कॉकटेल लाउंज : वॉटर्मेलन मोहितो

'कॉकटेल लाउंज' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे "वॉटर्मेलन मोहितो

पार्श्वभूमी:

मला मनापासून आवडणारे एक रसाळ फळ म्हणजे कलिंगड. भरपूर पाणी असलेले हे रसरशीत फळ त्याच्या लाल रंगामुळे आणी हिरव्या आवरणामुळे कापल्यावर खुपच आकर्षक दिसते. कलिंगडाचे काप, त्यातल्या बिया अलगद तोंडातल्या तोंडात वेगळ्या करून खाण्यात जी मजा आहे तेवढीच मजा कलिंगडाचा रसही पिण्यात आहे. जर हा रस मजा देऊ शकतो तर मग त्याचे कॉकटेलही बहार आणणारच असा विचार येणे सहाजिकच आहे Smile
तर आजचे कॉकटेल आहे 'वॉटर्मेलन मोहितो', क्लासिक मोहितोला दिलेला कलिंगडाचा फ्लेवर.

प्रकार व्हाइट रम आणि पुदिना बेस्ड (मोहितो)
साहित्य
व्हाइट रम २ औस (६० मिली)
मोसंबी रस किंवा लेमन स्क्वॅश १.५ औस (४५ मिली)
कलिंगडाचा रस (प्युरी) २ औस (६० मिली)
ग्रेनेडाइन १० मिली
सोडा किंवा स्पार्कलिंग वॉटर १५ मिली
पुदिना ७-८ पाने
बर्फ
मडलर
बार स्पून
ग्लास कॉलिन्स

कृती:

सर्वप्रथम कलिंगडाचे काप करून मिक्सर किंवा ब्लेंडरमधून साधारण ६० मिली होईल इतका रस काढून घ्या. त्यानंतर कलिंगडाचे ३-४ छोटे छोटे तुकडे आणि पुदिनाची ३-४ पाने कॉलिन्स ग्लास मध्ये टाकून मडलरच्या सहाय्याने चेचून घ्या. त्याने पुदिनीच्या पानांमधले तेल (Oils) आणि कलिंगडाचा ताजा रस सुटा होऊन ते कॉकटेलला तजेलदार बनवेल.

आता ग्लासमध्ये बर्फाचे खडे टाकून घ्या. त्यात रम आणि मोसंबीचा रस किंवा लेमन स्क्वॅश टाका.

कलिंगडाच्या ताज्या रसामुळे रमला एक मस्त गुलाबी छटा येईल आणि ती तशीच गट्टम करून टाकावीशी वाटेल, पण जरा कळ सोसा. सब्र का कॉकटेल बढिया होता है| Smile आता त्यात कलिंगडाचा रस ओतून घ्या मस्त लाल रंग येईल आता मिश्रणाला.

त्यावर आता ग्रेनेडाईन ओता. मिश्रण एकदम लालेलाल होऊन जाईल. बार स्पून वापरून मस्त ढवळून घ्या.

थोडासा सोडा किंवा स्पार्कलिंग वॉटर टाकून ग्लास टॉप अप करा. सजावटीसाठी पुदिन्याची काही पाने व कलिंगडाचा एक काप ग्लासाच्या कडेला लावा.

चला तर, लालचुटुक वॉटर्मेलन मोहितो तयार आहे Smile

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

तोंडच्या सुटलेल्या पाण्याचं काय करावं? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

घ्या... तोच तर त्यांचा हेतू आहे.
करा आता हे कॉकटेल आणि त्यात तोंडाला सुटलेले पाणी जिरवा. तोंडाला पाणी सुटलेले असते तेव्हा जे काही पोटात जाते ते उत्तम पचते. तेव्हा किती घ्यायची हे आपल्या क्षमतेनुसार आधीच ठरवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो हाफिसात फटु बघून तोंपासु त्याचं काय कराव असं विचारायचं होतं.
बाकी 'पाणी अडवा पाणी जिरवा' हे सुत्र योग्य हे पटलं Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'पाणी अडवा पाणी जिरवा'

दुर्दैवाने आमच्याकडे सध्या दुष्काळ आहे. सगळं कसं ड्राय ड्राय आहे. तेव्हा या पेयाच्या सुंदर फोटोंकडे बघून डोळ्यात पाणी आणतो इतकंच...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही तर आपली 'मोहितोंची मधुरा' !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॉकटेल बघूनतरी आवडलं रे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मस्त !
शेवटचा फोटो खूप आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मडलर म्हणजे बत्ता (खलबत्त्यातला) हे कळलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कलिंगड आवडीचे, रमही आवडीची. मग काय विचारता?
आता कलिंगडे मिळेनाशी झाली आहेत, पण मिळू लागली की हे करुन बघणार आणि पिणार हे नक्की....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा