Skip to main content

फोन अ "फ्रेंड"

साधारणतः माहित नसलेल्या नंबरकडून फोन आला तर मी उचलत नाही किंवा मी मी नाहीच असं सांगून वाटेला लावते. पण आत्ता एका मित्राचा फोन येईल असं वाटत होतं म्हणून हा अनोळखी नंबरकडून आलेला फोन शिस्तीत उचलला आणि व्यवस्थित "हॅलो" म्हटलं.
समोरचा: जय श्रीक्रिष्ण
मी: (आपलं काय जातंय म्हणायला?) जय श्रीक्रिष्ण
समोरचा: (गुजराथीत काहीतरी बोलला आणि) केम छो?
मी: मजा मा

डेक्कन ट्रॅप, महाराष्ट्रातील किल्ले इत्यादि.

"महाराष्ट्रात ज्वालामुखी नवीन नाही. सह्याद्रीच्या रांगा ज्वालामुखीच्या उद्रेकातूनच तयार झालेल्या आहेत हे आपण शालेय भूगोलातच शिकलेलो आहोत. पण हा ज्वालामुखी आता मृत आहे. निदान गेली ६५ लाख वर्ष या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला नाही असं मानलं जातं."

विक्षिप्त अदिति ह्यांच्या ह्या यलोस्टोन पार्कविषय धाग्यात वरील वाक्य वाचले आणि बरेच दिवस डोक्यात असलेला एक विचार पुढे आला. मी भूगर्भशास्त्राचा अभ्यासक नाही, केवळ थोडीबहुत माहिती सर्वसामान्य वाचनातून गोळा केली आहे. तसेच एकेकाळी सह्याद्रीच्या डोंगरपठारांमधून आणि किल्ल्यांवर बराच हिंडलो आहे आणि त्यातून हा येथे मांडलेला हा ढोबळ विचार तयार झालेला आहे. भूगर्भशास्त्राच्या अभ्यासकांकडून ह्याबद्दल अधिक खोलात जाऊन अधिकृत असे काही वाचावयास आवडेल.

मी वाचल्यानुसार डेक्कन ट्रॅपची निर्मिति ही पृथ्वीच्या पोटातील लाव्हा वरती येऊन घट्ट झाल्यामुळे निर्माण झाला आहे हे खरे पण ही प्रक्रिया ज्वालामुखींच्या उद्रेकातून स्फोट होऊन झालेली नाही तर पृष्ठभागावरील भेगांमधून दाबामुळे लाव्हा वर येऊन सावकाश क्षितिजसमान्तर पसरला जाऊन घडलेली आहे. सहज शोधता books.google.com येथे Hydrology and Water Resources of India हे पुस्तक मिळाले त्याच्या पृ.२४० वर हेच म्हटले आहे.

सह्याद्रीमध्ये आसपास चारहि बाजूस डोंगर आहेत अशा जागी उभे राहून सभोवार दृष्टि टाकली की असे जाणवते त्या डोंगरांची रचना सर्वात खाली दगडमातीचा आणि चढाचा डोंगर, त्याच्यावर शंभर-दीडशे फूट उंचीची खडकाची उभी भिंत, त्यावर पुनः दगडमातीचा आणि चढाचा डोंगर, त्यावर पुनः शंभर-दीडशे फूट उंचीची खडकाची उभी भिंत अशा प्रकारची असते. बहुशः पहिल्याच खडकाच्या भिंतीवर सपाट जागा असते आणि त्यावर पुढील डोंगर नसते. महाराष्ट्रातील बहुसंख्य डोंगरी किल्ले ह्या सपाटीवर वसलेले असतात. उभ्या खडकाच्या भिंतीच्या वर असल्याने त्या जागा शत्रूपासून आश्रयाच्या जागा म्हणून अतिशय योग्य असतात. खडकाच्या भिंतीमध्ये आवश्यक तेथे दरवाजे काढले आणि थोड्याफार तटाच्या भिंती आवश्यक तेथे बांधल्या की स्वसंरक्षण करण्यास निसर्गाने निर्मिलेली अति-उपयुक्त अशी जागा तयार मिळते. पावसाच्या खडकात मुरलेल्या पाण्यामुळे तेथे पाण्यासाठी टाकीहि खोदता येतात सातार्‍याचा अजिमतारा, तेथील जवळचे सज्जनगड, नांदगिरी, चंदन-वंदन असे किल्ले, पुण्याजवळचे सिंहगड, पुरंदर, विसापूर-लोहगड हे किल्ले असेच आहेत. अशा जागा सह्याद्रीमध्ये भरपूर असल्याने येथे ३५०-४०० किल्ले ऐतिहासिक काळापासून निर्माण झाले आहेत.

काही ठिकाणी खडकाच्या एकाऐवजी दोन भिंती आढळतात. असे डोंगर साहजिकच एक भिंतवाल्या डोंगरांहून अधिक उंच असतात. पुण्याजवळ पुरंदरमध्ये अशा एकावर एक दोन भिंती आढळतात. राजगडचा बालेकिल्ला, नाशिक जिल्ह्यात चांदवडच्या सभोवतालचे डोंगर ही मी पाहिलेली अन्य काही उदाहरणे. ह्या पायर्‍यापायर्‍यांच्या रचनेमुळे त्यांना स्वीडिश भाषेतील तशा अर्थाच्या शब्दावरून 'डेक्कन ट्रॅप' हे नाव मिळाले आहे.

येथे सहजच लक्षात येणारी गोष्ट म्हणजे खडकांच्या ह्या पहिल्या वा दुसर्‍या भिंती सर्व जवळपासच्या डोंगरांवर एकाच समपातळीला असतात. महाबळेश्वर आर्थर्स सीट, हरिश्चंद्रगदाच्या पश्चिमेचा कोकणकडा येथे हे स्पष्ट दिसते.

अशी रचना का झाली असावी ह्याबद्दल माझा तर्क आहे तो असा. पृथ्वीच्या पोटातील लाव्हा भेगांमधून बाहेर येऊन पसरतांना लाव्हाच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या काळात कधी मऊ तर कधी अधिक कठिण अशा लाव्हांचे थर एकावर एक बसत गेले. तदनंतर हवा,पाणी, तापमानातील बदल, वर वाढू लागलेल्या वनस्पति ह्यांमुळे ह्या थरांची झीज होऊ लागली आणि तुलनेने मऊ थर धुपून जाऊन त्यांचे उतार निर्माण झाले. धुपायला विरोध करणारे कडक थर तसेच राहिले आणि त्यांच्या भिंती तयार झाल्या आणि म्हणून एका आसमंतातील ह्या भिंती एकाच पातळीवर दिसतात.

सह्याद्रीत कित्येकदा वेळा मी लाव्हाच्या थिजलेल्या बुडबुडयासारखे दिसणारे गोल आकाराचे चेंडूसारखे गोळे आसपासच्या घट्ट दगडात अडकलेले पाहिले आहेत. हे गोळे अनेक थरांचे बनलेले असतात आणि हे थर अगदी ठिसूळ असून हातानेदेखील एकमेकांपासून विलग करता येतात. लाव्हा पसरत असतांना आतील गॅसमुळे हे बुडबुडे झाले असावेत असा माझा तर्क आहे.

वर उल्लेखिलेल्या खडकाच्या दोन उभ्या भिंती आणि मधील चढाचा डोंगराचा भाग सातार्‍याजवळील ह्या चित्रात स्पष्ट दिसत आहेत. सातार्‍याच्या अजिमतार्‍याच्या जवळजवळ पश्चिम पायथ्यापासून आणखी पलीकडे दिसणार्‍या यवतेश्वर परिसराचे हे चित्र आहे. पुढचा डोंगर पहिल्याच भिंतीपाशी संपतो. मागे - न दिसणारा - अजिमतारहि असाच एक भिंतीचा आहे. उजव्या वरच्या कोपर्‍यात यवतेश्वराची पहिली आणि दुसरी अशा दोनहि भिंती दिसत आहे. डाव्या बाजूच्या सांबरवाडी नावाच्या डोंगरालाहि त्याच उंचीवर तशीच दुसरी भिंत आहे. (यवतेश्वराच्या टोपीसारख्या दिसणार्‍या दुसर्‍या भिंतीला सातार्‍याचे लोक 'बंडा' असे म्हणतात - का ते ठाऊक नाही! त्याच्यावर फूटबॉलच्या मैदानाइतक्या आकाराचे सपाट मैदान आहे नेहमीपेक्षा अधिक पाऊस एखादे दिवशी पडला तर तर ह्या बंडावरून धबधबे लागतात, सातार्‍यातून हा देखावा मोठा प्रेक्षणीय दिसतो. अलीकडे बरेच प्रसिद्धीला आलेले कासचे पठार यवतेश्वराच्या मागे आणि पहिल्या भिंतीच्या पातळीवर आहे.)

त्यापुढील चित्र चंदन-वंदन ह्यांपकी एका किल्ल्यावरून दुसर्‍याचे घेतलेले चित्र आहे. (हे ३६० अंशात फिरविता येते.) ह्या चित्रातही समपातळीवरील थर स्पष्ट दिसतात.

भूगर्भशास्त्राच्या अभ्यासकांचे आणि अन्य निरीक्षकांचे ह्यावरचे विचार वाचावयास आवडतील.

एन्डीव्हर स्पेस शटलची शेवटची भरारी.

स्पेसशटलला निवृत्त केल्यानंतर म्युझियममध्ये नेतानाची ही त्याची शेवटची भरारी, बोईंग ७४७ च्या पाठीवर बसून.

(गेले कालचे राहून)

सन्जोप रावांचा राहून गेलेल्या गोष्टी हा लेख वाचून मनात अनेक तरंग उमटले. प्रत्येकानेच काहीतरी मोठ्ठ्या मोठ्ठ्या गोष्टी राहून गेल्याची तक्रार केली होती. कोणी म्हटलं शेती, कोणी म्हटलं गांजा, कोणी म्हटलं काय न् काय.... पण आयुष्य हे असं मोठ्या गोष्टींचं नसतं. अनेक छोट्या छोट्या घटनांनी ते भरलेलं असतं. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून लोक कुठल्यातरी भलत्या ध्येयाकडे हे राहिलं, ते राहिलं करत रडतात. माझ्या मते रोजच्या जीवनात रोज घडणाऱ्या गोष्टींतच राहून जाणाऱ्या गोष्टी खूप असतात.

आर्थिक उदारीकरणः दूरगामी तोटे आणि गोड गैरसमज

Taxonomy upgrade extras


संपादकः
श्री. क्रेमर यांनी म्हटलेलेच उद्धृत करत आहे

यलोस्टोन राष्ट्रीय उद्यान - उत्तर अमेरिका खंडातला सर्वात मोठा ज्वालामुखी

महाराष्ट्रात ज्वालामुखी नवीन नाही. सह्याद्रीच्या रांगा ज्वालामुखीच्या उद्रेकातूनच तयार झालेल्या आहेत हे आपण शालेय भूगोलातच शिकलेलो आहोत. पण हा ज्वालामुखी आता मृत आहे. निदान गेली ६५ लाख वर्ष या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला नाही असं मानलं जातं. उत्तर अमेरिका खंडातला यलोस्टोन उद्यानात असणारा ज्वालामुखी अतिशय वेगळा दिसतो. हा ज्वालामुखी अजूनही जिवंत आहे असं समजलं जातं. अनेक ठिकाणी दिसणारा धूर, पाण्याची कारंजी आणि सल्फरचा वास ही याची लक्षणं आहेतच. शिवाय या भागात सतत भूकंपाचे हादरे बसतात. भूगर्भातल्या तापमानजन्य घडामोडींपैकी अर्ध्या घटना या Caldera मधे घडतात.

नवी नियमावली

गेली काही दशके प्रस्तुत लेखकाच्या असे (हळूहळू) लक्षात आलेले आहे की खालील दोन गोष्टींमध्ये भयावह वाढ झालेली आहे.
* नवीन तंत्रज्ञान
* प्रस्तुत लेखकाला फाट्यावर मारून जगरहाटी चालवण्याची प्रथा
पण आता या खुळचटपणाला थांबवणे भाग आहे. जगरहाटीचे नवीन नियम खालीलप्रमाणे असतील.

==

विद्यार्थी, पुस्तके, प्रती अन् प्रताधिकार

'हिंदू' ह्या दैनिकात आणि आंतरजालावर इतरत्र१ सध्या एक गरमागरम खलित्यांची लढाई सुरू आहे. निमित्त झालं ते दिल्ली विद्यापीठाविषयीच्या एका बातमीचं. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस यांनी दिल्ली विद्यापीठाच्या आवारातल्या एका फोटोकॉपी दुकानावर आक्षेप घेतला आहे. अभ्यासक्रमात शिफारस (रेकमेंडेड रीडिंग) असणाऱ्या पुस्तकांच्या फोटोकॉपी करून त्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात असा त्यांचा आरोप आहे. विद्यार्थ्यांना तो आरोप मान्य आहे. त्यांच्या मते पुस्तकांच्या किमती जास्त आहेत. त्यामुळे त्यांना पुस्तकं विकत घेता येत नाहीत.

एका फूलवेलीचे मनोगत

अगदी परवा परवा जरी मला कोणी सांगीतले असते की माझ्या जीवनातील सर्वोच्च भाग्याचा क्षण लवकरच येणार आहे, तर माझा विश्वास तरी बसला असता का? परंतु आता विचार करतेवेळी वाटते खरच, दैवी भाग्योत्कर्ष कधी आणि कसा होईल याचे भाकीत कोण करू शकते बरे? माझ्या पूर्वजन्मीच्या सत्कर्माचे फलच म्हणायची ती घटना. मागे वळून पाहता त्या सावळ्या, तेजस्वी वनकन्येच्या लोभस मूर्तीवरुनच मला हे आकळायला हवे होते की ती तिच्या सुकुमार पावलांनी या वनात दैवी संकेत आणि अनंत पुण्यराशी घेऊन प्रवेशली आहे. मला तो क्षण अजूनही लख्ख आठवतो ज्या क्षणी वार्‍यावर डोलता डोलता अचानक माझी नजर तिच्यावर स्थिरावली.

भक्तीहीनता

आजवर अनेक लोकांनी माझ्यात भक्तीचं, श्रद्धेचं बीज रुजावं म्हणून प्रयत्न केले आहेत पण ते दुर्दैवाने सगळे फोल ठरले. मी कधीच चांगली ‘भक्त’ नव्हते आणि पुढेही बहुधा मी ती होऊ शकणार नाही. पण कोणा पंथावर, धर्मावर, देवावर श्रद्धा नसतानाही आजवरचे माझे आयुष्य एकंदरित आनंदाचे गेले आहे.