थोडा सा बादल... थोडा सा पानी... और एक कहानी...

'भिन्न' वाचून झालं, त्यावेळचा अनुभव अजूनही ताजा आहे. निदान आठवडाभर डोकं सुन्न झालं होतं. कशातच मन लागेना. दु:ख कसलं, तेही शब्दांत नेमकं पकडता येईना. पण रेल्वेच्या रूळांप्रमाणे समांतर सरळ रेषांत प्रवास करणार्‍या आयुष्यात अकल्पितपणे सगळं उद्ध्वस्त करून टाकणारा अपघात झाल्यासारखं वाटलं होतं... अगदी असंच काहीतरी सध्या अनुभवतो आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक सुरेश शेलार यांचे तीन लघुपट पाहिले. त्याविषयी थोडक्यात...

बर्थडे :

अ‍ॅलेक्स आणि अभय या दोन पात्रांच्या गोष्टीतून एक विलक्षण प्रत्ययकारी अनुभव सुरेश शेलार यांनी 'बर्थडे' या लघुपटातून दिला आहे. समलैंगिक नात्यातली अस्थिरता अधोरेखित करणार्‍या या लघुपटाशी भिन्नलिंगी नात्याचा अनुभव घेणारे प्रेक्षकही अगदी सहज कनेक्ट करू शकतील. कारण समलिंगी काय, भिन्नलिंगी काय... प्रेमाच्या नात्यातली तरलता, सौंदर्य, ते तुटल्यावर येणारं एकाकीपण या सगळ्या भावना वैश्विक... दोन्ही कलाकारांचा अतिशय नैसर्गिक अभिनय आणि पार्श्वसंगीताने प्रसंगांमध्ये भरलेले गहिरे रंग यामुळे लघुपट अप्रतिम जमला आहे... 'दोस्ताना'सारखे फालतू चित्रपट डोक्यावर घेणार्‍या भारतीय प्रेक्षकांनी एकदातरी हा लघुपट पाहावा, म्हणजे समलैंगिक व्यक्ती आणि त्यांच्या नातेसंबंधाबद्दलचे प्रचलित गैरसमज थोडे तरी दूर होतील...

मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस शर्मा :

'अ‍ॅण्ड दे लीव्ड हॅप्पिली एवर आफ्टर...' अशा वळणाने जाणारी या लघुपटाची कथा शेवटच्या काही मिनिटांत अकल्पित धक्का देऊन जाते. मोहित आणि ॠतुजा, असं सुखी जोडपं... एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलं... असं आपल्याला काही मिनिटं वाटत राहतं. वस्तुस्थिती मात्र भयानक आहे... अंगावर येणारी आहे... काळ बदलत गेला, तसं हिंदी सिनेमातलं प्रेमही बदलत गेलं... झाडांभोवती फेर धरून गाणी म्हणणारी जोडपी हळूहळू आलिंगनाकडे आणि मग चुंबनाकडे वळली... हा लघुपट या सर्वांच्या पुढे जाऊन प्रेमावर, आयुष्यातल्या वास्तव आणि कटु सत्यांवर भाष्य करतो...

स्ट्रगलर्स :

फिल्मलाईनमध्ये काम मिळावं, हिरो म्हणून आपण पडद्यावर चमकावं ही आशा मनात ठेवून, घरदार सोडून कितीतरी तरुण - तरुणी देशभरातून मुंबईत येतात. त्यातले कितीजण यशस्वी होतात, कितीजण टक्केटोणपे खात पुढे जातात, कितीजण निराशेच्या गर्तेत सापडून अंमली पदार्थांना जवळ करतात, याची मोजदादही कुणी ठेवत नाही... पण तरीही या चमचमत्या दुनियेचा मोह काही संपत नाही... अशाच पाच मित्रांची ही कथा आहे. आपलं भविष्य काय, याची हळूहळू जाणीव झाल्यावर येणार्‍या दडपणामुळे त्यांच्या नकळतच त्यांच्या मैत्रीत कसा फरक पडत जातो, हे या लघुपटातून फार प्रभावी पध्दतीने दाखविले आहे.

दिग्दर्शक सुरेश शेलार यांचे हे तिन्ही लघुपट सर्वांनी पाहावेत, असेच आहेत. विषय भिन्न असले, तरी सर्वांत एक समान सूत्र आहे - लघुपट पाहिल्यानंतर येणार्‍या एका तुटलेपणाच्या अनामिक भावनेचं...

(सर्व व्हिडियो युट्युबवर उपलब्ध आहेत.)

==
संपादक: व्हिडीयो इथे बघता येतीलः
बर्थडे: http://www.youtube.com/watch?v=fT-2WBfIaog

मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस शर्मा : http://www.youtube.com/watch?v=VdsqvovMwlI&feature=related

स्ट्रगलर्स-१: http://www.youtube.com/watch?v=UffgDQjhzgE

स्ट्रगलर्स-२: http://www.youtube.com/watch?v=oGy_s7JBJ_c&feature=relmfu

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

थोडक्यात अन् उत्तम परिचय करून दिला आहेस.
"टिझर" पद्धतीच्या या परिचयामुळे हे लघुपट बघावेसे वाटु लागले आहेत. विकांताला नक्की बघेन

आभार!

टिपः मुळ लेखात शेवटी दुवे चढवले आहेत. ते योग्य नसल्यास सांगावे, योग्य ते बदल केले जातील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋ प्रमाणेच म्हणतो. अगदी थोडक्यात उत्तम परिचय करून दिल्यामुळे हे तिनही लघुपट पाहायची उत्सुकता वाढली आहे. ह्या विकेंडला नक्की बघेन म्हणतो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

प्रतिक्रियेबद्दल आणि दुवे जोडल्याबद्दल आभार.
दुवे सायबर कॅफेत जाऊन पाहीन.
योग्य नसल्यास कळवेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीतरी आवर्जून पाहण्यासारखे आहे हे जाण्वले.
शोधून पाहिले जातील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पाहायला हवेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

दुवे उघडत नाहीयेत..

पण तूनळीवर शोधून लगेच सर्व सिनेमे पाहिले...

कमी रिसोर्सेसमध्ये फिल्म्स बनवणं सोपं नसतं, कल्पना आहे...त्यामागच्या कष्टांची माहिती आहे पण अपेक्षा जास्त होत्या पाहताना कदाचित...
प्रयत्न ठीक वाटला.( अनइन्टेशनल हलणारा केमेरा, कॅमेर्‍याचे आवाज, नॉईज , गोंगाट, काही ठिकाणी होता ... अभिनेते अधिक बरे असू शकले असते... नाटकवाले अभिनेते आणि मॉडेलिंगवाले अभिनेते असा ढोबळ फरक करता येइल.काही अभिनेत्यांचे उच्चार कळत नव्हते वगैरे.)

स्ट्रगलरच्या गोष्टीत अजून काय काय घडू शकणारं होतं... फारसं न घडता शेवट गुंडाळला आहे असं वाटलं...

अवांतर : शॉर्ट फिल्मवाले किंवा एकूणच फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगलर सम्कल्पनेला उगीचच ग्लॅमर आहे, खरंतर प्रत्येक नोकरी व्यवसायात स्ट्रगल आहेच... पण यांचा स्ट्रगल म्हणजे जाम कौतुकाचा वगैरे...थोरांहूनही थोर.. चार मुलं नोकरी मिळवण्यासाठी मुंबईत येतात, इन्टरव्यू देतात भरपूर पण नोकरी मनासारखी मिळत नाही, म्हणून गावी परत जातात. अशा गोष्टीला ग्ल्यामर नाही... कलाक्षेत्रातल्या धडपडीला ग्ल्यामर मोठ्ठं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुवे दुरुस्त केले आहेत. तपासून पाहावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

योग्य दुव्यांबद्दल आभार
विकांताला तिनही डॉक्युमेंटरीज बघितल्या. भडकमकर मास्तरांप्रमाणे मलाही सफाई(फीनेस)ची कमतरता जाणवली. बाकी विषय-आशय चांगले वाटले.

@मास्तरः
नोकरदारांचे स्ट्रगल आणि सृजनात्मक स्ट्रगलमध्ये फरक केला जातो तो केवळ फिल्मलाईन पुरताच मर्यादीत नाही. चित्रकारापासून ते नटापर्यंत आणि फॅशन डिझायनर / मॉडेल पासून ते लेखक.कवींपर्यंत सगळ्यांच्या स्ट्रगलिंग पिरीएडला (प्रसिद्धी मिळाल्यावर) ग्लॅमर मिळताना आपण बघतो.
आता नोकरदारांच्या स्ट्रगलमुळे समाजाला फारसे काही मिळत नसल्याने त्याचे त्यांनी कौतुक न करणे फारसे गैर वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्व प्रतिक्रियांबद्दल आभार. माझं वैयक्तिक मत असं आहे की, नोकरदार वर्गाच्या चिंता मनाजोगती नोकरी मिळाली, त्यात बढत्या मिळाल्या की मिटतात तरी. कलाक्षेत्रात असं काही एक ठराविक माप असतं का? एक चित्रपट चालला म्हणून एखादा कलाकार एका रात्रीत स्टार होत असेलही. बाकीच्यांचं काय? आणखी एक मुद्दा असा की इथे यशाचा असा एक फॉर्म्युला असतो का? मायबाप प्रेक्षकांवर सगळं अवलंबून. अर्थात हे फक्त म्या पामराचं मत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0