ऑलिंपिक २०१२ Live!

पहिला धागा खूप मोठा झाल्याने ऑलिंपिक Live! चा दुसरा भाग काढत आहोत.
०३ ऑगस्ट पर्यंतची माहिती या धाग्यावर मिळेल

आजपासून "ऑलिंपिक २०१२ Live!" या धाग्याद्वारे ताज्या घटना, पदक तालिका, व दर दिवसांचे खेळ या धाग्यावर दिले जातील. जर एखाद्या दिवसाची चर्चा रंगली किंवा एखाद्या दिवशी भारताचा मोठा सहभाग असेल तर त्या दिवसासाठी वेगळा धागा काढला जाईल.

ऑलिंपिक्सच्या खेळांची माहिती पुढील धाग्यांवर वाचता येईल.
A-B C-E F-H I-S T U-Z

सदस्यांना ऑलिंपिक्सच्या खेळाडुंबद्दल, बातम्यांबद्दल, एखाद्या नियमाबद्दल शंका विचारण्यासाठी किंवा संबंधीत विषयावर गप्पा मारण्यासाठी ऑलिंपिक गप्पा हा धागा उपलब्ध आहेच. त्याचाही लाभ घेता येईल.

पदक तालिका

क्रमांक देश सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
अमेरिका ४६ २९ २९ १०४
चीन ३८ २७ २२ ८७
ग्रेट ब्रिटन २९ १७ १९ ६५
रशिया २४ २५ ३३ ८२
दक्षिण कोरीया १३ २७
५५ भारत

.
.
.
पदकविजेत्या भारतीय खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी या धाग्याचा वापर करावा.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

४ ऑगस्ट २०१२ रोजी खेळले जाणारे खेळः
आज एकूण २३ क्रीडाप्रकार खेळले जातील. व २५ सुवर्णपदके प्रदान होणार आहेत

क्रीडाप्रकार

भारताचा सहभाग?

फेरी

पदक प्रदान?

अ‍ॅथलेटिक्स (अडथळा शर्यत- महिला) होय सर्व होय
अ‍ॅथलेटिक्स (चालणे २० किमी - पुरूष) होय शर्यत होय
अ‍ॅथलेटिक्स (थाळी फेक- महिला) होय अंतीम होय
अ‍ॅथलेटिक्स (इतर २ खेळ) नाही पात्रता/अंतीम होय
बॅडमिंटन महिला (एकेरी) होय सर्व होय
बॅडमिंटन पुरूष नाही उपांत्य नाही
बॅडमिंटन (दुहेरी) नाही अंतीम होय
बास्केट बॉल (महिला) नाही प्राथमिक नाही
बीच व्हॉलिबॉल (महिला व पुरुष) नाही उप-उपांत्यपूर्व नाही
बॉक्सिंग(४९, ६४ किग्रॅ.पुरुष) होय उप-उपांत्यपूर्व नाही
बॉक्सिंग(८१ किग्रॅ.पुरुष) होय उप-उपांत्यपूर्व नाही
सायकलिंग - ट्रॅक (तीन प्रकार) नाही सर्व होय
डायविंग (महिला मी स्प्रिंगबोर्ड) नाही पात्रता नाही
घोडेस्वारी(वैयक्तीक, सांघिक) नाही पात्रता नाही
तलवारबाजी(महिला एपी) नाही सर्व फेर्‍या होय
फुटबॉल पुरुष नाही उपांत्यपूर्व नाही
हॅन्डबॉल (पुरुष) नाही प्राथमिक नाही
हॉकी(महिला) नाही प्राथमिक नाही
रोईंग (चार प्रकार) होय (केवळ रँकिंगसाठी) अंतीम होय (चार)
नौकानयन (महिला व पुरूष) नाही शर्यती नाही
नेमबाजी (पुरूष ५०मी रायफल प्रोन) होय सर्व होय
नेमबाजी (महिला ५० मी फायर ३ पोसिशन) नाही सर्व होय
नेमबाजी (महिला ट्रॅप) होय सर्व होय
जलतरण (उर्वरीत) नाही सर्व होय (चार)
टेबल टेनिस(पुरूष,महिला -सांघिक) नाही प्राथमिक नाही
टेनिस (मिश्र दुहेरी) होय उपांत्यपूर्व नाही
टेनिस (उर्वरीत) नाही अंतीम होय (दोन)
ट्रायथलॉन नाही सर्व होय
व्हॉलिबॉल (पुरूष) नाही प्राथमिक नाही
वॉटर पोलो (पुरूष) नाही प्राथमिक नाही
भारोत्तोलन नाही सर्व होय

आजचा भारताचा सहभागः

बॅडमिंटन महिला(एकेरी): आज सायना नेहवाल ब्रॉन्झ मेडल साठी खेळेल.
निकाल

अ‍ॅथलेटिक्स (अडथळा शर्तय): सुधा सिंग अडथळाअ शर्यतीच्या पात्रता फेरीत खेळेल
निकाल

टेनिस: मिश्र दुहेरीत पेस-सानिया उपांत्यपूर्व फेरी खेळतील. त्यांचा सामना बेलारूसची जोडी मॅक्स मिर्नी आणि व्हिक्टोरिया अझारेन्का सोबत असेल.
निकाल

बॉक्सिंग: देवेन्द्र सिंग ४९ किलो वजनी गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत खेळेल
निकाल

बॉक्सिंग: मनोज कुमार ६४ किलो वजनी गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत खेळेल
निकाल

अ‍ॅथलेटिक्स (अ‍ॅथलेटिक्स - २० किमी चालणे): गुरमित सिंग, बलजिंदर सिंग, इरफान थोडी २० किमी चालण्याच्या स्पर्धेच्या प्रात्रता फेरीत खेळतील. अर्थात शर्यत असल्याने विजेत्यांना थेट पदके मिळातील
निकालः .
.
.
.
.
कृष्णा पुनिया अंतीम फेरीत पोचली आहे. आज ती सुवर्णपदकासाठी खेळेल.
निकालः .
.
.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पहिल्या राऊंड नंतर महिला नेमबाजी ट्रॅप स्पर्धेत शगुन चौधरी १०व्या स्थानावर आहे.
दुसर्‍या राउंड मध्ये केवळ १७ चकत्या भेदून शगुन चौधरी शेवटच्या स्थानावर फेकली गेली आहे
तिथून पहिल्या आठात येणे जवळजवळ अशक्यच दिसते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

५ किमी अडथळा शर्यतीत सुधा सिंग आपला वैयक्तीक बेस्ट (९:४७:७०) (जो राष्ट्रीय रेकॉर्ड आहे) देउ शकली नाही, तिने ९:४८:८६ अशी वेळ दिली. तिच्याकडून पदकची अपेक्षा नव्हतीच. अपेक्षेप्रमाणे ती स्पर्धेच्या बाहेर गेली आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चीनची वँग गुडघ्याच्या दुखपतीमुळे साईना विरुद्धचा सामना पूर्ण खेळू शकली नाही. त्यामुळे साईनाला कांस्य पदक मिळाले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सायनाने सलग ३ पॉईंट्स मिळ्वत पहिल्या सेट मध्ये २०-१८ स्कोर असताना मला शंका आलेली की सलग ३ पाँईंट्स मिळवल्याने तिथपरर्यंत आलेल्या सायनाचा फ्लो तोडण्यासाठी ही ट्रिक वापरली की काय कारण फरसे काही न करता ती एक पट्टी गुंडाळून खेळायला आली व लगेच एक पॉईंट मिळवून गेम खिशात टाकला.

मात्र बिचारीचा खरच गुडघा दुखावला होता.

असो. कसेही असो.. वेल डिसर्व्हिंग सायना नेहवालने पदक जिंकले हे ब्येष्टच!
तिचे अभिनंदन त्या धाग्यावर केले आहेच इथे पुन्हा करतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"..सायनाचा फ्लो तोडण्यासाठी ही ट्रिक वापरली की काय.. "
माझ्याही डोक्यात हे एकदा येऊन गेलं. काय युक्या काढतील काय माहीत त्यामुळे अशा शंका येतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

देवेन्द्र सिंग लायश्रम ४९ कि.ग्रॅ. बॉक्सिंग स्पर्धेत विजयी झाला आहे. तो उपांत्यपूर्व फेरीत पोचला आहे.
जर तो पुढील सामना जिंकतो तर त्याचे एक पदक नक्की होईल (बॉक्सिंग मध्ये उपांत्य फेरीत हरलेल्या दोघांनाही ब्रॉन्झ मिळते वेगळा सामना होत नाही)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

२० कि.मि. चालण्याच्या शर्यतीत भारताचा इरफान दहावा आला आहे. त्याने नॅशनल रेकॉर्ड केलं आहे: वेळ १:२०:२१.
सुवर्ण पदक विजेत्याची वेळः १:१८:४६.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. टेनिस मिश्र दुहेरी स्पर्धेत मिर्नी-अझारेन्का जोडीकडून पेस - मिर्झा ५-७, ६-७ असे पराभूत झाले आहेत.
२. कृष्णा पुनिया थाळीफेक स्पर्धेत सातवी आली आहे. हा तिचा वैयक्तीक उच्चांक आहेच. हा राष्ट्रीय उच्चांक आहे का ते पहावे लागेल.
३. मनोज कुमार ६९ कि. बॉक्सिंग मध्ये १६-२० असा पराभूत झाला आहे. या वजनी गटात आव्हान संपुष्टात आले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

५ ऑगस्ट २०१२ रोजी खेळले जाणारे खेळः
आज एकूण २१ क्रीडाप्रकार खेळले जातील. व २३ सुवर्णपदके प्रदान होणार आहेत

क्रीडाप्रकार

भारताचा सहभाग?

फेरी

पदक प्रदान?

अ‍ॅथलेटिक्स नाही शर्यती होय (सहा)
बॅडमिंटन पुरुष(एकेरी व दुहेरी) नाही अंतीम होय (दोन)
बास्केट बॉल (महिला) नाही प्राथमिक नाही
बीच व्हॉलिबॉल (महिला) नाही उपांत्यपूर्व नाही
बॉक्सिंग(५१ किग्रॅ.महिला) होय उप-उपांत्यपूर्व नाही
बॉक्सिंग(उर्वरीत) नाही उप-उपांत्यपूर्व नाही
सायकलिंग - ट्रॅक (तीन प्रकार) नाही सर्व होय
डायविंग (महिला मी स्प्रिंगबोर्ड) नाही अंतीम होय
घोडेस्वारी(वैयक्तीक, सांघिक) नाही पात्रता नाही
तलवारबाजी(पुरुष टीम फॉईल) नाही सर्व फेर्‍या होय
जिमनॅस्टिक्स (आर्टिस्टिक) नाही अंतीम होय (तीन)
हॅन्डबॉल (पुरुष) नाही प्राथमिक नाही
हॉकी(पुरूष) नाही प्राथमिक नाही
नौकानयन (महिला व पुरूष) नाही शर्यती होय (दोन)
नेमबाजी (पुरूष ५०मी पिस्टल) नाही सर्व होय
नेमबाजी (पुरुष ट्रॅप) होय पात्रता नाही
जलतरण (सिंक्रोनाईज्ड - महिला दुहेरी) नाही पात्रता नाही
टेबल टेनिस(पुरूष,महिला) नाही उपांत्यपूर्व / उपांत्य नाही
टेनिस (एकेरी- दुहेरी) नाही अंतीम होय (तीन)
व्हॉलिबॉल (महिला) नाही प्राथमिक नाही
वॉटर पोलो (महिला) नाही उपांत्यपूर्व नाही
भारोत्तोलन (महिला) नाही सर्व होय
कुस्ती (पुरुष-ग्रीको रोमन-५५,७४ किलो नाही सर्व होय (दोन)

आजचा भारताचा सहभागः

बॉक्सिंग: मेरी कोम ५४ किलो वजनी गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत खेळेल
निकाल मेरी कोमने पहिल्या फेरीत शानदार विजय मिळावत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

नेमबाजी: मानवजित सिंग साधु पुरुष-ट्रॅप स्पर्धेत पात्रता फेरीत खेळेल. या पात्रता फेरीत तीन फेर्‍या होतील.
निकाल पहिल्या दिवस अखेर मानवजीत आपल्या गटात (पाच खेळाडूंमध्ये)दुसरा तर एकूण सर्व खेळाडूंमध्ये २५ वा आहे. उद्या (०६-ऑगस्ट) पात्रताफेरीचा दुसरा दिवस आहे

हॉकी: भारताची टिम दक्षिण कोरीया विरुद्ध खेळेल. याआधीच या प्रकारात भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
निकाल भारताचा दक्षिण कोरीयाने पराभव केला आहे. या ऑलिंपिक मध्ये भारत एकही सामना जिंकु शकलेला नाही किंवा बरोबरीदेखील साधु शकलेला नाही Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऑलिम्पिकमधील पदकाची प्रबळ दावेदार भारताची अव्‍वल 29 वर्षीय बॉक्‍सर मेरी कोम हिने 51 किलो वजनी गटात शानदार विजय मिळवला आहे.
या लढतीत तिने पोलंडच्‍या कॅरोलिनाला मिशेलजुकला पराभूत केले. या विजयाबरोबरच तिने क्‍वार्टर फायनलमध्‍ये प्रवेश केला आहे.
अभिनन्दन !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेरीला शुभेच्छा. तिचा सामना कधी आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तिचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना लगेच आज (०६ ऑगस्ट) आहे.
मेरी कोमला शुभेच्छा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

६ ऑगस्ट २०१२ रोजी खेळले जाणारे खेळः
आज एकूण २० क्रीडाप्रकार खेळले जातील. व १८ सुवर्णपदके प्रदान होणार आहेत

क्रीडाप्रकार

भारताचा सहभाग?

फेरी

पदक प्रदान?

अ‍ॅथलेटिक्स (थाळीफेक -पुरूष) होय पात्रता नाही
अ‍ॅथलेटिक्स नाही शर्यती/पात्रता/अंतीम होय(पाच)
बास्केट बॉल (पुरुष) नाही प्राथमिक नाही
बीच व्हॉलिबॉल (पुरूष) नाही उपांत्यपूर्व नाही
बॉक्सिंग(५१ किग्रॅ.महिला) होय उपांत्यपूर्व नाही
बॉक्सिंग(७५ किग्रॅ.पुरुष) होय उपांत्यपूर्व नाही
बॉक्सिंग(उर्वरीत) नाही उपांत्यपूर्व नाही
कनोई स्प्रिंट नाही पात्रता नाही
सायकलिंग - ट्रॅक (तीन प्रकार) नाही रँकिंग होय
डायविंग (पुरूष ३मी स्प्रिंगबोर्ड) नाही पात्रता नाही
घोडेस्वारी(वैयक्तीक, सांघिक) नाही अंतीम (सांघिक) होय
फुटबॉल (महिला) नाही उपांत्य नाही
जिमनॅस्टिक्स (आर्टिस्टिक) नाही अंतीम होय (तीन)
हॅन्डबॉल (महिला) नाही प्राथमिक नाही
हॉकी(महिला) नाही प्राथमिक नाही
नौकानयन (महिला व पुरूष) नाही शर्यती होय(दोन)
नेमबाजी (पुरूष ५०मी रायफल ३ पोझिशन्स) होय सर्व होय
नेमबाजी (पुरुष ट्रॅप) होय पात्रता/अंतीम होय
जलतरण (सिंक्रोनाईज्ड - महिला दुहेरी) नाही पात्रता नाही
टेबल टेनिस(सांघिक) नाही उपांत्य नाही
व्हॉलिबॉल (पुरुष) नाही प्राथमिक नाही
वॉटर पोलो (पुरूष) नाही प्राथमिक नाही
भारोत्तोलन (पुरुष १०५कीलो) नाही सर्व होय
कुस्ती (पुरुष-ग्रीको रोमन) नाही सर्व होय (तीन)

आजचा भारताचा सहभागः

बॉक्सिंग: मेरी कोम ५४ किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत खेळेल. ही स्पर्धा जिंकल्यास एक पदक निश्चित होईल
निकाल:मेरी कोम हिने शानदार विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. तिचे पदक आता निश्चित झाले आहे

बॉक्सिंग: विजेंदर सिंग ७५ किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत खेळेल. ही स्पर्धा जिंकल्यास एक पदक निश्चित होईल
निकाल विजेंदर सिंग ला उझबेगिस्तानच्या अबॉस कडून १७-१३ असा पराभवाचा सामना करावा लागला आहे

अ‍ॅथलेटिक्स (थाळीफेक): विकास गौडा थाळी फेक स्पर्धेच्या पात्रता फेरीत खेळेल.
निकाल विकास गौडा अंतीम फेरीसाठी पात्र ठरला आहे. तो पाचव्या स्थानावर आहे

नेमबाजी:
गगन नारंग ५० मी रायफल ३ पोझिशन्स स्पर्धेच्या पात्रता फेरीत खेळल. जर अंतीम फेरीसाठी तो पात्र झाला तर दिवसअखेरीस सुवर्णपदकासाठी खेळेल
निकाल.
गगन नारंग याला २० व्या स्थानावर समाधान मानावे लागले. आव्हान संपुष्टात..
.
.
.
संजीव राजपूत देखील ५० मी रायफल ३ पोझिशन्स स्पर्धेच्या पात्रता फेरीत खेळल. जर अंतीम फेरीसाठी तो पात्र झाला तर दिवसअखेरीस सुवर्णपदकासाठी खेळेल
निकाल.
संजीव राजपूत याला २६ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. आव्हान संपुष्टात..
.
.
मानवजित सिंग साधु पुरुष-ट्रॅप स्पर्धेत पात्रता फेरीत खेळेल. पहिल्या दिवसाच्या शेवटी तो २५व्या स्थानावर आहे. जर अंतीम फेरीसाठी तो पात्र झाला तर दिवसअखेरीस सुवर्णपदकासाठी खेळेल
निकाल.
मानवजित सिंह साधु याला १६ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. आव्हान संपुष्टात.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर जे कोष्टक दिलंय त्यापेक्षा सरळ फक्त भारताची कामगिरी दाखवणारंच कोष्टक बनवा...सुरुवातीचं वाचताना खुपच गोंधळले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असं कोष्टक बनवायला वेळ लागेल. प्रयत्न करतो. तोपर्यंत आहे हेच गोड मानून घ्यावे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोन्ही नेमबाजी स्पर्धा सुरू झाल्या आहेत.
५० मी रायफल ३ पोझिशन्स
पहिली प्रोन (झोपून) पोझिशनच्या चारही फेर्‍या झाल्यावर
गगन नारंग ३९८/४०० गुण मिळवत पाचव्या स्थानावर, तर संजीव राजपूत ३९५ गुणांसह २०व्या स्थानावर आहे.

पुरुषांची ट्रॅप स्पर्धेत चैथी फेरी सुरु झाली आहे. मानवजीतसिंग साधु २३व्या स्थानावर आहे
चौथ्या फेरी अखेर मानवजीत सिंग १९ व्या स्थानावर पोचला आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुरुष थाळीफेक स्पर्धेची पात्रता फेरी सुरू झाली आहे.
विकास गौडा भारतातर्फे खेळत आहे.

पहिला ट्रायः ६३.५२मी. (आतापर्यंत खेळलेल्या ७ जणांत ३ रा)

दुसरा ट्राय ६५.२०मी (आतापर्यंत खेळलेल्या १८ जणांत १ला)!!! त्याच्या नावपुढे Q दिसतोय. बहुदा तो Qualified by Position असावा असे वाटते. तसे असेल तर भारतीय इतिहास दोन खेळाडू अ‍ॅथलेटिक्स खेळांच्या अंतीम फेरीत पोहचण्याची पहिलीच वेळ असेल.

ग्रुप A च्या २० खेळाडूंचे दुसरे ट्राय झाल्या नंटरही ग्रुपमध्ये सर्वात जास्त अंतरासह विकास पहिल्या क्रमांकावर आहे!

गटातील पहिल्या स्थानासह विकास अंतीम फेरीत पात्र ठरला आहे.

सध्या विकास गौडा सर्व स्पर्धकांमध्ये(गट A व B मिळून) तिसर्‍या स्थानावर आहे.

टिप: ऑलिंपिक रेकॉर्ड ६९.८९मी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान माहिती रे ऑलिंपिक्या. घरबसल्या विलायतेत चालु असलेल्या ऑलिंपिकची माहिती ईथे मिळतेय हेच आमचे भाग्य.सध्याच्या पिढीला ह्यात विशेष वाटणार नाही पण अगदी १९७६च्या मॉन्ट्रियल ऑलिंपिकपर्यंत अशी माहिती मिळणे हेच भाग्याचे होते. आमचे 'हे' अगदी सकाळी केसरी,सकाळ आणायला अगदी पहाटे जात्.भारताला कधीतरी सुवर्णपदक मिळेल ही आशा.
(तांदूळ्,रवा निवडत ऑलिंपिकविषयी वाचणारी) रमाबाई

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उर्वरीत अपडेट्स
१. अ‍ॅथलेटिक्स (थाळीफेक): सर्व खेळाडूंच्या सर्व प्रयत्नांनंतर विकास गौडा (दोन्ही गटात मिळून) पाचव्या स्थानावर (व A गटात पहिला) आहे. तो अंतीम फेरीत पात्र आहे. अंतीम फेरी ०७ ऑगस्ट ला होईल
२. बॉक्सिंग: मेरी कोम हिने शानदार विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. तिचे पदक आता निश्चित झाले आहे
३. विजेंदर सिंग ला मात्र उझबेगिस्तानच्या अबॉस कडून १७-१३ असा पराभवाचा सामना करावा लागला आहे. आपले पुरुष बॉक्सिंगमध्ये केवळ देवेन्द्र सिंगचे आव्हान टिकून आहे.
४. पुरुष ट्रॅप नेमबाजीत मानवजित सिंह ला १६ व्या स्थनावर तर ५० मी रायफल तिहेरी पोझिशन्स मध्ये गगन व संजीवला अनुक्रमे २०व्या व २६व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

७ ऑगस्ट २०१२ रोजी खेळले जाणारे खेळः
आज एकूण २० क्रीडाप्रकार खेळले जातील. व २४ सुवर्णपदके प्रदान होणार आहेत

क्रीडाप्रकार

भारताचा सहभाग?

फेरी

पदक प्रदान?

अ‍ॅथलेटिक्स (थाळीफेक -पुरूष) होय अंतीम होय
अ‍ॅथलेटिक्स (तिहेरी उडी - पुरूष) होय पात्रता नाही
अ‍ॅथलेटिक्स (उर्वरीत) होय पात्रता/अंतीम होय(तीन)
बास्केट बॉल (महिला) नाही उपांत्यपूर्व नाही
बीच व्हॉलिबॉल (पुरूष व महिला) नाही उपांत्य नाही
बॉक्सिंग(पुरुष) नाही उपांत्यपूर्व नाही
कनोई स्प्रिंट नाही पात्रता नाही
सायकलिंग - ट्रॅक (तीन प्रकार) नाही अंतीम होय (तीन)
डायविंग (पुरूष ३मी स्प्रिंगबोर्ड) नाही अंतीम होय
घोडेस्वारी(वैयक्तीक, सांघिक) नाही अंतीम (सांघिक) होय
फुटबॉल (पुरूष) नाही उपांत्य नाही
जिमनॅस्टिक्स (आर्टिस्टिक) नाही अंतीम होय (चार)
हॅन्डबॉल (महिला) नाही उपांत्यपूर्व नाही
हॉकी(पुरूष) होय प्राथमिक नाही
नौकानयन (महिला व पुरूष) नाही शर्यती होय(दोन)
सिक्रोनाईज्ड जलतरण (महिला दुहेरी) नाही अंतीम होय
टेबल टेनिस(सांघिक) नाही अंतीम होय
व्हॉलिबॉल (महिला) नाही उपांत्यपूर्व नाही
वॉटर पोलो (महिला) नाही उपांत्य नाही
भारोत्तोलन (पुरुष +१०५कीलो) नाही सर्व होय
कुस्ती (पुरुष-ग्रीको रोमन) नाही सर्व होय (दोन)

आजचा भारताचा सहभागः

अ‍ॅथलेटिक्स (तिहेरी उडी): रणजित महेश्वरी तिहेरी उडी अर्थात ट्रिपल जम्प स्पर्धेच्या पात्रता फेरीत खेळेल.
निकालः रणजित महेश्वरी तिहेरी उडीत एकही 'व्हॅलिड' उडी मारू शकला नाही व कोणत्याही गुणाविना तो शेवटच्या क्रमांकावर राहिला

अ‍ॅथलेटिक्स (हॉकी): आज साखळी सामन्यातील शेवटचा सामना भारत बेल्जियम विरुद्ध खेळेल.
निकालः भारताचा हॉकी संघ शेवटच्या सामन्यात देखील बेल्जियम कडून ३-० अश्या फरकाने पराभूत झाला.

अ‍ॅथलेटिक्स (थाळीफेक): विकास गौडा थाळी फेक स्पर्धेच्या अंतीम फेरीत पदकासाठी खेळेल.
निकाल: थाळीफेक स्पर्धेत ६४.७९मी अंतराच्या कमाल फेकीसह विकास गौडा यास आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पात्रता फेरीत रणजित महेश्वरी तिहेरी उडीत एकही 'व्हॅलिड' उडी मारू शकला नाही व कोणत्याही गुणाविना तो शेवटच्या क्रमांकावर राहिला.
अर्थातच त्याचे आव्हान संपुष्टात आले आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उर्वरीत अपडेट्स
-- थाळीफेक स्पर्धेच्या अंतीम फेरीत विकास गौडा आपल्या पात्रता फेरी इतकी मजलही मारू शकला नाही. ६४.७९ या सर्वाधिक अंतराच्या फेकीसह तो आठव्या स्थानावर राहिला. अर्थात थाळीफेक स्पर्धेत भारतातर्फे अंतीम फेरीत पोचणाराअ तो बहुदा पहिलाच पुरूष खेळाडू असावा.
-- अपेक्षेप्रमाणे भारतचा हॉकी संघ शेवटच्या सामन्यात देखील बेल्जियम कडून ३-० अश्या फरकाने पराभूत झाला. एकही सामना न जिंकता येणारा हा संघ आता मायदेशी परतेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

८ ऑगस्ट २०१२ रोजी खेळले जाणारे खेळः
आज एकूण १६ क्रीडाप्रकार खेळले जातील. व १६ सुवर्णपदके प्रदान होणार आहेत

घाईघाईत आधीचे टेबल ओवरराईट झाल्याने नवे टेबल बने पर्यंत टेबल अप्रकाशित करत आहे

आजचा भारताचा सहभागः

अ‍ॅथलेटिक्स (८०० मी धावणे): टिन्टु लुका आज या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारतातर्फे सहभागी होईल.
निकालः प्राथमिक फेरीत तिने २:०१.७५ मिनिटे अशी वेळ दिली व अंतीम फेरीत पात्र झाली आहे

बॉक्सिंग: देवेन्द्र सिंग सहभागी झाला व पराभुत झाला आहे. याच बरोबर भारताचे पुरूष बॉक्सिंगमधील आव्हान पदकाविना संपले आहे

कुस्ती:

महिला बॉक्सिंग मध्ये ५१ किलो वजनी गटात मेरी कोम हिने कांस्य पदक पटकावले आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२ मिनिटे ०१ सेकंद ७५ मिलीसेकंद या वेळेसह टिन्टु लुका ८०० मी पळण्याच्या शर्यतीत तिच्या गटात तिसरी आली आहे व पुढील फेरीत पात्र ठरली आहे.

सर्व खेळाडूंची वेळ बघता तिचा बारावा क्रमांक आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फार आशा होत्या मेरी च्या संभाव्य सुवर्णपदकावर. पण असो, कांस्यपदकावर समाधान मानून घेऊ या.

हॉकी टीमने मात्र फार फार निराशा केली....गटातील अखेरचा सामनाही सणसणीत फरकाने हरल्याने एकेकाळचा या खेळात जगज्जेता असलेला भारत शेवटच्या क्रमांकावर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हॉकी टीमने मात्र फार फार निराशा केली....गटातील अखेरचा सामनाही सणसणीत फरकाने हरल्याने एकेकाळचा या खेळात जगज्जेता असलेला भारत शेवटच्या क्रमांकावर.

निराश होऊ नका. तेथेच एक आशेचा किरण आहे, त्याकडे पहा. आता इथून पुन्हा निराशेचे पाऊल नाही. जिथे आहे तेथेच आपण असू, स्थितक्रम! झाली तर प्रगतीच होईल! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वेल, वेल.... इन अ डिफरन्ट वे....तुम्ही सत्यच सांगत आहात श्रामो.
वाईट वाटते ह्याचे की, अगदी गोपुदेशपांड्याची 'उद्ध्वस्त धर्मशा़ळा' होऊन बसले हो भारतीय हॉकीजगत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला खरोखरच प्रश्न पडला आहे. सुवर्णपदक मिळवणारा जगज्जेता भारतीय संघ आणि आजचा संघ यांच्यात नक्की समान धागा कोणता? एक-दोन खेळाडू बदलले तर तो संघ तोच म्हणता येईल ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

देवेन्द्र सिंग याचा आयर्लंडच्या पॅडी याने पराभव केला आहे. याच बरोबर पुरूष बॉक्सर्सचे आव्हान कोणत्याही पदकाविना संपुष्टात आले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

९ ऑगस्ट २०१२ रोजी खेळले जाणारे खेळः
आज एकूण १९ क्रीडाप्रकार खेळले जातील. व २३ सुवर्णपदके प्रदान होणार आहेत

क्रीडाप्रकार

भारताचा सहभाग?

फेरी

पदक प्रदान?

अ‍ॅथलेटिक्स (८०० मी धावणे-महिला) होय उपांत्य नाही
अ‍ॅथलेटिक्स (उंच उडी) होय पात्रता नाही
अ‍ॅथलेटिक्स (उर्वरीत) नाही पात्रता/प्राथमिक/अंतीम होय(पाच)
बास्केट बॉल (महिला) नाही उपांत्य नाही
बीच व्हॉलिबॉल (पुरूष) नाही अंतीम होय
बॉक्सिंग(महिला) नाही अंतीम होय (तीन)
कनोई स्प्रिंट नाही अंतीम होय (चार)
सायकलिंग - BMX नाही उपांत्यपूर्व नाही
डायविंग (महिला १०मी प्लॅटफॉर्म) नाही अंतीम होय
घोडेस्वारी(वैयक्तीक) नाही अंतीम होय
फुटबॉल (महिला) नाही अंतीम होय
जिमनॅस्टिक्स(रिदमिक) नाही प्राथमिक नाही
हॅन्डबॉल (महिला) नाही उपांत्य नाही
हॉकी(पुरूष) नाही उपांत्य नाही
नौकानयन (महिला व पुरूष) नाही शर्यती होय
जलतरण (मॅरॅथॉन) नाही अंतीम होय
सिन्कोनाईज्ड जलतरण (महिला संघ) नाही प्राथमिक नाही
तायक्वांन्डो(दोन गट) नाही सर्व होय (दोन)
व्हॉलिबॉल (महिला) नाही उपांत्य नाही
वॉटर पोलो (महिला) नाही अंतीम होय
कुस्ती (महिला-फ्रीस्टाईल) होय (एक) सर्व होय (दोन)

आजचा भारताचा सहभागः

अ‍ॅथलेटिक्स (८०० मी धावणे): टिन्टु लुका आज या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतातर्फे सहभागी होईल. काल प्राथमिक फेरीत तिने २:०१.७५ मिनिटे अशी वेळ दिली होती. तिचा वैयक्तिक आणि राष्ट्रीय विक्रम १:५९.१७ मिनिटांचा आहे.
निकालः १:५९.६९ अशी वेळ देऊन ११वी आली. अंतीम फेरीत अपात्र

अ‍ॅथलेटिक्स (उंच उडी): सहाना कुमारी आज या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारतातर्फे सहभागी होईल. तिचा वैयक्तिक विक्रम १.९२ मीटर्सचा आहे (ऑलिंपिक विक्रम २.०६ मीटर्स)
निकालः १.८० मी उडीसह सहाना कुमारीचे आव्हान संपले आहे

कुस्ती: महिला कुस्तीच्या ५५ किलो वजनी गटात "गीता गीता फोगट" खेळेत. ती जर विजयी होत गेली तर दिवस अखेर ती सुवर्णपदकासाठी खेळेल. तिने यापूर्वी राष्ट्र्कुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे तर ऑलिंपिक आशियायी पात्रता स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले आहे.
निकाल: प्राथमिक फेरीत तसेच रिपिज फेरीतही हरल्याने गीताचे आव्हान संपले आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहाना कुमारी हिने कमाल १.८०मी उडी मारली आणि ती स्पर्धेत २९वी आली आहे. अर्थातच तिचे आव्हान संपुष्टात आले आहे.
अर्थात तिने आज स्वत:चा सर्वोत्तम खेळ खेळला असता तरिही ती पात्र ठरली नसती. १.९३मी ला पात्रता यादी संपल्याने १.९३ उडी मारून देखील काहिंना पात्र होता आले नाही (अश्यावेळी कितव्या अटेम्प्टमध्ये उडी मारली यावर निर्णय घेतला जातो)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

महिलांच्या ८00 मी धावण्याच्या स्पर्धेत टिँटू लिँका सहावी आली
पहिल्या राऊंडमधे चौथ्या क्रमांकावर असणारी टिँटू लिँका दूसऱ्‍या राऊंडमधे एक्झाँट झाल्यासारखी वाटली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

सर्व क्रमांकांचा विचार करता टिन्ह्टु ११वी आहे.
मात्र तिने तिच्या सर्वोत्तम वेळेच्या बरीच जवळची वेळ दिली आहे. १:५९.६९ मिनिटे

अर्थातच ती अंतीम फेरीत पोचलेली नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वेळेच्या आभावामुळे सर्व खेळांचे टेबल देणे शक्य होत नाहिये. केवळ भारताचा सहभाग नोंदवतो:

आज भारतातर्फे केवळ एक स्पर्धक आपले नशीब आजमावेल
कुस्ती: पुरूष कुस्तीच्या ५५ किलो वजनी गटात "नरसिंह यादव" खेळेल. तो जर विजयी होत गेली तर दिवस अखेर ती सुवर्णपदकासाठी खेळेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुरूष कुस्तीच्या ५५ किलो वजनी गटात "अमित कुमार" खेळेल आणि ७४ किलो वजनी गटात "नरसिंह यादव" खेळेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नरसिंह यादव हरला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अप्रतीम खेळ करत १/८ चा राऊंड अमित कुमारने ३-१ असा जिंकला आहे !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमित कुमार क्वार्टर फायनल मधे हरला...आता या फेरीतला त्याचा प्रतिस्पर्धी जर अंतिम फेरीत गेला तर त्याला कांस्य पदकासाठी खेळायची संधी मिळेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा प्रकार नीट समजला नाही. क्वार्टर्समधे हरल्यावर तो ५-८ या क्रमांकांमधे राहिला पाहिजे ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अमित कुमार रिपिज राऊंडमध्ये पोचला आहे. जर तो ही राऊंड जिंकला तर त्याला ब्रान्झ मेडलसाठी खेळता येईल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

योगेश्वर दत्त 60 Kg फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात अंतोलीला हरवून उपांत्यपूर्व फेरीत पोचला आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

याहू!!!
योगेश्वर दत्तने कोरियाच्या मल्लाला फ्रीस्टाईल ६० किलो गटात धूळ चारुन कांस्यपदक जिँकल
त्याचे अभिनंदन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

१२ ऑगस्ट २०१२ रोजी खेळले जाणारे खेळः
आज ऑलिंपिक्सचा शेवटचा दिवस. आज एकूण ६ क्रीडाप्रकार खेळले जातील. व १५ सुवर्णपदके प्रदान होणार आहेत

क्रीडाप्रकार

भारताचा सहभाग?

फेरी

पदक प्रदान?

अ‍ॅथलेटिक्स (पुरूष मॅरॅथॉन) होय शर्यत होय
बास्केट बॉल (पुरूष) नाही अंतीम होय
बॉक्सिंग(पुरुष) होय अंतीम होय (पाच)
सायकलिंग - माऊंटन बाईक नाही शर्यत होय
जिमनॅस्टिक(रिदमिक) नाही सर्व होय
हॅन्डबॉल (पुरुष) नाही अंतीम होय
आधुनिक पंचकर्म नाही अंतीम होय
व्हॉलिबॉल (पुरूष) नाही अंतीम होय
वॉटर पोलो (पुरूष) नाही अंतीम होय
कुस्ती (फ्रीस्टाईल) होय सर्व होय(दोन)

आजचा भारताचा सहभागः


बॉक्सिंग (६६ किलो): त्याला पात्रता फेरीत बाय मिळाला आहे. गतवेळचा ब्रॉन्झ मेडल विजेता सुशील कुमार हा १/८ फेरीत खेळेल. जर तो जिंकत गेला तर दिवस अखेरीस सुवर्णप्दकासाठी खेळेल
निकालः .
.
.
.
.

अ‍ॅथलेटिक्स (मॅरॅथॉन): मानाच्या व ऑलिंपिकमधील शेवटच्या समजल्या जाणार्‍या मॅरॅथॉन स्पर्धेत भारताचा रामसिंग यादव सहभागी होईल. अर्थात शर्यत असल्याने विजेत्यांना थेट पदके मिळातील.
निकालः .
.
.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुशीलकुमारचा क्वार्टर फायनलमध्ये शानदार विजय......आता काहीवेळाने 'सेमी फायनल' होईल....शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता सुशील कुमारचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरू होत आहे.
आशा करूया की तो विजयी होईल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पहिली फेरी सुशील कुमारने ३-० ने जिंकली आहे Smile
आता दुसरी फेरी सुरू होते आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दुसरी फेरी कझाक पेहलवानाने ३-० ने जिंकली आहे. आता निर्णायक तिसरी फेरी होईल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अप्रतिम तिसर्‍या सेटमध्ये ६-३ ने सुधील कुमार विजयी झाला आहे'सुशील कुमार अंतीम फेरीत पोचला आहेच
याच सोबत भारताचे सहावे मेडल नक्की झाले आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुशील कुमार याने रौप्य पदक पटकावले आहे

त्याचे हार्दिक अभिनंदन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अश्याप्रकारे आजवरच्या इतिहासात सर्वाधिक पदकांसह भारतीय चमु परततो आहे. अमेरिकेने आपला पहिला क्रमांक (सुवर्ण व एकूण पदके अश्या दोन्ही दृष्टीने) पुन्हा मिळवला आहे.
भारतीय संघ सुवर्णांच्या क्रमवारीने ५५व्या स्थानावर आहे तर एकूण पदकांच्या निकषाने ३७ वा आहे.

भारतीय चमु कडून मला व्यक्तीशः एखाद-दोन अधिक पदकांची अपेक्षा होती (तिरंदाजी, टेनिस आणि बॅडमिंटन महिला दुहेरी). मात्र जे मिळाले आहे तेही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहेच. यानिमित्ताने भारतात विविध खेळांकडे जनतेच लक्ष गेले आणि खेळ हा प्रकार आनंदाबरोबरच करीयर म्हणून पुढे येऊ लागला तर ऑलिंपिकचा चमु खर्‍या अर्थाने जिंकला असे म्हणता येईल.

असो. लंडन ऑलिंपिकचे माझ्यापरीने शक्य तितके Live वार्तांकन केले. ते गोड मानुन अनेकांनी व्यनीद्वारे आपली पसंतीही कळवली आहे. त्याबद्दल मी सार्‍यांचा आभारी आहे. आता ऑलिंपिकची सांगता झाल्याबरोबर माझे (या आयडीचे) प्रयोजनही संपले आहे. तेव्हा आपली रजा घेतो. या Live वार्तांकनाने 'दुधाची तहान ताकावर' भागण्याइतपत आनंद तुम्हा देऊ शकलो असेन अशी आशा करतो.

पुन्हा भेटूच २०१६मध्ये रीओ येथे!!

टीपः
ऑलिंपिक स्पर्धा संपल्याने सदर धागा उद्यापासून वाचनमात्र करण्यात येईल. ऑलिंपिक गप्पा आणि अभिनंदनाच्या धाग्याचा वापर याविषयावर चर्चा करण्यासाठी करू शकताच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0