Skip to main content

आणखी एक टायटॅनिक-३

सत्तर ते ऐंशी अंशात कललेलं जहाज आता किनाऱ्याजवळ एका ठिकाणी येऊन स्थिर झालेलं. काही लोकं अजूनही जहाजावर होते.मेयर मेरीको पेल्लेग्रीनी आणि कोस्टाचा डॉक्टर दोघे मिळून सर्व लोकांना बाहेर पडण्यास मदत करत होते. मेरीकोला मदत करण्यात काही क्रू मेम्बर्स होते. थॉमस मेंडोसा या सफाई विभाग प्रमुखाने बऱ्याच लाईफ बोटी सोडण्यात मदत केली. पाण्यात पडून हायपोथर्मियाने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सॅन्डॉर फ्रेहर हा कोस्टाचा अजून एक बँड मेंबर, हा व्हायोलीन वाजवत असे. खोलीमध्ये असलेलं आपलं आवडतं व्हायोलीन घेऊन येण्याआधी त्याने शक्य तितक्या लहान मुलांना लाईफ जॅकेट चढवली. जहाजातून बाहेर पडणे तो जमवू शकला नाही.

काही जाहीर खरे आणि बरेचसे खाजगी खोटे

प्रास्ताविक: आज होळी. उद्या धूलीवंदन. जेंव्हा होळी ही शिमगा होती आणि धूलीवंदन ही धुळवड होती तेंव्हापासून आमचे हे आवडते सण. ’बेंबट्या,होळीत बोंबलावयास लाजणे यात पुरुषार्थ नाही. कोर्टात भांडण आणि तीर्थास मुंडण न लाजता करावे..’ असे धोंडो भिकाजी जोशांचे तीर्थरुप त्यांना सांगत असत. आमच्या लहानपणी शिमगा हा असाच न लाजता साजरा करायचा सण होता. गल्लीतल्या सार्वजनिक होळीत मनसोक्त बोंबलून जाले की दुसऱ्या दिवशी त्या होळीच्या राखेचा चिखल करुन त्याचे गोळे हातात घेऊन टवाळ कार्ट्य़ांची टोळी गावभर खंडणी मागत हिंडत असे.

'ध' चा 'मा'

आमची प्रेरणा:

सर्व ध्यानप्रेमींची व ध्यानपुरस्कर्त्यांची क्षमा मागून या लेखातील विमा ऐवजी ध्यान हा शब्द घालून लेखात काही सूक्त बदल केल्यास काय होईल, हे मांडण्याचा प्रयत्न. लेखिका व समस्त वाचक हा उपद्व्याप sportively घेतील अशी अपेक्षा. (वाचकांच्या सोईसाठी जे बदल केले आहेत ते तांबड्या अक्षरात लिहिले आहेत.)

ध्यान नव्हे, मनःशांती

GRACE: MAKING SENSE WITH NONSENSE

'ग्रेस हा अब्सर्ड कवी आहे.' आता हे विधान वाचताना वाचकाच्या मनात या वाक्याबद्दल अनेक प्रश्न उभे रहात असतील. म्हणून मी आधी अब्सर्ड या शब्दाची नीट व्याख्या करतो(?!?). अल्बर्ट कामूच्या अब्सर्डिस्ट तत्वज्ञानानुसार, अस्तित्वाचा अर्थ शोधणारं मन आणि कोणताच ठाम अर्थ नसलेलं निरर्थक जग यांच्यातल्या मुलभूत भेदामुळे अब्सर्ड मानसिकता तयार होते. संपुर्ण वास्तव हे एकमेकांशी जोडलेलं,एकमेकांवर आधारीत,सहसंबंधित किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या तर्कशात्रीय मांडणीत असतं का? याचं नक्की उत्तर अजुन देता आलेलं नाही. आपल्याला संपुर्ण वास्तवाचे ज्ञान आहे का? मानवीय दॄष्ट्या ते अशक्य आहे.

प्राध्यापकांचा संप

Taxonomy upgrade extras

रविवारी सुट्टी असल्यामुळे मी सकाळी उशीरा उठतो. आणि जनरल नाँलेज वाढवायच्या बळकट हुक्कीने टिव्हीतल्या बातम्या , टिव्हीतल्या बाईकडे कानाडोळा करत बघत राहतो, ऎकत राहतो. दर आठवडी हिशोबाने आज ही बातम्या ऎकल्या आणि सकाळ भल्तीच उदास झाली. आईशप्पथ चहापण घरात नाय पिलो थेट बाहेर जाऊन पिवून आलो. अठ्ठेचाळीस दिवस संपावर असलेल्या संपकरी प्राध्यापक वर्गाच्या टिव्हीवरच्या प्रतिनिधी दोन लेडीज प्राधायापक माऊल्या सगळ्यांच्या वतीने शासनाला न जुमानता आम्ही संपावर किती 'ठाम' आहोत हे मुठी वळवू वळवू सांगताना ऎकल्या पाहिल्या आणि जीव तिळ तिळ तुटला.

अलिकडे काय पाह्यलंत? - ४

दुसरा धागा बराच मोठा झाल्यामुळे तिसरा धागा सुरू करत आहे.
याआधीचे भाग:१ | २ | ३

ऊर्जेची गणिते ४: धोक्याची घंटा - १

कुठचीही थिअरी ही 'निव्वळ थिअरी' किंवा 'हायपोथिसिस' म्हणून सुरू होते. जसजसे तिच्या बाजूचे पुरावे मिळत रहातात तसतशी ती पसरत जाते. प्रथम तिचा पुरस्कार केवळ वैज्ञानिक वर्तुळात, तोही पुरस्कर्त्यांमध्ये होतो. जसजसे पुरावे वाढतात, तसतसे वैज्ञानिक वर्तुळातले विरोधक कमी होतात, आणि मान्य करणारे वाढतात. मग ती हळू हळू जनसामान्यांमध्ये पसरते. या पसरण्याच्या वाटेवर अनेक अडथळे असतात. काही रास्त असतात - म्हणजे त्या क्षेत्रातल्या ज्ञानी व्यक्तींची मान्यता मिळण्यासाठी ढीगभर पुरावे शास्त्रीय पद्धतीने गोळा करावे लागतात.

विश्वरूपदर्शन - २

भाग १

मागच्या भागात आपण बरीचशी चित्रं आणि थोडीशीच माहिती पाहिली. मुख्य म्हणजे नव्या आलेल्या नकाशात आपण आकाश कसं पहातो आहे हे पाहिलं. आता त्या चित्रातले रंग कसले आहेत, त्याचा अर्थ काय, आणि मुख्य म्हणजे त्या वैश्विक प्रारणांचा उगम कसा झाला त्याचा सर्वमान्य सिद्धांत इत्यादी गोष्टी थोड्या तपशीलात पाहू या. त्यासाठी आपण साधारण १३-१४ अब्ज वर्ष मागे प्रवास करू या. एवढ्या मागच्या भूतकाळात जाताना आपला आकारही फार लहान करावा लागणार आहे. आणि फक्त आकारच कमी करून पुरणार नाही. आणखी काय आणि का करावं लागेल ते ही सांगतेच.

विश्वरूपदर्शन - १

आजच सकाळी झालेला चॅट-संवादः

मी - पुढचे दोन-चार दिवस काल चर्चा करत होतो ती गोष्ट लिहीली का नाही विचारू नकोस.
मित्र - का? आता कुठे उलथणार?
मी - नाही रे. विश्वाचा नवीन नकाशा आलाय. त्याबद्दल आपल्याला अंमळ माहिती आहे याची जाहिरात नको करायला?
मित्र - च्यायला, म्हणजे आता जीपीएसमध्ये पुन्हा गोंधळ होणार... तुझ्याकडे यायला निघालो तर कदाचित वायोमिंगला पोचेन.
मी - एय्य!
मित्र - नकाशे बदलले, रस्ते बदलले, पूर्वीची गावं आता होती तिथे राहिली नाही....

असं काही झालंय का नाही हे वेगळं सांगायला नको. विश्वाचा नवा नकाशा कसा आहे हे काही गुपित वगैरे नाही. तेव्हा तो आधीच दाखवून टाकते.