मुरलीधर मल्हार अत्रे यांच्याबाबत कोणास माहिती आहे काय?

श्री मुरलीधर मल्हार अत्रे (कवठेकर) यांनी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात "सुभेदार थोरले मल्हारराव होळकर" हे चरित्र लिहिले होते व ते १८९३ मद्धे नवा किताबखाना या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले होते. प्रस्तुत लेखकाचे हे पहिलेच लेखन होते...त्यानंतर त्यांनी अधिक काही लेखन केल्याची माहिती नाही. लेखकाबद्दलही माहिती मिळत नाही. चरित्रकोशातही नाही.

या उपरोक्त चरित्रग्रंथाचे पुनर्मुद्रण करावयाचे असून सदर लेखकाबद्दल कोणाहीकडे माहिती असल्यास वा त्यांचे अल्प का होइना चरित्र माहित असल्यास आणि त्यांचा कोणी वंशज माहितीत असल्यास कृपया सांगावे ही विनंती.

तत्कालीन स्थितीत, पुरेशा संदर्भ साधनांची वानवा असतांनाही अत्रेंनी संशोधकीय शिस्त पाळत अत्यंत तटस्थपणे हा ग्रंथ सिद्ध केला आहे. १९ व्या शतकात सांप्रदायिक चरित्रे अनेक प्रसिद्ध झाली असली तरी ऐतिहासिक व्यक्तींची चरित्रे अत्यंत तुरळक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे गद्य चरित्र १९०६ साली प्रथम प्रकाशित झाले. तत्पुर्वी १८७३ मद्धे गणेशशास्त्री लेले यांचे "शिवाजी काव्य" हे खंडकाव्यात्मक पुस्तक १८७३ मद्धे प्रकाशित झाले होते. म. फुलेंचा पवाडाही होताच. त्यामुळे १८९३मधे प्रकाशित झालेल्या या चरित्रग्रंथाचे एक ऐतिहासिक महत्व आहे.

तरी जेही कोणी अत्रेंची माहिती पुरवू शकतील मी त्यांच्या ऋणात राहील.
धन्यवाद.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

इथे हे पुस्तक सापडले :
आर्काईव्ज.ऑर्ग
लेखकाची माहिती जालावर सापडत नाही. Sad
...कदाचित भारत इतिहास संशोधक मंडळात मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारत इतिहास मंडळात चौकशी केली, परंतु त्यांना मुळात असे चरित्र होते हेच माहित नसल्याने उपयोग झाला नाही. "अत्रे कुलवृत्तांत" असल्यास कदाचित त्यात माहिती मिळेल असे वाटते. मी ब-याच जणांना सांगितलेय पण अद्याप तरी हाती काही लागलेले नाही. अत्रे मंडळीचा एखादा जालकट्टा असेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अत्रे (कवठेकर) असे जोड-आडनाव 'देवरुखे ब्राह्मण' या पोटजातीत मोडते -असे दिसले.(डिक्शनरीवाले) वीरकर, तेरेदेसाई इ. आडनावांच्या व्यक्ती या जातीत आढळतात.त्या मंडळींमध्ये चौकशी केल्यास कदाचित काही पत्ता लागू शकेल.(येथे पहा: http://www.devrukhebrahmin.com/sampark_soochana.htm)
(बघा, पुन्हा जातीवर गेलो.) Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संजयजी.....

मी सदर पुस्तक पूर्णपणे ऑनलाईनच वाचले आहे. (प्रिं.आगरकर यांच्या कौतुकाच्या चार शब्दांसह). मुरलीधर मल्हार अत्रे यांनी 'होळकर' विषयातील संशोधनाबाबत घेतलेल्या कष्टाची त्या लिखाणातून पुरेपूर प्रचिती येतेच. पण तुम्ही म्हणता तसे या एकमेव पुस्तकानंतर श्री.मुरलीधर अत्रे यांचे नाव साहित्यसंशोधन क्षेत्रातून जणू लुप्तच झाले.

त्यांच्यासंदर्भात कुणी काही माहिती देण्याच्या शक्यतेचा तुम्ही आणि वर श्री.विसुनाना प्रयत्न करीत आहात ते वाचले मी. त्यात अल्पशी भर घालतो. इंग्लिश पत्रकारितेत चांगले नाव असलेले श्री.अभिजित अत्रे नावाचे गृहस्थ पुण्यात राहतात. त्यांच्या ब्लॉगचे मी वेळोवेळी वाचन करीत असतो. http://www.blogger.com/profile/10835571158837493335 ह्या लिंकवरून तुम्ही त्यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला तर कदाचित काहीतरी ठोस माहिती मिळण्याची शक्यता तर आहेच शिवाय जर त्यांच्याजवळ मुरलीधर अत्रे यांच्याविषयी काही माहिती नसली तर किमान ते पत्रकारिता क्षेत्रात असल्याने तुमच्या शोधप्रयासास नक्कीच हातभार लावू शकतील.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या माहितीनुसार नवा किताबखाना हा व्यवसाय पुण्यातील बुधवार पेठेत होता आणि त्याचसुमारास विद्याहर हरि दामले हे त्याचे मालक होते. मुरलीधर मल्हार अत्रे ह्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ह्या दूरान्वयाचा काही उपयोग झाल्यास पाहावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तत्कालीन स्थितीत, पुरेशा संदर्भ साधनांची वानवा असतांनाही अत्रेंनी संशोधकीय शिस्त पाळत अत्यंत तटस्थपणे हा ग्रंथ सिद्ध केला आहे. १९ व्या शतकात सांप्रदायिक चरित्रे अनेक प्रसिद्ध झाली असली तरी ऐतिहासिक व्यक्तींची चरित्रे अत्यंत तुरळक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे गद्य चरित्र १९०६ साली प्रथम प्रकाशित झाले. तत्पुर्वी १८७३ मद्धे गणेशशास्त्री लेले यांचे "शिवाजी काव्य" हे खंडकाव्यात्मक पुस्तक १८७३ मद्धे प्रकाशित झाले होते. म. फुलेंचा पवाडाही होताच. त्यामुळे १८९३मधे प्रकाशित झालेल्या या चरित्रग्रंथाचे एक ऐतिहासिक महत्व आहे.

इतपतच मान्य करतो,पुस्तकात पुष्कळ ऐकीव आख्यायिका आहेत त्यातली नागाची आख्यायिका मी आन्ग्रे यांच्या बद्दल पण वाचली आहे.काही गोष्टी बाजूला ठेवल्या तरी परस्पर विरोधी विधाने आहेत.पानिपत संदर्भात नवीन बरेच संशोधन झाले असतानाच्या पार्श्वभूमीवर पानिपत संदर्भात प्रस्तुत ग्रंथाचा approach चुकीचाच आहे हे सांगायला तज्ञ माणसाची गरज नाही .

त्या काळी केलेला संशोधनाचा प्रयत्न म्हणूनच या कडे बघाता येईल .

http://www.misalpav.com/node/21680
या धाग्याची आठवण झाली .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिती मिळाली की कृपया हा धागा अद्ययावत करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अत्रेंबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी सर्व प्रतिसाददात्यांनी जी आत्मियता दाखवली याबद्दल आभार. परंतु अद्याप तरी हाती काही लागलेले नाही.

मन्दारजी, नागाची आख्याईका चक्क जोन माल्कमनेही आपल्या मेमोयर्स ओफ सेन्ट्रल इंडिया या पुस्तकात नोंदवलेली आहे. बहुदा प्रत्येक महापुरुषांबद्दल आख्याइका निर्माण करण्याची ही एक भारतीय मानसिकता असेल एरवी किमान ९०% पुस्तक हे इतिहासाला धरुन आहे. मात्र गोलाच्या लढाईसंदर्भात अत्रेंचा प्रचंड गोंधळ उडालेला दिसतो. अनेक तारखाही चुकीच्या आहेत.

असे असले तरी ऐतिहासिक व्यक्तींची चरित्रे नुकतीच कोठे लिहिली जावू लागली होती त्या काळातील हे चरित्र एक ऐतिहासिक ठेवा म्हणुन पुन्हा प्रसिद्ध होणेही गरजेचे वाटते. नवीनची उपलब्ध माहिती प्रस्तावनेत देत आहोत. हे चरित्र दोनेक महिन्यांत प्रकाशित करण्याचा मानस आहे. त्या आत अत्रेंची माहिती मिळावी असा प्रयत्नही सुरु आहेच. यश यावे हीच प्रार्थना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0