साहित्यिकानाम् न भयं न लज्जा - उर्फ टोरंटोचा शिमगा

टोरंटो येथे भरू पाहाणारं विश्व साहित्य संमेलन भरेल असं काही दिसत नाही. त्या सगळ्या प्रकरणावरून मराठी साहित्यविश्वाला झोडपणारा एक खरपूस अग्रलेख 'लोकसत्ता'त आज आला आहे. साहित्यिक आणि राजकारणी, साहित्यिकांचं राजकारण आणि त्यांची 'रमण्यांची जनुकीय आवड' अशा अनेक बाबींचा समाचार त्यात घेतलेला आहे. या प्रकरणाबद्दल इथल्या साहित्यप्रेमी आणि इतर मंडळींना काय वाटतं?

field_vote: 
2.333335
Your rating: None Average: 2.3 (3 votes)

प्रतिक्रिया

अजून तरी मी रोज सकाळी ऑफिसला जातो. दिवसभर काम करतो. संध्याकाळी, रात्री वाचन करतो. फेसबुक, ऐसीअक्षरे येथे येतो, वाचतो, प्रतिसाद लिहितो. पूर्वी मद्यपान करायचो तेही सांप्रती अशक्य आहे असे वाटत नाही; पण मी करत नाही. रिक्षावाल्याच्या मीटरमधून होणारी फसवणूक तशीच आहे. बसची कटकट असतेच. वेळेवर जेवत असतो. वृत्तपत्रांचे वाचन सकाळी अर्ध्या तासात संपते आहे. वीजेचे बिल वाढले आहे. त्याविरुद्ध आंदोलन केले पाहिजे. पाऊस कमी असल्याने येत्या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असेल की शेतीचे पाणी तोडून मला पुण्यात पाणी भरपूर मिळेल याची एक चिंता मधूनच डोकावत असते. परवा खान्देशात काही तिथं शेतकरी चिंता व्यक्त करत होते. नागपुरात लक्ष्मणराव ढोबळे यांना मारहाणीचा प्रयत्न झाल्याचं मला लगोलग कळलं माझ्या मोबाईलवर. टीव्हीवर होतं का हे माहिती नाही. भारतानं टेस्ट आणि तो वर्ल्ड कप जिंकल्याचं मात्र टीव्हीवरूनही कळलं. लवासाला पंचवीस कोटी रुपयांचा दंड करून त्यांनी जमीन गिळण्याची प्रक्रिया सरकारनं नियमित केली. माधव गाडगीळ यांचा अहवाल गुंडाळण्याची तयारी सुरू आहे हे त्यांच्याच याच वृत्तपत्रातील मुलाखतीतून कळलं.
आता रात्रीचे साडेअकरा झाले आहेत. उद्या ऑफिस आहे. आता जावं लागेल. खरं तर अजून लिहायचं आहे. पण नको. झोप उडाली (माझीच) तर पंचाईत होईल.
कुठलं प्रकरण म्हणताय तुम्ही? साहित्यिकांना झोडलंय का? वा. हिंमत लागते राव त्यासाठी. ती दाखवली त्यांनी. साहित्यीकांना लाज नाही. पन्नास लाख रुपये मागतात. ऐन दुष्काळात. तरी, मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण पंचवीस लाख रुपये देतो म्हणाले आहेत त्यावर टीका केलेली दिसत नाही. ते बरोबर आहे म्हणा. पृथ्विराज चव्हाण पूर्वी बसमधून कसा प्रवास करायचे हे याच वृत्तपत्रात मी वाचलं होतं. हे पंचवीस लाखही कुणाच्या खिशातून येणार आहेत हे माहिती नाही राव. नाही तर त्यावरही मला काही तरी मत व्यक्त करता आलं असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मागणी तसा पुरवठा असे अग्रलेख वाचणारी लोक आहेत म्हणून असे अग्रलेख लिहले जात असावेत. किंबहुना त्यांनी असेच लिहण्यात व वाचणार्‍यांनी असेच वाचण्यात लिहण्यार्‍याचे व वाचणार्‍याचे हित असावे. असो.

बादवे श्रामो तुम्ही "द न्युजरूम" मालीका बघता का हो? नसल्यास जरुर बघा. अन्य कोणी बघते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पंचवीस लाख ही रक्कम फार नाही, पण महाराष्ट्रातल्या करदात्यांनी भरलेले पैसे अगोदरच मजबूत असणार्‍या कनेडीयन अर्थव्यवस्थेवर का खर्च व्हावेत?

मुळात मराठी साहित्य संमेलनं भारताबाहेर भरवण्यामागचं कारण काय? तेवढ्यासाठी भारतातून विमानं भरभरून लोकं येत असतील तर मग हेच सगळं कमी उठाठेवी करून भारतातच का करत नाहीत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखाची भाषा जळजळीत आणि टाळ्याघेऊ आहे खरी. त्यात सर्वच साहित्यिक म्हणवणाऱ्यांना टुकार, भिकार, वेगवेगळ्या पुढाऱ्यांचे पित्त्ये वगैरे विशेषणं मुक्तहस्ताने वापरलेली आहेत.

मुख्य प्रश्न असा - की त्या कॅनडामध्ये किंवा अमेरिकेत कडमडत जाऊन कशाला भरवावी साहित्य सम्मेलनं?

या प्रश्नाचं एक उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

जगात काही दशकांपूर्वी सुमारे ६००० भाषा/बोली होत्या. त्या येत्या काही वर्षांत ३००० वर येतील असा तज्ञांचा अंदाज आहे. आणि जसा काळ पुढे जाईल तसतशी जगाची लोकसंख्या मूठभर भाषांमध्ये वाटली जाईल. मराठी भाषा ही संख्येच्या दृष्टीने सुमारे पंधरावी भाषा आहे. तिच्या समृद्धीसाठी, प्रसारासाठी काही खर्च करणं आवश्यक आहे. नाहीतर तिची पीछेहाट होत जाऊन काही शतकात ती नामशेष भाषांमध्ये जाऊ शकेल.

आता हा खर्च नक्की कुठे करावा? हा प्रश्न करदात्यांचे प्रतिनिधी म्हणून सरकारला कायमच करावा लागतो. सध्याचं विश्व हे ग्लोबल आहे. कॅनडा, अमेरिका इथे स्थायिक झालेले अनेक मराठी लोक आहेत. मराठी साहित्यात नवे प्रवाह काय चालू आहेत, नवीन पुस्तकं कुठची आहेत याविषयी त्यांना माहिती देण्यात फायदा आहे. साहित्य सम्मेलनाच्या निमित्ताने अनेक लोक एकत्र येतात. दूरच्या देशात मराठी संस्कृती जिवंत रहायला मदत होते.

या दृष्टिकोनातून कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला सहाय्य करणं महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीने लॉंग टर्म फायद्याचं आहे. या सम्मेलनांत अनेक पुस्तकं विकत घेतली जातात. प्रकाशकांचा प्रचंड फायदा होतो. त्यामुळे त्यांना एरवी न खपणारी पण कलात्मक किंवा वैचारिक पुस्तकं छापणं परवडू शकतं. यातून मराठी भाषेत अभिजात साहित्य निर्मितीची शक्यता वाढते.

आता हा फायदा किती, आणि त्यासाठी करदात्यांनी किती खर्च करावा याबाबत वाद घालता येतो. मला वाटतं तशा वाटाघाटी चालूही आहेत. कदाचित सरकार, समिती आणि प्रकाशक यांनी एकत्रितपणे आपापला वाटा उचलला तर ५० लाखांची सोय होऊ शकेलही. पण या सगळ्याचा सम्यक विचार करण्याऐवजी या सगळ्याच गोष्टींना टुकार, पैशाची व परदेशवारीची लालूच असं म्हणून बोळवण करणं एकांगी वाटतं. प्रकाशनव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग असलेल्या वृत्तपत्राच्या संपादकाकडून येणं आणखीनच चिंताजनक आहे. त्यांच्याकडून टाळ्याघेऊ विधानांपेक्षा जनतेला काहीतरी शिकवण्याची अपेक्षा असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठी भाषा बोलणारे लोक जगभर (विखुरलेले? पसरलेले? - दोन्ही शब्दांचे अर्थ तिरकसही होऊ शकतात म्हणून ते टाळते ) आहेत हा भाग वेगळा. पण त्यामुळे मराठी काही 'जागतिक भाषा' बनत नाही. इथं महाराष्ट्रात ती नामशेष होऊ घातली आहे अशी भीती व्यक्त होत असताना (ती निराधार असेलही!) परदेशात जाऊन संमेलनं घेऊन भाषा कशी तगणार हे काही कळत नाही मला. आता ऑनलाईन पुस्तक खरेदीची शक्यता वाढलेली असताना केवळ पुस्तकं विकली जावीत म्हणून दूरदेशी संमेलन भरवण्यात फारसा काही मुद्दा नाही माझ्या मते. गेल्या काही वर्षांत मराठीत प्रकाशित झालेल्या (आणि विकल्या गेलेल्या) पुस्तकांत मू़ळ मराठीत लिहिलेली पुस्तकं किती आणि इतर (मुख्यत्वे इंग्रजी) भाषेतल्या पुस्तकांचे अनुवाद किती अशी आकडेवारी एकदा पाहायला हवी.

मराठी भाषा संख्येच्या दृष्टीने पंधरावी आहे ही माहिती वरती राजेश घासकडवी यांनी दिली आहे. आपली लोकसंख्या इतकी जास्त आहे की जगात ब-याच बाबतींत आपण पहिले आहोत!! मला म्हणायचे इतकेच आहे की केवळ जास्त लोक एखादी भाषा बोलतात म्हणून ती जागतिक भाषा होईलच असे नाही. एखादी भाषा जागतिक होण्यासाठी ती बोलणा-या लोकांची संख्या अधिक असणे गरजेचे आहे पण तितकेच पुरेसे नाही.

मराठी भाषा ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची आणि पर्यायाने अभिव्यक्तीची जागतिक भाषा व्हावी हे स्वप्न चांगले आहे. पण वास्तवात तसे होण्याची शक्यता सध्या तरी कमी दिसते आहे. निदान ती "आपल्या जगात" आपण वापरली, टिकवली आणि वाढवली - तरी खूप झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विश्व साहित्य संमेलन करायला हरकत नाही आणि २५-५० लाख रुपये म्हणजे सरकारसाठी फार नाही. पण अशी सम्मेलने होऊन भाषावृद्धी किंवा विकास होतो असे समजण्याचे कारण नाही असे वाटते.
गेल्यावर्षी सिंगापुरात विमसासंमेलन झाले. महेश एलकुंचवार, मंगला गोडबोले, विश्वास पाटील, दत्ता हलसगीकर, माधवी वैद्य इत्यादी अनेक ख्यातनाम लोकांनी हजेरी लावली. सिंगापुरातल्या मराठी जनांनीही बरीच उपस्थिती दाखवली पण परिसंवाद, मुलाखत, कथाकथन आणि काव्यवाचन या प्रकारांमध्ये भाग घेणार्‍यांचे आणि श्रोते-प्रेक्षकांचे सरासरी वय बहुतेक ३०-३५च्या वर असावे. तरूण म्हणजे अगदी सोळा-सतरा वर्षांची मुले सोडून द्या पण विशी-पंचविशीतले लोकही अजिबात आले नाहीत.
अजून शाळेत असलेल्या मुलांना तर 'हायर' मराठी फारसं समजतच नाही तर संमेलनाला हजर राहण्याचा प्रश्नच येत नाही.
महाराष्ट्र मंडळात ऋतुगंध नावाचे द्वैमासिक चालवले जाते आणि त्यात प्रथेप्रमाणे बालविभाग असतो. या बालविभागासाठी 'साहित्य' गोळा करायला कोण कष्ट पडतात. मुले मराठीत लिहीत नाहीत म्हणून इंग्रजीत त्यांचे लेखन मागवून मंडळाचा एखादा सभासद ते मराठीत भाषांतर करून शेवटी ते छापायचे असे ठरवावे लागले.
इतर भाषिकांच्या आग्रहाने हिंदी, पंजाबी आणि बंगाली भाषांचा समावेश अभ्यासक्रमात दुय्यम भाषा म्हणून करण्यास सिंगापूर सरकारने परवानगी दिली आहे. तमिळ तर इथल्या चार प्रमुख भाषांपैकी एक आहेच. पण मराठीला असा अधिकृत दर्जा मिळण्याची सुतराम शक्यता नाही कारण संमेलन म्हणजे तेच ते आणि तेच ते उगाळत बसणे एवढेच लोकांना कळते. ज्या ज्या देशात विश्वसंमेलन होईल त्या त्या देशात मराठीसाठी सरकार दरबारी काही करणे हे होत नाही.
शिवाय निवडक चांगल्या लोकांव्यतिरिक्त इतर 'साहित्यिकांच्या' 'साहित्याचा' दर्जा पाहून या अग्रलेखात म्हटलेले सगळेच काही चुकीचे नाही असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी अशाच स्वरूपाचा माझा, मी रहातो तेथील, सुमारे २० + वर्षांचा अनुभव आहे. अनेक वर्षांपूर्वी मी व साहित्याची उत्तम जाण असलेले आणि उत्साही असे, आमचे तत्कालिन मंडळाध्यक्ष ह्यांनी मिळून एका तळ्याकाठच्या कार्यक्रमात जी. एंच्या 'चंद्रावळ'चे वाचन केले होते. तेव्हा खरे तर बर्‍यापैकी प्रौढ सभासद मंडळात अधिकांश होते, पण ह्या वाचनाचा संपूर्ण बोर्‍या ऊडाला. एक बाई समोरच बसून पायावर चढणार्‍या मुंग्यांना मारत होत्या, सर्व 'हे एकदा कधी संपते' ह्याची आतुरतेने वाट पहात होते. नंतर कुणीतरी हे कथावाचन अशा प्रकारच्या कार्यक्रमात कसे अप्रस्तुत होते, ह्यावर मला चांगल्या शब्दांत समज दिली. अलिकडे तेंडुलकर गेले त्यावर्षी निमीत्त साधून 'पाहिजे जातीचे' बसवावे असा प्रस्ताव मी मांडला. अगदी धडपड करून एकदोन प्रति मिळवल्या, त्यातील एक प्रत एका संबंधित व्यक्तिने वाचावयास म्हणून नेली ती आजतागायत मला मिळालेली नाहीच, पण त्याविषयी त्या व्यक्तिने, तसेच इतर संबंधितांपैकी कुणीही चकार शब्दही काढला नाही. दरवर्षीप्रमाणे कुठलेतरी 'इयत्ता चौथी' दर्जाचे, स्वरचित नाट्क तेव्हाही सादर झाले. दहाएक वर्षांपूर्वी, मराठी जगताच्या साहित्य, कला, क्रीडा, संगीत अशा विवीध अंगांचा परामर्ष घेणार्‍या एका स्पर्धेचा अनुभव असाच विदारक होता. 'पिपात ओले' चा कवि कोण, 'ह्या नभाने, ह्या भुईला दान द्यावे' चा कवि कोण... अशा सर्व प्रश्नांवर स्पर्धक अत्यंत आंबट चेहरा करीत ('हे काय बाबा नवीनच, कधीच ऐकले नाही कधी!') नाही म्हणायला एक चलाख तरूणी अशा सर्व कवितांचे जनकत्व कुसुमाग्रजांकडे देऊन मोकळी होई! चार पाच वर्षांपूर्वी अशाच एका कार्यक्रमात (---मी आयोजिला नाही, तो नाद मी केव्हाच सोडून दिला--) 'संगीत स्ययंवर' चे लेखक कोण, ह्या प्रश्नाचे उत्तर अगदी हात वर करून, एका तरूणाने 'बाल गंधर्व' असे दिले होते. हे माझे अनुभव परदेशातील मराठी समाजाचे प्रातिनिधीक असावेत, खरे तर, आम्ही भौगोलिक दृष्ट्या, अमेरिकेच्या तुलनेने, भारताच्या बरेच जवळ आहोत, तेव्हा मंडळींची अनेक छोट्यामोठ्या वैयक्तिक कारणांने ये- जा होत असते. आता तर जालामुळे सर्वच विश्व छोटे झाले आहे. तरीही ही परिस्थिती आहे व ती अत्यंत निराशाजनक आहे.

ह्या माझ्या अनुभवांच्या पाश्वभूमिवर राजेश घासकडवींचा खुलासा आश्चर्यकारक वाटला-- इतका, की ते व मी बहुधा विभिन्न ग्रहांवर वास्तव्य करतो आहोत की काय, असा प्रश्न मनात यावा!

या सम्मेलनांत अनेक पुस्तकं विकत घेतली जातात. प्रकाशकांचा प्रचंड फायदा होतो. त्यामुळे त्यांना एरवी न खपणारी पण कलात्मक किंवा वैचारिक पुस्तकं छापणं परवडू शकतं. यातून मराठी भाषेत अभिजात साहित्य निर्मितीची शक्यता वाढते.

हे छान आहे, पण सुमारे दहा वर्षांपूर्वी, मुंबईतील टिळक ब्रिजच्या खाली 'मॅजेस्टिक'चे दुकान चालवणारे अनिल कोठावळे ह्यांच्याशी झालेला माझा संवाद मला आठवला. त्यावेळी अमेरिकेतील पहिले 'बृहन महाराष्ट्र अधिवेशन' नुकतेच पार पडले होते. तिथला त्यांचा तसेच इतर प्रकाशक/ पुस्तक विक्रेत्या स्टॉल्सवरील अनुभव ते सांगत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या सार्‍यांनी भरभरून पुस्तके नेली होती, त्यातील ९५ % खपलीच नाहीत. तेव्हा उरलेली परत आणण्याचा भुर्दंड सोसण्यापेक्षा त्यांनी ती तेथेच फुकटात वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या माझ्या अनुभवांच्या पाश्वभूमिवर राजेश घासकडवींचा खुलासा आश्चर्यकारक वाटला-- इतका, की ते व मी बहुधा विभिन्न ग्रहांवर वास्तव्य करतो आहोत की काय, असा प्रश्न मनात यावा!

त्या अग्रलेखातून साहित्य संमेलनाच्या कल्पनेला, त्यावर खर्च करण्याच्या कल्पनेला कडाडून विरोध केला होता. तसं करताना संभाव्य फायद्यांचा शून्य विचार केलेला दिसला. ते काय असू शकतील एवढंच मी मांडलं. ते नेहमीच पैशामध्ये मोजता येतात असंही नाही. पण म्हणून ते नसतातच असं नाही. हे फायदे पन्नास लाख रुपये किमतीचे नाहीत असं मुद्देसूदपणे मांडलेलं मला व्यक्तिशः आवडलं असतं. तसं काहीच नसल्याने एकांगी वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परदेशातच नाही, तर देशात भरणार्‍या साहित्य संमेलनांवरही काही प्रमुख साहित्यिकांनी टीका केलेली आहे. विंदा, पाडगावकर अशा काहींनी संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीला उभं राहायला नकार दिला होता. अग्रलेखावरच्या प्रतिसादांमध्ये काही जणांनी पु.लं.च्या दानशूरतेशी सध्याच्या साहित्यिकांची जी तुलना केली आहे, किंवा दुर्गा भागवतांनी सत्ताधीशांवर केलेल्या टीकेचं स्मरण केलं आहे ते अगदीच अस्थानी वाटत नाही. मराठी साहित्य परिषदेसारख्या संस्थेत सध्या जे पदाधिकारी आहेत त्यांची नावं पाहिली तर त्यामागे राजकारण जास्त अन् साहित्यकारण कमी हे लक्षात येतं. त्यामुळे एकंदर साहित्यविश्वाविषयी काही प्रमाणात उपहासात्मक टिप्पणी होणं अपरिहार्य वाटतं.

जो कोणी सत्ताधीश असेल त्याच्या आडोशास राहावे, एखाद्या पुस्तकाच्या पुण्याईवर लेखक म्हणून मिरवत जमल्यास एखादे घर, तेवढे न झेपल्यास साहित्य संस्कृती महामंडळ, विश्वकोश किंवा मराठी संवर्धनासाठीच्या एखाद्या संस्थेत सदस्यत्व मिळवावे आणि रेल्वेने दुसऱ्या वर्गात ये-जा करून टॅक्सीचे बिल लावण्याचा तिसऱ्या दर्जाचा शूरपणा करावा हा अनेक साहित्यिकांचा मुख्य व्यवसाय. एखाद्या संपादकास हाताशी धरून वर्तमानपत्रीय स्तंभ मिळवावा आणि तो छापूनही येत नाही तोच त्या स्तंभाचे पुस्तक करण्यासाठी पुन्हा फिल्डिंग लावण्यास सुरुवात करावी, हे यांचे साहित्यविश्व. या पुस्तकास पुन्हा एका संपादकाची प्रस्तावना घ्यावी आणि दुसऱ्याच्या अध्यक्षतेखाली तिसऱ्याच्या हस्ते प्रकाशन करावे. म्हणजे पूर्वप्रसिद्धीचीही मोफत सोय आणि किमान एक आवृत्ती तरी सहीसलामत सुटण्याची हमी. जे जे मोफत ते ते पौष्टिक हे यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान.

हे वर्णन आज अनेक साहित्यिकांना शोभतं ही खेदजनक वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

संमेलनादरम्यान होणार्‍या पुस्तकविक्रीचं म्हणायचं तर महाराष्ट्रात भरणार्‍या संमेलनांच्या वेळी कुणाला किती स्टॉल दिले यावरून प्रमुख प्रकाशकांची 'तू तू मै मै' वृत्तपत्रांत सार्वजनिकरीत्या गाजते हा गेल्या काही वर्षांतला अनुभव आहे. त्यात एखाद्या साहित्यिकाच्या सगळ्या पुस्तकांचे हक्क विकत घेताना प्रकाशक काय करतात वगैरेंविषयीच्या तक्रारी अधूनमधून वृत्तपत्रांमध्ये येत असतातच. थोडक्यात, साहित्यविश्वाचं मोठ्या प्रमाणावर व्यापारीकरण झालेलं आहे असं चित्र सामान्य वाचकासमोर आज उभं राहतं. असं असताना अशा उपक्रमांना सरकारी मदत मिळावी का हा प्रश्न मनात उभा राहतोच. मग त्यापेक्षा परदेशात जिथे संमेलन भरवायचं असेल तिथल्या लोकांनी आपापल्या क्षमतेनुसार पैसे उभे करावेत आणि छोट्या पातळीवर का होईना, पण संमेलन भरवावं ही मागणी अवाजवी वाटत नाही.

अभय पाटील यांनी २००९च्या कॅलिफोर्निया संमेलनाच्या वेळी लिहिलेला 'बोलाचे साहित्य बोलाचेच विश्व, रंकाचे धन आणि रावांचे कवित्व' हा लेख या संदर्भात रोचक वाटू शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अभय पाटील यांचा लेख आवडला. विशेषतः महाराष्ट्र फाऊंडेशन, कॅनडातली महाराष्ट्र सेवा समिती, कॅलिफोर्निया आर्टस् असोसिएशन अशा उदाहरणांमुळे परस्परविरोध उठून दिसतो.

व्यावहारिक प्रश्न विचारायचा असेल तर अमेरिकेत्/कॅन्डात कर भरणार्‍यांनी आयोजित केलेल्या एखाद्या कार्यक्रमाला महाराष्ट्र सरकारने पैसा पुरवावा एवढं थोर किंवा सामाजिक कार्य इथे होतं का? अमेरिकेत करदात्यांच्या पैशांबद्दल एवढी जागरूकता आहे तर महाराष्ट्रात का नसावी असाही उलट प्रश्न विचारता येईल.

या सर्व प्रकारात साहित्यिक आणि/किंवा साहित्य मंडळाची भूमिका काय आहे? ती कुठेच कानावर आलेली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या पार्श्वभूमीवर हे / हे रोचक वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

भारताबाहेर सम्मेलन होत आहे ह्यावर एवढा आग्यामोहोळ उठण्याचे कारण काय ? सम्मेलने फक्त ईचलकरंजी,नाशिक्,परभणीलाच झाली पाहिजेत असा नियम आहे की काय?
मराटी लोकांची संख्या कॅनडा,अमेरिकेत लक्षणिय आहे असे शिरिष नेहमी म्हणतो. साहित्याचा दर्जा बंगाली,तामिळ,हिंदी एवढा नसला तरी बर्‍यापैकी आहे असे म्हंटले जाते.सम्मेलनानिमित्त पाच्,पन्नास एन.आर.आय. डोकी एकत्र येत असतील,थोडी फार पुस्तके घेत असतील तर एवढा आ़क्षेप घ्यायचे कारण असू नये असे ह्यांनाही वाटते.
(देशाची सीमा कधीही न ओलांडलेली)रमाबाई

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजच्या लोकसत्ताच्या लोकमानस विभागामध्ये दोन पत्रं आहेत. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांचं पत्र त्यापैकी एक आहे. त्यात अर्थात अग्रलेखाविषयी नाराजी आहे. 'साहित्यिक मंडळी साहित्य संस्थांना फार वेळ देऊ शकत नाहीत, तेव्हा संस्थात्मक कार्य करणाऱ्यांनाही न्याय मिळायला हवा.' या त्यांच्या युक्तिवादातून संमेलनाच्या परदेशवारीचं साहित्यकारण कितपत आहे त्याचा सूज्ञांना अंदाज येऊ शकेल. त्याबरोबर औरंगाबादच्या श्रीकांत उमरीकर यांचं पत्रही लोकसत्तानं छापलं आहे. परभणीचं संमेलन, मराठवाडा साहित्य परिषद वगैरेंचे त्यांचे बोलके आणि प्रातिनिधिक म्हणता येतील असे अनुभव त्यात त्यांनी दिले आहेत. साहित्याच्या राजकारणाचा अंदाज येण्यासाठी ते मुळातूनच वाचण्यासारखे आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--
माहितगार

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars