Skip to main content

इतर

‎निर्गुणी भजने‬ (भाग २.५) सुनता है गुरू ग्यानी - तिसरा चरण

-------------------------------
भाग १ | भाग २.१ | भाग २.२ | भाग २.३ | भाग २.४ | भाग २.६ | भाग २.७
-------------------------------

दुसऱ्या कडव्यावरच्या माझ्या लेखनावर प्रतिसाद देताना एका मित्राने "तृष्णा तोउ नै बुझानी" असा अजून एक पाठभेद सांगितला. तो शब्दशः कुमारजींच्या आणि परळीकरांच्या संहितेच्या जवळ जाणारा आहे. श्री प्रल्हाद तिपनिया आणि बागली गावातील हस्तलिखित यांच्याशी तो शब्दशः जुळणारा नसला तरी त्याचा अर्थ मात्र तिपनीया यांच्या पाठभेदाशी जुळणारा आहे आणि मला लागलेला अर्थ देखील त्याने अजून बळकट होतो.

स्पर्धा का इतर?

‎निर्गुणी भजने‬ (भाग २.४) सुनता है गुरू ग्यानी - दुसरा चरण

-------------------------------
भाग १ | भाग २.१ | भाग २.२ | भाग २.३ | भाग २.५ | भाग २.६ | भाग २.७
-------------------------------
मागच्या भागात मी ऐतरेयोपनिषदातील विश्वोत्पत्ती चा सिद्धांत आणि सुनता है गुरु ग्यानी चा पहिला चरण यांचा संबंध आहे असा अर्थ लावला होता. त्यानुसार, निर्गुणाच्या इच्छेने प्रथम निर्गुणातून चार लोकांची निर्मिती, त्यानंतर हिरण्यपुरुषाची निर्मिती, त्याच्या अवयवातून चार लोकाच्या लोकपालांची म्हणजे गुणांची निर्मिती, मग गुणांच्या कार्यसाफल्यासाठी मानवी देहाची निर्मिती, या देहातील विवक्षित अवयवांमध्ये एकेका गुणाने स्थान ग्रहण करणे आणि मग देहाच्या टाळूतून चैतन्य शक्तीने मानवी देहात प्रवेश करणे असा पहिल्या चरणाचा अर्थ लावला होता.

स्पर्धा का इतर?

सारा अमृता साहिर

सारा शगुफ्ता आणि अमृताची मैत्री खास होती. पत्रातून दोघी एकमेकींजवळ येत असत. सारा पाकिस्तानी लेखिका/कवी होती. त्या काळात एका मुस्लिम बाईनी लिहीणं समाजमान्य नव्हतंच. साराची समाजात चाललेल्या घडामोडी, स्रीयांवर होणारे अन्याय आणि तिच्या वयक्तिक आयुष्यातिल प्राॅब्लेम्स यामुळं होणारी घुसमट ती अमृताशी बोलून म्हणजे पत्रातूनच बोलून व्यक्त करत असे. असंच एक पत्र साराने अमृताला पाठवलं होतं उर्दूतूनच ...खूप उदास ...इमरोज वाचत होता आणि अमृता रडत होती...

स्पर्धा का इतर?

फिरसे आइयो....

"अजीब है हमारी मिठू.. गुस्सेली भी बहुत है और शांत भी बहुत है, दुःखी भी बहुत है और हंसती भी बहुत है.. बस, पागल नही है बाकी सब कुछ है..."

स्पर्धा का इतर?

इश्क मजाजी से इश्क हकिकी तक

"अज्ज आपणे दिल दरिया दे विच्च
मैं आपणे फूल प्रवाहे..."
...... साहिर गेला आणि अमृताने ही अशी आदरांजली वाहीली. पंजाबी मध्ये एक टप्पा आहे,
"कच्ची कंद उते काणा ए...
मिलणा तू रब नु तेरा प्यारा त़ा बहाणा "
...ज्याचा अर्थ आयुष्य एखाद्या मातीच्या कच्च्या भिंतीसारखं आहे ... भेटायचं तर त्याला ( देव/ ईश्वर/ जगद्नियंता, आकाशीचा बाप यापैकी कोणीही, काहीही) आहे तुझं प्रेम हे फक्त एक निमित्त आहे त्यासाठीचं....

स्पर्धा का इतर?

मेरी अमृता

मनापासूनची नाती कधी संपत नाहीत.... खरंच आहे! अमृताने साहिरवर अगदी मनापासून प्रेम केलेलं....वेडं प्रेम असलं तरी आंधळं प्रेम नव्हे! ते खरं होतं, अगदी सच्चं होतं!! आणि ते खरं असल्यामुळेच जगापासून लपवून ठेवण्याची त्यांना गरज पडलीच नाही. इमरोज़पासून तर तिने काहीच लपवलं नाही त्याला लिहिलेल्या अनेक पत्रांतून अमृता तिच्या आणि साहिरबद्दलच बोलत असे... आणि म्हणूनच साहिर ला इमरोज़ही खुल्या दिलानी, मोकळ्या मनानी भेटत असे... पहिल्यांदा साहिर अमृता आणि इमरोज़ भेटले ते दिल्लीमध्ये, तेव्हा इमरोज़ मोकळा होता पण साहिर कुठल्याश्या गोष्टीमुळे काहिसा उदास होता. त्या रात्री तिघांनी खूप गप्पा मारल्या.

स्पर्धा का इतर?