निर्माल्य
.
- Read more about निर्माल्य
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2340 views
राहून गेलेल्या गोष्टी
रविवारच्या 'महाराष्ट्र टाईम्स' मध्ये 'राहून गेलेली गोष्ट' नावाचे एक सदर प्रसिद्ध होत असते. प्रसिद्ध व्यक्तींच्या - मटाच्या भाषेत 'सेलेब्रिटीं'च्या कायकाय करण्याच्या इच्छा होत्या, आणि त्यातल्या काय राहून गेल्या याचा जाहीर पंचनामाच म्हणाना. त्या निमित्ताने या मंचावर असलेल्या लोकांच्या कायकाय गोष्टी करायच्या राहून गेल्या याचा पंचनामा करावा म्हणून हा धागा सुरु केलेला आहे. यात वाचकांनी आपल्याला काय करायचे होते, आणि ते या ना त्या कारणाने जमले नाही याबाबत लिहावे अशी अपेक्षा आहे.
- Read more about राहून गेलेल्या गोष्टी
- 43 comments
- Log in or register to post comments
- 29204 views
पुस्तकांची खरेदी ऑनलाईन करण्यासाठी संकेतस्थळे
नमस्कार पुस्तकप्रेमींनो,
अलिकडच्या काळात ऑनलाईन खरेदी हा पर्याय उपलब्ध झाल्यापासून आपल्यापैकी अनेक वाचनप्रेमी स्वतःच्या आवडीच्या पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी झटू लागले आहेत. मी ही त्याला अपवाद नाहिये. या छोट्याशा लेखाद्वारे वाचकांना मराठी पुस्तके ऑनलाईन विकत घेण्यासाठी कोण-कोणते पर्याय उपलब्ध आहेत? पुस्तके विकत घेताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे? ऑनलाईन खरेदी करताना कोणती सुरक्षितता बाळगावी? व एक ग्राहक म्हणूनही अधिकाधिक स्वस्तात आपल्याला हवी असलेली पुस्तके कशी मिळवावीत? याकडे वाचकांचे थोडे लक्ष वेधू इच्छितो.
- Read more about पुस्तकांची खरेदी ऑनलाईन करण्यासाठी संकेतस्थळे
- 15 comments
- Log in or register to post comments
- 28464 views
राहुल गांधींविषयी 'इकॉनॉमिस्ट'
'इकॉनॉमिस्ट' ह्या प्रतिष्ठित नियतकालिकानं राहुल गांधींविषयीच्या एका चरित्राचा आधार घेऊन ह्या युवराजाची राजकीय समज आणि एकूण बुद्धिमत्ता यावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. WHAT is the point of Rahul Gandhi? हे लेखाचं पहिलं वाक्यच अतिशय बोलकं आहे. देशाचं काय करायचं याविषयी राहुलला काही म्हणता येत नाही कारण त्याला देशाच्या वास्तवाची जाण नाही; स्वत:पाशी काही दृष्टी नाही; आलेल्या संधीचा फायदा करून घेण्याचं राजकीय संधिसाधू शहाणपणसुद्धा नाही असे अनेक शेरे हा लेख मारतो. नेहरू घराण्याच्या करिश्म्यावर विसंबून राहण्याचे दिवस आता संपले आहेत हे काँग्रेसनं लवकर लक्षात घेतलं पाहिजे असंही लेखात म्हटलेलं आहे.
- Read more about राहुल गांधींविषयी 'इकॉनॉमिस्ट'
- 25 comments
- Log in or register to post comments
- 18560 views
जस्ट टाईमपास !
चला, विद्वत्प्रचुर चर्चा खूप झाल्या. आता जरा डोक्याचा व्यायाम करूया.
एका शाळेत काही मुले होती. शिक्षकांनी त्यांना परेडसाठी मैदानावर नेले अन त्यांच्या रांगा बनवल्या.
प्रत्येक रांगेत १० मुले अशा काही रांगा बनवल्यानंतर अखेरच्या रांगेत ९ मुले शिल्लक राहिली.
प्रत्येक रांगेत ९ मुले अशा काही रांगा बनवल्यानंतर अखेरच्या रांगेत ८ मुले शिल्लक राहिली.
प्रत्येक रांगेत ८ मुले अशा काही रांगा बनवल्यानंतर अखेरच्या रांगेत ७ मुले शिल्लक राहिली.
अशा प्रकारे अखेरीस प्रत्येक रांगेत २ मुले अशा काही रांगा बनवल्यानंतर अखेरच्या रांगेत १ च मुलगा शिल्लक राहिला.
- Read more about जस्ट टाईमपास !
- 18 comments
- Log in or register to post comments
- 10650 views
गीता आणि गीताध्यान - 'उगमा'विषयी काही विचार
Taxonomy upgrade extras
सर्वपरिचित आणि संस्कृतीचा अविभाज्य घटक बनलेल्या गोष्टींचा - पारंपरिक कथा, स्तोत्रे, म्हणी, शब्दप्रयोग - अशा मुळाचा शोध घेणे, त्यांचा निर्माता कोण असावा ह्याचा विचार करणे हा एक मोठा आनंददायी छंद आहे. आपल्या घरातल्या घरात संगणकासमोर बसून जगाच्या कानाकोपर्यात उपलब्ध असलेली माहिती वाचायला मिळणे ह्या जालाच्या सोयीमुळे हा छंद जोपासणे अधिकच सोपे झाले आहे.
असाच 'भगवद्गीते'चा निर्माता कोण हा विचार मी करत असतांना सुचलेले काही विचार येथे मांडत आहे.
एका अर्थाने 'भगवद्गीते'चा निर्माता कोण ह्या प्रश्नाचे उत्तर देणे सोपे आहे. ज्या निर्मात्यांनी जय, भारत आणि अखेर महाभारत ह्यांची निर्मिति करण्यात सहभाग दिला त्या अज्ञात निर्मात्यांपैकी कोणी एकाने - अथवा अनेकांनीहि - हे कार्य केले आहे. त्यांपैकी कोणाचीच नावे ऐतिहासिक व्यक्ति म्हणून आता माहीत नसल्याने ही चौकशी येथे येऊन थांबते.
महभारतातील १ लाख श्लोकांमध्ये गीतेचे सुमारे ७०० श्लोक शान्तिपर्वाचा एक भाग आहे आणि शान्तिपर्वातील अन्य अनेक श्लोकांप्रमाणे ते आहे तेथेच पडून राहू शकले असते. पण तसे न होता कोणीतरी हे ७०० श्लोक वेगळे करून त्यांची 'भगवद्गीता' अशी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली. हे गीतेला स्वतःचे अस्तित्व देण्याचे काम इतके यशस्वी झाले की 'भारतीय तत्त्वज्ञानाचे सार' अशी तिची ओळख निर्माण झाली, त्यापुढे जाऊन गीता ही एक देवता मानून तिची देवळे होऊ लागली, गीता संदेशाचा प्रसार करणार्या संस्था निर्माण झाल्या. ख्रिश्चन धर्माला जसे बायबल, इस्लामला जसे कुराण, तसा हा हिंदूंचा हा प्रमाण धर्मग्रंथ आहे अशी जगात पुष्कळांची समजूत झाली. अशा अर्थाने गीता 'निर्माण' झाली. हे कोणामुळे घडले असा हा येथे प्रश्न आहे.
आदिशंकराचार्यांपासून ज्ञानेश्वर, रामानुजाचार्य ते लोकमान्य टिळक अशा अनेक विद्वानांनी आपापल्या विचारांनुसार गीतेचे विवरण केले. अजूनहि नवनवे अभ्यासक हेच कार्य आपापल्या मार्गांनी करीतच आहेत. ह्या सर्वांमधील सर्वात जुने आणि मान्यताप्राप्त विवरण आदिशंकराचार्यांच्या गीताभाष्यामध्ये आहे. त्यांच्या पूर्वीहि गीताग्रंथ वेगळा अस्तित्वात असावा असे मानायला जागा आहे कारण गीताभाष्यातच स्वतः शंकराचार्यांनी त्यांच्या पूर्वीच्या टीकाकारांचे उल्लेख केले आहेत. (जसे अध्याय ३ चा प्रारंभ 'केचित्तु अर्जुनस्य प्रश्नार्थं अन्यथा कल्पयित्वा तत्प्रतिकूलं भगवतः प्रतिवचनं वर्णयन्ति|) मात्र त्यांनी कोठल्याच त्यांच्या पूर्वीच्या टीकाकाराचे नामनिर्देशन न केल्यामुळे आणि असा कोणताच टीकाग्रंथ वा त्याचे नाव वा टीकाकाराचे नाव आज उपलब्ध नसल्यामुळे असे म्हणता येते की हे टीकाकार जनमानसावर फार प्रभाव टाकू शकले नाहीत.
जनमानसावर प्रभाव पडला तो शंकराचार्यांच्या भाष्यापासून कारण तेव्हांपासून गीतापाठ आणि गीतेच्या अभ्यासाची साखळी अविच्छिन्न चालू दिसते. अशा अर्थाने मी म्हणेन की आदिशंकराचार्य हे गीतेचे निर्माते आहेत.
हा विचार मी विवेकानंदांच्या एका उतार्यावरून बनविला आहे. पहा:
(The Complete Works of Swami Vivekananda, Vol III P 328):
'The great glory of Sankaracharya was his preaching of the Gita. It is
one of the greatest works that this great man did among the many noble works of his noble life - the preaching of the Gita, and writing the most beautiful commentary upon it. And he has been followed by all founders of the orthodox sects in India, each of whom has written a commentary on the Gita.'
गीतापाठासोबतच 'गीताध्यान' नामक ९ श्लोकांच्या रचनेच्या पठणाचीहि प्रथा आहे. त्याचा प्रारंभ 'पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयम्' असा होतो. 'सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः| पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्', सर्व उपनिषदे ह्या गाई, दोहन करणारा कृष्ण, भोक्ता अर्जुन आणि गीतामृत हे दूध, हे प्रसिद्ध वचनहि ह्या स्तोत्रातीलच आहे.
ह्यावर बरीच प्रदीर्घ चर्चा येथे वाचावयास मिळेल. चर्चा मीच तेथे सुरू केली होती. ती चर्चा प्रदीर्घ आहे म्हणून येथे तिचा सारांश देत नाही. पण चर्चेचे फलित म्हणजे मधुसूदनाचार्य सरस्वती (सु. १५४०-१६४०) (गूढार्थदीपिका ह्या टीकेचे लेखक) अथवा धेनकनाल जिल्हा, ओरिसा येथे वास्तव्य केलेले श्रीधरस्वामी (१५वे वा १६वे शतक) ह्या दोघांपैकी कोणी एकजण ह्या प्रसिद्ध स्तोत्राचा कर्ता असावा.
माझ्या मनातील दोनहि प्रश्नांना अशी काहीशी निश्चित उत्तरे मिळाल्याने मला खूपच बरे वाटले!
- Read more about गीता आणि गीताध्यान - 'उगमा'विषयी काही विचार
- 13 comments
- Log in or register to post comments
- 26027 views
रात्र काळी घागर काळी : पुस्तक परिचय

- Read more about रात्र काळी घागर काळी : पुस्तक परिचय
- 5 comments
- Log in or register to post comments
- 7893 views
माझी 'वाईट्ट' व्यसनं : भाग १
१९९३ ची गोष्ट ! कॉलेजच्या द्वितीय वर्षात होतो. केतन मेहताची नवी फिल्म रिलीज झाली होती. 'माया मेमसाब' ! बरीच चर्चा झाली होती या चित्रपटाबद्दल, त्यातल्या काही खास प्रसंगांबद्दल. साहजिकच आम्ही चार मित्र (चष्म्याच्या काचा साफ करुन) थिएटरवर पोचलो. जाताना मनात एकच भीती, कुणी ओळखीचे तर भेटणार नाही ना? खरंच सांगतो, चित्रपटांमध्ये बरंच काही होतं. पण आई शप्पत, थिएटरमधून बाहेर पडलो तेव्हा बाकी काही म्हणजे काही आठवायची इच्छा नव्हती. ओठावर एका गाण्याच्या चार पाच ओळी होत्या....
खयाल चलते है आगे आगे
मै उनकी छांवमें चल रही हूं...
न जाने किस मोमसे बनी हूं
जो कतरा कतरा पिघल रही हुं
- Read more about माझी 'वाईट्ट' व्यसनं : भाग १
- 13 comments
- Log in or register to post comments
- 14770 views
दिनविशेष - बॉस्टनहून भारतात बर्फाचं आगमन
१३ सप्टेंबर १८३३ रोजी एक जहाज कलकत्ता बंदरात दाखल झालं. बॉस्टनहून आलेल्या ह्या जहाजात १०० टन बर्फ होता. भारतात बर्फ आयात करणारं हे पहिलं जहाज होतं. चार महिने प्रवास करून हे जहाज भारताच्या किनाऱ्यावर पोहोचलं होतं. हे शक्य होण्यामागे प्रगत तंत्रज्ञानाचा सहभाग होता. त्याविषयी अधिक माहिती http://www.todayinsci.com/T/Tudor_Frederic/IceTradeAmericaToIndia.htm इथे मिळेल. भारतात त्या काळात 'हुगळी बर्फ' उपलब्ध असे, पण तो स्वच्छ नसे त्यामुळे पेयांमध्ये तो घालून पिणं शक्य नसे.
- Read more about दिनविशेष - बॉस्टनहून भारतात बर्फाचं आगमन
- 7 comments
- Log in or register to post comments
- 7194 views
"नॉट विदाऊट....." दुसरी बाजू
Taxonomy upgrade extras
स्नेहांकिता यांचा असा हा प्रतिसाद आहे की, ज्याचे मनापासून स्वागत करणे गरजेचे आहे. प्रथमच कुणी वाचक 'नॉट विदाऊट....' हे कथन दुसर्या अंगानेही वाचण्याचा प्रयत्न करीत आहे असे दिसले.
- Read more about "नॉट विदाऊट....." दुसरी बाजू
- 96 comments
- Log in or register to post comments
- 64135 views