लॅपटॉप कुठला घ्यावा ?
Taxonomy upgrade extras
मला व माझ्या मित्राला एक 30-35 हजार पर्यँत बजेट असणारा लॅपटॉप घ्यायचा आहे. तर याबाबतची माहिती मिळविण्यासाठी ही चर्चा! ( यात किँमत , कुठे मिळेल , सुविधा , आपले अनुभव अपेक्षित)
- Read more about लॅपटॉप कुठला घ्यावा ?
- 19 comments
- Log in or register to post comments
- 15950 views
सर्वात "मका " भाकरी करा !
एकेदिवशी अखंड बडबड करून आणि फिदीफिदी हसून चंपाचे सर्व दात ठणकू लागले. तिने घराजवळचा एक दंतवैद्य गाठला. दंतवैद्य अगदी गोजिरवाणा ससा होता. त्याने गोग्गोड बोलून हिची दातखीळ बसवली. जबड्याला प्रथमच विश्रांती मिळाल्याने दात दुखायचे तर थांबलेच शिवाय शांतता म्हणजे काय याचा अनोखा अनुभव आला. चंपा गोजिरवाण्या सशावर लट्टू झाली अन् लटिकेच त्याला भेटू लागली. ससा मक्याच्या पीठाचा छुपा एजंट होता. गळाला लागलेल्या पेशंटला सर्वात "मका"चे सर्वेश्वरत्व जे जे जगी जगते तयांसाठी कसे आवश्यक आहे ते पटवून पाच किलोचं पाकीट त्याच्याकडे अलगद सरकवण्यात तो यशस्वी होत असे.
- Read more about सर्वात "मका " भाकरी करा !
- 21 comments
- Log in or register to post comments
- 17414 views
भंजाळलेल्या अस्मितांची दहशत आणि सेन्सॉरशिप
Taxonomy upgrade extras
प्रस्तुत लिखाणाला संदर्भ फेसबुकावरील एका चर्चेचा आहे. चर्चा एका बंद गटात (closed group) मधे झालेली असल्याने मुख्य चर्चेचे दुवे देता येणं कठीण आहे, परंतु थोडी पार्श्वभूमी देऊन, थोड्या लिंका पुरवून संदर्भ देईन म्हणतो.
- Read more about भंजाळलेल्या अस्मितांची दहशत आणि सेन्सॉरशिप
- 14 comments
- Log in or register to post comments
- 10173 views
कॉकटेल लाउंज : मॅन्गो मार्गारीटा
‘कॉकटेल लाउंज : ग्रीष्म लाउंजोत्सव' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे मॅन्गो मार्गारीटा
पार्श्वभूमी:
आपले गवि यांनी एकदा गोव्याला फिशरमन व्हार्फ मध्ये मॅन्गो मार्गारीटा ट्राय केली होती. त्याने तसे सांगितल्यापासून ते कॉकटेल एकदम मनात भरले होते. आमरस हा माझा जीव की प्राण! माझ्यासाठी, खाण्यात आमरसाचे जे स्थान तेच दारुमध्ये टकीलाचे आहे. त्यामुळे ह्या दोन्ही आवडीच्या गोष्टींचा संगम असलेले कॉकटेल तितकेच कातिल असणार ह्याची खात्री होती.
- Read more about कॉकटेल लाउंज : मॅन्गो मार्गारीटा
- 12 comments
- Log in or register to post comments
- 9290 views
विश्वरूपदर्शन - ३
वैश्विक प्रारणांचा नकाशा कसा वाचायचा आणि ही प्रारणं कशी तयार झाली हे पहिल्या दोन भागांमधे पाहिलं. कोबे, डब्ल्यूमॅप आणि प्लँकच्या नकाशांमधे आपसांत फार फरक नाही हे ही चित्रातून दिसतं आहे. मग मुळात कोबेनंतर आणखी कष्ट आणि पैसा खर्च करण्याचं कारण काय?
- Read more about विश्वरूपदर्शन - ३
- 17 comments
- Log in or register to post comments
- 25609 views
मानवी अनुभव
आम्ही दोघी सख्ख्या बहिणी. ती थोडी उजळ.मी सावळीच आहे.. एका उंच इमारतीत रहातो आम्ही. आई आमच्या लहानपणीच गेली. म्हणजे एक दिवशी रात्री ती जी बाहेर गेली ती परत आलीच नाही. मग आम्ही दोघीच उरलो एकमेकींना. एका घरी जास्त काळ नाही रहायचो. पण जेंव्हा भेटायचो तेंव्हा आमच्या चु(क्)चु(क) वाणीत भरपूर गप्पा मारायचो. मी जात्याच खोडकर होते. तरी बहीण नेहमी मला म्हणायची," तू बाई फार धोका पत्करतेस. एकदिवशी जीवावर बेतेल तेंव्हा समजेल." पण मला आवडायच्या खोड्या काढायला!
- Read more about मानवी अनुभव
- 12 comments
- Log in or register to post comments
- 11546 views
सचिवालय ते मन्त्रालय.
Taxonomy upgrade extras
नुकताच यूट्यूबवरून 'उंबरठा' हा स्मिता पाटील ह्यांची उत्तम भूमिका असलेला १९८१ साली पडद्यावर आलेला चित्रपट पाहिला आणि त्यातील 'सचिवालय' हा शब्दप्रयोग ऐकून विचारांची साखळी निर्माण झाली ती पुढीलप्रमाणे.
मुंबईतील 'मन्त्रालय' हा शब्द आता आपल्या चांगलाच परिचयाचा झाला आहे. 'Secretariat' ह्या इंग्रजी शब्दाचा समानार्थी म्हणून तो सर्रास महाराष्ट्रात वापरात आहे, इतका की १९७०-७५ नंतर जन्मलेल्या मराठी व्यक्तीला 'सचिवालय' म्हटले की त्याचा अर्थ काय असा प्रश्न पडावा. जालावर घेतलेल्या शोधानुसार नेपाळमध्येहि 'मन्त्रालय, हा शब्द 'सचिवालय' ह्याच अर्थाने वापरला जातो. अन्यत्र मात्र 'सचिवालय' हाच शब्द अजूनहि रूढ आहे. दिल्लीतील Central Secretariatला 'केन्द्रीय सचिवालय' असेच म्हणतात, 'केन्द्रीय मन्त्रालय' नाही. दिल्लीतील UPSC कडून भरती केल्या जाणार्या एका सेवेचे नाव 'केन्द्रीय सचिवालय सेवा' असे आहे. दिल्लीच्या सरकारी भाषेत 'मन्त्रालय' म्हणजे 'Ministry', जसे की गृह मन्त्रालय म्हणजे Home Ministry, वित्त मन्त्रालय म्हणजे Finance Ministry इत्यादि.
माझ्या आठवणीप्रमाणे मुंबईत 'सचिवालया'चे 'मन्त्रालय' १९८४-८५ च्या सुमारास झाले असावे. मन्त्री सचिवालयात कसे बसतील, सचिवांनी मन्त्र्यांच्या आलयात बसले पाहिजे असा काहीसा 'प्रोटोकोली' विचार काही राजकीय नेत्यांच्या मनात आला. मन्त्रिन् + आलय ह्याचा सन्धि 'मन्त्र्यालय' होईल असे वाटते. पण हा शब्द तर सर्वसामान्यांना उच्चारायला फार अवघड. ह्यावर तोडगा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांनी सुचविला. 'मन्त्र' म्हणजे 'सल्लामसलत', 'advice'. अशा 'मन्त्रा'चे जेथे आदानप्रदान होते ती जागा म्हणजे 'मन्त्रालय'असा तोडगा त्यांनी सुचविला आणि तो मान्य होऊन राजकीय नेत्यांची रुखरुख दूर झाली असे ह्या संदर्भात त्या काळी वाचल्याचे स्मरते.
ह्यावर अजून काही माहिती असल्यास वाचायला आवडेल.
- Read more about सचिवालय ते मन्त्रालय.
- 19 comments
- Log in or register to post comments
- 14336 views
ब्राह्मण्यमापक, विद्रोहमापक, दालित्यमापक, माराठ्यमापक वगैरे
'आमचा ब्राह्मणांना विरोध नाही तर ब्राह्मण्याला विरोध आहे' हे आपल्याला अनेक ठिकाणी ऐकायला, वाचायला मिळतं. माणूस वेगळा आणि दुर्गुण वेगळे हे तत्व आम्हांस फारच आवडलं. माणूस हा सगुण, साकार, सवर्ण असतो, तर त्याचे दुर्गुण हे निर्गुण, निराकार, आणि वर्णहीन असतात. आपल्या परमपूज्य हिंदू संस्कृतीत शरीर हे आत्म्याच्या वस्त्राप्रमाणे मानलेलं आहे. शरीर नाशवंत - आत्मा अविनाशी. शरीर दृश्य तर आत्मा अदृश्य. 'नैनं छिंदन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः' असं आत्म्याबद्दल प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णानेच म्हणून ठेवलेलं आहे. आत्मा अमर आहे. एका शरीरातून दुसऱ्या शरीरात त्याचा अनादी अनंत काल प्रवास चालू असतो.
- Read more about ब्राह्मण्यमापक, विद्रोहमापक, दालित्यमापक, माराठ्यमापक वगैरे
- 35 comments
- Log in or register to post comments
- 15709 views
दलितांना प्रश्न
Taxonomy upgrade extras
आजच्या लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत ' दलितांनी कोषातून बाहेर यावे' हा नरहर कुरुंदकरांचा १९६९ साली लिहिलेला लेख पुनर्मुद्रित केला आहे. बाबासाहेबांची आज जन्मतिथी. त्या निमित्तानेच हा लेख लोकसत्ताने छापला आहे.
http://epaper.loksatta.com/105713/indian-express/14-04-2013#page/23/1
- Read more about दलितांना प्रश्न
- 13 comments
- Log in or register to post comments
- 11619 views
रोमन इतिहासास..
मध्यंतरी इटलीला जाऊन दांते, मेकीयाव्हेली, मायकेल अज्नेलो, गलिलिओ ह्यांची टोंब्ज आणि त्यांची कला-ज्ञानसाधना 'याची देही..' बघून आलो. वसंत बापटांचं मायकेल अन्जेलोपनिषद इथे अष्टसात्त्विक भाव जागृत होऊन अनुभवलं ! अलौकिक..!! रोममध्ये भटकताना रोमन साम्राज्याचा व ज्युलियस सीझरचा इतिहास पुलंच्या 'हरीतात्यां'च्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहिला...!
प्रबोधनाच्या देशात जाऊन आल्यावर मर्यादा झिडकारून देण्याचं बळ मिळावं इतकं स्थानमाहात्म्य इथे आजही आहे.. असो..!
त्यानिमित्ताने काही स्फुरलं..ते लिहिलंय..:
----------------------------------
- Read more about रोमन इतिहासास..
- 7 comments
- Log in or register to post comments
- 5962 views