Skip to main content

अमेरिकन अर्थव्यवस्थेतील फेडरल रिझर्व्ह पुरस्कृत बुडबुडा फुटण्याचा इशारा

रोनाल्ड रेगन यांच्या कारकीर्दीत बजेट डायरेक्टर या पदावर काम केलेल्या श्री. डेव्हिड स्टॉकमन यांनी अमेरिकन फेडरल रिझर्व्हने अर्थव्यवस्थेत भरपूर पैसा ओतून एक बुडबुडा निर्माण केला आहे आणि तो लवकरच फुटेल असा इशारा दिला आहे.
२००८ च्या संकटानंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी क्युईच्या नावाखाली पैसा छापून तो अर्थव्यवस्थेत ओतण्यात आला. त्याने शेअर बाजारात तेजी आली असली तरी मुख्य अर्थव्यवस्था (Main Street Economy) कमजोरच राहिल्याने ह्या अतिरिक्त पैशाने अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य

ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य

( हे छायाचित्र स्पष्ट दिसत नसेल तर ह्या दुव्यावर टिचकी मारा. Photo Link )

हीच ती वेळ ...आणि हीच ती जागा ...( जेव्हा मी हे छायाचित्र टिपले आणि ) जेव्हा माझ्या मनात आले कि ST चा लाल डबा म्हणजे खरच जगातले १० वे आश्चर्य असावयास हवे.

नैतिकतेचा ब्रह्मघोटाळा

Taxonomy upgrade extras

नैतिक पेचप्रसंग उभे करणारे काही प्रसंग जालावर डॉ खरे ह्यांच्या मिसळपावावरील लिखाणात वाचले. पदवीदरम्यान असलेल्या principles of ethics and cyber laws ह्या विषयाची मग आठवण झाली. त्यात चित्रविचित्र किस्से, निर्णयक्षमतेची कसोटी पाहणारे प्रश्न असत. त्यातली आमची उत्तरे व्यक्तिसापेक्ष बदलत. आम्ही उत्तरे काहीही दिली तरी चालत; पण योग्य ते जस्टिफिकेशन आम्हाला देता येते आहे की नाही; हे पाहिले जात.(वाद विवाद स्पर्धेप्रमाणे; कुठलीही बाजू मांडा; बक्षीस मिळू शकेल; पण तुमचा त्यातला अभ्यास दिसायला हवा.)
.

संत एकनाथांच्या रचना

काल एकनाथषष्ष्ठी म्हणजे संत एकनाथ महाराजांची पुण्यतिथी होती. त्यानिमित्याने त्यांच्या काही अप्रतिम रचनांचा थोडक्यात परिचय या लेखात करून देत आहे.

संत बहिणाबाईंनी आपल्या प्रसिध्द अभंगात म्हटले आहे, संतकृपा जाली | इमारत फळा आली ।।
ज्ञानदेवें रचिला पाया | उभारिले देवालया ।। नामा तयाचा किंकर | तेणे रचिले तें आवार ।।
जनार्दन एकनाथ | खांब दिधला भागवत ।। तुका जालासे कळस | भजन करा सावकाश ।।

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २०: उत्सव

या वेळचा स्पर्धेचा विषय आहे "उत्सव". रोजच्या जगण्यात धर्म, प्रांत, परंपरा किंवा इतिहास याप्रमाणे अनेक उत्सव माणूस साजरा करतो.. बरेचदा मला वाटतं उत्सव आपल्याला जगण्याचं बळ आणि आनंद देतात. उत्सव भारतीयच असावा असं काही बंधन नाही. उत्सव तुमच्या दृष्टिकोनातून कसा दिसला हे महत्त्वाचं. त्यातला उल्हास, वेगळेपण, रचना, रंग, उत्फुल्ल आनंद चौकटीत पकडण्याचा प्रयत्न करणारी छायाचित्रं आवडतील..
अनेक प्रांतातले / देशातले उत्सव बघायला आवडतील आणि ते धार्मिकच असावे असं काही नाही..थोडा अधिक पर्याय देऊ शकणारा विषय मांडावा असं वाटलं..

स्पर्धा का इतर?

प्लास्टिकची माती

'माती असशी मातित मिळशी' हे सर्व सजीवांना लागू पडतं. (अगदी एकजात सगळ्या सजीवांना, सर्वच बाबतीत लागू पडत नाही, पण बहुतांश...). प्रत्येकच जीवाचं शरीर खाऊ शकणारा, पचवू शकणारा दुसरा जीव असतो. एक जीव मेला की ताबडतोब त्याचं शरीर जीवाणू खाऊन टाकतात. त्या जीवाणूंवर जगणारे जीव, त्यांच्यावर जगणारे जीव असं वर वर जात अन्नाच्या साखळीत ते शरीर शोषलं जातं.

लोकसत्ताचा अग्रलेख दि.०१/४/२०१३

Taxonomy upgrade extras

पुरोगाम्यांच्या मुग गिळीबद्दलचा लोकसत्तातला सविस्तर ? अग्रलेख वाचला. कुबेर दादांनी लक्षीमनाला बळ देणार्या पित्त्यांविषयी परखड अवाक्षर न काढण्याची खबरदारी घेत दलित कार्यकर्त्यांच्या, पुरोगाम्यांच्या चळवळीला, चुळबुळीला खिजवी धाटणीचं आवाहन केलं आहे. पुरोगामी चळवळी विषयी प्रचंड दृढ झालेल्या समजाचेच हे फलित आहे. दलित नेतृत्वाची गत , पांढरी कापडं घालायची आणि त्याला माकड म्हणुन मिरवायचं ही निती यशवंतराव ते शरदराव सुप्पर डूप्पर हिट स्टाईल ने महाराष्ट्रात यशस्वी वाटचाल करत आली आहे. माने, लक्ष्मन ढोंबळे, ढसाळ, आठवले ही आजची ठळक उदाहरणं. आताचे ढोँबळेँ त्यांना अण्णा भाऊचे नाव घ्यायची मुभा आहे.

राजकीय पक्ष आणि संरचना

काल भाजपामधील नव्या अध्यक्षांनी आपली नवी 'टीम' घोषित केली. या निमित्ताने प्रत्येक पक्षातील अंतर्गत संरचना कशी असेल असे कुतूहल होते. थोडी शोधाशोध केल्यावर भाजपा, काँग्रेस आणि डाव्यांमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची रचना जशी माझ्या लक्षात आली तशी येथे देत आहे.

या धाग्यामुळे विविध बातम्यांत वेळोवेळी उल्लेख होणार्‍या पदांविषयी अधिक डोळस समज निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.
========================

भारतीय जनता पार्टी (भाजपा):