जोडी जमवली देवानं-अध्यात्म आणि विज्ञानाची (डॉ. श्री बालाजी तांबे)

हिग्ज बोसॉनचा शोध साजरा करायला रविवारच्या 'सकाळ'मध्ये अनेक लेख आले आहेत. त्यातला डॉ. श्री. बालाजी तांबे यांचा 'जोडी जमवली देवानं-अध्यात्म आणि विज्ञानाची (डॉ. श्री बालाजी तांबे)' या शीर्षकाचा लेख मनोरंजक आहे. नमुन्यादाखल त्यातील काही उद्धृते :

अदृष्ट रूपात असलेल्या शक्‍तीच्या शोधात जाणारा अध्यात्मवाद आहे तर घनीभूत झालेल्या वा आकार धारण केलेल्या त्याच शक्‍तीचा अभ्यास करून परमेश्‍वरापर्यंत पोचणारा भौतिकवाद (आधुनिक विज्ञान) आहे. अशा तऱ्हेने केव्हा केव्हा असे लक्षात येते की विज्ञानही परमेश्‍वराच्याच शोधात आहे.

आता साधारण कल्पना आली आहे की या दिशेने आपल्याला देवाचे ज्ञान होईल. ते आहे पण कळत नाही; ते आहे पण दिसत नाही; ते आहे पण आवाक्‍याबाहेर (beyond) आहे; ते समजण्याच्या सीमांच्या पलीकडे आहे, ते इंद्रियांच्या सीमांच्या पलीकडचे आहे हेच शेवटी विज्ञानाला कळणार आहे.

प्रयोगात वापरलेले चुंबकत्व हे निसर्गाचे म्हणजेच देवतत्त्वाचेच प्रकटीकरण आहे असे म्हणणे वावगे होणार नाही.

बाहेर पाहिलेल्या वस्तू मेंदूत प्रतिबिंबित होतात हे सध्या संशोधनाद्वारा सिद्ध केलेले दिसते. भारतीयांनी याच तत्त्वावर यंत्रशास्त्र, मंडलशास्त्र यापूर्वीच विकसित केलेले आहे. मंगल दर्शन घेणे, देवाचे दर्शन घेणे, एखाद्या सुंदर मूर्तीला नटवून तिचे दर्शन घेणे या गोष्टी याच तत्त्वावर आधारित आहेत.

"देव गावला कणाकणात' असे आज "दैनिक सकाळ'मध्ये वाचल्यानंतर असे लक्षात आले की हे सांगण्यासाठी केलेली मेहनत, केलेला खर्च आपल्या ऋषिमुनींनी कधी व कसा केला असेल? अजून प्रत्यक्षात सापडले नसले तरी जे सत्य सापडेल असे विज्ञानाला वाटायला लागले आहे तेच सत्य ठामपणे उद्धृत करून, त्यावर सर्व वेदवाङ्मयाची निर्मिती करून त्याच तत्त्वाच्या आधारे सृष्टीचा व्याप कसा चालतो हे दाखवून, त्याद्वारे पुराणातील वेगवेगळ्या कथा सांगून विश्‍वनिर्मितीचे गूढ व एकूण हा विश्‍वपसारा आपल्या भारतीय ऋषिमुनींनी कसा शोधून काढला व तो समाजापुढे कशा तऱ्हेने ठेवला हे एक गहन कोडे आहे.

विश्‍वाची व्याप्ती एवढी मोठी आहे की जर विश्‍वाच्या उत्पत्तीचा वा विश्‍वसंबंधीचा काहीही शोध लावायचे म्हटले तर अफाट खर्च होणार हे नक्की. त्याएवजी पिंड-ब्रह्मांड न्यायाने संपूर्ण विश्‍व एका अणूत सामावलेले आहे हे लक्षात घेऊन मनुष्याने स्वतःच्या शरीरात पूर्ण विश्‍वरचनेचा वा त्याच्या उगमाचा शोध घ्यायचा ठरविणे नक्कीच सोपे होईल. हे लक्षात घेऊन ऋषिमुनींनी या विश्‍वाचा अभ्यास स्वतःच्या शरीरात करून विश्‍वासंबंधीचे नियम बाहेरच्या विश्‍वाशी पडताळून पाहून नक्की केले आणि आलेले अनुभव वेद वाङ्मयात लिहून ठेवले.

परमेश्‍वराने स्फोट घडवून ज्यावेळी विश्‍वाची निर्मिती केली तेव्हा तो त्याच्या जाणिवेतून झालेला विस्फोट होता, त्याला कल्पना स्फुरली होती, स्फुट झाली होती. उगमापाशी असलेली गंगा थेंबाथेंबाने बाहेर येते व तिचाच पुढे गंगासागर होतो व तोच गंगासागर पुढे सागराला मिळतो तशा पद्धतीने हा स्फोट झाला असावा.

ज्या कणात संकल्पनाही आहे, तो कण ज्यावेळी विस्तार पावेल त्यावेळी त्याला अमुक एक कल्पनेचा विस्तार कर असे सांगण्याची योजना वैज्ञानिकांना करावी लागेल.

त्याशिवाय शंखांविषयीची मोठी रंजक माहिती या लेखात आहे.
लेख इ-सकाळमध्ये वाचला तर ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची ही मौलिक टिप्पणीही बोनस म्हणून वाचायला मिळेल :

हे विश्‍व कसं आणि का निर्माण झालं यापेक्षा या विश्‍वाचं काय करायचं, याबद्दलचं महत्त्वपूर्ण प्रतिपादन ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. श्री बालाजी तांबे यांनी या लेखात केलेलं आहे, त्याच्याशी मी पूर्णतः सहमत आहे. अध्यात्म आणि विज्ञान या दोघांचाही प्रवास सत्यशोधनाच्या दिशेनं सुरू असतो. वस्तुतः आपले ऋषी-मुनी आणि वैज्ञानिक यांच्यात सुसंवाद हवा. परंपरेनं चालत आलेलं ज्ञानाचं संचित आणि आधुनिक विज्ञान एकत्र यायला हवं. "इंटिग्रेटेड मेडिसिन' ही संकल्पना मी मांडत असतो. मानवी जीवन सुखी-समृद्ध-संपन्न होण्यासाठी सर्व उपचारपद्धतींचा मिलाफ व्हायला हवा. भारतीय आयुर्वेद, होमिओपॅथी, ऍलोपॅथी इत्यादी सर्व औषधी उपचारांच्या ज्या पद्धती आहेत, त्यांचा समुच्चय होण्याची गरज आहे. आधुनिक विज्ञान, संस्कृतीनं दिलेलं-अनुभवातून आलेलं परंपरागत असं ज्ञान आणि आध्यात्मिकता यांचा सुरेख आणि सुरेल मेळ मानवी जीवनाला अर्थ प्राप्त करून देईल. असा सुंदर संगम डॉ. श्री बालाजी तांबे यांच्या विचारात असलेला मला दिसतो. त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!

याशिवाय इतर वाचकांच्या मौलिक टिप्पण्यासुद्धा वाचायला मिळतील. अधिकाधिक वाचकांनी या मनोरंजनाचा लाभ घ्यावा.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

सन्जोप रावांचा http://www.manogat.com/node/17319 हा लेख आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

खरेच मनोरंजन झाले. प. वि. वर्तकांची फार्फार आठवण झाली.
डॉ. माशेलकर नक्की कशाशी सहमत आहेत हे पहायला मूळ लेख वाचायला हवा.

राधिका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

खीखीखीखी... ओ सजना बरखा बहार आई... आठवलं...

लेख इ-सकाळमध्ये वाचला तर ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची ही मौलिक टिप्पणीही बोनस म्हणून वाचायला मिळेल

अरे वा... या शब्दाची व्याख्या काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रॉयल सोसायटीचे पूर्ण/अर्ध सदस्यत्व मिळालेल्या लोकांना "ख्यातनाम शास्त्रज्ञ" हे बिरूद चिकटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बालाजी तांब्यांची मुक्ताफळं फारच मनोरंजक असतात. त्यांच्या दिव्य मराठीचा एक नमुना - "सुरुवातीला एकदा एरंडेल तेलाचा एक जुलाब घ्यावा, नंतर पाच दिवस सकाळ-संध्याकाळ अर्धा-अर्धा चमचा वावडिंगाचे चूर्ण मधासह घ्यावे व पुन्हा एकदा एरंडेल तेलाचा एक जुलाब घ्यावा. " (संदर्भ: फॅमिली डॉक्टर , Friday, August 13, 2010)

मी आता सकाळच बंद करायचा असे ठरवले आहे - https://www.facebook.com/IDoNotLikeSakal

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांच्या दिव्य मराठीचा एक नमुना - "सुरुवातीला एकदा एरंडेल तेलाचा एक जुलाब घ्यावा, नंतर पाच दिवस सकाळ-संध्याकाळ अर्धा-अर्धा चमचा वावडिंगाचे चूर्ण मधासह घ्यावे व पुन्हा एकदा एरंडेल तेलाचा एक जुलाब घ्यावा. "

उर्दू/फारसीमध्ये 'जुलाब' हा शब्द 'रेचक' अर्थात 'पोट साफ करण्यासाठी पोटात घ्यावयाचे पाणी' असा काहीसा होतो, असे कळते. (दुवा १ (उर्दू), दुवा २ (फारसी))

मराठीतही हा शब्द याच अर्थाने वापरता येतो; मात्र, मराठीत तो सामान्यतः तो 'उर्दू/फारसीतील जुलाब पोटात घेतल्यावर होणारा परिणाम' अशा अर्थाने वापरला जातो, असे आढळते. (दुवा ३ (मराठी))

उर्दू आणि मराठी जुलाबांतील हा कार्यकारणभाव रोचक आहे. (थोडक्यात, उर्दू जुलाब प्याल्याने मराठी जुलाब होतो, असेही म्हणता येईल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक माहिती दिलीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

('रोचक'बद्दल कल्पना नाही. 'रेचक' निश्चित.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आज बाग़ में खिलेगा एक ग़ुलाब
पिला दे साकी, पिला दे साकी, पिला दे साकी, एक गिलास जुलाब!' *

* गरजूंनी मूळ संदर्भ तपासून नेमके शब्द दुरुस्त करून घ्यावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बालाजी तांबे हे नाव वाचूनच मनोरंजन झालं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय लेख वाचलेले नाहीत पण त्यांचे संगीत ऐकलेले आहे आणि अपरीमीत फरक जाणवला आहे.

उदाहरणार्थ - दत्तात्रेय सीडी खूप शांत करते हा १००% अनुभव आहे.

कालच "समृद्धी" इथे परत एकदा विकत घेतली कारण पहीली सीडी भारतात राहीली होती. पूर्ण सीडी ऐकल्यानंतर जवळजवळ शेवटी "महालक्ष्मी अष्टक" आहे. हा सर्वोच्च बिंदू आहे. येथपर्यंत पोहोचेपर्यंत जवळजवळ समाधी लागते. आणि मग अष्ट्काचा आनंद अवर्णनिय अनुभवता येतो.

एक काळ होता "महाशक्ती दुर्गा" मी सतत ऐकत असे कारण बसने जाता जाता कानाला लावून ऐकणे होत असे पण ..... झेपली नाही. खूपच प्रखर (इन्टेन्स) सीडी आहे.

प्रत्येक सीडी चे संगीत एक वातावरणनिर्मीती करते. एवढेच काय सीडी चे कव्हर (मुख/मलपृष्ठ) आणि त्याची रंगसंगती देखील संगीताच्या "मूड" ला साजेशी आहे.

तांबे यांचे संगीतविषयक ज्ञान वादातीतच आहे. वाद्यवृंद/आवाजोच्चार फार परीणामकारक वाटले मला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुभव घेऊन पहायला हवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे पोस्ट लिहीण्यास राज क्षीरसागर यांनी अंमळ घाईच केली म्हणायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जगातील सर्व शास्त्रज्ञांनी आपापले संशोधन बालाजींना विचारुनच करावे. मूळ लेखात तर हे पण लिहिले आहे.

परमेश्‍वर वेगळा न राहता तोच पुन्हा या ठिकाणी पृथ्वीशी एकरूप होतो. त्यातून पुन्हा एकात्म राहते, सरतेशेवटी सगळे एक राहते. एकापासून सुुरुवात होऊन शेवटी एकापर्यंत पोचायचे असते हा सिद्धांत भारतीयांनी स्वीकारलेला आहे. त्यामुळे सर्व समाज मतभिन्नतेशिवाय, जातिवर्णाशिवाय किंवा कुठल्याही प्रकारच्या भेदभावाशिवाय आहे.

माझी समजूत होती की भारतीयांनी शून्यापासून शून्यापर्यंत पोचायचे असे ठरवले आहे, कारण लक्षणे तरी तशीच दिसत आहेत.
आम्हाला जे जातिभेद,वर्णभेद, मतभिन्नता दिसते तो केवळ भासच आहे म्हणायचा तर! मेरा भारत महान!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परमेश्‍वराने स्फोट घडवून ज्यावेळी विश्‍वाची निर्मिती केली तेव्हा तो त्याच्या जाणिवेतून झालेला विस्फोट होता, त्याला कल्पना स्फुरली होती, स्फुट झाली होती. उगमापाशी असलेली गंगा थेंबाथेंबाने बाहेर येते व तिचाच पुढे गंगासागर होतो व तोच गंगासागर पुढे सागराला मिळतो तशा पद्धतीने हा स्फोट झाला असावा.

मला गंमत वाटते म्हणजे बिग बॅंग थिअरी आल्याबरोबर लग्गेच कशी 'परमेश्वराने स्फोट घडवून विश्व निर्माण केलं' वगैरे विधानं यायला लागली? शंभर वर्षांपूर्वी कोणीच स्फोटाचा उल्लेख केलेला दिसत नाही. स्फोट म्हणजे जाणिवेतला विस्फोट, स्फुरणं, स्फुट होणं वगैरे तर प्रचंड विनोदी. त्याचा नदीच्या थेंबाथेंबाने होणाऱ्या उगमाशी काय संबंध हेही न विचारता ऐकून घेतलेलं उत्तम.

शब्दांचं कोलित अनेक माकडांच्या हाती आहे एवढंच म्हणायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>नदीच्या थेंबाथेंबाने होणाऱ्या उगमाशी काय संबंध हेही न विचारता ऐकून घेतलेलं उत्तम.

अगदी अगदी. आणि नदीच्या एका थेंबाचा महासागर होत नसून बाहेरून थेंब येऊन मिळत असतात असले किरकोळ क्षूद्र तपशील तर दुर्लक्षिण्यायोग्यच असतात. Smile

>>शंभर वर्षांपूर्वी कोणीच स्फोटाचा उल्लेख केलेला दिसत नाही.

तसं नाही. पूर्वी ते गूढ भाषेत लिहिलेलं होतं. त्याचा अर्थ स्फोट हे नंतर लक्षात आलं Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लेख वाचवला गेला नाही. माशेलकरांची प्रतिक्रीया पेपर आवृत्तीत नाहीए का? प्रतिक्रीया वाचून गंमत वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मुळ लेख वाचणं जाणीवपूर्वक टाळलं..असो. इथल्या लेखावरून आणि एकूण प्रतिसादांवरून तो जास्तच मनोरंजक दिसतोय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असे दिशाभूल करणारे लेख (तांब्यांचा लेखाबद्द्ल) छापले जातात आणि बरेचसे लोक ते वाचतात. एक शेवट्चं वाक्य वाचण्याची चूक झाली....
"ज्या कणात संकल्पनाही आहे, तो कण ज्यावेळी विस्तार पावेल त्यावेळी त्याला अमुक एक कल्पनेचा विस्तार कर असे सांगण्याची योजना वैज्ञानिकांना करावी लागेल."
हद्द झाली.....मोठे आलेत वैज्ञानिकांना काय करावं लागणार हे सांगणारे..हास्यास्पद आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या चालीवर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हॅ हॅ हॅ.

जरा इकडे पण पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.