द ईनसायडर

"Where’s the Beef” सरकारच्या पुराव्याकडे बोट दाखवत अ‍ॅडवोकेट गॅरी नफ्तालीसने प्रश्न केला
मात्र सरकारी वकील रीड ब्रोस्कीयाला आपण सादर केलेले पुरावे आरोपीला गजाआड करण्यास समर्थ आहेत असा ठाम विश्वास होता.

शेवटी १५ जून २०१२च्या ज्यूरीच्या निर्णयाने तो विश्वास सार्थ ठरवला.

गोल्डमन सॅचचे संचालक रजत गुप्ताना गॅलन हेज फंडचे मॅनेजर राजरत्नमना कंपनीची अंतर्गत गुपितांची माहिती पुरवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं.
*****************************************************************

रजत गुप्ता वॉलस्ट्रीटवरील प्रतिष्ठित व्यक्तीमत्वापैकी एक्.कोलकातामधील व्यवसायाने पत्रकार असण्यार्या प्राण कुमार गुप्ता आणि अश्विनी गुप्तांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. पुढे हे कुंटूब दिल्लीला स्थलांतरीत झालं. सोळा वर्षाचे असतानाच वडीलाम्चा मृत्यू झाला.दोन वर्षानी मातृछत्र हरपलं. पोरक्या झालेल्या रजत आणि त्यांच्या भावडांनी "स्वतच जीवन जगण्याचा " निर्णय घेतला.

दिल्लीच्या मॉर्ड्न हायस्कूलचे विद्यार्थी असलेले गुप्ता आयआयटीच्या प्रवेशपरीक्षेत १५वे आले.मेकॅनिकल ईजिनीअरींग पूर्ण केल्यानंतर आयटीसीमधील नोकरीची संधी नाकारून हावर्ड बिझिनेस स्कूलमध्ये एमबीएसाठी प्रवेश घेतला.
उक्तृष्ट अशी शैक्षणिक पार्श्वभूमी लाभल्यामुळे गुप्ताना मॅककिन्से, प्रॉक्टर अ‍ॅन्ड गॅम्बल,हार्मन ईन्टरनॅशनल्,सिम्फनी टेकनॉलॉजी, अमेरिकन एअरलाईन्स्,गिनपॅक्ट अशा मोठ्या कंपनीत काम करण्याची संधी मिळाली.
अशा प्रतिष्टित माणसावर ईनसायडर ट्रेडिंगचा आरोप करण्यात आल्याने अमेरिकन उद्योग जगतात एकच खळबळ ऊडाली.
***************************************************************

२००८ मंदीच्या पार्श्वभूमीवर गोल्डमन सॅचच्या संचालक मंडळाची बैठक सुरू होती. या बैठकीत प्रसिध्द गुंतवणूकदार वॉरेन बफेट गोल्ड्मन सॅचमधे ५ बिलियन डॉलर्सची गूंतवणूक करेल अस जाहीर करण्यात आलं. तसच Vavochio ही कर्मिशिअल बँक तसच एआयजी हा ईन्शुरस गृप विकत घेण्याबद्द्लही चर्चा करण्यात आली.
बैठक संपताक्षणीच गॅलन हेज फंडाद्वारे गोल्डमन स्टॉकच्या ४३ मिलियन डॉलर्सची खरेदी करण्यात आली. ही खरेदी ट्रेडिंग डे संपायला ३ मिनीटे शिल्लक असतानाच करण्यात आली हे विशेष. या उलाढालीद्वारे गॅलनने मोठा नफा कमवला.

एवढी मोठी खरेदी एकाच दिवशी तिही ३ मिनीटे शिल्लक असताना करण्यात आल्याने भुवया ऊंचावल्या गेल्या. आणि या प्रकाराची चोकशी सुरू झाली. १ मार्चला SEC ने रजत गुप्तांवर ईनसायडर ट्रेडिंग केल्याबद्द्ल दिवानी तक्रार दाखल केली.या तक्रारीला आधार होता गुप्ता आणि राजरत्नम यांच्या टेलिफोनिक संभाषणाचा. ह्यालाच पुढे वायरटेप्स स्यूट असही म्हटलं गेलं. संचालक मंडळाच्या बैठकीनंतर मिनीटभराने गुप्ता आणि राजरत्नम यांच्यात बोलणं झालं. या बोलण्यात बैठकीत घेतल्या गेलेल्या निर्णयाचा स्पष्ट ऊलेख्ख होता. या फोनकॉलनंतरच राजरत्नमच्या हेज फंडाने गोल्ड्मनच्या स्टॉकची खरेदी केली हे ऊघड झालं. आणि हीच कृती गुप्तांना ईनसायडर ट्रेडर आरोपी ठरवण्यात महत्वाची ठरली.
**************************************************************************

अपेक्षेप्रमाणे गुप्तांनी ईनसायडर ट्रेडिगचा आरोप फेटाळला. मॅनहॅटन कोर्टात खटला चालू झाल्यावर गुप्ता आणि त्यांच्या वकीलांचा मुख्य आक्षेप वायरटेप ( ही पध्द्त सामन्यतः माफिया केसेसमध्ये वापरली जाते) हा पुरावा वापरण्यावर होता.पण न्यायमूर्ती जेड राकोफ यांनी आक्षेप फेटाळून लावत टेप्स वाजवण्यास परवानगी दिली. राजरत्नमचेही कॉल रेकॉर्ड करण्यात आले होते. त्या कॉलमध्ये राजरत्नम आपल्या सहकार्याला गोल्डमनच्या संचालकाकडून एक चांगली माहिती मिळालीय अस बोलल्याचही स्पष्ट झालं.पुढे गोल्डमॅनचे सीईओ लॉईड ब्लँकफेन यानीही त्यांच्या कोर्टापुढील जबाबात गुप्तांनी महत्वाची म्हणजेच Price Sensitive Informantion गॅलनला पुरवत असल्याचा आरोप केला.
**************************************************************************

प्रत्युतरादाखल गुप्तांच्या वकीलांनी खालील मुद्दे मांडले.

१) सर्वात महत्वाचा आक्षेप वायरटेप्स हा पुरावा म्हणून वापरण्यावर होता.

२) राजरत्नम यांना माहिती देण्याच्या ईनसायडर ट्रेडिंगच्या गुन्ह्यात फक्त गुप्तानांच बळीचा बकरा बनवण्यात आलं.गोल्डमॅनचे ईतर कर्मचारीही ऊदा. डेव्हिड लोब हे ही अशाच प्रकारच्या गुन्ह्यात सामील आहेत. त्यांनाही एफबीआयने आरोपी केलं आहे. अस असतानाही फक्त गुप्तानांच टार्गेट केल जात आहे.

३) गुप्तांनी यासगळ्यामधून कोणताही वैयक्तिक फायदा ऊपटलेला नाही.

४) सरकार पक्षाचे पुरावे हे फक्त परीस्थितीजन्य आहेत. ह्याला भक्कम पुरावा याला म्हणता येणार नाही.

५) गुप्ता हे फक्त बिझिनेस मांईडेड नसून अनेक परोपकारी काम त्यांनी केलेली आहेत्.उदा. हैदराबाद येथील बिझिनेस स्कूल्,एडसवरील काम,तसेच त्यांच्यातील दानशूर वृत्ती.

६) गुप्ता हे वंशवादाचे बळी आहेत.
************************************************************************

मात्र मॅनहॅटन कोर्टाने आक्षेप फेटाळून लावत सरकार पक्षाच म्हणणं मान्य केलं. सर्व साक्षीपुरावे सादर झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांच्या कालवधीत गुप्तां ईनसायडर ट्रेडिंगच्या खटल्यात दोषी ठरले.

गुप्तांच्या विरोधात गेलेले मुद्दे
------------------
१) वर म्हटल्याप्रमाणे वायरटेप्स हा महत्वाचा पुरावा ठरला.

२) डेव्हिड लोब प्रकरणाचा आणि या केसचा अर्थाअर्थी सबंध नाही.

३)गुप्तांचा जरी शेअर खरेदी करण्यात सहभाग नसला तरी वोयाजर मधील त्यांचा स्टेकमधून त्यांना फायदा झाल्याचे स्पष्ट झालं.

४) गुप्तांना दोषी ठरवण्यात त्यांची एकदरीत वर्तणूकही कारणीभूत ठरली. सरकार पक्षाने गुप्ता राजरत्नममध्ये वारंवार गुप्ता डायरेक्टर असलेल्या कंपन्याबाबतीत चर्चा होत असे याकडे लक्ष वेधले.

५) वंशवादाचा मुद्दा कोर्टाने अमान्य केला.
**************************************************************************

गोल्डमॅन सॅच मधील गुन्ह्याबरोबरच गुप्तांना ईतरही कंपन्यामधील ईनसायडर ट्रेडिंगच्या गुन्ह्याबाबत दोषी ठरवण्यात आलं. यात प्रॉक्टर अ‍ॅन्ड गॅम्बलमधील गुन्ह्याचा समावेष होता. त्यांच्यावरील ६ आरोपापैकी ३ सिक्युरीटी फ्रॉड तसेच १ कट केल्याच्या आरोप सिध्द झाले. दोन आरोप सिध्द होऊ शकले नाहीत. निर्णय जाहीर होताच गुप्तांच्या पत्नी तसच त्यांच्या ४ मुलीना रडू आवरल नाही. पण गुप्तांचा चेहरा भावनाशून्य होता.
यूएस कॉर्पोरेट जगतामध्ये या खटल्याचे पडसाद ऊमटले. हा निकाल गोल्डमन सॅचबरोबरच अमेरिकन सरकार तसेच या खटल्याच काम पाहण्यार्या भारतीय वंशाचे अ‍ॅटर्नी जनरल प्रीत भरारा यांच्यासाठीही महत्वाचा ठरला.
**************************************************************************
ऊद्योग जगतात खळबळ माजवण्यार्या या खटल्यातील आरोपी ६३ वर्षीय रजत गुप्ता सध्या जामिनावर आहेत. मॅनहॅटन कोर्टाने शिक्षेसाठी १८ ऑक्टोबर ही तारीख ठरवली असून वरील गुन्ह्यासाठी त्यांना २५ वर्षाची शिक्षा होऊ शकते.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (5 votes)

प्रतिक्रिया

चांगला जमलाय. बर्‍याच शंकांची उत्तरं मिळाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माहितीपूर्ण लेख आहे. "वंशवादाचा बळी" ठरण्याचा आरोप नेहमी होतो का अशा केसेसमध्ये हे जाणून घ्यायला आवडेल. या खटल्याचे यूएस कार्पोरेट जगतामध्ये जसे पडसाद उमटले तसे पडसाद भारतीय कार्पोरेट जगातही उमटले आहेत का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख माहितीपूर्ण आहे हे तर दिसत आहेच. त्यातही अगदी शून्यातून प्रवास केलेल्या एका व्यक्तीच्या करीअरला शेवटी शेवटी असा डाग लागावा [प्रत्यक्ष त्याना त्या माहिती टिपमधून आर्थिक फायदा किती झाला वा होऊ शकला असता हेही संदिग्धच आहे] ही फार दुर्दैवी गोष्ट. लेखात गुप्ता याना आक्टोबर २०१२ च्या सुमारास शिक्षा होऊ शकेल असे म्हटले आहे, पण या व्यवहारातील दुसरी व्यक्ती राज राजरत्नम यानाही ज्यूरी दोषी ठरवितील की त्यांच्यावरही स्वतंत्र खटला नंतर उभा राहू शकतो ?

माझ्या वाचनात असे आले होते की, राजरत्नम अशाच एका आरोपाखाली या क्षणी अमेरिकेत ११ वर्षाची शिक्षा भोगत आहेतच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय सर
यू आर राईट
राजरत्नमला 11 वर्षाची शिक्षा या गुन्ह्यामुळे झाली आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

अत्यंत तपशील वार आणि त्रयस्थ दृष्टिकोनातून दिलेली माहिती.
त्रयस्थतेमुळे / वस्तुनिष्ठ पद्धतीने दिल्यामुळे अधिकच आवडली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा लेख वाचायचा राहून गेला होता. आर्थिक जगतातल्या अशा घडामोडी नेहमीच रोचक असतात. मात्र व्हाइट कॉलर क्राइम्स करणारांबद्दल लोकांमध्ये का कोण जाणे, तितकी घृणा नसते. अब्जावधी रुपयाच्या अफरातफरीला 'हे चालायचंच' अशी दृष्टीआड सृष्टी टाइप प्रतिक्रिया असते. मात्र कोणाचं घर फोडून लाखाचा माल गेला तर गुन्हेगारी वाढल्याची ओरड होते. कदाचित बॅंकेतल्या पैशांकडे त्रयस्थ भावनेने बघता येत असावं. तेच स्वतःच्या घरातल्या वस्तूंबाबत करता येत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जाई, हा लेख वाचायचा सुटला होता.

छान माहितीबद्दल मनापासून धन्यवाद Smile
अनेक बाबींवर मोजक्या शब्दांत प्रकाश टाकला आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख पुन्हा वाचला. गेल्यावेळी लेख वाचून अनेक विचारांचा गुंता झाल्याने प्रतिक्रिया द्यायचे राहून गेले होते.
लेख माहितीपूर्ण आणि जे घडलं त्याचा निरपेक्षपणे गोषवारा देणारा आहे. एक चांगला वृत्तांत.
गोल्डमनचे अजूनही उद्द्योग उघडपणे चघळले जातात आणि त्यावर कधीही काहीही कारवाई होण्याची शक्यता नाही.
गोल्डमनचा एक्स-सीईओ ट्रेजरीवर असणे, एआयजी बुडली तरी गोल्डमनला फरक पडणार नाही असे जाहीर केले जाणे आणि नंतर बेलआऊट दिल्यानंतर गोल्डमनचे बरेच एक्स्पोजर उघडकीस येणे, इन्वेस्टर्सना अंधारात ठेऊन सीडिओजचे शॉर्टिंग करणे इत्यादी अनेक प्रकार आहेत ज्यावर कारवाई होणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0