तारेने जोडलेली गर्दी
मी मला जे वाटतं ते कधी करतच नाही
एक गर्दी माझ्याकडून आपली कामे करून घेत असते
एका तारेन जोडलेली ही गर्दी
माझ्यासोबत चालत राहते रात्रंदिवस
माझा रंग या गर्दीचाच रंग आहे
मी या गर्दीच्याच भाषेत बोलत असतो
ही गर्दी माझ्या घरात-
माझ्या रक्तवाहिन्यांमध्ये
येऊन शिरली आहे
ही गर्दी मला वाहावत नेत असते
उंची शहरांच्या वैभवशाली रस्त्यांमधून
बहुमजली दुकानांमधून
माझ्या सभोवती वस्तूंचे एक जाळे पसरून पडलेले आहे
या वस्तू माझ्या आहेत की नाहीत
हे मला माहीत नाही
किंवा हे की या वस्तू नक्की कशासाठी आहेत
ही गर्दीच ठरवत असते माझ्या वेळा
माझी जगण्याची पध्दत
माझे जीवन
- Read more about तारेने जोडलेली गर्दी
- 9 comments
- Log in or register to post comments
- 4083 views
मध्यमवर्गीय संगोपन मूल्ये : एक प्रसंग, काही निरीक्षणें
Taxonomy upgrade extras
आपल्या दैनंदिन आयुष्यांत आजूबाजूला घडणार्या बारीकसारीक घटनांमधे अनेकदा गमतीदार गोष्टी आपल्याला दिसतात. कधी त्यातली विसंगती आपण हसतखेळत स्वीकारतो. कधीकधी त्या इतक्या हसतखेळत स्वीकारणें अशक्य होऊन बसते. "जळात राहून माशाशी वैर करू नये" या उक्तीला स्मरून आपण या विसंगती इतरांना सांगतोच असं नाही. मात्र इंटरनेटवरच्या बुरख्यांचा, अनोळखीचा फायदा अशा बाबतीतल्या आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्यायला कधीकधी होतो खरा.
- Read more about मध्यमवर्गीय संगोपन मूल्ये : एक प्रसंग, काही निरीक्षणें
- 44 comments
- Log in or register to post comments
- 21628 views
एक दक्खनी कविता - कुतुबमिनार
येथील एक सन्माननीय, ज्येष्ठ आणि गुरुतुल्य सदस्य सन्जोप राव यांनी दिलेल्या आज्ञेचे पालन करून दस्तुरखुद्द संकेतस्थळांवर अतीच लिहायला लागले आहेत याची जाणीव आम्हास आहे.
- Read more about एक दक्खनी कविता - कुतुबमिनार
- 31 comments
- Log in or register to post comments
- 16032 views
पथ्य
(सूचना: हा लेख यू.स. लेटर अाकाराची नऊदहा पानं भरतील इतका मोठा अाहे.)
डग न्यूफरच्या 'Never Again' या कादंबरीची सुरुवात अशी होते:
- Read more about पथ्य
- 13 comments
- Log in or register to post comments
- 17732 views
"देह्तराणे"
वस्त्रांमधल्या विन्यासाचा रंगबिरंगी होऊन धागा
तुजदेहाच्या भासाभवती चतुराईने लिंपून घ्यावे
केसांवरल्या जलबिंदूसम तीळ खुणेशी थांबून खाली
आवेगाने कोसळताना तुजप्राणांशी खोल भिडावे
स्पर्शामधल्या स्फुल्लिंगांनी तेजवताना श्वाससमाधी
कायेचे कायेशी बंधन वादळातले काहूर व्हावे
दान नव्हे जे दिले घेतले अथवा देवापुढे ठेवले
समरसतेच्या आलापांनी प्रेमतराणे निखरून यावे
शांतवणारी बेचैनी ही अर्ध्या मिटल्या डोळ्यांमधली
क्षणाक्षणाने विस्कटताना कणाकणाने उजळून जावे
- Read more about "देह्तराणे"
- 9 comments
- Log in or register to post comments
- 6505 views
अफजल गुरुला फाशी
संसदेवर २००१ साली केलेल्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार अफजल गुरु याला फाशी दिल्याची बातमी नुकतीच हाती आलेली आहे.
http://www.thehindu.com/news/national/afzal-guru-hanged/article4396289…
या बातमीचे पडसाद अनेक ठिकाणी उमटतीलच. कसाब पाठोपाठ अफजल गुरुला फाशी देण्यामागे राजकीय गणितं आहेत यात शंका वाटण्याचं कारण नाही. मुस्लिमांचा अनुनयाचा आरोप करण्याबाबत विरोधी पक्षीयांना उपलब्ध असलेले दोन प्रमुख मुद्दे आता बाद झालेले आहेत.
- Read more about अफजल गुरुला फाशी
- 41 comments
- Log in or register to post comments
- 19836 views
स्मरण
आमच्यासारख्या छांदिष्ट लोकांना एकत्र जमायला एकेक कारणच लागत असतं. मुंबईला दर एप्रिल महिन्यात होणारी 'शुक्ला मेमोरियल डे कॉईन फ़ेअर' ही तमाम भारतातील नाणी-संग्राहकांना एकत्र आणणारी अशीच एक 'इव्हेंट'. कै. सदाशंकर शुक्ला ह्या मुंबईतल्या आद्य नाणेसंग्राहक-संशोधकाच्या स्मरणार्थ दर वर्षी त्यांच्या जन्मदिवसाचे निमित्त साधून हा 'मेळा' भरवला जातो. 'नाणकशास्त्र' ह्या विषयात केवळ नाणीच मोडतात असे नव्हे, तर नोटा, मेडल्स, पदके अशा गोष्टींचाही ह्या विषयाच्या 'स्कोप'मध्ये समावेश होतो. सबब, ह्या गोष्टींचे संग्राहकही 'शुक्ला डे'ला आवर्जून हजेरी लावतात.
- Read more about स्मरण
- 22 comments
- Log in or register to post comments
- 24877 views
हिंदी चित्रपटातली आवडलेली स्त्री पात्रं
संपूर्ण लेखात 'चमेली', 'तीन दीवारें' आणि 'डोर' या चित्रपटांचे संदर्भ आहेत. या चित्रपटांची कथाही त्या अनुषंगाने लिहीलेली आहे.
- Read more about हिंदी चित्रपटातली आवडलेली स्त्री पात्रं
- 74 comments
- Log in or register to post comments
- 49600 views
ब्रेड अँड बटर - भाग ४ 'संपूर्ण गव्हाचा पाव'

भाग तीनमध्ये झालेल्या चर्चेतून संपूर्ण गव्हाचा पाव बनवण्याची प्रेरणा मिळाली होती आणि त्याची माहिती मी त्या भागात दिलेली होतीच पण फोटो लावायचे राहिले होते म्हणून नवीन धाग्याचा प्रपंच.
पावासाठी लागणारे साहित्य:
संपूर्ण गव्हाचे पीठ ५०० ग्रॅम*
फास्ट अॅक्शन यीस्ट १.५ टेबलस्पून
कोमट पाणी ८० मिलीलीटर (१/३ कप)
कोमट दूध १७० मिलीलीटर (साधारण २/३ कप)
२ अंडी
मध ४० मिली
मीठ १.५ टीस्पून
लोणी ७५ ग्रॅम
- Read more about ब्रेड अँड बटर - भाग ४ 'संपूर्ण गव्हाचा पाव'
- 35 comments
- Log in or register to post comments
- 27338 views
सुन री पवन
http://www.youtube.com/watch?v=FSbTl3kEyMI
'सुन री पवन' या अनुराग चित्रपटातल्या अप्रतिम गाण्याचं हे रसग्रहण नव्हे, त्यातल्या व्हिडिओची ही रनिंग कॉमेंटरी. गाण्याची टिंगल करण्याचा हेतू नाही. केवळ मौजमजा.
- Read more about सुन री पवन
- 15 comments
- Log in or register to post comments
- 10775 views