समाजसुधारणा व पक्षपात

सामन्यत: एका नाण्याच्या दोन बाजु असतात ,चांगली व वाईट आणि इथे ही नाण्याला दोनच बाजुच नाहीत तर त्या बाजु दोन्ही चांगल्या असुनही एक चांगली बाजु स्वत:च्या स्वार्थासाठी समोर आणली जाते आणि दुसरी चांगली बाजु जाणिवपुर्वक दुर्लक्षीत केली जाते . आणि महत्वाचे म्हणजे या ठिकाणि या नाण्याला दोन बाजु ’जात’ ही संकल्पना समोर ठेवून जाणिवपुर्वक तयार केल्या गेल्या आहेत.
जगातील कोणत्याहि धर्मांच्या तुलनेत हिंदु धर्म परिवर्तनशिल आहे. परिवर्तन किंवा बदल हा निसर्गाचा नियम आहे. युनान रोम मिस्त्रा सब मिट गये यहा से, कुछ बात है की हस्ती मिटती नही हमरी , आणि ही हस्ती न मिटन्याच्या अनेक कारणांपैकी हिंदु धर्माची परिवर्तनक्षमता हे एक महत्वाचे कारण आहे. हिंदु धर्माने परिवर्तन कधीही नाकारलेले नाही तसेच धर्मत असलेले तत्वे, नियम , मान्यता यांची कोणावरही कधी सक्ती केली नाहि. ज्या ज्या वेळी धर्मामध्ये दोश घुसले त्या त्या वेळी राम , कृश्ण, ज्ञानेश्वर, तुकाराम , स्वामी विवेकानंद अशा अनेक धर्म-सुधारकांनी धरमातील उणीवा आणि दोश नष्ट केल्या आणि पुन्हा एकदा एक निखळ असा धर्म समाजासमोर ठेवला. सांगण्याचा उद्देश एवढाच की हिंदु धर्मा मध्ये फार पुर्वीपासून म्हणजे अगदी व्यास , श्री कृष्ण यांपासुन ते आजच्या बाबा आमटे , बाबा रामदेव, टिळक, आगरकर, सावरकर, शाहु महाराज यांच्यापर्यंत अनेक धर्म सुधारक पर्यायाने आज आपण त्यांना समाजसुधारक म्हणतो हिंदु धर्मात होऊन गेले त्यांनी धर्म / समाजातील दोष मुळापासुन उपटून टाकले , काही वेळा असेही झाले की जुण्या काळात निर्धारीत केला गेलेला एक नियम आजच्या काळातील दोष असेल तर त्याला विरोध करुन त्याला एखाद्या बांडगुळाला बाजुला करावे त्याप्रमाणे बाजुला केले आणि निखळ असे तत्व समाजासमोर मांडले आणि कदाचीत हेच एक कारण आहे की जगातील कोणत्याहि धर्मात नसतील एवढे समाज/ धर्म सुधारल हिंदु धर्मात होऊन गेले त्याचप्रमाणे प्राचीन काळापासुन आजपर्यंत हिंदु धर्म नष्ट झालेला नाही.
आणि हीच गोष्ट काही लोकांच्या डोळ्यात खुपत आहे. आणि काही समाजसुधारक ज्यांनी हिंदु धर्मातील बांडगुळे नष्ट करुन नवे तेज प्राप्त करुन दिले अशां काही मोजक्या (मोजक्या म्हणजे स्वत:ला झेपतील एवढ्या ) समाजसुधारकांना त्याच धर्माच्या विरोधात उभे करुन ते धर्मसुधारक हे कसे हिंदु धर्माच्या विरोधात होते हे त्यांचे तत्वज्ञान काटून छाटून समाजात प्रस्तुत केले जात आहे. त्यामुळे समाजसुधारक म्हणजे हिंदु धर्म विरोधक असे चित्र निर्माण करण्यात काही अंशी हे लोक यशस्वि झाले आहेत.
शाहु - फुले- आंबेडकर तत्कालीन समाजसुधारक , भारतीयांवर यांचे थोर उपकार आहेत. यांचे महानत्व कोणीही नाकारणार नाही. परंतु समाजसुधारक म्हटले की आपल्याला फक्त शाहु - फुले- आंबेडकरच आठवतात याचे कारण म्हणजे वर सांगीतल्याप्रमाणे याच मोजक्या समाजसुधारकांचे विचार या लोकांना झेपतात त्यामुळे अशांनी समाजसुधारक हेच काय ते आहेत असे चित्र तयार केले आहे आणि या महपुरुशांचा आधार घेवुन हिंदु धर्माच्या विरोधात प्रचार चालु आहे. आणि याचमुळे समाजसुधारक म्हणजे असे की ज्यांनी धर्म नाकारला असे समिकरण तयार झाले आहे.
याठिकाणि आपण काही अगदी थोडक्यात अशी उदाहरणे पाहणार आहोत की जे समाजसुधारक शाहु - फुले- आंबेडकर यांच्या सोबत बसु शकत नाही कारण .. यांची समाजसुधारना या स्वार्थी लोकांना झेपत नाही.

* आचार्य विनोबा भावे :-

भारतीय समाजसुधारणेच्या कार्यामध्ये अचार्य विनोबाजिंचे भुदान आंदोनल अपण विसरु शकत नाही. १९५१ मध्ये तेलंगण प्रदेशामध्ये पोमपल्ली गावामधील मागासवर्गीयांच्या विनंतीवरुन तेथील धनिकांकडुन आपापल्या जमिनी सत्याग्रहाच्या मार्गावरुन मिळवण्यात यशस्वि झाले. आणि हे आंदोनल जणु एका ऐतीकहासीक आंदोलनाची सुरवात होते. आचार्यजिंनीपुर्ण देशाभर यात्रा करुन सर्व भुमिधारक धनिकांना आपल्या जमिनिचा सातव हिस्सा भूमी रहीत गरिब, दलित पिडीतांना देन्याचे आवाहन केले हे आंदोलन पुर्णत: अहिंसात्मक आणि शांततापुर्ण होते आणि या आंदोलनातुन मिळालेल्या जमिण आणि संपतीतुन त्यांनी १००० गांवांमध्ये निर्धन लोकांची राहायची व्यवस्था केली त्यांपैकी १७५ गाव एकट्या तामिळनाडू मध्ये वसवले गेले.

* धोंडो केशव कर्वे :-

लहान वयात मुलींची लग्न होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे. ही समाजरीत नाकारणार्‍या अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणार्‍या आनंदी या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. अण्णा पत्नीसह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला.
अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती. घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या हेतूने २१ मे १८९४ या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक‘ मंडळाची स्थापना केली. विधवा-विवाहाला विरोध करणार्‍या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर
घालणे हे या मंडळाचे काम होते. अनिकेत कन्यांसाठी १८९९ मध्ये अण्णांनी ‘अनाथ बालिकाश्रम‘ काढला. ‘विधवा विवाहोत्तेजक‘ मंडळाची स्थापना केली. रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि रु. ७५० संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांकडे सुपूर्द केले. या उजाड माळरानावर अण्णांनी एक झोपडी बांधली. ही पहिलीवहिली झोपडी ही हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेची गंगोत्री. आज अनेक वास्तूंनी गजबजून गेलेल्या या वैभवसमृद्ध परिसरात अण्णांची झोपडी त्यांच्या तपाचे महाभारत जगाला सांगत उभी आहे. १९०० मध्ये अनाथ बालिकाश्रमाचे स्थलांतर हिंगण्यास करण्यात आले. याच परिसरात अण्णांनी विधवांसाठी एक हक्काची सावली निर्माण केली. विधवांचे हे वसतिगृह ही एक सामाजिक प्रयोगशाळा होती.
स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक यांचा त्यांना कायम राग येत असे. पंडिता रमाबाई आणि इश्वर चंद्र विद्यासागर यांच्या जीवनकार्यामुळे अण्णासाहेब खूपच प्रभावित झाले होते. थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचाही त्यांच्यावर पगडा होता.
सन १८९६मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला. याच ठिकाणी १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली. अण्णासाहेबांची २० वर्षांची विधवा मेहुणी - पार्वतीबाई आठवले - या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत. आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारं कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी `निष्काम कर्म मठा'ची स्थापना केली.
पुढे या तिन्ही संस्थांचे कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्याने त्याचे एकत्रीकरण करून `हिंगणे स्त्री शिक्षण संस्था' आणि त्यानंतर `महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था' असे त्याचे नामकरण करण्यात आले.
अर्थात, हे सगळे काही सहजसाध्य नव्हते हे नक्कीच. या कार्यामुळे कर्मठ, सनातन समाजाचा त्यांना रोष पत्करावा लागला. संस्था चालविण्यासाठी पैसे अपुरे पडत असल्याने कित्येक वर्ष अण्णासाहेबांना हिंगणे ते फर्ग्युसन कॉलेज पायी प्रवास करावा लागत असे. आपल्या संस्थांसाठी कुणाकडे देणगी मागायला गेल्यावर कित्येक वेळा त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळत असे. पण अत्यंत जिद्दीने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले.
जपानच्या महिला विद्यापीठाला भेट दिल्यानंतर अण्णासाहेब अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना झाली. पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचे `श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरसी भारतीय महिला विद्यापीठ' (एसएनडीटी) असे नामकरण करण्यात आले.त्यांनी एका जपानी महिला विद्यापीठाचे माहितीपत्रक पाहिले होते. त्यांच्या मनात भारतीय महिला विद्यापीठाचा विचार येत होता. विद्यापीठाची प्रस्तावना म्हणून त्यांनी माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. शिक्षण संस्थांभोवती कार्यकर्त्यांची तटबंदी असावी म्हणून ९०८ मध्ये ‘निष्काम कर्ममठ‘ या संस्कारपीठाची स्थापना केली.
१९१५ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान अण्णांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘महिला विद्यापीठ‘ या कल्पनेचा पुनरुच्चार केला. ३ जून १९१६ रोजी महिला विद्यापीठाची स्थापना झाली. स्त्रीशिक्षणाची ही धारा विद्यापीठाच्या रूपाने विस्तार पावली. अंत्यजांना आणि स्त्रियांना दुर्बल घटक लेखून त्यांना विद्येपासून वंचित करणार्‍या समाजात अण्णांनी आपल्या तपोबलावर हा चमत्कार घडविला. अण्णांच्या कर्तृत्वाने चकित आणि प्रभावित झालेल्या सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री नाथीबाई ठाकरसी यांच्या स्मरणार्थ या विद्यापीठास १५ लाख रुपयांची देणगी दिली. या ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी‘ या विद्यापीठास सरकारने स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिला. अनेक प्रज्ञावंत महिलांनी विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले. अण्णांना अभिप्रेत असणारे बोधवाक्य विद्यापीठाने शिरोधार्य मानले ते असे- ‘संस्कृता स्त्री पराशक्तिः‘ अण्णांच्या प्रयत्नाने अस्तित्वात आलेल्या प्रत्येक संस्थेचे भरणपोषण केले.
इंग्लंड, जर्मनी, जपान, अमेरिका या देशांना भेटी देऊन अण्णांनी आपल्या संस्थांची आणि संकल्पांची माहिती जगाला करून दिली. बर्लिनमध्ये असताना सापेक्षतावादाचे प्रणेते प्रा. अल्बर्ट आइनस्टाइन यांची त्यांनी भेट घेतली. त्यांनी बर्लिनमधली गृहविज्ञानशाळा पाहिली. टोकियोतील महिला विद्यापीठ पाहिले. अनेक राष्ट्रांत स्त्रियांनी

चालविलेल्या संस्था पाहिल्या. त्या दर्शनाने सुचलेल्या अनेक नव्या योजना त्यांनी पूर्णत्वास नेल्या.अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांनी डी. लीट. देऊन सन्मानित केले. `पद्मविभूषण' हा किताब त्यांना १९५५ साली प्रदान करण्यात आला, तर लगेच १९५८ साली त्यांना भारतातील सर वोच्च नागरी सन्मान `भारतरत्न'ने सन्मानित करण्यात आले. असे अण्णा काही नतद्रष्ट लोकांच्या समाजसुधारकांच्या यादीमध्ये बसत नाहीत.

* भारतरत्न पांडुरंग वामन काणे

:- विख्यात प्राच्यविद्या संशोधक आणि धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक. काणे यांची सामाजिक व धार्मिक दृष्टी पुरोगामी होती. हिंदू धर्मसुधारणेच्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. अस्पृश्यता, केशवपनादी अनिष्ट चालींचा त्यांनी निषेधच केला. सकेशा विधवेला पंढरपुरात विठ्ठलपूजेचा अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी वकीलपत्र घेतले होते. आंतरजातीय विवाह, विधवाविवाह, घटस्फोट यांचा त्यांनी पुरस्कार केला. १९४६ साली
नागपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेचे ते अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदांनाही ते भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. काणे यांचा अनेक संस्थांशी निकटचा संबंध होता आणि ह्या संस्थांना त्यांचे मार्गदर्शन लाभत होते. यामध्ये “एशियाटिक सोसायटी”, “भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था”, “महाराष्ट्र साहित्य परिषद”, “मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय” इ. संस्थांचा समावेश आहे. आपल्या हयातीतच काणे यांना अनेक मानसन्मान लाभले. ब्रिटिश शासनाने त्यांना महामहोपाध्याय ही पदवी देऊन गौरव केला. अलाहाबाद आणि पुणे विद्यापीठाने त्यांना “डी.लिट”. ही सन्माननीय पदवी दिली. संस्कृत भाषेचे एक मान्यवर विद्वान म्हणून त्यांना राष्ट्रपतीचे प्रशस्तीपत्र देण्यात आले. पढीक पांडित्याच्या चौकटीत न बसणारी पुरोगामी दृष्टी हे काणे यांचे वैशिष्ट्. भारतीय संस्कृती व धर्म यांचा इतिहास महामहोपाध्याय काणे यांचा आदरपूर्वक उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.

* गोपाळकृष्ण गोखले :-

भारतातील सनदशीर चळवळीचे प्रणेते म्हणून नाव घेतलं जातं ते गोपाळकृष्ण गोखले यांचं. अस्पृश्यता व जाती व्यवस्था निर्मूलनासाठी तसेच स्त्री शिक्षणासाठीही त्यांनी प्रयत्न केले. १९०५ साली भारत सेवक समाजाची त्यांनी स्थापना केली. सुधारक, राष्ट्रसभा समाचार इ. वृत्तपत्रातून सुधारणा विषयक विचार गोखले यांनी वेळोवेळी मांडले. गोखले यांचे दूरगामी विचार भारतीय राजकारणावर परिणाम करून गेलेले दिसतात.

* गोपाळ गणेश आगरकर :-

महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन,परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळ आगरकरांकडे जाते. राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८ साली त्यांनी ‘सुधारक (वृत्तपत्र)’ हे वृत्तपत्र सुरू केले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला, तसेच जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह, ग्रंथप्रामाण्य- धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती.

* आनंदीबाई गोपाळराव जोशी :-

आनंदीबाईनी कलकत्त्यामध्ये एक भाषण केले. तेव्हा त्यांनी भार ामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले आणि हे स्पष्ट सांगितले की, मला यासाठी धर्मांतर वगैरे करण्याची काही गरज नाही .. मी माझा हिन्दुधर्म , संस्कृती यांचा कदापी त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येउन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरु करायचे आहे . आनंदीबाईचे हे भाषण खुप लोकप्रिय झाले . त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून सबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय यांनी पण २०० रुपयांचा फंड जाहिर केला.कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च १८८६ मध्ये आनंदीबाईना एम् डी ची पदवी मिळाली. एम् डी साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’.एम् डी झाल्यावर राणी विक्टोरियाकडून ही त्यांचे अभिनंदन झाले . हा खडतर प्रवास करताना गोपालरावांचा वृक्षासारखा आधार होता म्हणूनच आनंदीबाई ची जीवन वेली बहरत गेली.
एम् डी झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले . सर्वत्र अभिनन्दन झाले. त्यांना कोल्हापुर मधील एक स्थानिक हॉस्पिटलमधील स्त्रीकक्षाचा ताबा देण्यात आला.

* न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

भारतीय समाजात संकुचित वृत्ती; जातिभेदांचे पालन; भौतिक सुखे, व्यावसायिकता व व्यावहारिकता यांविषयाचे गैरसमज यांसारखे दोष निर्माण झाल्यामुळे समाजाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. हे दोष दूर करूनच आपल्या समाजाची प्रगती साधता येईल असे त्यांचे ठाम मत होते. समाजाची राजकीय किंवा आर्थिक उन्नती घडवून आणायची असेल, तर सामाजिक सुधारणेकडे लक्ष पुरविले पाहिजे. "ज्याप्रमाणे गुलाबाचे सौंदर्य व सुगंध हे जसे वेगळे करता येत नाहीत, त्याप्रमाणे राजकारण व सामाजिक सुधारणा यांची फारकत करता येत नाही" असे त्यांचे मत होते. हे विचार त्यांनी समाजसुधारणा चळवळीच्या अगदी सुरुवातीच्या काळात मांडल्यामुळे त्यांना ‘भारतीय उदारमतवादाचे उद्गाते’, असेही म्हटले जाते. सामाजिक प्रश्नांचे महत्त्व लक्षात घेऊन, समाजसुधारणेसाठी रानडे यांनी पुढाकार घेऊन ‘भारतीय सामाजिक परिषदेची' स्थापना केली. या परिषदेचे ते १४ वर्षे महासचिव होते. जातिप्रथेचे उच्चाटन, आंतरजातीय विवाहांस परवानगी, विवाहाच्या वयोमर्यादेत वाढ, बहुपत्नीकत्वाच्या प्रथेस आळा, विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण, तथाकथित जाति-बहिष्कृत लोकांच्या स्थितीत सुधारणा, हिंदू-मुसलमानांच्या धार्मिक मतभेदांचे निराकरण अशा या संस्थेच्या मागण्या होत्या. विधवा विवाहाचा पुरस्कार करून एक नवं वळण रूजवायचा प्रयत्न केला. तसेच बालविवाह आणि जातीयता या समाज विघातक रूढींविरोधी जागृती निर्माण करण्याचं कार्य न्या. रानडे आपल्या चळवळींद्वारे करीत असत.

* स्वातंत्र्यविर सावरकर :-

सावरकर एक प्रख्यात समाससुधारक होते त्यांच्या विश्वास होता की सामाजीक व सार्वजनिक सुधार हे एकमेकांना पुरक आहेत. त्यांनी आपल्या भाषणां, लेख व कृती मधुन सुधारणेसाठी निरंतर प्रयत्न केले. सावरकरांच्या मतानुसार हिंदु समाज त्याकाळी सात बेड्यांमध्ये अडकुन होता.
१) स्पर्ष बंदी : - खालील जातितिल लोकांना स्पर्ष करणे निशिद्ध.
२) रोटी बंदी :- खालच्या जातीतील लोकांसोबत खाने पिणे निशिद्ध.
३) बेटी बंदी :- खालच्या जातीतील विवाह करणे निशिद्ध.
४) व्यवसायबंदी :- काही निश्चीत व्यवसाय करण्यास निशिद्ध.
५) सिंधु बंदी :- सागरयात्रा केल्यने विटाळ होतो वगैरे कल्पना.
६) वेदोक्त बंदी :- वेदाच्या कर्मकांडाशी एका वर्गाला निशिद्ध.
७) शुद्धि बंदी :- हिंदु धर्मातून धर्मांतर झालेल्याला पुन्ह: हिंदु होता न येणे

त्यांनी रत्नागिरिमध्ये सर्व जातीतील लोकांसाठी असे पतित पावन नावाचे मंदीर उभारले.
सावरकरांच्या सामाकीक कार्याविषयी अधीक जाणुन घेण्यासाठी खालील किंक्स फॉलो करा

समाजसुधारणा

* मुरलीधर देविदास तथा बाबा आमटे

समाजसुधारक, विचारवंत, कवी आणि कुष्ठरोग निर्मूलनाचे अफाट काम उभारणारे एक भारतीय व्यक्तिमत्त्व म्हणजे मुरलीधर देविदास आमटे तथा बाबा आमटे.

विदर्भातील एका श्रीमंत जमीनदार कुटुंबात २६ डिसेंबर १९१४ साली त्यांचा जन्म झाला. बी. ए., एल. एल. बी. पर्यंत शिक्षण झाल्यानंतर काही काळ त्यांनी वकिली केली. पण १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात ते महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या सहवासात आले आणि त्यानंतर कुष्ठरोग/महारोग सेवा समितीची त्यांनी स्थापना केली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा येथे कुष्ठरोग्यांसाठी ‘आनंदवना’ची स्थापना केली. कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी त्यांनी महत्त्वाचे काम केले. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अश्या इतर सामाजिक चळवळींतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

तत्कालीन समाजात कुष्ठरोग हे मागील जन्मीच्या पापांचे फळ समजले जाई. यामुळे कुष्ठरोग्यांस वाळीत टाकले जाई. आमट्यांनी एकदा पावसात कुडकुडत भिजणारा एक कुष्ठरोगी पाहिला. ते त्याला घरी घेऊन आले. तेव्हापासून त्यांनी कुष्ठरोग अभ्यासायला सुरुवात केली. १९५२ साली वरोडयाजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. २००८ सालापर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे.

बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांवर केवळ वैद्यकीय उपचार करण्याइतकचं मर्यादित काम न करता कुष्ठरोग्यांना मानसिक आधार मिळवून देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवून त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या. त्यातून

वरील सर्व समाज सुधारकांचे दुर्दैव येवढेच की हे समाजसुधारक केवळ एका विषीष्ठ वर्गाशी संबंधीत असल्यामुळे ते शाहु-फुले-आंबेडकर यांच्या पंक्तीत बसु शकत नाही आणि अर्थात याचा या महापुरुषांच्या कार्यावर जराही फरक पडणार नाही हे काही वेगळे सांगायला नको.

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

प्रतिक्रिया

या लेखातले काही भाग अनेक ठिकाणी आढळून आले. इथे, इथे, आणि इथे त्यांची यादी सापडते. हे सर्व लेखन आपणच केलेलं आहे का? नसल्यास मूळ लेखन कुठून घेतलं आहे याची माहिती द्यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या यादीत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा गांधी, साने गुरूजी, गोपाळ गणेश आगरकर आणि र. धों. कर्वे ही नावंही जोडायला हरकत नाही. विठ्ठल रामजी शिंदे हे स्वतः ब्राह्मणेतर आणि अतिशय पुरोगामी विचारांचे होते. लो. टिळकांशी त्यांचे अशा संदर्भात अनेक वाद झालेले आहेत. त्यांच्या काळात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद शिगेला पोहोचला असताना त्यांनी फक्त सामाजिक सुधारणांची बाजू लावून धरली; ज्याचा फायदा सगळ्या वर्गांना झाला. पण शिंदेंचा स्वतःचा फार मोठा राजकीय अजेंडा नसल्यामुळे त्यांच्याकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केलं.

सावरकरांची समाजसुधारणा मला किंचित कृतक वाटते. त्यांना भारत हा हिंदूंचा समर्थ देश बनवायचा होता. आणि मग त्यात दलित जाती-जमातींना अस्पृश्य ठरवल्यास हिंदू समाज (मुस्लिम समाजाशी तुलना करता) कमकुवत होईल म्हणून त्यांना अस्पृश्यता नाहीशी करायची होती. ब्राह्मणेतर बहुजन किंवा ब्राह्मणेतर आणि दलितेतर वर्गाच्याही जातीविषयक तक्रारी होत्या त्याकडे त्यांनी फार लक्ष दिल्याचं दिसत नाही.

महर्षी कर्व्यांचं काम नि:संशय मोठं आहे; पण ते जातीपातींमधे अडकलेले होते. विठ्ठल रामजी शिंदेंची एक नातलग (बहुदा कोणी चुलत, मामे बहिण) बालविधवा होती. तिला आश्रमात घेण्यास कर्व्यांनी नकार दिला तो जातीच्या कारणांवरून. त्यांच्यासमोर तेव्हा व्यावहारिक अडचणी होत्या हे मान्य केलं तरीही जातियतावादासमोर ते झुकलेच. र.धों, महर्षी कर्व्यांचे चिरंजीव, यांनी पदराला खार लावून समाजसुधारणेचं काम केलं. स्त्रियांच्या नकाराधिकाराचं आणि संततीनियमनाचं काम त्यांनी संपूर्ण समाजाचा रोष पत्करून केलं.

लेखन करताना ते परिपूर्ण असेल याची काळजी घ्या. समाजसुधारकांबद्दल लिहीताना त्यांच्या जाती बघण्याची काहीही आवश्यकता नाही. कॉपी-पेस्टबद्दल अधिक बोलत नाही.
शुद्धलेखनाच्या चुका थोड्या कमी करता आल्या तर लेख अधिक वाचनीय होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सामान्य ज्ञानाची ही सर्वज्ञात जंत्री पुष्कळशी मराठी विकिपीडियामधून उचलून येथे देण्याचे कारण शेवटच्या परिच्छेदात आहे असे वाटते.

"वरील सर्व समाज सुधारकांचे दुर्दैव येवढेच की हे समाजसुधारक केवळ एका विषीष्ठ वर्गाशी संबंधीत असल्यामुळे ते शाहु-फुले-आंबेडकर यांच्या पंक्तीत बसु शकत नाही आणि अर्थात याचा या महापुरुषांच्या कार्यावर जराही फरक पडणार नाही हे काही वेगळे सांगायला नको."

हे विधान अंशतः वा पूर्णत: मान्य आहे काय हे ज्याने त्याने स्वतःपुरते ठरवावे. मात्र "एका विषीष्ठ वर्गाशी संबंधीत असल्यामुळे" ह्या विधानाच्या मागे असणार्‍या वितंडवादात शिरून काही लभ्यांश पदरात पडणार नाही असे मला वाटते आणि म्हणून मी तरी ह्यावर मौन बाळगत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक कुलवृत्तांत प्रकाशित होत असतात. त्यामध्ये त्या त्या कुलातील प्रसिद्ध आणि थोर व्यक्तींची यादी असते. त्यामधून तो कुलवृत्तांत वाचणार्‍यांना त्या कुलाचे महत्त्व वाटावे आणि त्या कुलातल्या व्यक्तींचा अहंकार सुखावला जावा असा उद्देश असतो.

सदर लिखाण हा तसाच "बृहत्"कुलवृत्तांताचा प्रकार वाटतो. अधिकचा भाग म्हणजे कुलवृत्तांतात सहसा नसलेले 'तळतळाटी' लिखाण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माहिती वेगळी नाही व कोल्हटकर म्हणतात त्याप्रमाणे शेवटच्या निष्कर्षासाठी लेखाचा खटाटोप असला तर इतकेच म्हणावेसे वाटते की ह्या समाजसुधारकांना त्यांच्या कार्याचा उल्लेख व खल हा विशीष्ट जातीशी बांधून केल्याचा आवडेल काय?

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0