सर्वोच्च

थोड्याफार यश प्राप्तीने एक मनुष्य हुरळून गेला.

त्याला झाली ' ग ' ची बाधा.

त्याची वर्तणूक आंतरबाह्य बदलली.

लोक त्याला मग टाळू लागले.

त्याने मनात विचार केला,

जग माझ्या यशावर जळू लागले.

हळू हळू तो संपूर्णपणे एकाकी झाला.

असंच कुठे तरी त्याने ऐकले.

' मनुष्य एकाकीच असतो यशाच्या सर्वोच्च शिखरावर '

आता त्याच्या मनात कुठलीही शंका उरली नाही त्याच्या सर्वोच्चते बद्दल.

त्याचा उर गर्वाने भरुन आला,

अन तो हर्षवायुने मरून गेला.

(समाप्त)

field_vote: 
1.5
Your rating: None Average: 1.5 (2 votes)

प्रतिक्रिया

यावरून विन्दा करन्दीकराञ्च्या एका अर्कलेखनाची आठवण झाली.
(शब्द नेमके आठवत नाहीत पण असे काहीसे आहेत -)
एका मनुष्याने एकदा
समुद्रात लघवी केली
आणि मग आयुष्यभर
समुद्राची उञ्ची किती वाढली
हे तो मोजीत बसला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'करन्दीकराञ्च्या' आणि 'उञ्ची'?

तुम्ही अलीकडे माधवरावांच्या प्रभावाखाली आहात काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माधवराव पटवर्धन कोण/काय आहेत ? माहीत नाही.

'ऐसी अक्षरे' वर मी कायम असेच विनाअनुस्वार (काही अपवाद वगळता) लिहीत आलो आहे. तसे लिहीण्यामागे एक साधे कारण आहे. सविस्तार साङ्गण्यास सध्या वेळ नाही. पण अगदी थोडक्यात साङ्गायचे तर स्वत:साठी केलेला एक प्रयोग आहे. वेळ मिळाल्यावर हवे तर व्यक्तिगत निरोपात साङ्गेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Clue:

'झेंडूची फुलें' मधील पुढील कविता ह्यांच्या कवितेवर बेतली आहे.

श्यामले-

[वृत्त : तुङ्गभद्रा मिथुनराशी, राक्षसगणी.}

तूं छोकरी, नहि सुन्दरी । मिष्कील बाल चिचुन्दरी,
काळा खडा मी फत्तरी । तूं काश्मिरांतिल गुल्-दरी!
पाताळिचा सैतान मी । अल्लाघरीची तूं परी,
तू मद्रदेशिय श्यामला । मी तो फकीर कलन्दरी!
मैदान मी थरपार्करी । तूं भूमि पिकाळ गुर्जरी,
अरबी समुद्रहि मी जरी । तू कुद्रतीरसनिर्झरी!
आषाढिचा अन्धार मी । तू फाल्गुनी मधुशर्वरी!
खग्रास चन्द्र मलीन मी । तूं कोर ताशिव सिल्व्हरी!
बेसूर राठ ’सुनीत’ मी । कविता चतुर्दश तूं खरी,
’हैदोस’ कर्कश मी जरी । ’अल्लाहु अक्बर’ तूं तरी!
माजूम मी, तूं याकुती । मी हिङ्ग काबुलि, तूं मिरी,
अन् भाङ्ग तूं, चण्डोल मी । गोडेल मी, तूं मोहरी!
मी तो पिठयांतिल बेवडा । व्हिस्कींतली तूं माधुरी,
काडेचिराइत मी कडू । तूं बालिका खडिसाखरी !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक माहितीबद्दल आभारी आहे.

याच सन्दर्भात, 'बेगमेचे शिवाजीस पत्र' आणि त्यास 'शिवाजीचे बेगमेस उत्तर' यान्बद्दलही उडतउडत ऐकलेले आहे, परन्तु अतिशय वरवरच्या, त्रोटक, अर्धवट आणि ऐकीव माहितीच्या आधारावर त्याबद्दल उडतउडत उल्लेखाव्यतिरिक्त अधिक काही लिहू इच्छीत नाही. आपणास याबद्दल काही अधिक, सविस्तर माहिती असल्यास ती तपशीलवार नमूद करून उपकृत करू शकाल काय?

आगाऊ धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0