Skip to main content

ठसा

५ वर्ष्या पूर्वीचा तो जीवन बदलून टाकणारा प्रसंग आज अजुन सुधा ताजा होता त्याच्या मनात. अगदी आत्ताच घडून सारखा .तो प्रसंग होताच तसा.कधीच न विसरता येण्या सारखा. बघता बघता श्री भूतकाळात रमून गेला. श्रीला लहानपणा पासूनच व्यायामाची खूप आवड. अर्थात आई मुळे लागलेली . आईची खूप शिस्त होती एकदम कडक! पहाटे लवकर उठून दूध पिउन व्यायाम केल्यावरच ब्रेकफास्ट.पहाटे उठून जॉगिंगला जाणे हा श्री च्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला होता. तरुणपणी सुधा हेच अंगवळणी पडलं होत त्याच्या .व्यायामा सोबतच श्रीला गाण्याची ,नाटकात काम आवड होती.

AFSPA नावाचा तिरस्करणीय प्रकार - संजॉय हजारिका

सदर लेख An abomination called AFSPA या संजॉय हजारिका यांच्या लेखाचा स्वैर अनुवाद आहे. मूळ लेख इंग्रजी वृत्तपत्र "द हिंदू"मध्ये प्रकाशित झाला आहे. तो आंतरजालावर इथे वाचता येईल. लेखातील विकिपीडियाचा एक दुवा मी दिलेला आहे - मूळ लेखात नाही.
सदर अनुवाद करून योग्य त्या श्रेयासह ऐसीअक्षरेवर प्रकाशित करण्यासाठी मूळ लेखकाकडून अनुमती घेतली आहे व गरज पडल्यास सदर विरोप ऐसीअक्षरेच्या संस्थापकांसमोर सादर करू शकतो.

============

आणखी एक टायटॅनिक

मागच्या वर्षीची गोष्ट आहे, जानेवारीचा दुसरा पंधरवडा.. मुळचा मुंबईचा रहिवासी असलेला केविन रिबेलो समुद्रात अर्धवट बुडालेल्या अजस्त्र धुडाकडे आशेने बघत बसला होता...कोणत्याही क्षणी रेस्क्यू टीम आपल्या भावाला , रसेल ला घेऊन येईल या आशेत गेला आठवडा तसाच काढला होता.”या क्रुझ असाइनमेंट मधून चांगले पैसे मिळतील, थोड्याच वेळचा प्रश्न आहे” असे त्याच्या भावाचे क्रुझवर जाण्याच्या आधीचे शब्द त्याला आठवत असावेत...रेस्क्यू टीमला आता कोणी जिवंत असण्याची शक्यता वाटत नव्हती...

नक्की बघाच - कॅसिनो ( १९९५ )

बरेच दिवस ह्या सिनेमा बद्दल लिहायचे होते कारण oscar वगैरे मधे बाहुली न मिळाल्या मुळे भारतात तसा ह दुर्लक्षीत झालेला सिनेमा होता.

सोनई दलित हत्याकांड !!

Taxonomy upgrade extras

सोनई दलित हत्याकांड !!

"माझ्या पोराचे तुकडे या डोळ्यांनी पहाव लागल,
मला म्हातारीला आता हे दुख सहन होत नाय.
मराठ्याच्या पोरीसंग प्रेम करून माझ्या पोरान गुन्हा केल्ता का?
ते दोघ बी लगीन करणार होते, पर त्या लोकांनी तेला मारून टाकल ,
ती माणस नायीत हैवान हायीत"

- कलाबाई घारू ( मृत सचिन घारू याची आई)

खजिना (६/८)

~~~मंदार~~~

आता आमच्याकडे सखुच्या मागे जाण्यावाचून पर्याय नव्हता. मी साळवी लपले होते त्या झाडामागे गेलो तर तिथे ते नव्हतेच. आम्ही काही मिनिटं तिथे थांबलो पण अधिक वेळ थांबणे शक्य नव्हते. मी पटकन बॅगेतून कागद काढला आणि त्यावर आम्ही जातोय त्या दिशेने खूण केली आणि तो तिथेच एका दगडाखाली ठेवला. मानकामे तर हिप्नोटाईज झाल्यासारखे सखुच्या मागे चालू लागले होते. मी त्यांना गाठलेच.
"मानकामे सर! "
"श्श्श्श!! इतके दिवस ही बया माझ्या घरात रोज येत होती. कधी तागास तूर लागू दिला नाही! " मानकामे दबक्या आवाजात पण मिश्किल सुरात बोलले. मी नुसताच क्षीण हसलो

सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग २)

(१२ फेब्रुवारी - आज डार्विनचा जन्म होऊन २०४ वर्षं झाली. त्यानिमित्ताने त्याच्या स्मृतीला अभिवादन करून या लेखमालेचा पुढचा भाग सादर करतो आहे.)

विसावताना एकदा....

विसावताना एकदा....

नको हलवूस खांदा, झोप माझी चाळवेल
स्वप्न-वास्तवाचा सांधा, कोठेतरी हरवेल

समजावू नको काही, स्तोत्रसुद्धा म्हणू नको
सांगायाचे राहिलेले झोपताना सांगू नको

कधी व्याकूळ दु:खाने, कधी निराशेची गाणी
सुखासक्त आशा रुजे कधी दिव्यशा अंगणी

कधी सारे विस्कटून जाती क्षोभाचे प्रपात
शांतावते तेव्हा तुझ्या निरांजनातली ज्योत

वेग-हादरे जगाचे, उंच झोके कर्तृत्वाचे
घेते उसंत जराशी, उसे माझे विसाव्याचे

तुझ्या हृदयीचे ठोके कानी अस्फुट नादती
जन्मांतरीचे सौहार्द, खुणा अंधुक स्मरती

आता थोपटू ही नको, आर्त सारे निवळू दे

"विविध भारती"...

काल असंच Radio Channels बदलतांना (चुकून) "विविध भारती" लागलं,
आणि त्यातल्या निवेदकाचं (RJ) निवेदन ऐकतांना आधी थोडं हसू आलं...

Radio चा शोधलागल्यापासून आजपावेतो किती बदल झालाय,
कितीतरी नव-नवीन Channels आल्यात, आणि त्यातले RJs फूल धमाल करत,
मस्ती करत निवेदन करत असतात...
पण "विविध भारती" मधले निवेदक काय खाऊन निवेदन करीत असावेत, देव जाणे...
ह्यांना बहुधा Special Training मिळत असावी,
"विविध भारती" मध्ये Slow Motion मध्ये आणि धीर-गंभीर स्वरात बोलण्याची...
किंवा अश्याप्रकारे बोलणाऱ्यांनाच भरती करण्यास Special Quota असावा तिथे...