मधुची गाडी-एक खाद्यसेवा...!

ही गाडी आम्च्या एस.पी कॉलेज पोस्ट ऑफिसच्या जवळ आहे,,,हा झाला पत्ता सांगण्याच्या जनरितिचा भाग..पण मधुची गाडी हे एस.पी.पोश्ट हापिसचच एक अंग आहे,इतकी ही गाडी त्या पोश्टं नावच्या मानवी आघाडीत तिथे मिसळलेली असते.
अता विस/एक वर्ष होत आली ही गाडी इथे आहे. आणी पहिल्यापासुन ह्याच नावानी फेमस आहे,मधुची गाडी.

श्रमिक,भुकेले,टाइमपासी,खवैय्ये, असे नाना तर्‍हेचे लोक इथे येत असतात. मधुची गाडीही अगदी सक्काळी ७ ला रेड्डी असते....डेक्कनक्विन सारखी. हो...हे रोजचं टाइम आहे,चुकत नाही कधी. सकाळी सात ते दुपारी ३/४ वाजे पर्यंत...हे रोजचं गाडीचं टाइम. सुट्टी अशी इथे नाहीच. अहो खायच्या कामाला सुट्टी कशाला..? सातही वार खाण्याचे आणी तसाच इथला मेनुही.म्हणजे आंम्हा नेहमीच्यांना तो असा पाठ झालाय... बालगिताच्या बोलीवर...( बाकी जगात बालगिताच्या इतकी,समजायला आणी डोक्यात उतरायला सोप्पी बोली असताना,बाकिच्या विद्वान बोल्यांचा जन्मच कशाला झाला? हा आमचा प्रश्न...! )

सोमवार गुरवार शनिवार... साबुदाणाखिचडी इडलीसांबार
रविवार आणी बुधवार... भजी मिसळीवर शांम्पलची धार* (*रव्याच्या भाषेत,पहिल्या धारेचं शांम्पल Wink )
मंगळवार आणी शुक्रवार... मटार ऊसळ/ब्रेड बदाम शिर्‍याचा मार(म्हणजे या शिर्‍यात ''बदाम कुटून घातलाय...'' इति---मधुशेट...!)
हे येक नंबरी इडली सांबार.... विठ्ठल/रखुमाय सारखं एकजीव

ही मटार ऊसळ/पाव/ हाप-भजी Smile

सांबार....

तर्रीदार मटार ऊसळ

भजीत भजी गोल भजी...(मटार ऊसळीबरोबर लै कातिल लागतात)

आणी या सगळ्याच्या जोडीला,पोहे+सांबार+शेव+दही, भजी/हाप भजी+कट छ्छा!(हे चहाचं पुणेरी रूप आहे....''छ्छा.!''), हे रोजचे पाशिंजर असतातच.

इथले सगळे पदार्थ...म्हणजे आमच्या लेखी ए-१... पण तरी ए-१ म्हणायला नको.त्या मेल्या सँडविच वाल्या सगळ्यांनी या उपमेतलं वैशिष्ठ्य त्यांच्या कर्तबगारिनी ठ्ठार मारलय. व्यावहारिकपणेच वर्णन करायचं झालं तर मधुची गाडी हा काँटिटी/क्वालिटी या दोन व्यावसायिक मुल्यांचा संगम आहे. आणी आमच्या मते हेच इथलं वैशिष्ठ्य आहे. माझा इथला सगळ्यात अवडता पदार्थ म्हणजे इडली सांबारशेव... इथली इडली म्हणजे सांबाराशी जन्मोजन्मीचं नातं असलेली,पटकन त्यात मुरणारी अशी असते.आणी सांबारही त्यात शिरताना आपपरभाव करत नाही. हे इडली सांबार मेड फॉर इच अदर आहे अगदी. चव तर इतकी कातिल असते. की कधी कधी मी दोन/दोन प्लेट हाणुन...परत तेवढ्याच पार्सल सुद्धा घेतो... (उरलेला दिवस घरी निवांत असेल तर Wink )

अनुक्रमे....पहिला रव्या...--^--^--^-- आणी मधुशेट

पोश्ट हापिस-खातं Wink

ताजा गरम भज्जी पॉइंट

मस्त फिक्कट चविचा-छ्छा.!

पुन्हा इथे काय आहे,की सांबार असो,मिसळीचं शांम्पल असो,किंवा मटार उसळीचा रस्सा असो... तो हवा तेवढा प्लेटमधे अधुन मधुन येऊन पडत असतो. शेवंही भगवंताची कृपा घडल्या सारखी मधुन मधुन पडत असते. आणी इडली सांबार असो,किंवा मटार उसळ असो,त्या शेवेमुळे असा काही चविचा फ्लेवर तयार होतो,की एखाद दिवस शेव नसली (असं कधी होतच नाही म्हणा..!) किंवा वेगळ्या प्रकारची आलेली असली,तर आवडता मास्तर जाऊन कंटाळवाण्या सरांच्या हातात ''वर्ग'' किंवा तास पडल्या सारखी आमची अवस्था होते... मधुन मधुन मधु शेटचं ते ''मिर्ची फ्री'' हे संगीत ऐकू यावं लागतं,तेंव्हा या साळं'ची मज्जा येते. त्या महान ढगलबाज रव्या'ची बोली हा मधुशेटच्या गाडीवरचा असाच एक टेसदार प्रकार आहे. म्हणायला हा माणुस मधुशेटचा हेल्पर असेल,पण आमच्या लेखी हे पात्र-परिचय झाल्याखेरीज न उलगडणार एक स्वतंत्र नाटक आहे. हा माणुस शांम्पल असो,उसळीचा रस्सा असो,सांबार असो...कुठल्याही द्रवं-रूपा बद्दल बोलायला लागला की मदिराक्ष शास्त्रात शिरतोच... म्हणजे संबार वगैरे देताना ''(90) नैंटी टाकू का..?'' अशी भाषा...! सांबार उसळीतला फ्लॉवर बटाटा येऊ द्यायचा असेल तर,,, ''लेग-पीस असू दे का..?'' अशी गिर्‍हाइकाची केलेली विचारणा+संभावना..! तर्री देताना...'' कॉटर का हाप..?'' अशी एकंदरीतच,नवख्या आणी अजाण गिर्‍हाइकाची माप काढायची पेशल पद्धत!...असं सगळं तिथे आजुबाजुनी आणी जोडि/जोडिनी चाल्लेलं असतं.
शांपल देऊ का...? मिर्ची फ्री एsss.... इति...मधुशेट....

नाईंटी टाकताना...रव्या... Wink

त्यात मधुशेटंही गिर्‍हाइकांची...कधी गिर्‍हाइकं त्यांची कळ काढत असतात. पोश्ट ऑफिस/एस.पी.कॉलेजातले शिपाई प्रोफेसर/ आजुबाजुच्या कार्यालय कचेर्‍यां मधली रोजची येणारी लोकं...काही महिला मंडळं इ. इ. सर्व इथे नेमानी येत असतात. शिवाय अगदी राजकीय क्षेत्रापासून ते सिने/नाट्य क्षेत्रातल्याही लोकांची मधुची गाडी हे फेवरिट ठिकाण आहे...

इथला कुठचाही पदार्थ घ्या...त्याचं पहिलं वैशिष्ठ्य म्हणजे त्याला असणारी पहिली चव मधुच्या गाडीची...मग ते आमचं अवडतं इडली सांबार असो,मटार उसळ असो,मिसळ असो,अथवा सगळ्या उपवासांना पुरुन उरणारी टेश्टी उपासाची मिसळ असो... इथले पदार्थ इथलेच...असे' दुसरीकडे मिळणार नाहीत. शेवटी या अश्या ठिकाणांचं थोडसं तीर्थक्षेत्रां सारखं असतं... जे तिथे आहे ते दुसरीकडे नाही,आणी दुसरीकडच्या सारखं इथे नाही...ते पहायला आणी शोधायला जाऊही नये. लॉर्ड्स'ला लॉर्ड्स सारखंच असू द्यावं,त्यात वानखेडेची मज्जा शोधायला जाऊ नये. आणी वानखेडेवर लॉर्ड्सची स्वप्न पाहू नये हेच खरं.
आंम्ही या श्टेडियमवरचे नेहमीचे हौशी प्लेयर आहोत,तुंम्हिही कधी आलात टिळक रोडला(पुणें येंथें Wink )..तर या इथे आणी खेळून जा एक/दोन डाव...!

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

भेट देऊन येतोच...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान रे आत्म्या.पुणे म्हंटले की आठवतात ते अंजीर्,पेरु आणि जुन्या खानावळी.हल्ली बाहेर खायची आवड अनेकांना आहेच. त्यात हे असले तोंडाला पाणी सुटणारे पदार्थ.
(केव्हातरी मिसळपाव खाणारी) रमाबाई

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाहेर पाऊस आणि इथे भज्यांचे फोटो.. मरण आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख जबरदस्त झाला आहे. ती गाडी, तो परिसर, ते वातावरण सगळंच छान उभं राहिलं आहे. शेवटचा झणझणीत फोटो तर भारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान वर्णन. विशेषतः -

हे येक नंबरी इडली सांबार.... विठ्ठल/रखुमाय सारखं एकजीव
शेवंही भगवंताची कृपा घडल्या सारखी मधुन मधुन पडत असते.
तर्री देताना...'' कॉटर का हाप..?'' अशी एकंदरीतच,नवख्या आणी अजाण गिर्‍हाइकाची माप काढायची पेशल पद्धत!...असं सगळं तिथे आजुबाजुनी आणी जोडि/जोडिनी चाल्लेलं असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुण्यात आल्यावर मधुवरच भेटुया...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

शेवटचा फोटो एकदम झकास आला आहे.

मला स्वतःला एकूण मिसळ फार आवडत नाही, पण रोजच्या, सर्वसामान्य आयुष्याचं असं डॉक्यूमेंटेशन वाचायला, बघायला आवडतं. हे ही आवडलंच. अशा गाड्यांवरचं खाणं बर्‍याच काळात खाल्लेलं नाही, पण खायचं असेल तर मागे डोकावून बघत नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिल्यासारखं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>मला स्वतःला एकूण मिसळ फार आवडत नाही

ह्म्म.. शेवटी असाच व्हायचा होता ना आपल्या स्नेहबंधांचा शेवट...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय करणार, शेवटी आम्ही सकस खाद्यपदार्थांचे प्रेमी! कुपथ्य एखाद दिवशीच मानवतं. Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

होतं असं वयोमानाप्रमाणे.. नाही मानवत प्रकृतीला Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

धाग्यावर आलेल्यांचे व येणार्‍यांचे(ही) मनापासून धन्यवाद Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

चित्रण फारच उत्तम जमले आहे. त्यावरून एक आठवले.
पुण्यात सिम्बॉयसिसच्या बरोब्बर समोर एक गाडीवर सकाळी चहा, पोहे, उपमा, शिरा आणि चक्क कोल्ड कॉफी (!)विकत असे. चव सगळ्या पदार्थाञ्ची उत्तम आणि साधारण अश्या गाडयांवर अभावाने आढळणारी अत्यन्त स्वच्छता हा त्या गाडीवाल्याचा विशेष होता. पण हे सगळे १२ वर्षाम्पूर्वी. आताचे माहीत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@पण हे सगळे १२ वर्षाम्पूर्वी. आताचे माहीत नाही.>>> अत्ताही अश्या स्वच्छ आणी चविष्ट पदार्थ देणारे छोटे स्टॉल उभे रहात आहेत,,,पण वर्षानुवर्ष टिकुन रहाण्याची सचोटी त्यांच्यात असेल,असे वाटत नाही....

मधुची गाडी गेली २० वर्ष एकाच जागी सातत्यानी तीच चव देत,कंट्रोल रेटनी पदार्थ पुरवत उभी आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''