Skip to main content

प्रसारमाध्यम

जाने कहां गये वो लोग

Taxonomy upgrade extras

इस्माईल दरबारला पाहीलंय का कुणी ?
टीव्हीवर जज म्हणून नाही विचारत. अलिकडच्या हिंदी सिनेमाच्या श्रेयनामावलीत संगीतकार म्हणून त्याचं नाव कुणी वाचलंय का ? गायबच झालाय नाही का तो ? उदीत नारायणचं नावही असंच गायब झालंय. कदाचित मा़झ्या नजरेतून सुटण्याची शक्यता अधिक आहे. पण गेल्या पाच वर्षात त्याच्या आवाजात एकही नवीन गाणं कानावर पडलेलं नाही.

काय झालं असावं ?

पत्रकारांच्या नोकऱ्या जाताहेत

गेल्या तीन महिन्यांत दैनिकांची छपाईच बंद झाली, त्यामुळे खप नाही, जाहिराती नाहीत आणि उत्पन्न नाही म्हणून खर्च कमी करा हे धोरण राबवले जात आहे. लॉकडाउन संपल्यावर ताबडतोब दैनिकांचे उत्पन्न पुन्हा मूळपदावर येईल, अशी शक्यता नाही परंतु म्हणून अशी कत्तल करणे, हे मात्र माणुसकीला धरून नाही.

माध्यमथकवा, माध्यमलकवा

Taxonomy upgrade extras

सत्तरीच्या दशकाच्या उत्तरार्धातला किंवा ऐंशीच्या दशकाच्या पूर्वार्धातला काळ होता. एक आटपाट नगर होते. त्यात एक मध्यमवर्गीय घर होते. त्यांचा एक जवळचा नातेवाईक विलायतेत होता. तो दर चार-पाच वर्षांनी भारतात सुट्टीवर येत असे. त्याच्या येण्याचा आनंद वेगळाच असे. विलायतेबद्दल अपार कुतुहल असे. त्याच्या बारीकसारीक गोष्टींचे खूप कौतुक वाटे. तो परत गेल्यावर सुनेसुने वाटे. आमचा संपर्क बराच असायचा त्यावेळच्या मानाने. ‘आंतरदेशीय’ पत्र लिहीत होतो. मजकूर बराच संपादित करून आणि वर जास्तीत-जास्त मावावा म्हणून छोटे अक्षर काढून. तरीही पानांवरील जागा पुरत नसे, तेंव्हा घडी घालायच्या जागांवरही आत लिहीत असे.

दादा कोंडके यांचे चित्रपट

Taxonomy upgrade extras

मराठी चित्रसॄष्टीला सुवर्णकाळ दाखवणारे मराठी शोमॅन दादा कोंडके व त्यांचे अस्सल मराठी मातीशी इमान राखणारे गावरान भाषेतील इरसाल विनोदी चित्रपट हा एक अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या चित्रपटांइतकीच किंबहुना त्याहूनही सरस असणारी त्यातील गीते आज ५० वर्षानंतर देखील तितकीच श्रवणीय आहेत . अनेक रजत्/सुवर्णमहोत्सवी चित्रपट या गुणी कलवंताने दिले.

सेलेब्रेटीची आत्महत्या

Taxonomy upgrade extras

प्रत्युष्या बॅनर्जीच्या आत्महत्याच्या चर्चेत एका ब्रेकअप झालेल्या सेलेब्रेटीची आत्महत्या असाही सुर आहे. पण ब्रेकअप हे फक्त एकच कारण नाहीये, अनेक कारणांपैकी ते एक कारण असू शकते. प्रत्युश्याकडे फक्त एक सेलेब्रेटी म्हणून न बघता आत्ताच्या तरूण पिढीची एक प्रतिनिधी म्हणून ही बघावे लागेल आपल्याला.

गोष्ट एका अरभाट 'बिझनेस मॉडेलची'

Taxonomy upgrade extras

सन १९९३. देशात उदारीकरणाचं वारं वाहू लागलं होतं. मनमोहन सिंग आणि नरसिंह राव ही जोडगोळी देशाला गहाण ठेवत आहे, असा आरोप विरोधक उच्चरवात करत होते. बाहेरच्या उद्योगांसाठी आपले दरवाजे उघडले तर आपल्या लोकांचं काय होईल, असा प्रश्न तावातावाने विचारण्यात येत होता. नवीन आणि जुने असा संघर्ष सर्व क्षेत्रांत चालू होता. या संघर्षाचं चित्रपटसृष्टीमधलं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे, अभिनेता मिथुन चक्रवर्ती होता. त्या वेळी व्यावसायिक आघाडीवर त्याचं काही फारसं बरं चालू नव्हतं. नवीन दमाची ‘खान’ मंडळी तोपर्यंत बस्तान बसवू लागली होती. मिथुनचे चित्रपट एकामागून एक आपटत होते.