आरसा

"तुला माझ्या प्रेमाची पर्वाच नाही!" - लटक्या रागाने , आपले गोबरे गाल फुगवत या महीन्यात पाचव्यांदा तरी नंदिनी हे उद्गारली.
यावेळेस मात्र मी जय्यत तयारीतच होतो.
मी उठलो. मेजावरचा तिचा सुबक आरसा घेऊन तिच्याजवळ गेलो आणि आरसा तिला देत मिष्किलपणे म्हणालो - "बाईसाहेब, हा प्रश्न तुम्ही योग्य व्यक्तीला का बरे नाही विचारत?
तुझ्या सर्व तक्रारी उपकचेरींना धाडण्याऐवजी, मुख्य कचेरीलाच धाड ना.
तुझे सर्व भावनाप्रधान, संवेदनशील मुद्दे हाताळण्यास मला तरी बघ बुवा हीच व्यक्ती योग्य आणि जबाबदार वाटते. तुझे काय मत आहे" ; )

वाचकहो, तुम्हाला वाटत असेल तोच आरसा माझ्या डोक्यावर आदळून त्याचे शंभर तुकडे झाले असतील नाही का? पण थांबा खरी गंमत तर पुढेच आहे. अहो बाई आणि आरसा एकत्र आल्यावर जे होतं तेच झालं. आरसा देतेघेतेवेळी क्षणभराकरता नंदिनीचे लक्ष तिच्या प्रतिबिंबाकडे गेले. तिचे चित्त विचलित झालेच आणि ती अगदी मंत्रमुग्ध होऊन स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पहात राहीली.

आणि त्या पळभरात चतुर अस्मादिकांनी पोबारा केला. : )

_________वरील उतारा खालील कवितेचे स्वैर भाषांतर आहे_________________

Intimates by D H Lawrence

Don't you care for my love? she said bitterly.

I handed her the mirror, and said:
Please address these questions to the proper person!
Please make all requests to head-quarters!
In all matters of emotional importance
please approach the supreme authority direct! -

So I handed her the mirror.
And she would have broken it over my head,
but she caught sight of her own reflection
and that held her spellbound for two seconds
while I fled.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

हा हा हा! मस्त!
बाकी "गोबरे गाल" हे विशेषण एका सुंदर मुलीच्या गालांना लावलेले बघून अधिक गंमत वाटली Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मौजमजा आवडली.
गोबर्‍या गालाच्या मुली सुंदर असतातच. कल्पना, अमिता, लीना चंदावरकर वगैरे....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

तुम आईना ही न हर बार देखते जाओ
मिरी तरफ़ भी तो सरकार देखते जाओ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0