ऑलिंपिक २०१२: क्रीडाप्रकार-४ (I-S)

ऑलिंपिक २०१२: क्रीडाप्रकार: A-B C-E F-H I-S T U-Z

===
या भागात आपण इंग्रजी आद्याक्षरे I ते S ने सुरू होणाऱ्या क्रीडाप्रकारांची माहिती करून घेणार आहोत. अर्थात यात अर्थात यात ज्युडो (Judo), आधुनिक पंचकर्म ;)(Modern Pentathlon), रोइंग (Rowing), नौकानयन (Sailing), शूटिंग (Shooting), जलतरण (Swiming), सिंक्रोनाईज्ड जलतरण (Synchronised Swiming) अश्या ७ खेळांची माहिती करून घेणार आहोत. चला तर सुरू करूयात
-------

ज्युडो (Judo)

या स्पर्धा विविध वजनी गटांत तसेच महिला व पुरूष अश्या खेळवल्या जातात. सर्व मिळून यात एकूण १४ सुवर्णपदके पणाला लागलेली असतील.

यातील स्पर्धकांना 'ज्युदोका' म्हटले जाते. दोन ज्युदोका समोरासमोर येतात व समोरच्याला 'पटकून' किंवा 'पकडून' खेळला जातो. ही स्पर्धा जास्तीत जास्त पाच मिनिटे खेळली जाते व ज्याला सर्वाधिक गुण मिळतात तो जिंकतो. पकडणे, पटकणे, अडकवणे वगैरेसाठी गुण दिले जातात. यात 'इप्पॉन' नावाचा प्रकार असतो तो केल्यास स्पर्धकास थेट विजयी घोषित केले जात. हा इप्पॉन करण्यासाठी एका स्पर्धकाने दुसऱ्याला आधी पटकावे मग पकडावे आणि हात/पायात अडकवावे लागते.

या स्पर्धा प्रत्येक वजनी गटात 'नॉक-आऊट' पद्धतीने खेळवल्या जातील.

स्पर्धा कुठे होणार?: एक्सेल या खास निर्माण केलेल्या ठिकाणी या स्पर्धा होतील. सदर स्थान स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे.

स्पर्धा कधी होणारः सदर स्पर्धा २८ जुलैपासून सुरू होतील. व शेवटचे पदक ३ ऑगस्टला प्रदान होईल

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः मुळात जपानी खेळ असणाऱ्या या खेळात अपेक्षेप्रमाणे जपानने चार सुवर्ण पदकांसह ७ पदके पटकावली होती. तर चीनने ३ सुवर्णांसह ४ पदके मिळवली होती.

यावेळी भारताकडून कोण?
गरिमा चौधरी ही ६३ किलो वजनी गटात पात्र आहे. संबंधित बातमी

यावेळी भारताला पदकाची आशा?
जागतिक पटलावर ८८व्या स्थानावर असणाऱ्या गरिमाकडून पदकाची अपेक्षा करता येऊ नये.

===========

आधुनिक पंचकर्म ;)(Modern Pentathlon)

एकाच खेळाडूच्या विविध खेळातील कौशल्य अजमावणारी ही अनोखी स्पर्धा आहे. यात एकाच खेळाडूला पाच वेगवेगळ्या क्रीडाप्रकारातील कौशल्य दाखवावे लागते.

यातील सारे खेळ एकाच दिवशी खेळले जातात, सुरवात तलवारबाजीने होते. ज्यात स्पर्धकाला इतर प्रत्येका बरोबर तलवारबाजी करून गुण मिळवावे लागतात. त्यानंतर २०० मी फ्रीस्टाईल स्विमिंग व त्यानंतर १२ अडथळे असलेला ट्रॅक घोडेस्वारी करून पार करावा लागतो. यातील प्रत्येक स्पर्धेला गुण दिले जातात. या तीन स्पर्धांनंतर गुणांची बेरीज होते व त्याला टाइम हँडिकॅप मध्ये परिवर्तित केले जाते. हा हँडिकॅप शेवटचा (एकत्रित) चरण सुरू करण्याची वेळ दर्शवतो. या चरणात खेळाडूला ७० सेकंदात पाच लक्ष्यांचा वेध घ्यावा लागतो व १०००मी पळावे लागते, हे सारे तीनदा करावे लागते व जो हे करून अंतिम रेषा पहिल्यांदा ओलांडतो त्याला विजेता घोषित केले जाते. (वाचकांची इच्छा असल्यास प्रत्येक स्पर्धेचे नियम विस्ताराने लिहिता येतील)

या प्रकारात १ स्त्रियांचे व १ पुरुषांचे सुवर्णपदक पणाला असेल

स्पर्धा कुठे होणार?: तीन मैदानात या स्पर्धा होणार आहे. व सारी मैदाने स्पर्धेसाठी सज्ज झाली आहेत.

स्पर्धा कधी होणारः सदर स्पर्धा ११ व १२ ऑगस्टला होतील

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः गेल्यावेळी जर्मनी आणि रशियाने एक एक पदक पटकावले होते.

यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही

यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू

===========

रोइंग (Rowing)

रोइंग या प्रकारात एकेकट्या पासून ते आठ जणांच्या चमूपर्यंतच्या रोइंगच्या स्पर्धा होतात. या व्यतिरिक्त काही अल्पवजनी स्पर्धा (lightweight events) देखील होतात, ज्यात होडीच्या वजनावर त्यावरील खेळाडूंच्या प्रमाणात बंधने येतात. ही स्पर्धा प्रत्येक प्रकारात 'शर्यत' स्वरूपात खेळवली जाते. अंतिम फेरीच्या शर्यतीमधील पहिल्या तीन स्पर्धकांना / गटांना पदके दिली जातात.
या क्रीडाप्रकारात तब्बल १४ पदके पणाला लागलेली असतील

स्पर्धा कुठे होणार?:एटन डॉर्नी या हॅम्शायरमधील ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत. हे स्थळ स्पर्धेसाठी सज्ज घोषित केले आहे.

स्पर्धा कधी होणारः सदर स्पर्धा २८ जुलैपासून सुरू होतील व ४ ऑगस्टपर्यंत चालतील

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः गेल्यावेळी या स्पर्धांवर एकाच अशा देशाचे फारसे वर्चस्व नव्हते. १४ पदके ११ देशांत विभागली गेली होती. त्यातल्या त्यात ग्रेट ब्रिटनने २ सुवर्णांसह ६ पदके मिळवली होती

यावेळी भारताकडून कोण?
सिंगल स्कल (एकट्याचे रोइंग): स्वर्णसिंग विर्क
डबल स्कल (दोघांचा चमू): संदीप कुमार आणि मनजीत सिंग

यावेळी भारताला पदकाची आशा?
भारतीय रोअर्स आता सलग चौथ्यांदा पात्र होत आहेत. मात्र त्यांच्यात गुणात्मक प्रगती इतकीही झालेली नाही की ते पदक जिंकू शकतील.

===========

नौकानयन (Sailing)

दहा (१०) पदके मिळवून देऊ शकणाऱ्या या क्रीडाप्रकारात नौकानयनांच्या शर्यती न होता प्रत्येक स्पर्धेच्यावेळी पहिला आलेल्यास १ गुण, दुसरा आलेल्यास २ अशा प्रकारे गुण दिले जातात. शेवटच्या फेरीत - ज्याला मेडल राउंड म्हणतात- हे गुण दुप्पट करून दिले जातात. शेवटी ज्या संघाचे गुण सर्वात कमी असतील तो संघ जिंकतो

या प्रकारात ५-५ पदके महिला व पुरूष संघांना पटकावता येतील.

स्पर्धा कुठे होणार?: वेमाउथ आणि पोर्टलेट येथे या स्पर्धा होतील. ही दोन्ही स्थळे स्पर्धेसाठी सज्ज झाली आहेत.

स्पर्धा कधी होणारः ३८० स्पर्धांसह सुरू होणाऱ्या या स्पर्धा २९ जुलैपासून सुरू होतील व ११ ऑगस्टपर्यंत चालतील

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः गेल्यावेळी चार सुवर्णांसह ग्रेट ब्रिटन पहिल्या स्थानावर तर २ पदके पटकावून ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर होते.

यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही

यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू

=====================

शूटिंग (नेमबाजी) (Shooting)

यंदा भारताला सर्वाधिक आशा असणाऱ्या या खेळात १५ पदके पणाला लागलेली असतील. यात महिला व पुरूष गटांमधे रायफल, पिस्तूल प्रकारात स्थिर लक्ष्य तर शॉटगन प्रकारात हालत्या लक्ष्याचा वेध घ्यायचा असतो.
रायफल आणि पिस्तूल प्रकारामध्ये ठराविक अंतरावरील १० रंगात रंगवलेल्या लक्ष्याचा वेध घ्यायचा असतो. सर्वात मध्यावर सर्वाधिक गुण मिळतात. व गुणांच्या बेरजे वरून पुढील फेरीत जाता येते. अंतिम फेरीच्या विजेत्याला सुवर्णपदक मिळते. यात १०मी, २५ मी व ५० मी अशा स्पर्धा होतात. तर स्पर्धकांना त्या त्या स्पर्धेच्या नियमानुसार उभे राहून, गुडघ्यांवर बसून किंवा झोपून वेध घ्यायचा असतो.
शॉटगन स्पर्धेत समोर उडणाऱ्या चकतीचा / एकावेळी २ चकत्यांचा वेध घ्यायचा असतो. ठराविक वेळेत सर्वाधिक चकत्यांचा / चकत्यांच्या संचाचा वेध घेणारा विजेता ठरतो.

स्पर्धा कुठे होणार?: रॉयल आर्टिलरी बराक या नव्याकोऱ्या फील्डवर या स्पर्धा होणार आहेत. व हे स्थळ स्पर्धेसाठी सज्ज घोषित झाले आहे.

स्पर्धा कधी होणारः सदर स्पर्धा २८ जुलैपासून सुरू होतील व ८ ऑगस्टपर्यंत जवळजवळ रोज एक पदक प्रदान होईल

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः गेल्यावेळी अभिनव बिंद्राने याच खेळात आपल्याला पहिलेवहिले वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून दिले होते. तर चीनने ५ सुवर्णांसह ८ पदके मिळवत वर्चस्व मिळवले होते. पारंपरिक चॅम्पियन अमेरिकेला केवळ २ सुवर्ण पदके (एकूण ६) मिळवता आली होती.

यावेळी भारताकडून कोण?
यावेळी भारताकडून तब्बल ११ खेळाडू पात्र ठरले आहेतः
पुरूष
१० मी रायफल : अभिनव बिंद्रा (ऑलिंपिक'०८ सुवर्ण), गगन नारंग (दोन राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये मिळून ८ सुवर्ण, दोनदा जागतिक विक्रम (६००/६००))
५० मी रायफल (प्रोन): जॉयदिप करमकर
२५ मी रॅपिड फायर पिस्तूल विजय कुमार
५० मी रायफल (थ्री पोझिशन्स): गगन नारंग, संजीव राजपूत
ट्रॅप: मानवजीतसिंग साधू (खेलरत्न, जगात#१ - २००६, सध्या#३)
डबल ट्रॅप: रंजन सोढी (वर्ल्ड कपः दोन सुवर्ण, १रौप्य, १ ब्रॉन्झ; आशियाई १सुवर्ण, १ ब्रॉन्झ; राष्ट्रकुल २ रौप्य)

महिला
ट्रॅप: शगुन चौधरी
२५ मी पिस्तूल: राही सरनौबत (राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदके), हीना सिधु (दुहेरीमध्ये राष्ट्रकुल सुवर्ण, एकेरी रौप्य, आशियाई रौप्य)
१० मी रायफलः अनुराज सिंग (दुहेरीमध्ये राष्ट्रकुल सुवर्ण)

यावेळी भारताला पदकाची आशा?
माझ्यामते अभिनव बिंद्रा/गगन नारंग यांच्यातून १/२ पदके, मानवजीत, रंजन यांपैकी १व नशीब असेल तर संजीव, राही-हिना यांपैकी १ असे ३ ते ४ पदकांची अपेक्षा केल्यास अवाजवी ठरू नये.

=========

जलतरण (Swiming)

विविध प्रकारच्या स्पर्धा या क्रीडाप्रकारात खेळवल्या जातात आणि सर्व मिळून तब्बल ३४ सुवर्णपदके पणाला लागलेली असतात. इतक्या प्रमाणात पदके मिळवून देणार्‍या या खेळात अर्थात भरपूर देशांचा सहभाग असतो. यावेळी ५९ देश यात सहभागी होणार आहेत.

यात पुढील स्पर्धा होतातः
फ्रीस्टाईलः ५०, १००, २००, ४०० मीटर स्त्रिया व पुरुषांच्या शर्यती, ८०० मीटर स्त्रियांची शर्यत आणि १५०० मी पुरुष शर्यत
बॅकस्ट्रोकः १०० आणि २०० मीटर शर्यती (महिला व पुरूष)
ब्रेस्टस्ट्रोकः १०० व २०० मीटर शर्यती (महिला व पुरूष)
बटरफ्लायः १०० व २०० मीटर शर्यती (महिला व पुरूष)
वैयक्तिक मेडली*: २०० आणि ४०० मीटर शर्यती (महिला व पुरूष)
रिलेज (सांघिक): ४X१०० फ्रीस्टाईल, ४X२०० फ्रीस्टाईल, ४x१०० मेडली शर्यती (महिला व पुरूष)
मॅरेथॉन: १० किलोमीटर्स ओपन वॉटर मधल्या शर्यती (महिला व पुरूष)

*मेडली स्पर्धेत स्पर्धकांना बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक, बटरफ्लाय आणि फ्रीस्टाईल या चारही प्रकारात पोहावे लागते

स्पर्धा कुठे होणार?:अक्वॅटिक सेंटरवर बहुतांश स्पर्धा होतील. त्याव्यतिरिक्त मॅरेथॉन स्पर्धा हाईड पार्क इथे होईल

स्पर्धा कधी होणारः सदर स्पर्धा २८ जुलैपासून सुरू होतील. व शेवटचे पदक ४ ऑगस्टला प्रदान होईल

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः अमेरिकेने आपले वर्चस्व अबाधित राखत बीजिंग ऑलिंपिक मध्ये १२ सुवर्णांसह ३१ पदके तर ऑस्ट्रेलियाने ६ सुवर्णांसह २० पदके मिळवली होती

यावेळी भारताकडून कोण?
गगन उलल्माथ हा खेळाडू पात्र ठर(व)ला आहे संबंधित बातमी

यावेळी भारताला पदकाची आशा?
वीरधवल खाडे वगैरेंना डावलून गगनला ऑलिंपिकला पाठवले असले तरी त्याची सर्वोत्तम वेळ क्वालिफिकेशन मार्कलाही पोचलेली नाही तेव्हा आशा शून्य आहे.

======

सिंक्रोनाईज्ड जलतरण (Synchronised Swiming)

सौंदर्य, नृत्य, लालित्य आणि खेळ या सगळ्याचा सहभाग असलेला हा अत्यंत 'प्रेक्षणीय' क्रीडाप्रकार आहे. यात २ सुवर्णपदके पणाला लागलेली असतात.

यात दोन प्रकारच्या स्पर्धा होतात. जोडी (ड्युएट) आणि सांघिक (टीम). यात पाण्याखालीदेखील 'अंडरवॉटर' स्पीकर्स असतात ज्यांच्या मदतीने स्पर्धक संगीताच्या तुकड्यावर जलनृत्याने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडतात. जजेस गुण देतात व त्यांची बेरीज अंतिम फेरीतील स्पर्धक निवडतात. जजेस गुण देताना नृत्यदिग्दर्शन (कोरिओग्राफी), काठिण्यपातळी आणि त्याचे प्रत्यक्ष सादरीकरण याचा विचार करतात

स्पर्धा कुठे होणार?:अक्वॅटिक सेंटरवर स्पर्धा होतील. हे स्थळ सज्ज आहेच

स्पर्धा कधी होणारः सदर स्पर्धा ५ ऑगस्टपासून सुरू होतील व १० ऑगस्टपर्यंत चालतील

बीजिंग ऑलिंपिकचे निकालः बीजिंग येथे रशियाने दोन्ही सुवर्ण पदके पटकावली होती

यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही

यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

हा इप्पॉन करण्यासाठी एका स्पर्धकाने दुसऱ्याला आधी पटकावे मग पकडावे आणि हात/पायात अडकवावे लागते.

म्हणजे काय नक्की?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे ते खाली आपटतात-फेकतात ना? इंग्रजीत 'टु थ्रो' म्हणतात. मराठी शब्द सुचेना म्हणून 'पटकना' या हिंदी शब्दाच्या जवळ गेलो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आधुनिक पंचकर्म -- हा हा हा

नेमबाजीत अंजली वेदपाठक नाहीये?

भारताला ७७०० किमी लांबीचा किनारा लाभला आहे अशी ओळ रटल्याचं आठवतं. आपल्याकडे हौसेखातर केलेलं सेलिंगही दिसत नाही. आपल्या किनार्‍यांवर सेलिंग करण्यासारखी परिस्थितीच नसते का? का अन्य खेळांप्रमाणेच अनास्थाच हेच कारण असावं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यंदा सेलिंग टिम क्वालिफाय होऊ शकली नसली तरी काही वर्षे ती क्वालिफाय(च) होत आली आहे.
इथे अधिक माहिती मिळेल.
बाकी अनास्था, दुर्लक्ष, आर्थिकदृष्ट्या कमकुवत खेळाडू, या खेळासाठी लागणारे सौष्ठव सांभाळण्यासाठी लागणार्‍या सुविधा वगैरेचा अभाव (हा इतर अनेक खेळांप्रमाणे) या ही खेळाला कारणीभूत असावा Sad

बाकी भागवत २००७ नंतर फारशी दिसली नाही. बहुतेक रिटायर्ड झाली असावी. माहिती शोधून सांगतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

यंदा सेलिंग टिम क्वालिफाय होऊ शकली नसली तरी काही वर्षे ती क्वालिफाय(च) होत आली आहे.

स्पर्धा, पदकं वगैरे एका बाजूला झालं. पण आपल्याकडे सामान्य लोकंही किनार्‍यांवर सेलिंग करताना दिसत नाहीत. ही सामान्य लोकांची खेळांविषयी अनास्था का गरीबी, अभाव यामुळे सेलिंग फारसं होत नाही? का समुद्राचं पाणी मातकट असल्यामुळे फार उत्साह नसतो?

अमेरिकेत जागोजागी टेनिस कोर्ट्स दिसतात. आपल्याकडे अगदी चार फूट बाय तीन फूटांच्या जागांमधेही क्रिकेट खेळतात. सामान्य लोकं उत्साहाने जे खेळ खेळतात त्यात त्या देशाचा दबदबा असतो का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तसा सेलिंग हा महागडा खेळ आहे हे मुख्य कारण असावे. त्याव्यतिरिक्त एकूणच 'टँकमध्ये' पोहणे म्हणजेच सेफ हा समज हातभार लावत असेलच. शिवाय अरबीसमुद्राची किनारपट्टी हा तितकासा सेफही नसावा असे वाटते (दुवा शोधतो)

अवांतरः मी जेव्हा स्कुबा डायव्हिंगचे सर्टिफिकेशन करायला गेलो होतो तेव्हा आमच्या ६ जणांच्या चमुमधे मी एकटा भारतीय होतो. मी तिथल्या सहा दिवसांच्या बघितलेल्या सहा गटांत माझ्याव्यतिरिक्त फक्त एका भारतीय मुलीला भेटलो जी स्कूबा डायविंग करते
तेव्हा एकूणच समुद्रातील खेळांतील अनास्थेमागे किंमत आणि भिती यांचा मिलाफ असावा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'पदकांची आशा' व्यक्त करताना फक्त या आपल्या खेळाडूंचा पूर्वोतिहास लक्षात घेत आहात की त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंची तयारी/क्षमताही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी आशा व्यक्त करतेवेळी पूर्वोतिहासासोबत त्यांचे जागतिक क्रमवारीतले स्थान, जागतिक स्पर्धांमधील कामगिती आणि शक्य होईल तिथे आतापर्यंतचे ऑलिंपिक रेकॉर्ड बघतो आहे. अर्थात या तर्काला व्यक्तीगत-व्यक्तीसापेक्ष मर्यादा आहेतच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे 'आधुनिक पंचकर्म' फारच महागडं दिसतय. भारतात हा प्रकार कोणी खेळतं का? सैनिकांना वगैरेच हे जमत असावं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0