पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया - माधव गाडगीळ

सुप्रसिध्द पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांची मुलाखत आज लोकसत्तानं छापली आहे. पश्चिम घाट अहवाल, विकासाच्या दिशा, एफडीआय, समाजातली वाढती विषमता, अणुउर्जा अशा अनेक विषयांवरची त्यांची मतं गाडगीळ त्यात मांडतात. संतुलित, माहितीपूर्ण आणि तरीही जीवनातला आनंद न हरवलेली रंजक मांडणी हे गाडगीळांचं वैशिष्ट्य आहे.
लेखी मुलाखतीचा दुवा
यूट्यूबवर मुलाखतीचे व्हिडिओ अंश पाह्ता येतील. मुलाखतीच्या लेखी वार्तांकनात न आलेल्या अनेक गोष्टी त्यात पाहता येतील. (एक अंश खाली एम्बेड केला आहे, पण यूट्यूबवर इतर अंश आहेत.)

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

यातील काहि थेट वक्तव्ये गाडगीळांच्या परखडपणाचीच साक्ष देतात जसे:

केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांचा त्यात सहभाग होता. पण ते बदलून जाताच मंत्रालयाने अचानक ठरविले, आमचा अहवाल दडपून ठेवायचा. नव्या मंत्री जयंती नटराजन यांना विनंती केली, की मी तुम्हाला भेटू इच्छितो, म्हणजे या अहवालात काय आहे ते सांगता येईल, नंतर तुम्ही काय तो निर्णय घ्या. मात्र, त्यांनी भेट नाकारली.

या भागात करवंदे पिकली आहेत का, याचा बाहेरच्या लोकांवर परिणाम होत नाही, कारण ते न्यूझीलंडमधील किवी खाऊ शकतात. म्हणून पश्चिम घाटातील लोकांचे या अहवालावर काय म्हणणे आहे हे महत्त्वाचे आहे. ते जाणून न घेता या अहवालावर नवी समिती नेमण्याची प्रक्रिया अर्थशून्य आहे.

या गाडङीळांच्या मताशी सहमत आहे.

मात्र मला सर्वाधिक मार्मिक काही वाटले असेल तर त्यांचे हे मतः Smile

वैयक्तिक येत नाही. भ्रष्टाचार कसा पोसला जातो, हे समजून घ्यायलाही मला ज्ञानानंद मिळतो. सरकारने दडपले, नाही दडपले, तरी मी मनावर घेत नाही. पण मी आशावादी आहे, कारण भारतात लोकशाही आहे. मी बोलतोय त्यासाठी चीनमध्ये मला कदाचित तुरुंगात टाकले असते.

एकूणच उत्तम वाचनीय मुलाखत आहे. इथे दिल्याबद्दल माहितगार यांचे आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!