स्वरसम्राज्ञीस मानवंदना !
आज २८ सप्टेंबर 2012 .
बरोबर ८३ वर्षांपूर्वी याच दिवशी यक्ष-किन्नरांना एक सुरेल स्वप्न पडले अन भारतीय संगीताच्या क्षितिजावरती एक तेजस्वी तारका उदय पावली. पं. दिनानाथ मंगेशकरांच्या संगीत-रोपट्यावर एक इवलीशी, सावळी कळी उमटली. . अन मग त्या कळीचे फुल होता होताना चित्रपट संगीत क्षेत्रातील सर्व भाषांमधील गीतांच्या कळियांना बहरू आला. आणि अल्पावधीतच भारतीय चित्रपट गीतांच्या कीर्तीचा वेलू गगनावेरी गेला.
- Read more about स्वरसम्राज्ञीस मानवंदना !
- 22 comments
- Log in or register to post comments
- 18973 views
पानगळती सुरू झाली होssss!
हां हां म्हणता उन्हाळा कधी सरला समजलंच नाही. अर्थात थंडी पडायला सुरूवात झालेलीच आहे पण 'दिल है के मानता नही।'. ते असो. आपण कितीही नाही म्हटलं तरी वेळ कोणासाठी थांबतो? येणार्या दिवसांचं स्वागत उल्हासाने करायचं हे शिकवण्यासाठीच जणू सगळा निसर्गच कसा नटलाय! त्याच्या पानांच्या वेगवेगळ्या छटा बघण्यासाठी म्हणून लोकं कुठे कुठे जातात! पण असं आवर्जून जाऊन बघण्यापेक्षा अनपेक्षित पणे जेव्हा त्याचं सौंदर्य दिसतं तेव्हा मात्र एक वेगळाच आनंद मिळतो. आज मुलाला शाळेत सोडताना त्याच्या शाळेच्या वाटेवरच एका ठिकाणी असंच दर्शन घडलं. तिथेच थांबून बायकोने घेतलेले हे काही फोटो.
- Read more about पानगळती सुरू झाली होssss!
- 9 comments
- Log in or register to post comments
- 7338 views
एकवार पंखावरुनी फिरो तुझा "हात"
महाराष्ट्राच्या राजकारणातले एक जाणते काका उत्तरेकडे तोंड करुन हे गीत गात आहेत असे समजा.
या एका गृहीतकामु़ळे मूळ गाणेच विडंबनाची मजा देते.
एकवार पंखावरुनी फिरो तुझा "हात"
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात
धरेवरी अवघ्या फिरलो
निळ्या अंतराळी शिरलो
कधी उन्हामध्ये न्हालो, कधी चांदण्यात
वने, माळराने, राई,
ठायी, ठायी केले स्नेही
तुझ्याविना नव्हते कोणी, आत अंतरात
फुलारून पंखे कोणी
तुझ्यापुढे नाचे रानी
तुझ्या "मनगटी" बसले कुणी भाग्यवंत
"मुका" "बावरा", मी "भोळा"
पडेन का तुझिया डोळा ?
मलिनपणे कैसा येऊ, तुझ्या मंदिरात
- Read more about एकवार पंखावरुनी फिरो तुझा "हात"
- Log in or register to post comments
- 3559 views
शुभंकरोति
काही राजकीय नेत्यांच्या नातवंडांसाठी, पतवंडांसाठी, नवीन 'शुभंकरोति' लिहिण्याची नितांत गरज होती. मागणी तसा पुरवठा!
स्कॅमं करोति कल्याणम
भूखंड्म जलसंपदा
सुष्टबुद्धी विनाशाय
ब्रिगेडशक्ती नमोस्तुते ||
आजोबा, पणजोबा नमस्कार
तुम्हीच आमचे तारणहार
सर्वांना वाकून नमस्कार
दिवा लावला दिल्लीपाशी
आमची सत्ता घराण्यापाशी ||
- Read more about शुभंकरोति
- 5 comments
- Log in or register to post comments
- 7312 views
छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ८ : पोत (टेक्श्चर)
पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे: पोत (टेक्श्चर)
ऐकण्या-पाहाण्यापेक्षा स्पर्श वास्तवाच्या खूप जवळ जातो. मृगजळ म्हणजे काय? प्रकाशकिरणे दूरवरून डोळ्यांपर्यंत येता-येता प्रतिमा विकृत झालेली असते. ध्वनीसुद्धा दुरून विकृत होऊनच कानांना भेटतो. स्पर्श मात्र अगदी जवळ धडकलेल्या वस्तूचाच होतो. विकार व्हावा इतपत वास्तव आणि ज्ञानेंद्रिय यांत अंतरच नसते.
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ८ : पोत (टेक्श्चर)
- 61 comments
- Log in or register to post comments
- 64411 views
प्रसारमाध्यमांना सनसनाटीचा हव्यास का असतो?
Taxonomy upgrade extras
हल्ली ‘इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यां'च्या बातमीदारीला नावे ठेवली जातात. कोणत्याही घटनेला भडक स्वरूप देऊन सनसनाटी निर्माण करण्याचा सोस मीडियावाल्यांना आहे, असे म्हटले जाते. पण हा दोष केवळ इलेक्ट्रॉनिक्स मीडियातच आहे, हे मला अजिबात मान्य नाही. सर्वच प्रसारमाध्यमांना सनसनाटीचा हव्यास असतो. याचे मूळ मनुष्य स्वभावात आहे. मनुष्य स्वभावालाच सनसनाटीचा हव्यास आहे; म्हणून प्रसारमाध्यमे सनसनाटीचा हव्यास धरतात. इलेक्ट्रॉनिक मीडियाची उपद्रव क्षमता जास्त असल्यामुळे त्यांनी निर्माण केलेली सनसनाटी ठळकपणे नजरेत भरते एवढेच.
- Read more about प्रसारमाध्यमांना सनसनाटीचा हव्यास का असतो?
- 10 comments
- Log in or register to post comments
- 7419 views
थालेपारट
वर्णमालेत एकापाठोपाठ एक येणार्या 'र' आणि 'ल' अक्षरांच्या उच्चारांत बरंच साम्य आहे. लहान मुलं बोलायला शिकत असताना आपल्या बोबड्या बोलीत अनेकदा 'र' चा 'ल' करतात. बर्याचदा प्रौढांच्या 'र'चा उच्चारही 'र' आणि 'ल'च्या मध्ये कुठेतरी होतो. वानगीदाखल ह्या बातमीचे शीर्षक पुन्हा पुन्हा, वेगाने म्हणून पहा. ['र'चा स्पष्ट उच्चार ऐकायचा असेल तर लताबाईंची काही गाणी लक्षपूर्वक ऐकावीत. उदा.
- Read more about थालेपारट
- 43 comments
- Log in or register to post comments
- 26158 views
मडो आणि काउ!
असं म्हणतात की माणसांना जिंकून घेण्याचा मार्ग त्यांच्या पोटातून जातो. माणसाची जीभ हा मोठा विलक्षण अवयव देवाने घडवला आहे. अन्न हे आपल्या मूलभूत गरजांपैकी एक आहे. आपल्या संस्कृतीमधे तर त्याला पूर्णब्रह्माचा दर्जा दिलेला आहे. आणि अन्नग्रहणाला यज्ञकर्म मानायला सांगितले आहे. जर अन्नग्रहणात उदरम् भरणम् एवढाच उद्देश देवाला अपेक्षित असता तर त्याने रसग्राही अशी रसना म्हणजे जीभ कशाला निर्माण केली असती? पण काही म्हणा, जिभेचे चोचले पुरवण्यातला जो काही आनंद आहे तो अवर्णनीयच म्हणायला हवा.
- Read more about मडो आणि काउ!
- 29 comments
- Log in or register to post comments
- 14861 views
भारताच्या न्याययंत्रणेत १००% थेट विदेशी गुंतवणूक : द 'ड्रीम' डिसिजन
लंच बॉक्समधले दोन गुलाबजांब खाऊन झाल्यावर हात साफ करून खुर्चीवर परतलो.पुढ्यातल्या स्क्रीनवर रिडीफ, ऐसी, मिपा, उपक्रम, टॉई, आयबीएन लाईव्ह वाचताना नेहमीप्रमाणे डोळ्यांवर झापड आली. (ऑफिसमध्ये दुपारी पावर न्यॅप घेण्याचा आमचा शिरस्ता आहे.)
स्क्रीनवर लाईव्ह टाईम्स-नाव सुरू होते. कानाला हेडफोन्स. कोणी अनोळखी बया किडूकमिडूक बातम्या सांगत होती. मस्त तंद्रा आली होती. आता डोळा लागणार.. अन अचानक कानात ढॅण्ण.. आणि स्क्रीनवर ब्रेकिंग न्यूज... खुद्द अरणब - तेही दुपारी? फारच महत्त्वाची बातमी असणार -
- Read more about भारताच्या न्याययंत्रणेत १००% थेट विदेशी गुंतवणूक : द 'ड्रीम' डिसिजन
- 12 comments
- Log in or register to post comments
- 7190 views
प्रोजेक्ट
.
- Read more about प्रोजेक्ट
- 8 comments
- Log in or register to post comments
- 4663 views