दिनविशेष - बॉस्टनहून भारतात बर्फाचं आगमन

१३ सप्टेंबर १८३३ रोजी एक जहाज कलकत्ता बंदरात दाखल झालं. बॉस्टनहून आलेल्या ह्या जहाजात १०० टन बर्फ होता. भारतात बर्फ आयात करणारं हे पहिलं जहाज होतं. चार महिने प्रवास करून हे जहाज भारताच्या किनाऱ्यावर पोहोचलं होतं. हे शक्य होण्यामागे प्रगत तंत्रज्ञानाचा सहभाग होता. त्याविषयी अधिक माहिती http://www.todayinsci.com/T/Tudor_Frederic/IceTradeAmericaToIndia.htm इथे मिळेल. भारतात त्या काळात 'हुगळी बर्फ' उपलब्ध असे, पण तो स्वच्छ नसे त्यामुळे पेयांमध्ये तो घालून पिणं शक्य नसे. आयात झालेला स्फटिकस्वच्छ बर्फ हा भारतीयांच्या कुतुहलाचा विषय ठरला. बर्फाला हात लावल्यामुळे हात जळाला असं वाटून पळून गेलेल्या एका इसमाविषयीचा त्या दिवशीच्या इतिहासात दाखला आहे.

१८७८मध्ये बंगाल आईस कंपनीनं भारतात बर्फाचा कारखाना सुरू केला. त्यानंतर ही आयात थांबली.

अधिक माहितीसाठी वाचा :
http://www.wired.com/thisdayintech/2010/09/0913calcutta-ice-ship/

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

या विषयावरील एक दीर्घ लेख येथे वाचता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हेच आठवत होतो की यावर कुठेतरी तपशीलात वाचलं होतं. दुव्याबद्दल आभार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मायबोलीवर अन्नं वै प्राणा: नामक जी अतिविस्तृत आणि थक्क करून सोडणारी लेखमाला आहे, त्याच्या बहुतेक ५ व्या / ६व्या भागात अकबराने बर्फ खाद्यपदार्थात वापरल्याचा उल्लेख आहे. लाहोरमध्ये विक्रेते अव्वाच्या सव्वा भावाने बर्फ विकत, त्यांना बायपास करून त्याने स्वतःचे लोक त्या कामी लावले, त्यामुळे टनावारी बर्फ तौलनिकरीत्या स्वस्तपणे मिळू लागला असे वर्णन आहे. ऑफिसात मायबोली ब्लॉक असल्याने लिंक देऊ शकत नाही. मायबोलीवर फक्त "अन्नं वै प्राणा:" इतकाच सर्च दिला तरी चालेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या अप्रतिम लेखमालेच्या अनुक्रमणिकेचा दुवा :
http://www.maayboli.com/node/15408

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

दिनविशेष आवडला. माहितीबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम धागा.

ह्या विषयावरती मी अन्य एका ठिकाणी केलेले थोडे लिखाण आणि त्याच्या पुढची-मागची ही चर्चा मनोरंजक वाटेल. अधिक वाचनासाठी लिंक्सहि तेथे आहेत.

हा बर्फ अमेरिका-कॅनडामध्ये कसा बाहेर काढत असत, त्याची जमिनीवरची आणि समुद्रावरील वाहतूक कशी असे आणि हिंदुस्तानात तो कसा साठविला जाई ह्याची काही मजेदार चित्रे आणि फोटो येथे पाहावीत.

'Ice Trade of Boston, America' अशा शीर्षकाचा एक विस्तृत लेख Simmond's Colonial Magazine and Foreign Miscelleny' ह्या नियतकालिकाच्या सप्टेंबर-डिसेंबर १८४४ ह्या भागात पृ. ७९ वर उपलब्ध आहे. (हे पूर्ण पुस्तक books.google.com येथे ह्या ठिकाणी विनामूल्य वाचता येते. तेथील काही आकडयांवरून ह्या धंद्यातील नफ्याचा अंदाज करता येतो. १८४३ साली बॉस्टनहून ५५,००० टन बर्फ २.५५ डॉलर्स प्रति-टन ह्या दराने जहाजांवर चढला. पूर्वेकडील देशांमधून ह्याची विक्री करून ३,५७५,००० डॉलर्स मिळाले. त्यातून जहाजे नेण्याचा खर्च आणि काही बर्फ वितळणार त्याचे नुकसान धरून भरपूर नफा उरला असणार. जवळजवळ अर्धा बर्फ मार्गातच वितळून जाई. १ पौंड बर्फ पूर्वेकडे १ पौंड कापसाच्या किंमतीलाच विकला जाई आणि हा कापूस कापडगिरण्यांसाठी लिवरपूलला त्याच जहाजांमधून रवाना होई. अमेरिकेकडून हिंदुस्तानने विकत घेण्याजोगे तसे काहीच नव्हते आणि त्या कारणाने अमेरिकेतून मोकळी जहाजे पाठविण्यासाठी बॅलास्ट म्हणून माती-धोंडे आधी भरत असत तेथे आता विकला जाणारा बर्फ जाऊ लागला. बर्फामधून सफरचंदेहि पाठविली जात. येथे पहा. बॉस्टनमधील इंडिया स्ट्रीट आणि इंडिया व्हार्फ ही नावे अजून ह्या एकेकाळच्या महत्त्वाच्या व्यापाराची आठवण जगवतात.

डेनिस किंकेडलिखित 'British social life in India, 1608-1937' हे पुस्तक मी बर्‍याच वर्षांपूर्वी वाचले होते. (त्याची काही मर्यादित पाने येथे पाहावयास मिळतील. डेनिस किंकेड हे आयसीएस अधिकारी हिंदुस्तानात अनेक पिढ्या काढलेल्या कुटुंबातील होते. दुर्दैवाने वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी कारवारला कलेक्टर असतांना समुद्रात बुडून त्यांचा मृत्यु झाला.) कारखान्यात बर्फ करण्याच्या दिवसांपूर्वी हिंदुस्तानातील ब्रिटिश आपली वाइन आणि बीअर थंद करण्यासाठी काय करत असत ह्याचे मजेदार वर्णन त्या पुस्तकात मी वाचले आहे. दिल्लीतील ब्रिटिश कुटुंबे वर्गणी काढून नोकर नेमत. त्यांचे काम म्हणजे थंडीच्या दिवसात तुर्कमान गेटच्या वैराण भागात उथळ चर खणून त्यात पाणी टाकल्यावर थंडीमुळे वर जमलेला बर्फाचा थर काढणे आणि तो लाकडी भुसा वापरून त्यात टिकवून जमेल तितके दिवस वर्गणीदारांच्या घरोघर त्याचे वाटप करणे हे असे. विशेषतः उत्तर हिंदुस्तानात बर्‍याच ठिकाणी थंडीच्या दिवसात असा बर्फ तयार केला जाई.

अशी वाचावी तितकी ही बर्फाची कहाणी फार मनोरंजक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0