Skip to main content

पुस्तकः लिटररी कल्चर्स इन हिष्ट्री- रीकन्स्ट्रक्शन्स फ्रॉम सौथ एशिया

Taxonomy upgrade extras

लिटररी कल्चर्स इन हिष्ट्री- रीकन्स्ट्रक्शन्स फ्रॉम सौथ एशिया नामक जगड्व्याळ पुस्तक वाचायला घेतले. ब्रिटिशपूर्व काळातील भारतीय उपखंडातल्या साहित्य प्रसवणार्‍या विशिष्ट संस्कृती कुठल्या, त्यांची मूल्ये कोणती, व्हर्नाक्युलर अन कॉस्मॉपॉलिटन भाषांशी त्यांचा संबंध कसा इ.इ.इ. असंख्य विषयांचा परामर्श घेतलेला आहे. प्रत्येक भाषेला एकेक प्रकरण आहे. मराठी, ओरिया, पंजाबी अन काश्मिरी वगळल्यास सर्व मुख्य भाषा कव्हर केल्यात-अगदी नेपाळ, तिबेट आणि लंकेसकट. त्यातले कन्नड साहित्याचे प्रकरण नुकतेच काहीसे वाचले. धाग्यात उल्लेखिलेल्या नागराज यांनीच ते प्रकरण लिहिले आहे.

पिशी डाकिनी संस्कृतमग्ना (कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांच्या पिशी मावशीच्या काही कवितांचा संस्कृत भावानुवाद)

स्वीय-प्रस्तावना: अनुवाद
कितेक दशकांच्या झोपेतुन, बहुदशकानां गभीर शयना-
पिशी मावशी जागी झाली, दुत्थिता हि डाकिनी पिशी सा।
जागी होऊन हर्षोन्मीलित मृतयोन्यामप्यमृततत्त्वा-
रसिक-हृदातून पिंगा घाली।।१।। दमृतवाण्या पुनर्मिलति सा।।
.
अफाट प्रतिभेच्या अर'विन्दा'- शोभनार’विन्दा’कार-चितौ

प्राचीन भारत आणि प्रकाशाचा वेग.

प्राचीन भारत आणि प्रकाशाचा वेग.

असा दावा बर्‍याच जागी पाहावयास मिळतो की वेद आणि एकूणच प्राचीन भारतीय ग्रंथांमधून असे अनेक पुरावे आढळतात ज्यानुसार असे म्हणता येते की अन्य जगाला बरेच नंतर मिळालेले ज्ञान आपल्याकडल्या ऋषिमुनि आणि चिंतकांनी आधीच शोधून काढले होते. असाच एक दावा माझ्या वाचनात अलीकडेच आला, ज्यानुसार प्राचीन भारतीयांच्या स्मृतीमध्ये प्रकाशकिरणांच्या वेगाचे जे ज्ञान होते ते जवळजवळ आजच्या आकडयाशी तुलना करता येण्याइतके अचूक होते. प्रकाशाला मोजण्यायोग्य वेग असतो हेहि त्यांना माहीत होते हे ओघानेच आले.

ऋग्वेद १.५०.४ असे म्हणतो:

ह्याचे ग्रिफिथकृत भाषान्तर असे आहे:
Swift and all beautiful art thou, O Surya, maker of the light, Illuming all the radiant realm. (मराठीमध्ये भाषान्तर: ’हे प्रकाश उत्पन्न करणार्‍या सूर्या, विश्व प्रकाशमान करणारा तू वेगवान् आणि शोभन आहेस.’)

ह्यावर सायणाचार्यांचे (१३१५? - १३८७) सायणभाष्य असे आहे:
तथा च स्मर्यते - योजनानां सहस्त्रं द्वे द्वे शते द्वे च योजने। एकेन निमिषार्धेन क्रममाण नमोऽस्तुते॥

मराठी भाषान्तर: ’असे आठवणीत आहे - (हे सूर्या), एका निमिषार्धात २२०२ योजने चालणार्‍या तुला नमन असो.’ (सायणाचार्यांनी हा श्लोक कोठून घेतला हे स्पष्ट लिहिलेले नाही, केवळ हे आठवणीत आहे - त्यांच्या किंवा एकूण collective memory मध्ये - इतकेच लिहिले आहे असे दिसते.)

जालावर शोध घेतला तर अशी अनेक संस्थळे सापडतील जेथे सायणाचार्यांच्या ह्या विधानावरून असा तर्क बांधण्यात आला आहे की प्राचीन भारतीयांना प्रकाशकिरणांचा वेग काय असावा ह्याबाबत काही माहिती होती आणि ती ह्या श्लोकात निबद्ध आहे. तसेच प्रकाशवेगाचे प्राचीन भारतीयांना समजलेले मान सध्याच्या सेकंदाला सुमारे १८६००० मैल अथवा ३००००० किमी अंदाजे ह्याहून फार भिन्न नव्हते. उदा. ह्या संस्थळानुसार ते मान २८४८८३.७५ किमी इतके होते आणि ते सध्याच्या संशोधनाहून फार वेगळे नाही.

त्याच संस्थळात ह्या विधानाची उपपत्ति अशी दिली आहे. पुराणांमधील कोष्टकाने १५ निमिष = १ काष्ठा, ३० काष्ठा = १ कला, ३० कला = १ मुहूर्त आणि ३० मुहूर्त = दिवसरात्र = २४ तास. अर्थात् २४ तास = ८६४०० सेकंद = ४०५००० निमिष किंवा १ निमिष = ०.२१३३३.. सेकंद अथवा १६/७५ सेकंद. ’वैदिक अर्थशास्त्रा’प्रमाणे १ योजन =८.६२५ मैल अथवा १३.८ किमी. १/२ निमिषात २२०२ योजने म्हणजे १ सेकंदात २८४८८३.७५ किमी. हा अंदाज सध्याच्या २९९७९२ (आधार विकिपीडिया) ह्या आकडयाहून फार दूरचा नाही.

हे इतक्या सहजपणे मान्य करण्यात मला काही अडचणी दिसत आहेत. एकतर सायणाचार्यांनी दर्शविलेला श्लोक सूर्याच्या गतीबद्दल दिसतो, सूर्यकिरण अथवा प्रकाशकिरण ह्यांच्या गतीबद्दल नाही. पण ही अडचण दूर करणे तितकेसे अवघड नाही. भारतीय ज्योतिर्गणितानुसार सर्व ग्रह - सूर्य हाहि एकच ग्रहच मानला आहे - एकाच गतीने प्रवास आपापल्या कक्षांमधून प्रवास करीत असतात आणि ही गति सुमारे दिवसाला ११८५८.७५ योजने प्रतिदिवस आहे. (दीक्षितकृत ’भारतीय ज्योतिषशास्त्राचा इतिहास’ - पृ.३१७) भास्कराचार्यांच्या गणिताध्यायातील ’कक्षाग्रहानयन’ विभागातील ६ व्या श्लोकात हेच मान दर्शविले आहे. अर्ध्या निमिषाला २२०२ योजने ह्या गतिमानाहून हे फारच कमी आहे. तेव्हा श्लोकात दाखविलेले मान आणि ज्योतिर्गणितात मानलेले मान ह्यांमध्ये फारच मोठे अंतर आहे. ही अडचण दूर करण्याचा मार्ग म्हणजे श्लोकामध्ये उल्लेख जरी सूर्याचा असला तरी त्याचा रोख सूर्यकिरणांकडे आहे असे मानणे आणि सूर्यकिरणांचा वेग अर्ध्या निमिषाला २२०२ योजने असे समजणे.

अशी समजूत करून घेऊन ही छोटी अडचण जरी दूर केली तरी अजून नव्या अडचणी उभ्या राहात आहेत. ’निमिष’ आणि ’योजन’ ह्या दोन्ही कल्पनांना वर दर्शविलेल्या मानांहून अन्य माने इतर मान्यताप्राप्त ग्रंथांमधून दर्शविलेली आढळतात. आपण नक्की कोणते मान स्वीकारायचे?

वर दिलेले निमिषाचे मान निश्चित कोठल्या पुराणात आहे हे मला सापडू शकले नाही. तसेच ’वैदिक अर्थशास्त्र’ म्हणजे नक्की काय हेहि कळत नाही. कौटिल्यलिखित जे अर्थशास्त्र आपल्यासमोर आहे त्यात तरी मला ’निमिष’ म्हणजे किती असे काहीच दिसत नाही.

ह्याउलट ’निमिष’ ह्याच्या दोन वेगळ्या व्याख्या मला दिसतात. भास्कराचार्यांच्या गणिताध्यातील ’कालमान’ विभागात श्लोक १९-२१ येथील कोष्टक असे आहे:
१८ निमेष = १ काष्ठा, ३० काष्ठा = १ कला, ६० कला = १ मुहूर्त आणि ३० मुहूर्त = अहोरात्र. ह्यावरून ९७२००० निमिष = ८६४०० सेकंद अथवा १ निमिष = ०.०८८८... किंवा अंदाजाने ९/१०० सेकंद. वर दिलेल्या मानाच्या निम्म्याहूनहि हे लहान आहे.

अमरकोशातील कालवर्गामध्ये अजून निराळे कोष्टक दिले आहे. १८ निमिष = १ काष्ठा, ३० काष्ठा = १ कला, ३० कला = १ क्षण, १२ क्षण = १ मुहूर्त, ३० मुहूर्त = अहोरात्र. ह्यानुसार ५८३२००० निमिष = ८६४०० सेकंद, १ निमिष = ०.०१४८ सेकंद अथवा सुमारे १५/१०० सेकंद. हेहि निमिषाच्या १६/७५ ह्या मानाहून बरेच कमी आहे.

’योजन’ म्हणजे निश्चित किती ह्याबाबतहि असाच एकवाक्यतेचा पूर्ण अभाव आहे. लीलावतीप्रमाणे ४ हस्त = १ दण्ड, २००० दण्ड = १ क्रोश आणि ४ क्रोश = १ योजन. म्हणजे ३२००० हस्त = १ योजन. ’हस्त’ म्हणजे किती लांबी हे माहीत नाही पण १ हस्त = १८ इंच असे मानले तर १ योजन = ९.०९ मैल असे दिसते. १ हस्त = २४ इंच असे मानले तर १ योजन = १२.१२ मैल असे दिसेल.

प्राचीन भारतीयांनी प्रकाशाच्या वेगाचा विश्वसनीय अंदाज बांधला होता असा दावा मान्य करण्यासाठी इतक्या सगळ्या अनिश्चितता पचवाव्या लागतील.

असे अन्य काही डोळ्यात भरण्याजोगे दावे कोणास माहीत आहेत काय? अशा दाव्यांची एक जंत्री करणे हा एक मनोरंजक उद्योग ठरेल.

"कोकणस्थ"

"कोकणस्थ" सहकुटुंब बघुन आलो. माझी ठळक निरीक्षणे -

० "कोकणस्थ" हे नाव दिशाभूल करते
० नटसंच आणि गोखले कुटुंबाची राहणी कोकणस्थी जीवनशैलीशी विसंगत वाटली.
० माध्यमांनी केलेली प्रसिद्धीपूर्व टवाळी अवाजवी वाटली
० व्यवस्थेशी लढायचे असेल तर ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरांनी मतभेद मिटवायला हवेत - हा संदेश
० पैसे वाया गेले असे वाटले नाही.

ती नसताना मी जगतच कसा होतो?

ती आल्यावर असं वाटू लागलंय
की ती नसताना मी जगतच कसा होतो?

तिचं नसणं ती नव्हतीच तेव्हा जाणवायचं नाही फारसं,
खरंतर माहितीच नव्हतं
की आपल्यालाकडे काय नाहिये?
आपल्याला काय हवंय?

पण मग ती आली,
कधी? कशी?
कशामुळे?
काहिच कळलं नाही.
एखाद्या भिनत जाण्यार्‍या विषाप्रमाणे
किंवा चढत जाणार्‍या नशेप्रमाणे
अलगद
नकळत
पण निश्चितपणे!

पण आता ती आल्यावर
जितकं भरल्यासारखं वाटतंय
तितकंच
रिकामं, काहितरी राहिल्यासारखं,
तिला अजून आपलंस करायला हवं, जिंकायला हवं.

तसा तिला फार त्रास देतो मी
सतत कामाला लावतो,
वाट्टेल तेव्हा वाट्टेल ते मागतो,
अन् तीही काहिहि न मागता, न बोलता

बॉम्बे टॉकीज - कभी गम, कभी...?

चमकदार कथा लिहू शकणाऱ्या अनेकांची कादंबरी लिहिताना तारांबळ उडते. चित्रपटाच्या बाबतीतही असं होऊ शकतं. किंबहुना, सध्याच्या नव्या फळीत गणल्या जाणाऱ्या अनेकांच्या बाबतीत असं दिसतं की काही चमकदार कल्पना त्यांच्याकडे असतात; काही ते जगभरातल्या सिनेमातून उचलतात; पण सलग दीडदोन तासांचा सकस अनुभव देण्यात ते कमी पडतात. अशा वेळी चार दिग्दर्शक मिळून चार लघुचित्रपट करत आहेत आणि तेदेखील भारतीय सिनेमाची शंभर वर्षं साजरी करण्यासाठी हे कळलं तेव्हा थोडी आशा वाटली. कारण त्यातले किमान दोघं तरी वर दिलेल्या मर्यादांसकट काही चांगल्या क्षमता बाळगून आहेत असं मला अधूनमधून वाटत राहतं.

ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी

नमस्कार मंडळी. मी चित्रगुप्त...
आता या चित्रगुप्ताचा अध्यात्माशी काय संबंध? असे तुम्ही म्हणत असाल.

अहो, अध्यात्म म्हणजे आत्म्याचा ८४ लक्ष योनीतून होणारा प्रवास, आणि सरतेशेवटी लाभणारा मोक्ष. या सर्वांचा लेखा-जोखा ठेवणारे तर आम्हीच ना!...पण आता या सर्व उचापतींचा हिशेब लिहून लिहून आमचं कंबरडं पार मोडलय. निवृत्त होऊन या केंव्हा या कटकटीतून मुक्त होतोय, असं झालंय...

स्वखुशीने गृहिणीपण

Taxonomy upgrade extras

चेतन भगतला थोर समजणारे लोक इथे फार लिहीत असतील असं वाटत नाही. पण त्याच्या लिखाणावर टीका करणारा हा मजेशीर लेख सापडला; तो दाखवण्यालायक वाटला. रिचा झा नामक ब्लॉगरने लिहीलेला आहे.

या लेखासंदर्भात माझे काही विचार:

१. चेतन भगत सुमार लेखक/विचारांचा आहे.