माहिती हवी आहे - व्यक्तिचित्र किंवा शिल्पाबद्दल कविता

एखाद्या व्यक्तीच्या चित्राचं किंवा शिल्पाचं वर्णन असेल अशा मराठी कवितांचे संदर्भ हवे आहेत. अटी :

  1. कविता छापील स्वरूपात (पुस्तक/मासिक) पूर्वप्रकाशित असावी.
  2. कविता मराठीत असावी.
  3. कवी किमान नावाजलेला असावा. (म्हणजे इथल्या कवींनी स्वतःची कविता देऊ नये) Wink
  4. कवितेत एखाद्या व्यक्तीच्या चित्राचं किंवा शिल्पाचं वर्णन किंवा उल्लेख असावा. म्हणजे 'मानसीचा चित्रकार तो...' बाद आहे.
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

१. ज्ञानेश्वर -
'पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती' - पाण्डुरङ्गाच्या शिल्पाचे वर्णन थेट नसले तरी पुतळा समोर असता आलेल्या अनुभवाचे वर्णन आहे. चालते का बघा.. हे चालत असेल तर 'श्रीज्ञानेश्वरसमाधीवर्णन' ही अरूण कोलटकराञ्ची कविताही चालावी.
२. ना. घ. देशपाण्डे - रूढार्थाने शिल्प नसले तरी एका कल्पित भङ्गलेल्या समाधीचे वर्णन आहे -
'त्या दूरच्या दूर ओसाड जागी किडेपाखरांवीण नाही कुणी
हा भूमीचा भाग आहे अभागी इथे एक आहे समाधी जुनी.
विध्वंसली काळ्हस्तांमुळे ही हिला या पहा जागजागी फटा
माती खडे आणि आहेत काही हिच्याभोवती भंगलेल्या विटा
आहे जरी लेख हा छेद गेला जुन्या अक्षरातील रेघांमधून
दुर्वांकुरे अन् तरू खुंटलेला निघाला थरातील भेगांमधून
कोठून ताजी फुले ? बाभळींनी हिला वाहिले फक्त काटेकुटे
ही भंगलेली शलाका पुराणी कुणाचे तरी नाव आहे इथे
रानातला ऊन मंदावलेला उदासीन वारा इथे वाहतो
फांदीतला कावळा कावलेला भुकेलाच येथे-तिथे पाहतो.'
३. 'पत्र' या माधव आचवल याञ्च्या पुस्तकात एक अत्यन्त रसाळ लेख विष्णूचे वर्णन करणार्‍या एका श्लोकमालेबद्दल आहे. लेखाचे नाव आणि कवी दोनही विसरलो आहे आणि भारतात नसल्याने तपशील मिळण्यास थोडा अवधी लागेल, त्याबद्दल क्षमस्व.
४. ना.धों. महानोर - 'अजिंठा'. मी वाचलेली नाही पण या संस्थळावरील अनेकान्नी वाचल्याचे 'अजिंठा' चित्रपटाच्या चर्चेतून समजते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रतिसादांबद्दल धन्यवाद. विठोबाची मूर्ती ठीक आहे, पण मुख्यतः माणसांची चित्रं किंवा शिल्पं (किंवा प्रतिमा; प्रत्यक्ष रूप नव्हे.*) यांचं वर्णन कवितेत हवं आहे.

* - म्हणजे पडद्यावर दिसणारा अमिताभ बच्चन याविषयीची कवितादेखील चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

"अमिताभ बच्चन" या शीर्षकाची वसंत आबाजी डहाके यांची (बहुदा सत्तरीच्या दशकातली) कविता आहे.

कुसुमाग्रजांची सैगल वरचीही कविता आहे. (घडीभर तरी जागव रे अमुची मानवता) .

अवांतर : आशा पारेख या नटीला आमचे एक स्नेही दीदारगंज यक्षी म्हणायचे त्याची आठवण झाली Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हिंदी गाणी चालणार नाहित का? हिंदीत शिल्पावर खुप गाणी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला उधळायला फार फार आवडतं

कोलटकरांच्या "भिजकी वही" मध्ये बऱ्याच अश्या कविता सापडतील: ""किम" ही वियेटनाम युद्धाच्या सुप्रसिध्द फोटो मधली जी लहान मुलगी आहे, तिच्यावर आहे. कविता फोटो बद्दल आणि तिच्याबद्दल आहे. आणि पिकासोने आपल्या गर्लफ्रेंड चे जे रडत असतानाचं चित्र काढलेलं आहे ("Weeping Woman"), त्या चित्राबद्दल "डोरा" ही कविता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"भिजकी वही"बद्दलच्या सूचनेसाठी सरसू यांचे आभार. पिकासोनं काढलेल्या डोरा मार या आपल्या प्रेयसीच्या चित्रांविषयीच्या त्यातल्या काही कविता आणि व्हिएतनाममधल्या कुप्रसिद्ध नापाम छायाचित्राबद्दलच्या कविता ह्या खूपच उपयोगी आहेत. आणखी सुचल्या तर नक्की कळवा. डहाक्यांची बच्चनवरची आणि कुसुमाग्रजांची सैगलवरची कविता शोधून पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चिंतातूर जंतू, चित्रेंची कविता "गुरुदत्त मेलेला आढळतो" ही थोडीफार तुमच्या प्रश्नाच्या चौकटीत बसण्यासारखी असेल का? ह्या कवितेत सुरुवातीला तरी वर्तमानपत्रातल्या गुरुदत्तच्या चित्राचा रेफरेन्स आहे:

टाईम्सच्या पहिल्या पानावर आढळतो गुरुदत्त मेलेला
आणि सफेत रांगारयाचा ब्रश ओघळतो भव्य पोस्टरांवरून
बारीक बातम्यांचे टाईप वारूळांसारखे उघडतात
आणि काळी अक्षरं लागतात एका निनावी प्रेताला.

जर रेलेवंट असली तर तुम्हाला ही कविता चित्रेंच्या "एकूण कविता--२" मध्ये सापडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतर: ह्या कवितेचा तुमच्या प्रश्नाशी काहीच संबंध नाहीये पण एवढ्यातच वाचली होती आणि चित्रांबद्दल असल्यामुळे ह्या कॉनटेक्स्ट मध्ये आठवली.

मनातल्या मनात चित्र पाहताना (हेमंत दिवटे)

मनातल्या मनात चित्र पाहताना
चित्रातले कळत नाही काहीच
आणि आपण असतो उभे
चित्राबाहेर शिर्षकासारखे
जसा सर्व अर्थ समावलेला आपल्यात
तरीही
आपण समजू शकलो नाही
आपल्यातल्या अनेक चित्रांना
चित्र मांडली आहेत ओळीने
आपल्यातल्या कलादालनात
आपण सरकतो
एका चित्रातून दुसऱ्या चित्रात
किंबहुना
प्रत्येक जण चाललाय
एका चौकटीतून दुसऱ्या चौकटीत
आणि प्रत्येकातलं चित्र
डोकावतय बाहेर
पाहातंय
आपल्यातून निघून चालालेला माणूस
कुठलं चित्र नेतोय वाहून
त्याच्या चेहेर्याबरोबर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सरसू यांचे पुन्हा एकदा आभार. चित्र्यांची कविता माझ्या निकषांत बसते अन् दिवट्यांची नाही. मराठी संकेतस्थळावर नव्वदोत्तरी कवींचं नाव झळकलेलं पाहायला मिळणं मात्र दुर्मिळ असतं. असा धक्का दिलात त्याबद्दलदेखील आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||