अजि म्या ब्रह्म पाहिले

शीर्षकाचा श्रेयाव्हेर - (असे लेखाच्या सुरुवातीसच करण्याची पद्धत नसली तरी श्री. श्रावण मोडक यांच्या अन्य संस्थळावर वाचलेल्या एका प्रतिसादावरून हे शीर्षक सुचले आहे हे मान्य करतो.)
प्रथम काही विस्कळीत विचार आणि मग चर्चा प्रस्ताव -
१.
'अजि म्या ब्रह्म पाहिले' हा पैठणचे संतश्रेष्ठ अमृतराय यांचा अभंग किंवा गीत. पूर्व जीवनात अत्यंत उर्मट आणि नास्तिक असलेल्या अमृतरायाने आपल्या कठोर शब्दांत अनेक कटाव लिहून भल्याभल्या विष्णुदासांची भंबेरी उडवली. त्यातून मध्वाचार्यांसारखे वैष्णव संतही सुटले नाहीत. पण मध्वाचार्यांनी शांतपणे आपली मते अमृतरायाला पटवून दिली आणि हळूहळू अमृतरायाचा हरिभक्त कीर्तनकार झाला. आजही अनेक कीर्तनकार संत अमृतराय यांच्या अनेक काव्यपंक्तींचा उल्लेख आपल्या कीर्तनातून करत असतात. पण अमृतरायांच्या या भक्तीपूर्ण कवनाचा या चर्चेशी कसलाही संबंध नाही.
२.
सर्न, जिनिव्हा येथे ४ जुलै २०१२ रोजी 'हिग्ज बोसॉन' सदृश्य एका मूलकणाचा माग काढण्यात सीएमएस आणि अ‍ॅटलस अशा दोन संशोधन मंडळांना यश आले. १९६२ साली अनुमानित केल्या गेलेल्या या कणाच्या अस्तित्व-पुराव्यामुळे विश्वाच्या निर्मितीचे आणि अस्तित्वाचे कोडे सोडवण्यात आणखी थोडे यश मिळेल.परंतु हा शोधला जाणारा शेवटचा मूलकण नसावा अशी शंका दस्तुरखुद्द संशोधकांनीच व्यक्त केल्याने यापुढेही ही शोधप्रक्रिया सुरूच राहणार असे दिसते.
३.
नोबेल पारितोषिक विजेत्या लिऑन मॅक्स लेडरमन या शास्त्रज्ञाने आपल्या एका जनताभिमुख पुस्तकात हिग्ज बोसॉनला गॉड पार्टिकल असे संबोधले. तसे करण्यामागचा त्याचा उद्देश पूर्णपणे वेगळा होता. स्वतः तो किंवा अनुमान करणारा पीटर हिग्ज या दोघांनाही तो उल्लेख चुकीचा वाटत असला तरी तथाकथित 'विज्ञानविरोधकांनी'(किंवा देवाचे अस्तित्व मानणार्‍यांनी) तो शब्द उचलून धरला आणि विज्ञानसुद्धा ईश्वराला मानते असा सोयिस्कर प्रचार सुरू केला.
४.
हिग्ज बोसॉन शोधला गेल्याने विश्वाच्या निर्मिती आणि अस्तित्वाचा प्रश्न विज्ञानाच्या अखत्यारीत आला आणि त्यामुळे ईश्वर नाही हे सिद्ध होते असे काहीतरी प्रमेय मांडण्याचा काही उथळ विज्ञानवाद्यांचा (नास्तिकांचा) प्रयत्न विनाकारण सुरू झाल्याचे दिसले. विनाकारण म्हणण्याचे कारण असे की कोणत्याही जबाबदार वैज्ञानिकाने असे विधान केलेले नाही.(-करण्याचे कारणच नाही / संबंधच नाही.)
५.
हिग्ज फील्ड(कन्डेन्सेट), आईनस्टाईनचा कॉस्मॉलॉजिकल कॉन्स्टंट (ईथर)हे वैज्ञानिक तर्क एका विश्वव्यापी माध्यमाचा उच्चार करतात.गणितात कॉस्मॉलॉजिकल कॉन्स्टंट आला तेव्हा आईनस्टाईनला चूक ठरवले गेले. त्यानेही ती आपली सर्वात मोठी चूक असल्याचे मान्य केले. आता पुन्हा त्यावर विचार सुरू आहे.असे हे सर्वव्यापी माध्यम आहे तरी का? आणि असलेच तर कसे आहे? असे-नाही, तसे-नाही. (नेति, नेति) पण हिग्ज फील्ड एक्साईट होऊन (लाटेतून एखादा थेंब उडावा तद्वत) त्याचा खंड उडाला की हिग्ज बोसॉन दिसतो आणि परत लगेच हिग्ज फील्डमध्ये लुप्त होतो. (म्हणजे हिग्ज फील्ड/कन्डेसेट आहे....!?) म्हणजे म्हटले तर थेंबाथेंबापासून लाट तयार होते - म्हटले तर लाटेतून थेंब उडतो आहे. समुद्र-थेंब दोन्ही एकच. (ब्रह्म आणि विश्व दोन्ही एकच!!) असे बापरे! हे विचार तर भलतीकडेच निघाले.
६.
पुढे जाऊ या. पीटर हिग्ज आणि प्रभृतींनी भाकित केलेल्या एका कणाचे अस्तित्व प्रयोगाने सिद्ध होण्यास तब्बल ६० वर्षे लागली. त्यासाठी मानवाच्या भौतिक प्रगतीला मोठीच झेप घ्यावी लागली.यापुढचा मार्ग तर आणखीच बिकट होणार. हिग्ज बोसॉन हा एक कण नसून कणमालिका आहे असे संकेत मिळत आहेत. या कण-मालिकेचे गणिती भाकित काही शास्त्रज्ञ करतील. त्या कणांचे अस्तित्व शाबित करण्यासाठी आणखी काही वर्षे जातील. म्हणजे नव्या शोधाने विज्ञानाचे क्षितीज आणखी दूर नेले.पुन्हा भाकित, पुन्हा निरीक्षण...
७.
विज्ञानाची झेप कितीही मोठी असली तरी 'प्लँक'ने मोठीच (की फारच लहान?) फळी आडथळा म्हणून उभी केली आहे. (प्लँक लेंग्थ,प्लँक मास,प्लँक टाईम...) तिच्या खालून या विश्वातील काहीही सरपटू शकत नाही. आजही ज्या पातळीवर ही कणांची मोजमापे होत आहेत ती सर्व संख्याशास्त्रीय विश्लेषणे आहेत. (125 GeV/c2 ~5 σ..)आज जी फील्ड्स अस्तित्वात असल्याचे भाकित शास्त्रज्ञ करत आहेत ती कंटिन्युअस असली तर डिस्क्रीट/ग्रॅन्युलर (कण स्वरूपात) त्यांची अंतिम मर्यादा मोजता येणेच शक्य नाही. अशा ->० पातळीवर वैज्ञानिकांचा गणिती तर्क पोचणार यात शंकाच नाही. पण प्रयोगकर्ते वै़ज्ञानिक त्या पातळीवर कसे प्रयोग करणार ते कळत नाही. अशा वेळी, न्यूटनने गणित सांगितले -> त्याचा पडताळा आला, आईन्स्टाईनने गणित सांगितले -> त्याचा पडताळा आला, फेनमनने गणित सांगितले -> त्याचा पडताळा आला, हिग्स् ने गणित सांगितले -> त्याचा पडताळा आला.... ही शृंखला जेव्हा शून्याची पातळी गाठेल तेव्हा त्याचा पडताळा कदाचित घेताच येणार नाही.

प्रश्न :
१. इतके पाल्हाळ यासाठी की विचारांनी जे जे साध्य आहे ते ते सर्व प्रयोगांनी साध्य होईलच असे नाही. मानवाला केवळ विचारांनी जे ज्ञात होऊ शकते ते पराकोटीचे आहे. बुद्धी कृतीपेक्षा या अंगाने श्रेष्ठ आहे. असे असेल तर विश्वात मानवाच्या कृतीला अशक्य आणि प्रयोगाला अज्ञात असे काही आहे हे अखेरचे मान्य करायला वैज्ञानिक का धजावत नसावेत? असे करणे म्हणजे अस्तिकांच्या किंवा ईश्वरवाद्यांच्यासमोर मान तुकवण्यासारखे ठरते असे वाचकांना वाटते काय? विश्वातील अंतिम गूढ प्रायोगिक विज्ञानाच्या आवाक्यात आहे असा विश्वास येथील वाचकांना वाटतो का? कशाच्या आधारावर?
२. सध्या तर्काधारीत विज्ञानात इतक्या मतमतांतरांचा गलबला आहे की त्यातील सत्य काय ते समजणे माझ्यासारख्या सामान्य माणसाला मुळीच शक्य नाही. या विश्वाचे एकजिनसी (तार्किक) चित्र नेमके कसे आहे ते कोणी सांगू शकेल काय? या चित्रातील कोणत्या पायरीपर्यंत प्रयोगकर्ते शास्त्रज्ञ पोचलेले आहेत?(वेगळा लेख लिहीला तरी चालेल.)
३. अन्य संस्थळावर दिलेल्या प्रतिसादात तेथील (इथेही असतील तर इथलेच) एक सन्मान्य सदस्य म्हणतात की "...विश्वनिर्मितीपूर्वी काहीच अस्तित्वात नव्हते.अवकाश(स्पेस)सुद्धा नव्हता.काळही नव्हता.हे माझ्या तर्काला पटतच नाही.ते खरे असायला हवे हे कळते. सिद्धान्ताचा शाब्दिक अर्थ समजतो.पण बुद्धीला आकलन होत नाही.माझ्या बुद्धीची झेप तेवढी जात नाही.जे बुद्धीला पटत नाही ते मानणे अप्राणिकपणाचे ठरेल.म्हणून विश्वनिर्मितीविषयी मी विचारच करत नाही." वै़ज्ञानिक सिद्धांत न पटणारे असू शकतात का? ज्याची जेवढी बुद्धी तेवढेच विज्ञान त्याने मानावे असे आहे काय? की प्रयोगाने जे सिद्ध होते तेवढेच वि़ज्ञान असते?

येथे विज्ञान-शिक्षणाच्या शिखरावर पोचलेले अनेक सदस्य आहेत. अशा प्रज्ञावान सदस्यांनी आपली मते व्यक्त करून उपकृत करावे ही नम्र विनंती. केवळ प्रश्नांची उत्तरे न देता सदस्यांनी आपापली मतेही मांडावीत ही अपेक्षा आहे.

(मी स्वतः विज्ञानविरोधीही नाही आणि अंधश्रद्धही नाही हे स्पष्ट करतो. तरीही अनंत काळापर्यंत मानवाच्या प्रायोगिक क्षमतेच्या पलिकडे काही विश्वरहस्य शिल्लक उरेल असे वाटते.)

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

भौतिक विज्ञानाच्या टोकाच्या प्रयोगात आम्हा सामान्यांची बुद्धी कशी हरवून जाते,डोके भंजाळते हे यथायोग्य मांडल्याबद्दल् आभार. अगदि माझाही असाच गोंधळ उडतो आणि म्हणून् हे विषय तत्काळ महत्वाचे नसल्याने मी बाजूला सारतो.
विश्वात मानवाच्या कृतीला अशक्य आणि प्रयोगाला अज्ञात असे काही आहे हे अखेरचे मान्य करायला वैज्ञानिक का धजावत नसावेत?
मान तुकवण्याचा वगैरे इथे काहीही संबंध दिसत नाही. पण असे मान्य करणे म्हणजे प्रयोग, तर्क थांबवणे असेच होइल. बरे, हे थांबवायचे कुठे हे कुणास ठाउक?
समजा न्यूटनच्याच काळी "हे अंतिम आहे" असे म्हणत बसलो असतो तर आजच्या काळातल्या कित्येक गोष्टी मिळाल्या नसत्या.
बाकी हे सारेच बाउन्सर जात असल्याने इथेच थांबतो

"आज मिळालेले नाही, पण न जाणो यत्न सुरु ठेवले तर अजूनही काही हाती लागेल" अशा आशेवर नि निश्चित् दिशेवर संशोधन चालत असावे.
आस्तिक नास्तिक हे मला कसे वाटतात ते सांगतो.
दाट अनंत असा अंधार आहे, अगणित माणसे त्यात कैद आहेत. ठराविक वेळी त्यांच्यावर अन्नवर्षाव होतो, वासाने तेखातात नि झोपी जातात्.
काही माणसे कुठेतरी काहीतरी हाताला लागेल म्हणून धडपडताहेत, ठेचकाळताहेत तरी शोधताहेत. ह्या अंधाराला अंत असलाच पाहिजे असा त्यांचा कयास, तो शोधणे, म्हणजे संशोधन.
काही माणसे ह्या धडपड्यांना मूर्ख म्हणत स्वस्थ बसली आहेत, "हा अंधार एका दिव्य शक्तीने केला असून ह्यास अंत नाही हे त्याने आमच्या कानात सांगितले" असा त्यांचा दावा.
स्वस्थ बसलेली माणसे = आस्तिक,
धडपडणारे = नास्तिक
आस्तिक खरे बोलताहेत की खोटे हे मोजायची कुठलीही फूटपट्टी उपलब्ध नाही.

-- (भौतिकशास्त्र नापास) मनोबा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

चर्चाप्रस्ताव अतिशय उत्तम, परंतु भैतिकशास्त्राची आवड असली तरी ज्ञान नसल्याने इतरांचे प्रतिसाद वाचायला उत्सुक आहे.
A Brief History of Time मध्ये सिंग्युलॅरिटीबद्दल वाचून असाच गोंधळलो होतो. अवकाश, काळविरहीत एका शून्याची कल्पना करणे खरोखरच अवघड आहे.
हिग्ज-बोसॉनच्या शोधाबद्दल ऐकण्यापूर्वीपासून कणांवर विचार करताना माझ्या डोळ्यासमोर एक चित्र येते, त्यात सगळीकडे कणांचा समुद्र दिसतो आणि लाटा दिसतात, काही कण एकत्र येऊन बुडबुडे आणि आकार होतात, ते बुडबुडे म्हणजे झाडं, माणसं, वस्तु वगैरे वगैरे असं काहीसं विचित्र. शिवाय प्रत्येक कणातही कणांचा समुद्र आहे असं वाटत राहतं. तर असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तारतम्य! विवेक!! पण हे चालते का अशा विषयांवरील चर्चेत? विसुनाना, तुम्हीच सांगा मला.
प्रयोग थांबू नयेत, ते चालू राहिले पाहिजेत. त्याचे, किंवा त्याच्या विरोधातील बाबींचे, तत्त्वज्ञान होते ते मौजेचे, हास्यास्पद असते. हिग्ज-बोसॉनचे मंदीर झाले हे हास्यास्पद. ते मंदीर झाले म्हणून त्यासंदर्भात मूर्ख, मूर्ख असे ओरडत उठणे हेही हास्यास्पद.
पण हे तत्त्वज्ञान हास्यास्पद असते ते तारतम्य किंवा विवेकी माणसांसाठी. त्यामुळे त्यांनी त्याची मौज घ्यावी आणि सोडून द्यावे. एरवी ते होत रहावे, तितक्याच चौकटीला आतून ढुशा मिळतील, अवकाश व्यापक होत जाईल. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चाप्रस्तावाची मांडणी अतिशय आवडली. मात्र आवाका प्रचंड आहे. सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखून ठेवतो आहे.
-----

... विचारांनी जे जे साध्य आहे ते ते सर्व प्रयोगांनी साध्य होईलच असे नाही. मानवाला केवळ विचारांनी जे ज्ञात होऊ शकते ते पराकोटीचे आहे.

तुम्ही चर्चेच्या प्रस्तावनेत 'अमुकने गणित सांगितले - त्याचा पडताळा आला' अशी शृंखला दिली आहे त्या पार्श्वभूमीवर हे वाक्य घेतो. सत्याच्या कक्षा रुंदावताना आपल्याला दूर असलेलं काहीसं अंधुक आधी दिसतं. मग आपण जवळ जाऊन शहानिशा करतो. आणि मग ते सत्य म्हणून प्रस्थापित होतं. यावरून तुम्हाला थोडंसं असं म्हणायचं आहे की लांबून कायमच गोष्टी दिसत राहतील पण जवळ जाऊन ते नेहमीच पडताळून पहाता येईल असं नाही. या मांडणीबद्दल अनेक आक्षेप आहेत.

उदाहरणार्थ कोणाला लांबवर एक पिवळसर ठिपका दिसला. त्याच्या हालचालींचं निरीक्षण करून त्याने अंदाज बांधला की तो ठिपका म्हणजे वाघ आहे. म्हणजे इथेच निव्वळ विचार नसून आधीच्या वाघांचं निरीक्षण आणि त्या ठिपक्याच्या हालचालींचं निरीक्षण आलं. त्यांच्यातलं साम्य नोंदवणं आलं. तेव्हा 'निव्वळ विचारांनी साध्य आहे ते' यात प्रयोगापासूनची असलेली फारकत घेणं योग्य नाही.

दुसरा, आणि अत्यंत महत्त्वाचा आक्षेप 'ज्ञात' या शब्दाला आहे. हा अशा प्रकारे हलणारा ठिपका पाहून काहींना तो हलणारा झेंडा वाटेल, काहींना वाघाची कातडी घालणारा माणूस वाटेल, आणि हे सर्व जण आपापले विचार 'अज्ञात पिवळा ठिपका कॉन्फरन्स' मध्ये पेपर सादर करून मांडतील. पुढच्या वर्षीपर्यंत थोडी अधिक निरीक्षणं होतील, आणि यातले काही हायपोथेसिस गळून पडतील. काही शिल्लक रहातील. जसजशी अधिकाधिक निरीक्षणं होऊन तो निश्चितच वाघ आहे हे कळेल तेव्हाच त्या पहिल्या माणसाचं म्हणणं खरं ठरेल. म्हणजे इतके दिवस 'तो ठिपका म्हणजे वाघ आहे' हे 'ज्ञात' होतं का? अर्थातच नाही.

म्हणून तुमचं विधान बदलून मला असं मांडावंसं वाटतं. 'मानवाला केवळ विचारांनी जे ज्ञात होऊ शकते कल्पता येते ते पराकोटीचे आहे.' एकदा हा बदल केला की विचारशक्ती ही निरीक्षणांपेक्षा श्रेष्ठ की कनिष्ठ हा प्रश्नच उपस्थित होत नाही.

वै़ज्ञानिक सिद्धांत न पटणारे असू शकतात का? ज्याची जेवढी बुद्धी तेवढेच विज्ञान त्याने मानावे असे आहे काय? की प्रयोगाने जे सिद्ध होते तेवढेच वि़ज्ञान असते?

वैज्ञानिक सिद्धांत न पटणारे अर्थातच असू शकतात. यात न पटणे याचा अर्थ 'उत्क्रांतीने घडवलेल्या मानवी इंट्युइशनशी मिळतंजुळतं नसणे' असा मी घेतो आहे. अगदीच फुटकळ उदाहरण द्यायचं झालं तर अणुकेंद्रक आणि इलेक्ट्रॉन्स किंवा शेजारच्या अणूंची दोन अणुकेंद्रकं यांमध्ये एवढी प्रचंड पोकळी आहे यावर विश्वास बसायला कठीण जातं. कारण आपल्या घन पदार्थाच्या अंगभूत, संकल्पना वेगळ्या असतात. पण याचा अर्थ असा नाही, की या दोन वेगवेगळ्या स्केल्सवर घन म्हणजे काय याच्या वेगवेगळ्या प्रतिमा एकाच वेळी ठेवणं शक्य नाही.

शेवटच्या प्रश्नाचा रोख नक्की कळला नाही. प्रयोगाने सिद्ध होईल तेवढंच खऱ्या अर्थाने ज्ञान म्हणावं लागतं. म्हणून त्या सिद्ध झालेल्या गोष्टींपलिकडे तर्कच करू नये असं नाही. प्रत्येकाने तर्क करावे, जो तर्क खरा ठरेल तो ठेवून घ्यावा. तो नक्की का खरा ठरला हे तपासून बघितलं तर इतर आसपासच्या अज्ञात गोष्टींबद्दल अधिक चांगला तर्क करणं सोपं जातं. मग ते तर्क तपासून बघावेत. ज्ञानाच्या कक्षा अशाच रुंदावल्या जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-वाघ आणि हिग्ज फील्ड किंवा वाघ आणि सिंग्युलॅरिटी हे 'प्रश्न-प्रमेय-निरीक्षण-अनुमान' या पायर्‍यांसाठी समतुल्य आहेत काय? शून्य आणि अनंत या गोष्टी कायमच दिसत राहतील पण जवळ जाऊन ते नेहमीच पडताळून पहाता येईल असं नाही - असे मला म्हणायचे आहे.

या विषयावर एखादा माहितीप्रद लेख श्री. घासकडवी यांनी लिहावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-वाघ आणि हिग्ज फील्ड किंवा वाघ आणि सिंग्युलॅरिटी हे 'प्रश्न-प्रमेय-निरीक्षण-अनुमान' या पायर्‍यांसाठी समतुल्य आहेत काय?

हो. कारण 'वाघ' हे उत्तर जवळ जाऊनच मिळतं. जर जवळ जाणं शक्यच नसेल, तर तो वाघ न बनता हलणारा पिवळा ठिपका इतकाच राहातो. वरील साखळी खरं तर 'प्राथमिक निरीक्षण-प्रश्न-प्रमेय-निरीक्षण-अनुमान' अशी असायला हवी असं वाटतं. कारण पहिल्या प्रश्नाच्याही आधी कुठचंतरी निरीक्षण असतं.

शून्य आणि अनंत या गोष्टी कायमच दिसत राहतील पण जवळ जाऊन ते नेहमीच पडताळून पहाता येईल असं नाही

मला वाटतं दिसणं आणि असणं यामधल्या प्रतीत द्वैतामुळे हे विधान येऊ शकतं. त्याऐवजी 'भासणं आणि दिसणं-म्हणून-असणं' असं द्वैत असण्याला माझी हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जवळ जाऊन बघणार्‍या प्रत्येकाला वाघाने खाऊनच टाकले (ब्लॅक होल) किंवा कोणी जवळ येत आहे असे पाहताच वाघ नेहमी दूरच पळत राहिला (एलेमेंटरी पार्टिकल्स) तर - तो वाघच आहे का की वाघाचे कातडे पांघरलेले गाढव आहे? , वाघच असेल तर पट्टेरी आहे की बिबळ्या आहे हे कसे ठरवणार? Smile
असो. शब्दच्छल नको. कदाचित मला काय म्ह्णायचं आहे ते तुम्हीच जास्त योग्य शब्दात मांडू शकाल. उत्क्रांतीवादासारखी एक लेखमाला लिहून या प्रश्नांवर प्रकाश टाकावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चेचा विषय आवडला.

पीटर हिग्ज आणि प्रभृतींनी भाकित केलेल्या एका कणाचे अस्तित्व प्रयोगाने सिद्ध होण्यास तब्बल ६० वर्षे लागली.

इथे एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे; तंत्रज्ञान. तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर भौतिक सिद्धतेची मर्यादा अनेकदा ठरलेली आहे. उदा. कंप्युटर क्षेत्रातली प्रगती आणि आंतराळशास्त्र. हिग्ज बोसॉन बाबतीत सद्ध्याच्या तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे किती हातभार लागला हे मला माहित नाही, पण तो एक महत्त्वाचा फॅक्टर असू शकतो.

असे असेल तर विश्वात मानवाच्या कृतीला अशक्य आणि प्रयोगाला अज्ञात असे काही आहे हे अखेरचे मान्य करायला वैज्ञानिक का धजावत नसावेत? असे करणे म्हणजे अस्तिकांच्या किंवा ईश्वरवाद्यांच्यासमोर मान तुकवण्यासारखे ठरते असे वाचकांना वाटते काय? विश्वातील अंतिम गूढ प्रायोगिक विज्ञानाच्या आवाक्यात आहे असा विश्वास येथील वाचकांना वाटतो का? कशाच्या आधारावर?

याविषयी आघाडीच्या संशोधकांनाच काय वाटते हे पहाणेच बरे नाही का?

मागील वर्षी माझ्या युनिवर्सिटीत 'कॉस्मिक ओरिजीन्स' विषयावर एक लेक्चर सीरीज आयोजित केली होती. त्यातील बरीचशी लेक्चर्स विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतील असे वाटते. त्याच बरोबर विश्वाची निर्मिती, त्याबद्दलचे विविध वाद, पुढे काय इत्यादींचा उहापोहची चांगला केलेला आढळेल. अर्थातच ही सीरीज सामान्यांकरता बनवलेली आहे, वैज्ञानिकांकरता नाही. सीरीज विषयी माहिती इथे. http://cos.arizona.edu/outreach/cosmic-origins-0

लेक्चर १: Cosmology: Making Sense of the Universe,
लेक्चर २: Origin of the Universe: The Big Bang,
लेक्चर ३: The Oldest Question: Is There Life Beyond Earth?,
लेक्चर ४: Dark Matter, Dark Energy and Inflation: The Big Mysteries of Cosmology,
लेक्चर ५: Astronomical Alchemy: The Origin of the Elements,
लेक्चर ६: Origins of Black Holes: Gravity at Its Extreme.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

दुव्यांबद्दल आभारी आहे. एक-एक करून पाहीन. सर्व माझ्याकरिताच आहेत. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

विषयाची मांडणी अतिशय आवडली. चर्चेत माझे काही कण Smile

सुरवातीला माझी बैठक/पार्श्वभुमी स्पष्ट करतो. माझ्यामते एकूणच निसर्गनियम माहित करून घेणे म्हणजे विज्ञान. विज्ञानाप्रमाणे निसर्ग चालत नसून निसर्ग कसा आहे, कसा कार्य करतो वगैरेचा अभ्यास करत रहाणे, त्याला विविध नियमांत बांधणे म्हणजे विज्ञान. मग हे नियमांत बांधणे सोपे व्हावे म्हणून गणितासारख्या सशक्त आयुधाचा वापर होतो व या नियमांना 'सुत्रात' बांधले जाते. मग अर्थातच त्या विषयाचे व्यापक ज्ञान होते परंतू संपूर्ण ज्ञान होत नाही. ते मिळवणे हेच तर विज्ञानाने संपूर्ण होणे आहे.

तेव्हा आपल्याला जे अज्ञात आहे त्याला 'देव', 'दैव', 'नशीब' अशी विविध नावे आहेत असे मला वाटते. ज्याक्षणी त्यामागचा 'नियम' समजतो त्याक्षणी त्याचे 'देव'पण नष्ट होऊन त्याला भौतिकता प्राप्त होते. एके काळी सूर्य देव होता आता तो तारा आहे. एके काळी पर्जन्य ही देवता होती आता ते शाळकरी पोरही मानणार नाही. तेव्हा अज्ञान आणि विज्ञानाचा हा संघर्ष म्हणजेच देव आणि विज्ञानाचा सांघर्ष आहे असे मी मानतो.

असे असेल तर विश्वात मानवाच्या कृतीला अशक्य आणि प्रयोगाला अज्ञात असे काही आहे हे अखेरचे मान्य करायला वैज्ञानिक का धजावत नसावेत?

अज्ञात असणे असे ते मानतात म्हणून तर त्याचे ज्ञान मिळावण्याचे प्रयत्न करतात. वैज्ञानिक जगात बरेच काही अज्ञात आहे हे मान्य करतातच. किंबहुना दैववादी मंडळी 'देवासाठी' काहीही अज्ञात नाही असा दावा करतत तेव्हा काहीवेळा हसु येते तर अनेकदा कीव!Smile

असे करणे म्हणजे अस्तिकांच्या किंवा ईश्वरवाद्यांच्यासमोर मान तुकवण्यासारखे ठरते असे वाचकांना वाटते काय?

एखादी गोष्ट अज्ञात आहे हे वैज्ञानिक मान्य करतात हे वर म्हटले आहेच. मात्र ती कायम अज्ञात राहिल हे मान्य करणे म्हणजे होय ते दैववाद्यांना पाठबळ दिल्यासारखे आहे कारण दैववाद्यांची शक्तीच 'अज्ञात' ही आहे!

विश्वातील अंतिम गूढ प्रायोगिक विज्ञानाच्या आवाक्यात आहे असा विश्वास येथील वाचकांना वाटतो का? कशाच्या आधारावर?

गणितात लिमिट नावाचा प्रकार असतो त्याभाषेत बोलायचे तर विज्ञानामुळे देव (म्हणजेच अज्ञान) टेन्डस टु झिरो Smile

अन्य संस्थळावर दिलेल्या प्रतिसादात तेथील (इथेही असतील तर इथलेच) एक सन्मान्य सदस्य म्हणतात की "...विश्वनिर्मितीपूर्वी काहीच अस्तित्वात नव्हते.अवकाश(स्पेस)सुद्धा नव्हता.काळही नव्हता.हे माझ्या तर्काला पटतच नाही.ते खरे असायला हवे हे कळते. सिद्धान्ताचा शाब्दिक अर्थ समजतो.पण बुद्धीला आकलन होत नाही.माझ्या बुद्धीची झेप तेवढी जात नाही.जे बुद्धीला पटत नाही ते मानणे अप्राणिकपणाचे ठरेल.म्हणून विश्वनिर्मितीविषयी मी विचारच करत नाही." वै़ज्ञानिक सिद्धांत न पटणारे असू शकतात का?

त्याच सदस्यआंना त्याच संस्थळावर लिहिलेली खरड इथे उद्धृत करतो: (खरडीतील अवांतर भाग करड्या ठशात)
अश्या प्रकारचा स्टेडी स्टेट थियरी (स्थिरस्थिती सिद्धांत) फ्रेड हॉयल आणि सहकार्‍यांनी मांडला होता. जो गणिताच्या कसोटीवर टिकला नाही. (आपले) जयंत नारळीकर, हॉयल, आणि जेफ्री बर्बेज यांनी त्यावर पुन्हा काम करून, त्यात परिवर्तन करून आपला. 'क्वासी स्टेडी स्टेट थियरी' मांडली (मराठीत त्याला नारळीकर स्थिरवत् स्थिती सिद्धांत असे म्हणतात). मात्र हा सिद्धांत अजूनतरी सिद्ध झालेला नाही. (मात्र त्याचे मोठ्या प्रमाणावर खंडनही झालेले नाही - काहि खंडन करणारे लेखन आहे, जे मला फारसे कळले नाही Smile )

तेव्हा इतर सिद्धांत सिद्ध होईपर्यंत तरी स्फोटाच्या 'आधी' हे कालदर्शन गैरलागु ठरावे. जर स्फोटातून काळ निर्माण झाला आहे तर त्याच्या 'आधी' ही स्थितीच नव्हती तेव्हा तिथे काय होते हा प्रश्नच गैरलागू होतो.

ज्याची जेवढी बुद्धी तेवढेच विज्ञान त्याने मानावे असे आहे काय?

माझ्या मते ज्याचे जेवढे ज्ञान तेवढेच त्याच्यापुरते विज्ञान Smile बाकी सार्‍या गोष्टी दैवात/नशीबात किंवा देवाकडे जमा होतात Smile

की प्रयोगाने जे सिद्ध होते तेवढेच वि़ज्ञान असते?

केवळ प्रयोगानेच नव्हे तर ठोस नियमाने सिद्ध व्हावे लागते.

मनुष्याला अजूनही बरेच अज्ञात आहे. तेव्हा त्या गोष्टी सध्या तरी दैवाकडे सोपवलेल्या आहेत. मनुष्य 'माणसाचे मन/बुद्धी', 'हवामान' वगैरेसारख्या नैसर्गिक गोष्टींचे आकलन करण्यास अजूनही सक्षम नाही. मात्र वैज्ञानिकांनी हे अशक्य आहे असे मान्य केलेले नाही. आणि करूही नये. कधी तरी याचेही आकलन होईल आणि मग नवे प्रश्न पडतील असे करत करत एके दिवशी देव टेन्ड्स टु झिरो चे रुपांतर देव (म्हणजेच अज्ञान) = झिरो असे होईल अशी आशा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुमचा प्रतिसाद अतिशय आवडला आणि पटला.
"...वै़ज्ञानिक सिद्धांत न पटणारे असू शकतात का?" याबद्द्लचं तुम्ही लिहिलेलं आवडलं.
यात 'न पटणारे' म्हणजे 'नॉन इन्ट्युटिव्ह' असा अर्थ लावला, तर वैज्ञानिक सिद्धांत तसे असतात...सापेक्षता सिद्धांतातील 'टाईम डायलेशन' किंवा पुंजवादातील अनेक कल्प्ना मला तरी 'नॉन इन्ट्युटिव्ह' वाटतात...म्हणूनच तर त्यातलं गणित समजून घेतल्याशिवाय ते पचनी पडण अवघड होत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

केवळ तर्क अन विचार विज्ञानाला मान्य नाहीत. पण श्री ज्ञानेश्वर, समर्थ रामदास अन यांसारख्या अनेक दिग्गजांनी जे अनुभव माडले आहेत, ते, त्यांच्याच इतर संदर्भांचे उदाहरण पाहता, असत्य असेलसे वाटत नाही.
विज्ञानाने कितिही भरारी घेतली असली तरी मनुष्याने प्राक्तनावर खरोखरच विजय मिळवला आहे काय ?
जीवनाचा 'मार्ग' निवडण्याचे अगर बदलण्याचे स्वातंत्र्य माणसाला खरोखरंच आहे का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"विज्ञानाची झेप कितीही मोठी असली तरी 'प्लँक'ने मोठीच (की फारच लहान?) फळी आडथळा म्हणून उभी केली आहे. (प्लँक लेंग्थ,प्लँक मास,प्लँक टाईम...) तिच्या खालून या विश्वातील काहीही सरपटू शकत नाही."
"सरपटू शकत नाही" म्हणजे काय म्हणायचं आहे? ते जाऊदे..प्लँक लेंग्थ,प्लँक मास,प्लँक टाईम या सर्व फंडामेंटल कॉन्स्टंट्स पासून बनलेल्या स्केल्स आहेत. हे कॉन्स्टंट्स नक्की कॉन्स्टंट्स आहेत की तेही बदलतात याविषयीसुद्धा संशोधन चालू आहे. त्यामुळे या स्केल्स अंतिम आहेत असही अजून आपल्याला महीत नाही.

"आजही ज्या पातळीवर ही कणांची मोजमापे होत आहेत ती सर्व संख्याशास्त्रीय विश्लेषणे आहेत.(125 GeV/c2 ~5 σ..)"
शास्त्रीय मोजमापे नेहमीच संख्याशास्त्रीय विश्लेषणे असतात आणि राहतील. त्यामुळे 'आजही..' असं म्हण्ण्याला काही अर्थ नाही.

" आज जी फील्ड्स अस्तित्वात असल्याचे भाकित शास्त्रज्ञ करत आहेत ती कंटिन्युअस असली तर डिस्क्रीट/ग्रॅन्युलर (कण स्वरूपात) त्यांची अंतिम मर्यादा मोजता येणेच शक्य नाही. अशा ->० पातळीवर वैज्ञानिकांचा गणिती तर्क पोचणार यात शंकाच नाही. पण प्रयोगकर्ते वै़ज्ञानिक त्या पातळीवर कसे प्रयोग करणार ते कळत नाही. अशा वेळी, न्यूटनने गणित सांगितले -> त्याचा पडताळा आला, आईन्स्टाईनने गणित सांगितले -> त्याचा पडताळा आला, फेनमनने गणित सांगितले -> त्याचा पडताळा आला, हिग्स् ने गणित सांगितले -> त्याचा पडताळा आला.... ही शृंखला जेव्हा शून्याची पातळी गाठेल तेव्हा त्याचा पडताळा कदाचित घेताच येणार नाही. "

कोणतीही फील्ड्स कंटिन्युअस/ डिस्क्रीट ही कोणत्या स्केलवर कशी आहेत हे ठरतं. सोप उदाहरण - पाणी कंटिन्युअस वाटतं आपण ज्या स्केल्सवर ते पाहातो त्या..पण आतिसूक्श्म/अणू-रेणूच्या स्केल्सवर ते डिस्क्रीट आहे.
त्यामुळे नक्की कोणत्या स्केलवर काय कंटिन्युअस/ डिस्क्रीट आहे हे कळण्यासाठी प्रयोग करत राहीलच पाहिजे.
"पडताळा कदाचित घेताच येणार नाही"...तुम्ही कदाचित हा शब्द वापरला आहे..म्हणजे "पडताळा कदाचित घेता येईलही" अशी शक्यता आहेच ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो ऋता, मी एक सामान्य माणूस आहे. (हे संस्थळ आपल्यासारख्या असामान्य लोकांनी गजबजलेले आहे हे मान्य असले तरी-)सामान्यांच्याच भाषेत मी हा चर्चाप्रस्ताव मांडला आहे. त्यातली भाषा मी मुद्दामच बचावात्मक वापरलेली आहे हे तुमच्यासारख्या चाणाक्ष आणि हुशार वाचकाच्या लक्षात आलेले असेलच.(बचावात्मक अशासाठी की आपले अज्ञान उघडे पडू नये.) त्यामुळे शाब्दिक चुका व्हायच्याच.माफ करावे.

माझे 'आजही, कदाचित, सरपटणे' हे शब्द त्या अज्ञानाचे प्लेसहोल्डर्स समजा. (आणि काढून टाका - जे उरेल तो तुमच्यासाठीचा चर्चाप्रस्ताव). शब्दांवर जाऊ नका. कसे ते तुम्हाला तुमच्याच शब्दात सांगतो -

कोणतीही फील्ड्स कंटिन्युअस/ डिस्क्रीट ही कोणत्या स्केलवर कशी आहेत हे ठरतं. सोप उदाहरण - पाणी कंटिन्युअस वाटतं आपण ज्या स्केल्सवर ते पाहातो त्या..पण आतिसूक्श्म/अणू-रेणूच्या स्केल्सवर ते डिस्क्रीट आहे.
त्यामुळे नक्की कोणत्या स्केलवर काय कंटिन्युअस/ डिस्क्रीट आहे हे कळण्यासाठी प्रयोग करत राहीलच पाहिजे.

असे तुम्ही म्हणता. थोडा अधिक विचार केला तर रेणू-अणू-न्युक्लिअस-प्रोटॉन-न्यूट्रॉन-इलेक्ट्रॉन-फोटॉन-लेप्टॉन्स-क्वार्क्स-ग्लुऑन-बोसॉन्स (सापडलेले)- सुपरस्ट्रींग्स (भाकित केलेले) हे डिस्क्रीट विश्व झाले. पण पुढे या कणांचा डार्क मॅटर-डार्क एनर्जी-ग्रॅव्हिटी यांच्याशी मेळ घालताना एव्हर-एक्स्पांडिंग स्पेस-टाईम फॅब्रिक आणि हिग्ज फील्ड अशा कंटिन्युअस कन्सेप्ट समोर येतात. आता त्यात स्केलचे काय? टाईम तर कंटिन्युअसच आहे. मानवाला मोजमाप करण्यासारखे जे डिस्क्रीट स्केल आहे ते प्लँकने सांगूनच ठेवले आहे.(इतर कुणीही सांगितले असते तरी त्या स्केलच्या नावाशिवाय काही फरक पडला नसता.) त्या स्केलच्या खाली कोणतेही प्रत्यक्ष मोजमाप शक्य नाही.(कारणे तुम्हाला माहित असतीलच.) त्यावर शास्त्रज्ञ काय करतात तर ते स्केलच थोडे रिफाईन करतात. तेही अगदी अलिकडे.(WMAP).हे उमगल्याने प्रत्यक्ष (फिजिकल) प्रयोगांकडून वैचारीक (थॉट) प्रयोगांकडे (सुपरकॉम्प्युटर सिम्युलेशन्स)वाटचाल आधीच सुरू झालेली आहे.यापुढच्या पातळीवरच्या प्रयोगांसाठी सिम्युलेशन करणे हाच उपाय समोर येत आहे. माझे म्हणणे असे आहे की मानवाला विचारांनी जे जे सिद्ध करणे शक्य आहे ते प्रत्यक्ष प्रयोग करून सिद्ध करणे शक्य नाही. इट ईज द डेथ ऑफ 'फिजिकल' एक्सपेरिमेंट्स! याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे?

या चर्चेत - माझ्या प्रश्न क्र. २ कडे कोणाचेच लक्ष गेलेले दिसत नाही. ज्याअर्थी आपण माझ्या चर्चा-प्रस्तावावर इतक्या आत्मविश्वासाने प्रतिसाद दिला आहे त्याअर्थी आपणाला माझ्या - "या विश्वाचे एकजिनसी (तार्किक) चित्र नेमके कसे आहे ते कोणी सांगू शकेल काय? या चित्रातील कोणत्या पायरीपर्यंत प्रयोगकर्ते शास्त्रज्ञ पोचलेले आहेत?" - या प्रश्नाचे उत्तर देता येणे शक्य दिसते. कृपया ते नेमके उत्तर द्यावे ही नम्र विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माफ करा वगैरे म्हणू नका..तशी प्रतिक्रिया यावी असा अजिबात हेतू नाही. 'आजही' या शब्दातून अस जाणवलं की..इतकी प्रगती करूनही आपण फार काही पुढे गेलेलो नाही..म्हणून लिहिलं की तसं म्हणणं बरोबर नाही.

स्ट्रिंग्ज वगैरे बद्द्ल काही नेमकं विधान करणं माझ्या अपुर्या माहितीमुळे मी टाळते आहे.

"हे उमगल्याने प्रत्यक्ष (फिजिकल) प्रयोगांकडून वैचारीक (थॉट) प्रयोगांकडे (सुपरकॉम्प्युटर सिम्युलेशन्स)वाटचाल आधीच सुरू झालेली आहे.यापुढच्या पातळीवरच्या प्रयोगांसाठी सिम्युलेशन करणे हाच उपाय समोर येत आहे. माझे म्हणणे असे आहे की मानवाला विचारांनी जे जे सिद्ध करणे शक्य आहे ते प्रत्यक्ष प्रयोग करून सिद्ध करणे शक्य नाही. इट ईज द डेथ ऑफ 'फिजिकल' एक्सपेरिमेंट्स! याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे?"

सुपरकॉम्प्युटर सिम्युलेशन्स हा प्रयोगांना पर्याय नाही. सिम्युलेशन्स मधे आपण आपल्याला महित असलेलं विज्ञान वापरून एक रेसीपी तयार करतो आणि तिचं एवोल्युश्न बघतो (गुंतागुंतीची आकडेमोड संगणक करतो एवढच)....त्यातून अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सुट्तात...पण आपण जे फीड केलेलं नाही ते त्यातून काही हाती लागणार नाही. शेवटी जर सिमम्युलेशन जे प्रयोगातून समोर आलं आहे ते 'रीप्रोड्यूस' करू शकलं नाही तर आपल्या रेसिपीमधे त्रूटी आहे एवढच कळेल.
ज्या थिअरीज मधून काहीच 'ऑबझरवेबल' कक्षेत असलेलं भाकित नाही त्यांना काहीच अंत नाही....म्हणजे या प्रॉबलेमला इनफायनाईट सोल्युशन्स आहेत...मग तुम्ही नक्की कोणत्या थिअरीज मानणार? त्यालाच तुम्ही "द डेथ ऑफ 'फिजिकल' एक्सपेरिमेंट्स" अस म्हणत आहात काय?

प्र.क्र. २ कडे लक्ष नक्कीच गेलं..पण त्याचं उत्तर माझ्या आवाक्यात नाही...नारळीकरांच्या 'आकाशाशी जडले नाते' मधे त्यांनी खूप सोप्या भाषेमधे याबद्द्ल लिहिलं आहे असं आठवतं..त्यांच्यासारख्यांनी, ज्यांना त्या विषयाची पुरेपूर जाण आहे, त्यांनी लिहिलेलं वाचणं उत्तम..कारण तज्ञ नसलेल्यांनी केलेली 'ओव्हर सिम्प्लिफाईड' विधानं शास्त्रीय दृष्ट्या चूक असण्याची शक्यता जास्त...आणि त्यामुळेच पुढे गैरसमज.

मुळात विश्वाचं अंतिम गूढ वगैरे या फार ढोबळ/ व्हेग गोष्टी वाटतात..."द आन्सर इज ४२"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे म्हणणे असे आहे की मानवाला विचारांनी जे जे सिद्ध करणे शक्य आहे ते प्रत्यक्ष प्रयोग करून सिद्ध करणे शक्य नाही.

मुद्दा असा आहे की जे विचारांनी 'सिद्ध' होतं ते सत्य असेलच असं नाही. सोपं उदाहरण द्यायचं झालं तर आपण 'पाय'च्या किमतीचं घेऊ. कोणीही विचार मांडून सांगू शकेल की सिमेट्रीच्या तत्वावर पायची किंमत स्थिरच असली पाहिजे. युक्लिडीय भूमितीमध्ये पाय हा स्थिरांक आहे. वर्तुळाच्या आकारावर ते गुणोत्तर अवलंबून नाही. मात्र आपलं विश्व युक्लिडीय नाही. त्यामुळे पायची सैद्धांतिक किंमत आपल्या विश्वाला लागू होत नाही. हे सत्य अचूक निरीक्षणांतून हाती आलेलं आहे. या विषयावर धनंजयने लेख लिहिलेला आहे.

तेव्हा निव्वळ विचारांनी जे 'सिद्ध' झालेलं आहे, तेसुद्धा स्वीकारण्याला एक विशिष्ट मर्यादा आहेच. न्यूटनचं मेकॅनिक्स चूक नाही, पण ते एका विशिष्ट मर्यादेपर्यंत लागू होतं. विचारांच्या व प्रयोगांच्या मर्यादा एकमेकांच्या हातात हात घालून विस्तारतात.

प्रयोगांची 'मर्यादा' ही संकल्पनाही एखाद्या थियरीप्रमाणे आहे. आज जे विचारांनी सिद्ध झालेलं वाटतं ते उद्या बदलतं. बदलतं म्हणजे आमूलाग्र बदलत नाही, पण विशिष्ट मर्यादेपलिकडे एखादी थियरी लागू पडत नाही हे लक्षात येतं. त्यामुळे 'डेथ ऑफ एक्स्परिमेंट' ही संकल्पना पचत नाही.

"या विश्वाचे एकजिनसी (तार्किक) चित्र नेमके कसे आहे ते कोणी सांगू शकेल काय? या चित्रातील कोणत्या पायरीपर्यंत प्रयोगकर्ते शास्त्रज्ञ पोचलेले आहेत?"

या प्रश्नाचं सावकाशीने उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. मलादेखील ते चित्र तुकड्या तुकड्यातच माहीत आहे. हिग्ज बोसॉनमुळे स्टॅंडर्ड मॉडेलमध्ये मांडलेल्या सर्व मूलभूत कणांचा शोध लागलेला आहे, इतकंच आत्ता म्हणता येईल. याचा अर्थ असा नव्हे की 'अंतिम सत्य' हाती गवसलं आहे. मात्र आत्तापर्यंत ज्या गृहितकांवर ते मॉडेल उभं होतं, त्यातला एक प्लेसहोल्डर खांब जाऊन खरा खांब आला आहे.

इथे एक सम्यक चित्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0