मंगळावर 'क्युरिओसिटी' रोव्हर ने नेमके काय पाहिले?

माहितीचे काही दुवे:
महाराष्ट्र टाईम्स : मंगळावर दिसल्या उडत्या तबकड्या?
नासाच्या फोटोचे झालेले विश्लेषण (या दुव्यातील "The strange shimmering lights seen by Curiosity:" हा व्हिडिओ नक्की पहा. त्यात एक पांढरा ठिपका स्पष्टपणे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी गेलेला अगदी स्पष्टपणे दिसतोय

नासा : क्युरिओसिटी

पार्श्वभूमी:
अलिकडेच अमेरिकेच्या अंतराळ संशोधनाचा सर्व भार वाहणार्‍या 'नासा' या संस्थेमार्फत 'क्युरिओसिटी' रोव्हर ने घेतलेली काही छायाचित्रे सार्वजनिक केली गेलीत. त्या फोटोंपैकी एका फोटोत क्षितिजावर दिसत असलेल्या चार प्रकाशकणांचे अस्तित्त्व अनेकांना खटकले. कित्येकांच्या मते ते प्रकाशकण म्हणजे उडत्या तबकड्या (यु.एफ.ओ.) आहेत आणि दूर राहून मानवाच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. तर नासाच्या वतीने तो फोटोमधील एक तांत्रिक दोष असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.

हा तो मूळ फोटो:

हे या मूळ फोटोचे (युएफओ च्या अस्तित्त्वासाठी पूरक असे - केलेले? -) पृथक्करणः

नासाच्या वैज्ञानिकांनी फोटोमधील तंत्रातील त्रुटीमुळे निर्माण झालेले डाग आहेत असे म्हटलेले आहे. (येथे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की नासाने ते ४ ठिपके अंतराळातील कोणत्यातरी तार्‍याचे असावेत असे अजिबात म्हटलेले नाहिये) फोटो पाहिल्यावर ते डाग आहेत असे वाटत नाही. कारण डागांना पसरणारा प्रकाश नसतो. ऐसी अक्षरे च्या सदस्यांचे या बद्दल मत काय आहे ते माहिती करुन घ्यायला आवडेल. येथे मी फक्त माहिती देतोय, माझी मते नाहीत. पुढे चर्चेत सहभागी होईनच.

मंगळावर यशस्वीपणे उतरुन एक इतिहास निर्माण करणार्‍या 'क्युरिओसिटी' या रोव्हर च्या या मोहिमेकडे अवघ्या जगातील शास्त्रज्ञांचे व काही प्रमाणात सर्वसामान्यांचेही लक्ष आहे. रोव्हर चा शब्दशः अर्थ भ्रमण करणारा वा फिरणारा असा होतो. समुद्री चाच्यांसाठी देखील हा शब्द वापरला जातो. त्यामुळे क्युरिओसिटी रोव्हर चे मराठी रुपांतर "जिज्ञासू भटक्या" अथवा "जिज्ञासू लुटारु" असे ढोबळमानाने करता येईल. अर्थात हा प्रस्तुत लेखाचा वा चर्चेचा महत्त्वाचा विषय नसल्यामुळे आपण 'क्युरिओसिटी रोव्हर' हाच शब्दप्रयोग करुयात. तर या धाग्याद्वारे 'क्युरिओसिटी' रोव्हरने काढलेल्या फोटोंवरून नव्याने कोणते वादळ बातम्यांच्या जगात गाजते आहे? आणि त्यात तथ्य किती आहे? अशा विषयावर चर्चा करुयात.

'क्युरिओसिटी' रोव्हर ची सविस्तर माहिती व 'क्युरिओसिटी' रोव्हर चे कार्य यापुरताच हा धागा चर्चेसाठी ठेवूयात. चर्चेच्या अनुषंगाने येणार्‍या तांत्रिक बाबी ठीक आहेत, पण एखाद्या तांत्रिक बाबीवर सविस्तर चर्चा हवी असेल तर त्यासाठी वेगळा धागा काढला जावा असे मला वाटते. उदाहरणार्थ - रोव्हर मधील कॅमेरा कॅमकॉम कसा आहे, त्याची क्षमता किती आहे, ही चर्चा धाग्यावर योग्य आहे. पण अंतराळातील सर्व प्रकारचे कॅमेरे व त्यांची माहिती हा वेगळ्या धाग्याचा विषय व्हावा.

हा युट्युबवरील व्हिडिओ ज्यामध्ये २४ व्या सेकंदानंतरचे दृश्य पहा. ज्यात अगदी स्पष्टपणे एक पांढरा ठिपका क्षितिजावरुन जाताना व क्षितिजाच्या मध्यावर लुप्त होताना दिसतो आहे. http://www.youtube.com/watch?v=BSVAq-Znxmk

field_vote: 
2.333335
Your rating: None Average: 2.3 (3 votes)

प्रतिक्रिया

'क्युरिऑसिटी'ने पाहिलेला दुसरा दिवस, जो तुम्हीही तुमचा माऊस वापरून, ३६०°तून पाहू शकता.
(तबकड्या वगैरे विषयी माहीत नाही)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुव्याबद्दल धन्यवाद अमुकराव
नासाच्या क्युरिओसिटी रोव्हरचा तो फोटो बहुतेक मंगळावरील रात्री घेतला गेलेला असावा. या ३६० अंशाच्या कोनातून दिसणारे अर्थातच दिवसाचे दृष्य छान दिसते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेल असेल यू एफ ओ च असेल...

अवांतर : ही नासा मोठी आचरट संस्था असून ती पृथ्वीवरील सर्वसामान्यांना दर दोन चार वर्षांनी येडा बनवत असते असे आमचे वैयक्तिक मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अदिती यांनी, या विषयावर विस्ताराने लिहावे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"यू एफ ओ"चा इतिहास रंजक होता, त्यांचे भविष्यही उज्ज्वल दिसते आहे एकंदर!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यु एफ ओ म्हणजे Un Identified Object, मग ते काहीही असु शकते.
अवांतर - पण फारसं नाही: कालच मला घरात एक यु एफ ओ दिसलं...काय म्हणुन शोध घेतला तर लेकीने कागदाचे कपटे करुन घरभर टाकले होते त्यातलाच एक निघाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तांत्रिक दोष असावा असं मलाही वाटतं. या चित्रांची, चित्रफीतीची गुणवत्ता फार उच्च नाही. हवाईमधल्याएका टेलिस्कोपला जोडलेल्या उच्च गुणवतेच्या सीसीडीमधूनही leftover सिग्नल शिल्लक राहिल्यामुळे तिथून मिळणार्‍या इमेजेसमधे तांत्रिक दोष दिसतात. अशाच काही प्रकारचा दोष तेजस्वी वस्तूच्या आसपास येणं शक्य आहे.
ही वस्तू जर यू.एफ.ओ. असेल तर ती आकाशात अचानक गायब कशी झाली, तिचा मार्ग बदलला का तिच्याकडून येणारा प्रकाश अचानक गायब कसा झाला अशा प्रश्नांची उत्तरं देणं भाग आहे. फ्यांटसीची आवड अनेकांना असते पण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर त्यासाठी आधी शोधावी लागतील. फीतीमधले ठिपके यू.एफ.ओ. असतील असं मला वाटत नाही. तांत्रिक दोष हे स्पष्टीकरण आणि त्याचे पुरावे देणं "सोपं" आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तांत्रिक बाबींवरचे हे स्पष्टीकरण पटले.
वैज्ञानिक दृष्टीकोनातून अशा गोष्टींचे अगदी योग्य पद्धतीने पृथक्करण करता येते.
सहमत आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक स्थिरचित्र आहे ज्यात तीन ठिपके दिसतात. एक चलच्चित्र आहे ज्यात दोन ठिपके हलताना दिसतात - एक साधारण मध्यभागी खालून वर जातो, दुसरा क्षितिजाला समांतर (म्हणजे मध्यभागी) डावीकडून उजवीकडे जातो.
स्थिरचित्र - पुरेसे फिल्टर लावले की हव्या त्या चित्रातून हवं ते पहाता येतं. त्यामुळे कॅमेरातले डेड पिक्सेल असू शकणं सहज शक्य आहे. त्या पिक्सेलना जो 'आकार' आहे असं वाटतं ते केवळ वेगळ्या फाइल फॉर्मॅटमध्ये इमेज सेव्ह केल्यामुळे होऊ शकतं.

उदाहरणार्थ मी एक प्रयोग करून बघितला, जो तुम्हालाही सहज करता येईल.

- पेंटमध्ये एक नवीन फाइल उघडा. अगदी छोटी इमेज (५० पिक्सेल बाय ५० पिक्सेल) पुरेशी आहे.
- संपूर्ण फाईलमध्ये एकसंध काळा रंग भरा.
- पेन्सिल टूल वापरून फक्त एक पिक्सेल पांढरा करा.
- ती .bmp फॉर्मॅटमध्ये सेव्ह करा.
- आता तुमच्याकडे एक पांढरा पिक्सेल असलेली बाकी काळ्या रंगाची प्रतिमा तयार झाली. ही फाईल उघडून झूम केलंत तरी तुम्हाला एकच पांढरा पिक्सेल दिसेल.
- तीच प्रतिमा आता jpeg फॉर्मॅटमध्ये सेव्ह करा.
- आता तुमच्याकडे त्याच ठिपक्याच्या दोन प्रतिमा आहेत.
- जेपेग फाईल पिकासासारख्या एडिटरमध्ये उघडा.
- त्या पांढऱ्या ठिपक्यावर झूम इन केलं की तुमच्या लक्षात येईल की आजूबाजूला आसपास काही राखाडी ठिपके दिसत आहेत.
- आता या चित्राचा कॉंट्रास्ट वाढवा (पिकासात त्याला हायलाइट्स म्हणतात). मी त्याला इतर टिंट वगैरे फिल्टरदेखील लावले.
- तुम्हाला खालीलप्रमाणे चित्र दिसेल.

झाला की नाही एका पिक्सेलमधून एक गूढ आकार तयार? आता या आकाराला काहीतरी साधारण गोलाकार, भरीव दिसतंय असं म्हणू शकेल. कोणी लांबून दिसणारी पृथ्वी म्हणेल. किंवा कोणाला त्यात मानवाचा चेहेराही दडलेला दिसेल. याला आणखीन फिल्टर लावले, थोडं स्मूथ केलं की तो एकसंधही दिसू शकेल.

थोडक्यात आपण काय बघतो आहोत, हे दृष्टिकोनावर अवलंबून असतं. आपल्या नजरेवर पुरेसे चष्मे चढवले की काहीही कशासारखंही दिसू शकतं.

चलच्चित्र नक्की कसं तयार झालं याबाबत मला कल्पना नाही. माझा अंदाज असा की रात्रीच्या अंधारात प्रतिमा मिळवण्यासाठी अत्यंत हाय कॉंट्रास्ट असलेलं चित्र आहे. त्यामुळे चित्रातला नॉइज शतगुणित झालेला असावा. कॅमेराच्या आत, लेन्सच्या आसपास काही ठराविक हालचाली होत असतील तर त्याची बारीकशी प्रतिमा येणं शक्य आहे. किंवा आपण कधी सूर्याच्या आसपास कॅमेरा रोखून फोटो काढण्याचा प्रयत्न केला की असेच किरण, ठिपके आपल्यालाही दिसतात. या काही सेकंदात कॅमेराची अगदी बारीक हालचाल झाली असेल तर तो ठिपका फिरताना दिसणं सहज शक्य आहे. ही हालचाल रोव्हरची चाकं वाळूत हळूहळू रुतत गेल्यामुळेही होऊ शकेल.

अत्यंत अपुऱ्या माहितीवरून अनेक शेकडो शक्यता असतात. एका ठिपक्यातून कसलाच अर्थ लागत नाही. कसल्याही अस्तित्वाबाबत निष्कर्ष काढायचे असले तर यापेक्षा खूपच सबळ पुरावा लागतो. त्या पुराव्याला मनाला येईल तसे फिल्टर लावून सादर करून चालत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेशजी,

एकदम पटलं.
म्हणूनच मी आतापर्यंत यावर भाष्य केले नव्हते. तुमच्यासारख्या तज्ज्ञांच्याच प्रतिसादाच्या प्रतिक्षेत होतो.
धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राघा यांचं स्पष्टीकरण आवडलं. ज्यांनी फोटो घेतला ते खुद्द नासा या गोष्टीला तांत्रिक दोष म्हणत असताना बळंच त्यात अधिकचे अर्थ कशाला शोधायचे? नासाला युफोची शंका असती तर त्यांना तसं सांगण्यासाठी किंवा मौन बाळगण्यासाठी काहीच हरकत नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नील आर्मस्ट्राँग जसा नेवाडा वाळवंटात यानातून उतरल्यावर ते 'स्मॉल स्टेप- जायंट लीप' वगैरे बडबडला होता तसेच हे क्युरॉसिटी महाराष्ट्रातील जत-विजापूर पट्ट्यातील वैराण फुफाट्यात उतरून तिथले फोटो पाठवत आहे.
तो वरखाली हालणारा ठिपका म्हणजे कौंतेव-बाबलादच्या म्हमद्याने उडवलेला पतंग आहे आणि डावीकडून उजवीकडे सरकणारा ठिपका म्हणजे दूरवरून गेलेले बंगलुरू-मुंबई विमान आहे हे मी खात्रीने सांगू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते ठिपके म्हणजे बहुधा पृथ्वीवरून सूक्ष्मात मंगळावर गेलेली मडळीं असावीत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते ठिपके म्हणजे बहुधा पृथ्वीवरून सूक्ष्मात मंगळावर गेलेली मडळीं असावीत!

असू शकेल असू शकेल.
मागे एकदा मी प.वि. वर्तक हे व्यवसायाने डॉक्टर असलेल्या एका आध्यात्मिक महात्म्याचे पुस्तक वाचले होते. त्यात त्यांनी मंगळावर व्हायकिंग यान जायच्या आधी मंगळ ग्रहावरचे वर्णन त्यांनी करुन ठेवले होते. व्हायकिंगने पाठवलेल्या माहितीशी त्यांचे वर्णन तंतोतंत जुळले होते असे त्यांच्या पुस्तकात उल्लेख आहेत.

या विषयात रस असणार्‍यांना त्यांच्याबद्दलची ही व अधिकची माहिती बुकगंगा.कॉम येथे 'वास्तव रामायण' पुस्तकाची काही पाने वाचता येतील या पुस्तकात हे मंगळाचे उल्लेख आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0