Skip to main content

….ब्रह्मराक्षस

संध्याकाळी जेंव्हा केंब्रीज स्टेशनला मी रेल्वेगाडीत बसले तेंव्हा खूप खुशीत होते. दिवस अतिशय छान गेला होता. सकाळी गाडीतून उतरले तेंव्हा गिरीश स्टेशनवर घ्यायला आला होताच. त्याच्या घरी जाता जाता वाटेत स्टीफन हॉकिंगचे ऑफीस, हेनरी कॅवनडीशची लैब असं करत करत आम्ही घरी पोहोचलो. घरी सुमाने आणखी मोठा स्वागतसमारंभ आखला होता. पोटभर गप्पा आणि खाणे झाल्यावर पुन्हा आम्ही बाहेर पडलो. किंग्स कॉलेज, क्वीन्स कॉलेज, कॅम नदीवर पंटींग करणारे विद्यार्थी करत करत एका ऐतिहासिक कॅफेमध्ये थांबून छान कॉफी प्यायलो. सर्वच अनुभव अविस्मरणीय होते.

[श्रद्धांजली] गायला लावणारा अवलिया

आयुष्याला पूर्णत्व कशामुळे येत असावं...सर्वसाधारणपणे ९९ टक्के लोक उत्तर देतील की ध्येयपूर्तीमुळे, स्वप्नपूर्तीमुळे. मला मात्र माझ्या आयुष्याचे पूर्णत्व अनेकदा घेतलेल्या दिव्यत्वाच्या अनुभूतीमध्ये आहे असे वाटते. ही दिव्यत्वाची अनूभुती मला अनेकांकडुन मिळाली. त्यातली एक महत्वाची व्यक्ती म्हणजे उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर म्हणजे आमचे छोटे उस्ताद.

माझ्या आयुष्यातले वसंत

सगळ्यात शेवटी भेटलेला वसंत हा माझा जुना कलीग. वसंत कुलकर्णी. अजूनही त्याचं वय माझ्या वयाच्या दुपटीपेक्षा जास्त आहे. पण वसंत हा तसा 'मैत्रीखोर' माणूस असल्यामुळे नवीनच आलेला पोस्टग्रॅडही वसंतला फार न घाबरता वसंत म्हणू शकतो. थोडा वातावरणाचाही भाग असावा. वसंत आणि त्याच्या दोन तृतीयांश वयाच्या त्याच्या आणि माझ्या, (म्हणजे मित्र माझेही) मित्रांच्या म्हणण्यानुसार मुलींशी मैत्री करण्यासाठी वसंत फार उतावीळ असतो. मागे एकदा म्हणे त्याच्याकडे समर स्टुडंट म्हणून काम करायला कोणीही मुलगी तयार न झाल्यामुळे त्याने एक टेप ड्राईव्ह असूयेचा अटॅक आल्यामुळे मोडला होता.

पुरेपुर कोल्हापुर

तीन दिवस कोल्हापुरमधे होतो. खास कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा व अजून कोल्हापुरी इतर वैशिष्ट्यां बरोबरच कोल्हापुरी खंग्री ऊनही अनुभवलं. कोल्हापुरी बार ने मात्र निराशा केली. ऊन अपघाताने अनुभवावं लागलं. मित्र म्हटला आज खारकांडाचा बेत करु या काय ? इथलं भारी असतंय. मी म्हटलं ओके. बीफ खाऊन मलाही महिना दिड महिना झाला होता. गंगावेशीतून रिक्षा केली. तो वडाप हिशोबाने तिथपर्यँत सोडत होता. पण आम्हाला स्टँडच्या पुढे जायचे होते. त्यामुळे त्याला मिटरची आँफर दिली. खुशीत त्याने आधी खालेल्या गुटक्याची उरली सुरली चोथा गोळी टाकून दिली आणि २० रुपये जादा पडतील म्हटला. कबूल झालो.

व्हिषाची परीक्षा

ग्रीष्मातल्या रणरणत्या धारोष्ण दुपारी अडीच वाजता मुंबईला, मध्यम ते हुच्च वर्गीय आबालवृद्ध जनता, चित्रविचित्र पोशाखात नटूनथटून पण करुण चेहेर्‍याने अमेरिकन व्हिसासाठी निमूट रांगेत उभे होते. कुठल्याही रांगेत उभे राहायची सवय नसलेली हुच्चभ्रू मंडळी गर्वहरण झाल्यागत चोरट्यासारखी बायोमेट्रिक उर्फ हातांचे ठसे देण्यासाठी पासपोर्ट व कागदपत्रांची चळत सांभाळत प्रतीक्षेत होती. अंकल सॅम प्रसन्न व्हावा म्हणून ते लोटांगण घालायलाही तयार होते. त्यात काहीजणांचे जन्मल्यापासून केवळ अमेरिकेला जाणे हेच जीवनाचे प्रयोजन असल्याने ते निव्वळ फॉर्म्यालिटी पूर्ण करायला आले होते.

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड
--------------------------
लेखात ८० पेक्षा जास्त फोटू असल्याने ते सगळे मी येथे टाकू शकलो नाही. ( सवडीने टाकेन )
छायाचित्रांसह येथे वाचता येईल.
-------------------

कुतूहल हि खरच अजब चीज आहे. त्याच कुतूहलापोटी कुठे जाऊन काय बघायला किंवा अनुभवयाला मिळेल याची शाश्वती नाही. कुठेतरी डोंगररांगात माणसाचा थांगपत्ता नसलेल्या ठिकाणी जाऊन काही अदभुत अश्या गोष्टी आपण पाहतो. तेव्हा त्या गोष्टी आपल्या डोळ्यांमध्ये आणि मनामध्ये साठवून ठेवण्यापलीकडे आपल्या हाती काहीच उरत नाही.

पंडिता रमाबाई आणि अमेरिकन रमाबाई असोसिएशन भाग २.

रमाबाई अमेरिकेत प्रथम फेब्रुवारी १८८६ साली आल्या तेव्हा त्यांचा विचार तेथे काही महिने राहण्याचा होता पण प्रत्यक्षात तो मुक्काम नोवेंबर १८८८ पर्यंत वाढला. (ह्या काळात मनोरमेला शिक्षणासाठी त्यांनी ब्रिटनमध्ये वॉंटेजमधील सिस्टर्सकडे पाठवून दिले.) ब्रिटनपेक्षा अधिक मोकळे आणि आपल्या विचारांशी जुळते असे वातावरण अमेरिकेत आहे अशी त्यांची धारणा झाली. सिविल वॉर नुकतेच संपलेले होते आणि कृष्णवर्णी जनता कायद्याने गुलामगिरीच्या जोखडामधून मोकळी झालेली होती. विशेषत: अमेरिकेच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये कृष्णवर्णीय जनतेला समान हक्क मिळवून देणे - (abolitionist), स्त्रियांना समाजात पुरुषांबरोबरीचे स्थान देणे - (suffragettes), मद्यप्राशनविरोध - (temperance) अशा विचारांना बरीच सहानुभूति ख्रिश्चन विचाराच्या सुशिक्षितांमध्ये होती. अशा गटांमधून आपल्या इच्छित कार्याला चांगले पाठबळ मिळेल अशा विचाराने अमेरिकेतच अजून काही काळ राहण्याचे त्यांनी ठरविले. समविचारी स्त्रीपुरुषांच्या गटांपुढे हिंदुस्तानातील विधवांचा प्रश्न मांडून त्यांच्याकडून साहाय्य मिळविण्याच्या हेतूने त्यांनी गावोगावी दौरे काढून असे साहाय्य करू इच्छिणार्‍या लोकांचे गट - Ramabai circles - त्यांनी निर्माण केली. त्याच काळात A High-Caste Hindu Woman हे पुस्तक लिहून शिक्षणाचा अभाव, बालपणात लग्न, स्त्रियांचे आणि विशेषत: विधवांचे परावलंबी आणि निराश जिणे ह्या समस्या हिंदु समाजाला कशा विळखा घालून बसल्या आहेत ह्याचे विदारक चित्रण अमेरिकन समाजापुढे मांडले.

कवितास्पर्धेचा निकाल

गेल्या महिन्यात मी इथे जो एक कवितास्पर्धेचा प्रस्ताव मांडला होता, त्याचा हा निकाल. हा पूर्वीच जाहीर करायला हवा होता, पण कार्यबाहुल्यामुळे उशीर झाला याबद्दल क्षमस्व. स्पर्धेचे नियम थोडक्यात असे होते की नेमून दिलेल्या आठपैकी कोणतेतरी चार(च) शब्द कवितेत यायला हवेत, आणि कविता निकृष्ट असायला हवी.

एकूण आठ स्पर्धकांनी नऊ कविता पाठवल्या, त्यातल्या एकीमध्ये तसे चार शब्द आलेले नाहीत. बाकीच्या आठ कवितांत मिळून आलेल्या बत्तीस शब्दांची वाटणी अशी आहे:

हुरहूर आणि एकाकी (प्रत्येकी ६ वेळा), धुंद आणि कातरवेळ (प्रत्येकी ५ वेळा),