"माझे विमान - "
ताई, कर ना लौकर घाई
विमान चालू करून देई -
चावी दे तू विमानाला
फिरवून आणिन मी तुजला !
खेळणी पसरली सगळीकडे
विमान सरकत नाही पुढे ,
भूभू, हत्ती, उंट नि घोडा -
विमान आले रस्ता सोडा !
विमान निघाले, हळूच ये ना
तायडे, खेळणी मोडतील ना...
विमान माझे छान किती
वाटत नाही आता भिती !
घेतला वेग विमानाने जरी
मधेच थांबले विमान तरी -
खुर्र्र... खुर्र... खट..गम्मत झाली
बघ ना ताई, चावी संपली !
.
- Read more about "माझे विमान - "
- 7 comments
- Log in or register to post comments
- 7993 views
राख आणि रक्षण...
तो श्रीमंत होता. तसा त्या नगरातील तो एकटाच, एकमेव श्रीमंत वगैरे नव्हता. पण इतरांच्या, विशेषतः चोर,गुंड ह्यांच्या डोळ्यांवर यावी इतकी संपत्ती तरी नक्केच बाळगून होता. तसंही संपत्ती बाळगून असायला काय जातय? ती त्यानं कमावलेली नव्हतीच. पडली होती आपली पिढीजात त्याच्याकडं. कधी योगायोगानं, कधी मेहनतीनं तर कधी चक्क पालथे,निंद्य उद्योग करुन त्याच्या पूर्वजांनी ती कमावली होती म्हणे.
- Read more about राख आणि रक्षण...
- 5 comments
- Log in or register to post comments
- 3361 views
आता सारंच कसं मृगजळापरी दुर्लभ...
ती त्याची असणं काय अन नसणं काय...
आता सारंच कसं मृगजळापरी दुर्लभ...
तिने लहरती नादान बट
लाजेपरी कानाआड अडकवणं काय...
तिच्या सोज्वळ अदावर
त्याचं ते घायाळून जाणं काय...
आता सारंच कसं मृगजळापरी दुर्लभ...
धुंद बोलक्या नजरेने
तिने त्याला मुकं करणं काय...
स्पर्शाने बहरलेले स्पर्श
त्याने हृदयात जपणं काय...
आता सारंच कसं मृगजळापरी दुर्लभ...
रातभर जागत्या वेड्या गप्पांनी
त्याने स्वप्नांचा ठिसूळ महाल बांधणं काय...
अन नश्वर वचनांचे झूठे पाढे
तिने घश्याला कोरड पडेतो घोकणं काय...
आता सारंच कसं मृगजळापरी दुर्लभ...
प्रेमाच्या एकेक निशाणीला
त्या वेड्याने जीवापाड जपणं काय...
- Read more about आता सारंच कसं मृगजळापरी दुर्लभ...
- 5 comments
- Log in or register to post comments
- 2649 views
Trinity:love, sex & vanity
LOVE
प्रेम प्रेम म्हणाजे काय असतं?
तुला माहीतीये?
माहीत असलं तरी काय?
तु नेहमीप्रमाणे उभी राहशील,
आपल्या काजळभरल्या डोळ्यांसकट.
परमेश्वराकडे दोन्ही हात करुन,
डोळे गच्च बंद करशील.
मला गच्च मिठीत घेशील.
सेन्योरा,
प्रेमातलं रॅशनल-प्रॅक्टीकल
मला काही कळत नाही.
कळपांची चरित्रं लिहिण्याचा
मला सोस नाही.
तेव्हा बिवेअर,
माझ्या त्वचेत प्रिझर्व केलेली
सगळी जुनी गंधिल वस्ती
तुझ्या मिठीत झोपेल.
तेव्हा आत्ताच भोगुन घे
हे दगडी मौन
मी पुन्हा कधीतरी
तुझ्यापासुन दुर
एकांतात तुझ्यावर प्रेम करेन.
- Read more about Trinity:love, sex & vanity
- 4 comments
- Log in or register to post comments
- 4131 views
(पिच्चर पाहाणे - एक ना धड १७६० अनुभव)
पिच्चर पाहाण्याच्या पद्धती व अनुषंगिक फायदे याची माहिती घेण्यापूर्वी थोडेसे अवांतर.
काही ढुढ्ढाचार्यांच्या काही लेखांतील काही मुद्द्यांचे मला उमगलेले निराकरण असे.
पहिला मुद्दा ढुढ्ढाचार्यांनी सांगितलेल्या पिच्चर पाहाण्याच्या दोन पद्धती. या तशा ठीक वाटतात. तथापि पिच्चर पाहाण्याच्या पद्धती या हेतूप्रमाणे ठरत असून त्यांचे आणखीही बरेच प्रकार आहेत. सर्वसधारणपणे वैद्यकीय सहाय्यासाठी फुल्टु टाईमपास दर्शन ही पद्धत जास्त उपयुक्त आहे, असा अनुभव आहे.
- Read more about (पिच्चर पाहाणे - एक ना धड १७६० अनुभव)
- 12 comments
- Log in or register to post comments
- 8517 views
कॉकटेल लाउंज : बे ऑफ पॅशन (Bay of Passion)
‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “बे ऑफ पॅशन”
पार्श्वभूमी:
गोव्यावरून आणलेल्या पॅशन फ्रूट लिक्युअर (भ्रष्ट भारतीय नक्कल) वापरून बरेच दिवस झाले होते. आज त्या लिक्युअरच्या गुलाबी रंगाची पुन्हा एकदा भुरळ पडली. अॅबसोल्युट वोडकाचे संस्थळ चाळता चाळता पॅशन फ्रूट लिक्युअर वापरून केलेल्या कॉकटेल्स्ची खाणच मिळाली. मग एक मस्त आकर्षक रंगाचे बे ऑफ पॅशन आवडले. महत्वाचे म्हणजे सर्व साहित्य मिनीबार मध्ये दाखल होते. :)
प्रकार: वोडका बेस्ड, कंटेम्पररी कॉकटेल, लेडीज स्पेशल
- Read more about कॉकटेल लाउंज : बे ऑफ पॅशन (Bay of Passion)
- 5 comments
- Log in or register to post comments
- 3974 views
विमा नव्हे, मनःशांती
"मनाची उभारी आणि आर्थिक शांतता याचा परस्परसंबंध वेगळा सांगायलाच नको. आर्थिक आघाडीवर सगळं व्यवस्थित असेल तर डोकं किती शांत रहातं. त्यातून आजच्या धकाधकीच्या जीवनात ... हा शब्दप्रयोग आलाच पाहिजे बरं का, नाहीतर फाऊल समजला जातो... वेगवेगळ्या प्रकारचे ताणतणाव असतात. आपण ते सगळे टाळू शकत नाही. काहींचं फारतर व्यवस्थापन करता येतं. या ताणतणावांमुळे होणारे रक्तदाब, मधुमेह, त्वचारोग असे वेगवेगळे विकार मनुष्याचा कुरतडून कुरतडून जीव घेतात. यातले काही तणाव आपण जरूर दूर करू शकतो. मुख्य म्हणजे आर्थिक तणाव. लहानपणापासूनच आपल्या मध्यमवर्गीय, मराठी घरांमधे बचतीचं महत्त्व शिकवलं जातंच.
- Read more about विमा नव्हे, मनःशांती
- 15 comments
- Log in or register to post comments
- 10543 views
दुल्हेराजा....
गोविंदाचा दुल्हेराजा मी नक्की किती वेळेस पाहिला असेल ह्याचीही नोंद ठेवणं सोडून दिलय. हा चित्रपट म्हणजे जितेंद्रचा कसा "हिम्मतवाला" हा आयकॉनिक चित्रपट होता; "ब्रँड-जितेंद्र" हा दृढमूल कलडरणारा आणि ती क्याटेगरी ठसठशीत मांडणारा होता; तसाच "ब्रँड गोविंदा" स्पष्ट, लख्ख मांडणारा म्हणजे दुल्हेराजा.
.
- Read more about दुल्हेराजा....
- 25 comments
- Log in or register to post comments
- 13810 views
मेदिनी
सर्व वाचकांना चवदा मार्चच्या, अर्थात 'पाय' दिनाच्या शुभेच्छा. एक कविता:
व्रण हा रक्तवर्णी ज्या दक्षिणस्तनी
कृष्णमिलिंदकेंद्रबिंदू तिथे
विलसलसतो धवलासनी
पुष्कळे पुष्टरमणी चिंबनितंबवलये
अचपळमनमोहन गहनगंधप्रिये
अंगांगदंगसंभोगिनी मेदिनी
❊
- Read more about मेदिनी
- 29 comments
- Log in or register to post comments
- 14868 views
" डराव डराव -"
टकमक टकमक बघत बघत
डोळे मोठे आणखी करत
येता जाता डराव डराव
का ओरडता बेडूकराव
तुमच्या उड्या टुणूक टुणूक
चपळाईची मस्त चुणूक
अंगणातल्या डबक्यात
किती करता बाहेर आत
पाण्यात जास्त भिजू नका
डराव डराव गर्जू नका
सर्दी पडसे झाल्यावर
खोकत बसता काठावर
औषध कधी घेत नाही
डराव डराव थांबत नाही
झोपू द्या ना शांत आम्हाला
नाहीतर सांगीन नांव आईला !
.
- Read more about " डराव डराव -"
- Log in or register to post comments
- 3069 views