Skip to main content

काही राष्ट्रीय नियतकालिकं आणि यूजीसीवर अरिंदम चौधरींची पाबंदी

कुणाच्या तरी भावना दुखावतात असा दावा करून कुणाच्या तरी अभिव्यक्तीचा संकोच होणं ही भारतात आता एक नित्याची बाब झाली आहे. पण Indian Institute of Planning and Management (IIPM) ह्या संस्थेचे संचालक मॅनेजमेंट गुरु अरिंदम चौधरी यांनी आंतरजालावरच्या आपल्याला गैरसोयीच्या असलेल्या काही मजकुरावर पाबंदी आणून अभिव्यक्तीच्या संकोचाचा एक नवीन पायंडा पाडला आहे. तब्बल ७३ युआरएल, म्हणजे web address किंवा आंतरजालावरच्या पत्त्यांवर भारतभर बंदी घालण्याचा आदेश ग्वाल्हेरच्या एका कोर्टाकडून आणून त्यांनी दूरसंचार विभागाला तो पाळायला भाग पाडलं.

मास्तर

अध्यक्ष जवळ आला रे
आला कि मास्तरला हागायच येते.अध्यक्षाने
बोलोलं म्हणलं कि हा पयलंच हागून जाते.
काऊन ? तं तथी गेल्यावर याहीच्या पोटात
सारख्या कळाच या लागते. मास्तर
माघारी येते. कोरड्या नरड्याला वल्लं करते.
घट घट घाटी हालवून पाणी पिते. घाम पुसते.
आन् वर्गावर जाऊन बोलते. मै बोलेगा तो अयसा ,
मै बोलेगा तो वयसा ! मय किस्से डरता नय,
अन्याय को सहता नय.
पोट्टे कौतुकानं निर्हा पाहात राह्यते आन् मास्तर चिँब
भिजत राह्यते. मंग मास्तर घरी जाते. आन्
बायकोले बम बडवून काहाडते स्वाभिमान वसूल करते.
गेटाच्या बाहेर शैक्षणिक गांडूगिरीवर मास्तर बम

भलंरी दादा भलगडी दादा...

आज एक बहूत जुणं गाणं ऎकलं. आणि शेतकर्याची गावाकडची आणि पोतराजाची झोपडपट्टीतली गाणी आठवली..
देवावानी शेत माझं नवसाला पावलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं ,
झाकली मूठ ही मिरगानं फेकली
निधळाची धार ती सर्गानं शिपली,
बाळरुप कोवळं शिवारात हासलं
धरतीच्या माऊलीनं दिनरात सोसलं..
कुबेराचं धन माझ्या..
भलरी दादा भलगडी दादा भलरी दादा...भलं
चित्रपट: शिकलेली बायको
संगीतकार: ह्रदयनाथ मंगेशकर
गीतकार: रविकिरण मंडळातला कुणीतरी पठ्ठा.
नेमका कोण आठवेना..
क्लासवन अधिकार्याने मोहात पडून शेती करावी अशी शेताची जबरदस्त किमया मांडणारं खोटं जानपद गीत !

नामदेव ढसाळ

नामदेवाच्या विद्रोहाला शिव्या देणार्‍यांच्या भ्याड विरोधाला मी तीळमात्र भीक घालत नाही. कारण ढसाळांच्या विद्रोहात सर्व काही "क्षम्य" असते आणि आहे शिवाय कायम राहील. सभ्य म्हणून गणले गेलेले प्रतिशब्द वापरले तर विद्रोहच संपून जाईल. विवेकवादी चळवळींमध्ये देखील विद्रोहाचे मान व भान राखावे लागते. पण आपल्या मायबोलीचाच हात धरून नेहमी आपल्यावर अत्याचार केलाय त्या अत्याचाराला वाचा फोडण्याचे जहाल क्रांतीकारक कार्य माझ्या नामदेवानं केलंय. नामदेव ढसाळ ह्या दोन प्रवृत्तीमध्ये विभागलेल्या एका वादळाचं नाव आहे. मला कवीमनाचा अंगार चेतवणाराच नामदेव आवडतो आणि तोच माहित आहे.

Flyby of Asteroid 2012 DA14

पृथ्वीपासून अगदी जवळून जाणार्‍या या अ‍ॅस्टेरॉईड बद्दल एव्हाना तुम्ही ऐकले असेलच. अ‍ॅस्टेरॉईडला पहाण्याची अशी संधी सहजी चालून येत नाही. ज्यांना हे पाहण्याची इच्छा आहे त्यांना मदत होईल अशी माहिती थोडक्यात देण्याकरता हा धागा सुरु करतो आहे (इतरांनीही माहितीची देवाणघेवाण करावी).

किमान दुर्बिण(Binoculars) लागेल, डोळ्यांनी दिसणे दुरापास्त आहे! टेलिस्कोप मधून दिसणे अवघड आहे, पण कौशल्य असेल तर अशक्य नाही!

Skin deep

Taxonomy upgrade extras

'Skin' नावाचा एक दक्षिण आफ्रिकन चित्रपट पाहिला. गोर्‍या जोडप्याला कृष्णवर्णीय दिसणारी मुलगी होते. त्या काळात दक्षिण आफ्रिकेत 'apartheid' (वेगवेगळ्या वर्णाच्या लोकांना वेगळं करणारा, वर्णभेद मानणारा) कायदा अस्तित्त्वात होता. गोरी मुलं वेगळ्या शाळेत असत, काळी मुलं वेगळ्या. काळ्या लोकांची आर्थिक परिस्थिती खालची, आणि सामाजिक स्थानही खालचं. त्यात ही मुलगी सांद्रा (Sandra) गोर्‍या मुलांच्या शाळेत जाते; कारण आई-वडील गोरे. तिथे अन्य पालकांना सांद्राच्या काळेपणाचा त्रास होतो. त्या काळात डीएनए चाचणी उपलब्ध नव्हती, त्यामुळे हेच हिचे (आई-)वडील हे सिद्ध करणं अशक्यच.

नो, डेव्हीड!

फावल्या वेळात मुलाच्या शाळेत जाऊन वाचनायलात मदत करणं हा माझा आवडीचा छंद. तिथल्या लायब्ररीयन आणि मदतनिसाबरोबर माझी आता गट्टी जुळलेली आहे. मुलाच्या नावावर ते मला हवी तेवढी पुस्तकं घेऊ देतात. मी पुस्तकं व्यवस्थित चाळून, मुलांना आणि मला एकत्र वाचायला आवडतील या अंदाजाने आणत असते. या आठवड्यात अशाच अंदाजाने मी डेव्हीड शॅननचं 'नो, डेव्हीड!' आणलं, आणि सांगायची गोष्ट म्हणजे, आमच्या घरात या पुस्तकाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला! रोज या पुस्तकाची पारायणं होतात. असं आहे तरी काय या पुस्तकात?

बुद्धीमत्तेचा र्‍हास होत आहे का?

पूर्व प्राथमिक वा पहिली - दुसरीतील मुलं (व मुलीसुद्धा!) जेव्हा 70 - 80 टक्के गुण मिळवतात तेव्हा पालकांना आपल्या घरात खुद्द आइन्स्टाइन जन्माला आला आहे असेच वाटत असते. परंतु जेव्हा हीच मुलं मोठी होऊन आपले गुण उधळू लागतात तेव्हा मात्र पालकांचे डोळे उघडतात. म्हणूनच यासाठी वस्तुनिष्ठपणे विचार करून आपल्या पाल्याच्या कुवतीचा अंदाज घेणे शहाणपणाचे ठरू शकेल. अनेक वेळा आपला अंदाज चुकत असला तरी सामान्यपणे आजच्या पिढीचा बुद्ध्यांक मागच्या पिढीच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे, हे कबूल करावे लागेल. कदाचित आपल्याला खरे वाटणार नाही. परंतु आताची पिढी आपल्यापेक्षा नक्कीच जास्त शहाणी आहे.