परडीचा महिमा
मंगळवारी वस्तीत परडी उजवायचा कार्यक्रम झाला. योगायोगाने तिथे हजर होतोच तर तासभर गाणी आयकुच म्हटलं. आता फार होत नाहीत हे कार्यक्रम वस्तीत. पण ८ ते ९ वर्षामागं जबरदस्त रेलचेल असायची या कार्यक्रमांची. धोँड्याचा महिना म्हणजे तर क्या बात है ! याच टायपात मोडणारा. महिना भर नुस्ता धिंगाणा ! डलीडुली आणि पुरणपोळी सारख्याच मापात. कितीकही मोजा गड्या हो . आराधी मंडळी फुल टाईम बिझी ! ह्यांची अपाँईँटमेँट मिळणं , मिळवणं. म्हणजे जबरदस्त दिव्य ! नवरा बायकोच्या भांडणात ह्यांची अपाँईँटमेँट म्हणजे कळीचा मुद्दा ! तु काच गेली नाहीस ? किँवा तू काच गेला नाहीस ? या टाईपचा कालवा धोँड्याच्या महिन्यात वस्तीत नवा नसतो.
- Read more about परडीचा महिमा
- 19 comments
- Log in or register to post comments
- 26045 views
वेडी आशा अनुदानाची -
आशा मोठी वाईट असते
कुणालाच ती सोडत नसते -
पाऊसधार भुलवुन जाते
धरा कोरडी पहात असते...
गोठ्यामधली वैरण संपुन
गुरेढोरे विकून झाली -
डोळ्यामधल्या पाण्यामध्ये
शिळीच भाकर भिजून गेली...
दुष्काळाचे पडता सावट
शासन सारे झोपी जाते -
बळीराजाची वेडी आशा
अनुदानाची वाट पहाते !
.
- Read more about वेडी आशा अनुदानाची -
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2789 views
खजिना (३/८)
- Read more about खजिना (३/८)
- 8 comments
- Log in or register to post comments
- 12171 views
कॉकटेल लाउंज : ब्लु गोवन हेवन
‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “ब्लु गोवन हेवन”
पार्श्वभूमी:
काजु फेणीच्या चवीवर एक्सपेरीमेंट्स करताना ही कॉकटेल रेसिपी हाती लागली. ब्लु कुरास्सो वापरुन निळ्या रंगाची समुद्राची निळाई ह्या कॉकटेलला आकर्षक आणि दिलखेचक बनवते. ही रेसिपी माझे इंप्रोवायझेशन आहे. कंप्लीट, नावासकट.
| प्रकार | काजू फेणी बेस्ड कॉकटेल |
| साहित्य | |
| काजू फेणी | 2 औस (60 मिली) |
- Read more about कॉकटेल लाउंज : ब्लु गोवन हेवन
- 8 comments
- Log in or register to post comments
- 7729 views
मुलं, संस्कृती, आडदांडपणा, बलात्कार इत्यादी: काही असंकलित नोंदी
Taxonomy upgrade extras
अनेक शाळांमधून हिरीहिरीने राबवला जाणारा उपक्रम म्हणजे ताज्या वर्तमानपत्रांचे वाचन. अशाच एका शाळेत मुलांना पेपर वाचायला सांगण्यामागची कारणे सांगितली जातात ती अशी: दररोज घडणा-या घटनांची माहिती मुलांना कळते, २. मुलाला आत्मविश्वास येतो, ३. मुलांची भाषा चांगली होते, ४. मुलांना सामाजिक भान येते इत्यादी. आता, नऊ-दहा वर्षाच्या वयाच्या मुलाला माहिती वा सामाजिक भान देण्यासाठी पेपर वाचायला लावणारा ‘स्पर्धा परिक्षा- अभ्यास’ टाईप प्रकार कशासाठी किंवा वर्तमानपत्रे वाचून भाषा खरच चांगली होते काय अशा प्रश्नांना शिक्षणशास्त्रीय चौकटीत प्रतिसाद देण्याचा हेतू इथे नाही.
- Read more about मुलं, संस्कृती, आडदांडपणा, बलात्कार इत्यादी: काही असंकलित नोंदी
- 27 comments
- Log in or register to post comments
- 21145 views
आई ..
ठेच लागता घाई घाई,
तोंडी नेमके आई आई ..
दु:खामधे मुखात येई
कसे नेमके आई आई ..
तळमळ जेव्हां जिवात होई
मनीं नेमके आई आई ..
समर प्रसंग सामोरी येई
स्मरण नेमके आई आई ..
बापाचा पाठी मार खाई
तोंडी नेमके आई आई ..
जन्म माणसा वाया जाई
म्हटले ना जर आई आई !
.
- Read more about आई ..
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2500 views
छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १६ : संध्याकाळ
पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे : संध्याकाळ.
या विषयाचबद्दलही अधिक काही स्पष्टीकरण/अपेक्षा द्यायची गरज नाही. तसा सोपा विषय म्हणता यावा. अर्थ किती व्यापक असू शकतो हे चित्रांमधूनच पाहू !
------
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही किंवा स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १६ : संध्याकाळ
- 55 comments
- Log in or register to post comments
- 46646 views
माझ्या गावात कधी आता -
माझ्या गावात कधी आता
माझा मामा रहात नाही -
आजोळी जाण्याचा त्यामुळे
प्रसंग कधी येतच नाही......
धूर सोडणारी झुकझुक गाडी
साधे झाडही दिसत नाही
शहरात राहिला मामा आता
त्याला नोकरी मिळत नाही ...
वेळ नसल्यामुळे तो
मला कधी बोलवत नाही
मामी सुगरण आहे का
त्यामुळेच माहित नाही...
वर्षात कधीतरी एकदाच
शिकरण-पोळी खाते म्हणे -
एवढे मात्र ऐकून आहे
बाकीच काही ठाऊक नाही...
मामाची रंगीत गाडी नाही
मामाची उंचउंच माडी नाही
लपली काळाच्या पडद्याआड
आजी बरळते काहीबाही....
- Read more about माझ्या गावात कधी आता -
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2596 views
गांधीहत्या - सावरकर दोषी?
गांधीजींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज 'हिंदू'मध्ये 'How Savarkar escaped the gallows' हा लेख आला आहे. गांधीहत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपातून सावरकर निर्दोष सुटले; तरीही सावरकरांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंगरक्षक आपटे आणि त्यांचे सचिव दामले यांनी कपूर समितीसमोर दिलेल्या साक्षींनुसार सावरकरांचा गांधीहत्येतला सहभाग सिद्ध झाला होता असं ह्या लेखात म्हटलं आहे.
- Read more about गांधीहत्या - सावरकर दोषी?
- 24 comments
- Log in or register to post comments
- 27159 views
नंदी आणि यादवची मुक्ताफळं
Taxonomy upgrade extras
भाषण्या रोग निवडणुकीत बोकाळतो. मिरव्या आणि दाव्या हे दोन रोग सध्या भयानक धुमाकुळ घालत आहेत ब्वा ! काळं असू अगर गोरं , सालं तोँड मिडियात झळकलंच पाह्यजे , विचारांचं पाहू बास्ता ! ते नीट पत्रकारावर ढकलता येतंय. मी असं बोललोच नाही, विपर्यास केला काही लोकांनी, वगैरे वगैरे वगैरे ! ही जबरी महत्त्वाकांक्षा राजकारण्या पासून चढत्या, उतरत्या दोन्ही श्रेणीनं लेखक कवी आणि
- Read more about नंदी आणि यादवची मुक्ताफळं
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3494 views