मध्यमवर्गीय कूपमंडुकोपनिषद !!
अनादी, अनंत कालापासून मध्यमवर्गाला स्वतःच्या सामाजिक स्थानाविषयी फाजील अहंकार असून , त्याला खतपाणी घालून जोपासण्याचे काम महाराष्ट्रात म्हणजेच पुण्यात लेखनकला अस्तित्वात आल्यापासूनच जोमाने सुरु आहे. सर्वप्रथम त्यांनी ठरवून टाकले की त्यांची भाषा अमृताशीही पैजा जिंकते. ही अमृता कोण आहे आणि तिच्याशी पैजा जिंकल्याने मराठी भाषा श्रेष्ठ कशी काय ठरते ते मात्र कुणालाच ठाऊक नाहीये. महाराष्ट्रातले "पुणे" हे शुद्ध तुपातल्या मराठीच्या प्रवाहाचे उगमस्थान असून तो प्रवाह आता सरस्वती नदीप्रमाणे गुप्त झाल्याचीही वदंता आहे. मध्यमवर्गीय मूल्ये सर्वश्रेष्ठ असणे हे तर अध्याहृतच आहे.
- Read more about मध्यमवर्गीय कूपमंडुकोपनिषद !!
- 32 comments
- Log in or register to post comments
- 19200 views
मोकळेपणा...
काल माझ्या मुलीने तिच्या क्लासला दांडी मारली आणि माझ्या देखत तिच्या बाईंना फोनकरून सांगितले. बाईनी तिला कारण विचारले तेव्हा ती अत्यंत सहज म्हणाली, "अहो मॅडम, माझे पिरीयडस् आले आहेत आणी पोट खुप दुखतंय." मला त्या संवादातल्या सहजतेची आणि मोकळेपणाची ( किंचित हेवा आणि) खूप गंमत वाटली. तिचे पिरीयडस् चालु झाले तेव्हा १ल्यांदा तिने अगदी आनंदात मलाच सांगितले होते.
पुरुषांच्या लैंगिक जीवनाबद्दल असा मोकळेपणा मला आजतागायत दिसला नाही. कधी मित्रांनी wetdreams किंवा हस्तमैथुनाबद्दल बोललेले आठवत नाही. पुरुषांची लैंगिक अभिव्यक्ती कायम vulgar स्वरूपातच का बाहेर पडते?
- Read more about मोकळेपणा...
- 65 comments
- Log in or register to post comments
- 50531 views
खेळांतली अनिश्चिती
Taxonomy upgrade extras
हा विषय कित्येक दिवस डोक्यात असला तरी सध्या IPL T20 निर्वाणीच्या अवस्थेत असल्यामुळे त्याबद्दल लिहायचं ठरवलं. लिहीत असताना तो किती जगड्व्याळ आहे हे लक्षात यायला लागलं, पण तरीही सुचतील तसे काही मुद्दे मांडतो.
- Read more about खेळांतली अनिश्चिती
- 29 comments
- Log in or register to post comments
- 13409 views
अणूउर्जा - दोन परस्परविरोधी भूमिका
१७ मेच्या लोकसत्ताच्या अंकात राजीव साने यांचा चेटकीण ठरवलेली अणुऊर्जा हा लेख प्रकाशित झाला. त्यात आणि एका पत्रात असलेल्या मुद्द्यांचा प्रतिवाद आजच्या लोकसत्तामध्ये 'गैरप्रचाराचे अणू..' ह्या शीर्षकाखाली प्रकाशित झालेल्या प्रदीप इंदुलकर यांच्या लेखात आहे. इंदुलकरांचा दावा असा आहे की राजीव साने यांच्यासारखे लोक अवैज्ञानिक विधानं करून धूळफेक करत आहेत.
- Read more about अणूउर्जा - दोन परस्परविरोधी भूमिका
- 8 comments
- Log in or register to post comments
- 6303 views
ज्योतिष
Taxonomy upgrade extras
* लेख अत्यंत विस्कळीत आहे.
- Read more about ज्योतिष
- 58 comments
- Log in or register to post comments
- 53941 views
आल, संदीप आणि गोर्बी.
पब्लिकच्या इच्छेचा आदर करून हा वेगळा धागा सुरू करीत आहे. संदर्भ http://aisiakshare.com/node/1820.
वासलेकर म्हणतातः
"मी 1991 मध्ये जानेवारीत मॉस्कोला मिखाईल गोर्बाचोव्ह हे सोव्हिएत युनियनचे राष्ट्रपती असताना त्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा अनेक देशांचे नेते त्यांच्याशी केवळ हस्तांदोलन करण्यासाठी धडपडत होते. त्यात अमेरिकेचे आल्बर्ट गोर हेही होते."
ह्यावरून मला ह्या वेळी काय डायलॉग झाला असेल ह्याची कल्पना करता येते.
संदीप आणि गोर्बी ह्यांची भेट आधीच कन्फर्म्ड असल्यामुळे हॉटेल मस्क्वामधील आपल्या नेहमीच्या गार्डन स्वीटमधून संदीप झपाझपा पावलं टाकत लॉबीमध्ये उतरतात. पोर्चमध्ये क्रेमलिनचा झेंडा फडकवणारी गाडी तयारच असते. कॉन्सिअर्जनं अदबीनं दार उघडल्यावर संदीप मागच्या सीटवर बसतात आणि डौलदार वळण घेऊन गाडी क्रेमलिनकडं निघते. तेथे पोहोचताच झपझपा पावलं टाकत आणि आसपासच्या फ्लंकीजचे नमस्कार अॅक्नॉलेज करत संदीप गोर्बीच्या ऑफिस स्वीटपर्यंत पोहोचतात. तेथे अनेक राष्ट्राध्यक्ष आपल्याला आत जाऊ दे ना असं काकुळतीनं दारावरच्या गार्डांना विनवीत उभे असतात. तिसर्या जगातले काहीजण गार्डांच्या हातात डॉलरबिलं सरकवण्याचाहि प्रयत्न करतांना दिसतात. त्यांच्याकडं दुर्लक्ष करीत संदीप आत शिरणार एवढ्यात त्यांना गर्दीत आल (गोर, आलं लक्षात?) दिसतो. घामाघूम झालेला बिचारा आल केवळ साधा उपराष्ट्राध्यक्ष असल्याने त्याला राष्ट्राध्यक्षांच्या रांगेतहि उभं राहून दिलेलं नसतं. आता डायलॉगः
संदीप - हाय आल, इकडे कुठं?
आल - अरे ही राष्ट्राध्यक्षांची परिषद गोर्बीनं बोलावलीय ना. खरा बिलच यायचा. पण त्याची आणि मोनिकाची आधीच गुप्त भेट ठरली होती. तिकडं कसं जाता येणार म्हणून बिचारा तळमळत होता. मग मीच त्याला म्हटले, अरे बाळा, दोस्त कशासाठी असतात? मी जातो तुझ्या जागी. म्हणून निघालो पण निघण्याच्या घाईत इन्विटेशन बरोबर ठेवायचं विसरलो. आता हे गार्ड लोक म्हणतायत की तुम्ही आत जायला सायबांची परमिशन नाही. परत गेल्यावर मी बिलला काय सांगू?
संदीप - अरे आल, तूच म्हणालास ना की दोस्त कशासाठी असतात? चल माझ्याबरोबर आत. माझी गोर्बीबरोबर सोवियट युनिअनमधील ताणतणाव कसे कमी करता येतील ह्याबद्दल आताच मीटिंग आहे. तूहि चल आत दोन मिनिटं.
आल - आलो अस्तो रे पण गोर्बीला आवडेल का? हे रूस्की प्रोटोकोल फार मानतात ठाऊक आहे ना?
संदीप - डोंच्यू वरी. गोर्बी माझा शब्द मानतो. परवाच त्याला एका अमेरिकनानं काही हजार डॉलर्सना गंडा घातला आणि मीच ते पैसे त्याला परत मिळवून दिले. माझ्या शब्दाच्या बाहेर नाही तो.
(दोघेही आत शिरतात. अर्थात ह्या वेळी केजीबीचे दारावर बसलेले कर्दनकाळ गार्ड अजिबात विरोध करत नाहीत. उलट दोघांसाठी अदबीनं दार उघडून धरतात. आत शिरताच -)
गोर्बी - दब्रो पज्झालवात, झ्द्राव्त्वुइ, संदीप, काक दिला? आणि हे काय, आल पण? हौडी आल? (गोर्बीला अमेरिकेचं फार प्रेम आहे आणि आपण अगदी अमेरिकन इंग्लिश बोलतो असं त्यानच संदीपला पूर्वी एकदा सांगितलं होतं त्याची संदीपला आठवण येते. तो मनातच हसतो.)
आल - गुड मॉर्निंग तवारिश प्रित्सिदात्येल! ग्रीटिंग्ज फ्रॉम बिल.
असा थोडा गुडीगुडी डायलॉग काही मिनिटं चालतो. गोर्बीचा वेळ महत्त्वाचा आहे हे संदीपला माहीत आहे. फॉर्मॅलिटी पुरी झाल्यावर तो आलला हलकेच मानेने खूण करतो. आलचंहि काम झालेलं असतंच. दोघांचाहि निरोप घेऊन तो आनंदानं बाहेर पडतो. जाताजाता संदीपच्या कानात हलकेच 'पुढच्या वेळी वॉशिंग्टनला आलास म्हणजे एक डिनर टिपर आणि माझ्याबरोबर करायचीय हे लक्षात ठेव' असं सांगायला विसरत नाही. तो बाहेर गेल्यावर संदीप आणि गोर्बी सोवियट युनिअनमधलं टेन्शन कसं कमी करायचं ह्या महत्त्वाच्या विषयाकडे वळतात.
- Read more about आल, संदीप आणि गोर्बी.
- 15 comments
- Log in or register to post comments
- 16403 views
एकावे ते नवलच....
नुकताच आशा आणि आशोकचा विवाह झाला होता,आशोकचे आईवडील लहानपणी वारले होते,त्याला चुलता चुलतीने वाढवले होते, मोठा झाल्यावर त्याचा मामाच्या मुलीशी लग़्न करायचे ठरले होते.
लग़ना नंतर लग़ेच आशाला दिवस ग़ेले,
मुलग़ा झाला पण दुसर्या मुलांची आपेक्षा मावळली,डाँक्टरने काही शारीरीक व्याधीमुळे दुसरे मुलं होऊ शकत नाही म्हणाले. मुलग़ा एक वर्षाचा झाला,दुसर्या मुलाच्या आपेक्षेने आशोकला कसे कसे वाटु लाग़ले, म्हणुन चुलत्याला सांग़ितले.
चुलत्याने त्याचा सांसरा त्याचा मामाच्या कानावर घातले,मामा मामीने तोडग़ा म्हणुन घरी आसलेली अपंग़ मुलग़ी निशा शी यादी पे शादी करुन द्यायचे ठरवले .
- Read more about एकावे ते नवलच....
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3826 views
२०१४ लोकसभा निवडणुका: पर्याय व अंदाज (भाग - १)
- Read more about २०१४ लोकसभा निवडणुका: पर्याय व अंदाज (भाग - १)
- 18 comments
- Log in or register to post comments
- 17732 views
खेड्याकडे चला..
Taxonomy upgrade extras
खुप दिवसानी राजेश आपल्या ग़ांवी आला होता,ग़ांव सोडुन त्याने तब्बल पाच वर्ष झाले होते,आता तो शहरात राहुन तो शहरी झाला होता,आता ग़ावात त्याच्या भावाचे घर होते, तो त्याच्याच घरी आला होता.
भाऊ शेती करुन आपले पोट भरत होत.
त्याला दोन मुलं होती.घरी येताच घरची परस्थिती पाहुन खुप दु:खी झाला आणि आपला भाऊ रमेशला म्हणाल,' हे काय घर आजुन जसेच्या तसे,मला वाटले थोडीतर प्रग़ती झाली आसेल तुझी?'
'आता खेड्यात कसली प्रग़ती हुत्यायं,खायला मिळाले तर खुप झाले',रमेश म्हणाला,
'आसलं जग़ंन काही बरे नाही,'राजेश म्हणाला,
'मग़ काय करु म्हणतोस',रमेश वैताग़ुन म्हणाला,
- Read more about खेड्याकडे चला..
- 2 comments
- Log in or register to post comments
- 7877 views
शेटजी
संजय हा शेटजीचा वफादार नोकर होता, त्याने शेटजीजवळ सुमारे दहा वर्ष सेवा देत होता.शेटजीचा त्याच्यावर विश्वास होता पण त्याचा विश्वास शेटजीवर नव्हता. पण तो शेटजीशी व्यवाहारानी वाग़त, शेटजीचा व्यवसाय चांदीचा होता.तेथे संजय हीशोब पाहत आसे,एक एक पैशाचा हीशोब शेटला देत आसे.
काही दिवसानी संजयला आपला ही धंदा आसावा आसे वाटत होते.पण पैशाच्या कमी पणामुळे तो काही करत नव्हता.
एकदा सुट्टीच्या दिवशी संजय आपल्या पत्नी सोबत जेवत होता,
पत्नीने विचारले,' खुप शांत आहात, काही झाले का?'
'हो , मी तसा बरा आहे पण मला वाटतं आपण कीती दिवस शेट जवळ काम करायचे',संजय म्हणाला,
- Read more about शेटजी
- 4 comments
- Log in or register to post comments
- 4340 views