लबाड कान्हा .. खट्याळ कान्हा ...

.
खोड्या करुनी
दंगा करुनी
गोपगड्यांना
खेळवतो -

लबाड कान्हा
खट्याळ कान्हा
यशोदामाईला
पळवतो -

क्षण शिक्षेचा
गोळा लोण्याचा
डोळ्यासमोर
वितळतो !

हसणे विसरता
रुसून बसता
आनंद माईचा
मावळतो -

मुख उघडोनी
विश्व दावूनी
यशोदामायेला
'माया'ळतो ,

यशोदामाता
जवळी घेता
पदरामध्ये
विरघळतो !
.

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

मोजक्या शब्दातले कन्हैयाच्या लिला सुंदर जमल्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

काही ठिकाणी लय बिघटल्याने मजा कमी होतेय.. त्या दृष्टीने जरा फेरफार करता येईल का?
बाकी कल्पना आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!