पुस्तकांची खरेदी ऑनलाईन करण्यासाठी संकेतस्थळे

नमस्कार पुस्तकप्रेमींनो,

अलिकडच्या काळात ऑनलाईन खरेदी हा पर्याय उपलब्ध झाल्यापासून आपल्यापैकी अनेक वाचनप्रेमी स्वतःच्या आवडीच्या पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी झटू लागले आहेत. मी ही त्याला अपवाद नाहिये. या छोट्याशा लेखाद्वारे वाचकांना मराठी पुस्तके ऑनलाईन विकत घेण्यासाठी कोण-कोणते पर्याय उपलब्ध आहेत? पुस्तके विकत घेताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे? ऑनलाईन खरेदी करताना कोणती सुरक्षितता बाळगावी? व एक ग्राहक म्हणूनही अधिकाधिक स्वस्तात आपल्याला हवी असलेली पुस्तके कशी मिळवावीत? याकडे वाचकांचे थोडे लक्ष वेधू इच्छितो.

अर्थात मी देत असलेली माहिती मर्यादित आहे याची मलाही जाणीव आहे. पुस्तकप्रेमी मंडळींनी त्यात भर टाकावी अशी माझी आग्रहाची विनंती. जेणेकरुन या धाग्याचा उपयोग नव्याने व सातत्याने ऑनलाईन पुस्तक खरेदी करणार्‍या दोन्ही प्रकारच्या वाचकांना व्हावा

सर्वप्रथम ऑनलाईन खरेदी करण्यासाठी कोणकोणती संकेतस्थळे उपलब्ध आहेत ते पाहूयात.

१. बुकगंगा.कॉम : http://www.bookganga.com/eBooks/
देशातील खरेदीसाठी

२. फ्लिपकार्ट.कॉम : http://www.flipkart.com/books/marathi?_pop=flyout
देशातील खरेदीसाठी

३. मायहँगआऊट स्टोअर : http://www.myhangoutstore.com/
देशातील खरेदीसाठी

४. ग्रंथद्वार.कॉम : http://www.granthdwar.com/
देशातील खरेदीसाठी

५. अक्षरधारा.कॉम : http://www.akshardhara.com/
देशातील खरेदीसाठी

६. रसिक साहित्य : http://www.erasik.com/books/page1/
देशातील खरेदीसाठी

७. रसिक.कॉम : http://www.rasik.com/
विदेशातील खरेदीसाठी

८. मीमराठी शॉप : http://shop.mimarathi.net/
देशातील खरेदीसाठी

९. मायबोली : http://kharedi.maayboli.com/shop/home.php
देशा-विदेशातील खरेदीसाठी

१०. सह्याद्री बुक्स : http://www.sahyadribooks.org/
देशातील खरेदीसाठी

खरेदी कशी करावी?

१. खरेदी करताना वरील सर्व संकेतस्थळे एक संपर्क क्रमांक पुरवितात. त्यावर आधी फोन करुन पुस्तकांची उपलब्धता तपासून घ्या मगच ऑर्डर तयार करा.

२. ऑर्डर देण्यापूर्वी आपल्याला उत्तम किंमत / सवलत कोण देत आहे ते आधी तपासून पहा. म्हणजे कोणी विक्रेता सवलत जास्त देतो पण शिपिंग चार्जेस परवडत नाही तर कोण शिपिंग फुकट देतो. या सर्व बाबी तपासून मगच आपल्या ऑर्डरची किंमत ठरवा.

सुरक्षितता:

ऑनलाइन खरेदी करताना सुरक्षितता हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो. वरील सर्व संकेतस्थळांवरुन मी स्वत: खरेदी करुन सुखद अनुभव घेतलेला आहे. शिवाय पैसे खात्यात ट्रान्सफर करण्याची सेवा अनेकांनी दिली आहे याचा फायदा क्रेडिट कार्डवरच्या व्यवहारावर प्रोसेसिंग चार्ज वाचवून घेता येतो. अनेक साईट्स क्रेडिट कार्डावर कर नाही घेत. तेव्हा ही बाब देखील तपासून घेणे गरजेचे ठरते.

सवलत:
तेव्हा वरील सर्व संकेतस्थळांवरुन खरेदी करताना अनुभव हा महत्त्वाचा ठरतो. सातत्याने खरेदी करुनही तुमचे विक्रेत्यांशी नियमित ग्राहकाचे संबंध निर्माण होतात ज्याचा फायदा तुम्हाला सवलतींच्या रुपाने मिळतो.

धन्यवाद,
सागर

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

त्यातल्या त्यात कोण जास्त सवलत देते?आपला अनुभव सांगावा.....
माझी एक भर infibeam.com
आणि technical बुक्स साठी इथे फ्लिपकार्ट पेक्षा जास्त सवलत असते ,
रेडीफ (rediff.com)आणि amazon.com पण ठीक आहे .

सातत्याने खरेदी करुनही तुमचे विक्रेत्यांशी नियमित ग्राहकाचे संबंध निर्माण होतात ज्याचा फायदा तुम्हाला सवलतींच्या रुपाने मिळतो
हे कसे ओन लाइन खरेदि बद्दल कसे काय शक्य आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगला प्रश्न विचारलात मन्दार तुम्ही.

ऑनलाईन खरेदी करण्यापूर्वी काही संकेतस्थळे संपर्क क्रमांक देतात हे मी अगोदर लेखात सांगितले आहेच.
तर अशा वेळी फोनवरुन संभाषण करताना तुमचे एक चांगला ग्राहक या नात्याने त्यांच्याशी संबंध प्रस्थापित होतात.
चांगली सेवा मिळण्याच्या दृष्टीने या छोट्याशा बाबी बर्‍याच वेळा महत्त्वाच्या ठरतात.
बुकगंगा, रसिक साहित्य, मीमराठी शॉप, ग्रंथद्वार यांच्याकडून मी हा अनुभव अनेक वेळा घेतला आहे.
किंबहुना तुम्हाला हवी असलेली पुस्तके उपलब्ध आहेत का? अशी विचारणा केली तरी वरील ऑनलाईन विक्रेत्यांनी लगेचच पुस्तकांची उपलब्धता कळवलेली आहे.

बुकगंगा सेवे बाबत अतिशय तत्पर आहे. ऑर्डरपैकी एखादे पुस्तक उपलब्ध नसेल तर त्या रकमेचे डिस्काऊंट कुपन तुम्हाला लगेच पाठवले जाते. म्हणजे पुढच्या खरेदीच्या वेळी त्याचा उपयोग तुम्ही करु शकता. डिस्काऊंट कुपन नको असेल तर फोनवर बोलून व फरकाची रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करुन दुसरे पुस्तक मागवू शकता.

रसिक साहित्य ही कस्टमर बेस्ड फोकस करुन सेवा देणारी संस्था आहे. त्यामुळे फक्त ईमेल मार्फत तुमची ऑर्डर देऊ शकता व त्याचे बिल ते ईमेल करतात. पैसे खात्यावर ट्रान्सफर केले की लगेच २-३ दिवसांत पुस्तके (मी बंगळूरात असूनही) मिळतात. असा माझा अनुभव आहे.

ग्रंथद्वारला फेसबुक वा ट्विटरद्वारे पुस्तकांची विचारणा केली व लगेच त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर ती पुस्तके उपलब्ध करुन दिलीत.

मीमराठी शॉप देखील रसिक साहित्य सारखी ऑनलाईन बरोबर फोनवर ऑर्डर घेण्याची सेवा देखील पुरवते. फ्री डिलिव्हरी व इतर ऑफर्सदेखील वेळोवेळी त्यांच्या संकेतस्थळावर बघायला मिळतात.

माझी एक भर infibeam.com
आणि technical बुक्स साठी इथे फ्लिपकार्ट पेक्षा जास्त सवलत असते ,

होय इन्फिबिम हा फ्लिपकार्टला एक छान पर्याय आहे. अलिकडे फ्लिपकार्टने पुस्तकांचे दर व फ्री शिपिंग ची मर्यादा वाढवल्याने ती थोडी महाग पडते.
रेडिफचा मराठी पुस्तकांचा बराचसा डाटा अद्ययावत नसल्यामुळे कधी कधी अडचण येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चला . एक वाचनखूण साठली.
बादवे, एकांकिका, नाटके, ह्यांच्या संहिताही ऑनलाइन मिळतात काय?
आम्ही थेट दुकानात जौअन खरेदी करायचो, पण ती दुकानेही फार म्हणजे फारच मर्यादित संख्येने आहेत.
हवी ती संहिता नेहमी दुसर्‍याची नाकदुर्‍या काढून, झेरॉक्स करवून घेउन किम्वा प्रकाशकाला थेट संपर्क साधूनच मिळवावी लागे.
अशात संपर्कात नाही, पण नाट्यसंहितेची रड अजूनही सुरुच असावी.(वाचकवर्ग फार नाही, त्याचा हा परिणाम असावा.)
मला स्वतःला प्रयोग पाहून समाधान होत नाही. कित्येकदा प्रयोग पाहून झाल्यावर पुन्हा पुन्हा वाचल्याशिवाय एकेके गोष्ट नीटशी डोक्यात घुसतच नाही.
तस्मात, काही पहायचे असले, तरी वाचणे मस्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मनोबा,

छान मुद्दा उपस्थित केला आहेत तुम्ही.

पण नाट्यसंहितेची रड अजूनही सुरुच असावी.(वाचकवर्ग फार नाही, त्याचा हा परिणाम असावा.)

हे मात्र अगदी खरे आहे. वाचकवर्गच नसेल तर विक्री कशी कोणार. पुण्याला पुढील भेटीत एकांकिका व नाटकांच्या संहितांची उपलब्धता कशी व किती प्रमाणात आहे याचा शोध घेईन. नाटके जशी च्या तशी उपलब्ध आहेत. पण ती 'नटसम्राट' सारखी अतिशय गाजलेली असतील तरच उपलब्धता असते.

या मुद्द्याची माझ्याकडे नोंद करुन घेतली आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यातल्या त्यात नटसम्राट, ती फुलराणी, तो मी नव्हेच्,मोरुची मावशी,भ्रमाचा भोपळा अशी एकेकाळी गाजलेली नाटके, प्रथितयश मंडळींचा सुवर्नस्पर्श लागलेली असतील, तर तुलनेने अधिक उपलब्ध असतात.
पण मी म्हटलं चारचौधी द्या, "ध्यानीमनी" द्या, किंवा "सविता दामोदर परांजपे" पहायचय किंवा अलिकडील काळातील "राहिले दूर घर माझे" हवे आहे, तर मिळायचे चान्स थोडे कमी होतात.(ही सुद्धा उत्तम आहेतच, त्यांचे लेखकही चर्चित नावेच आहेत ह्यात शंका नाही, पण मुद्दा उपलब्धतेचा आहे. )
तरी ही थोडीफार परिचयातील नावे.
अगदिच अनवट म्हटले तर "प्रकाशाच्या प्रदेशात, "सूर राहू दे" वगैरे. ते तर कुठेच सापडनार नाहित, ह्याची खात्री.
स्वगतः-
सालं, डिजिटलायझेशनचं युग थोडं आधी अवतरलं असतं, तर मानवजातीवर किती अगणित उपकार झाले असते असं वाटायला लागतं.
मग कुटह्ली प्रत अधिकृत ह्यावरचे वादही टळले असते. एकनाथाला ज्ञानेश्वरीचे पुनर्र्चनही करावे लागले नसते, नि मूळ संहिता जशच्या तशा फोटोकॉपी रुपात तरी पोचल्या असत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पण मुद्दा उपलब्धतेचा आहे.
सालं, डिजिटलायझेशनचं युग थोडं आधी अवतरलं असतं, तर मानवजातीवर किती अगणित उपकार झाले असते असं वाटायला लागतं.

पूर्ण सहमत आहे मनोबा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुप्लिकेट प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

याबाबतीत माझ्याकडे फक्त 'फ्लिपकार्ट.कॉम' चा अनुभव पदरी आहे, आणि तो सर्वोत्तम आहे असा अगदी पहिल्या आठवड्यापासून अनुभव आल्याने अन्य कोणत्याही ऑनलाईन संस्थेकडे जाण्याचा प्रसंग आलेला नाही. अतिशय उत्तम पॅकिंग्ज, उत्तम प्रकारे कुरिअर सर्व्हिसेस, शिवाय ऑर्डरमधील एखाददुसरे पुस्तक त्या क्षणी त्यांच्याकडे शिल्लक नसेल तर त्या पुस्तकाबाबत वेगळे ई-मेल पाठवून त्याच्या उपलब्धतेसाठी त्यांच्याकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन....आणि ते वेळेत पुरेही करणे...आदी बाबी मला फार भावल्या....शिवाय 'कॅश ऑन डिलिव्हरी' असल्याने येणारे बिल हे जाहीर केलेल्या कमिशनसह केले जात असल्याचे पाहिले आहे...शिवाय एकदा त्यांच्या लिस्टवर आपले नाव योग्यरितीने रजिस्टर झाले की मग वेळोवेळी नवनवीन योजना तसेच पुस्तकांच्या त्या त्या महिन्यात निर्माण होणार्‍या याद्या....यांच्याबाबतीतही सविस्तर मेल्स येत राहतात. थोडक्यात फ्लिपकार्ट.कॉम ला मी ऑनलाईन खरेदीबाबत ५ स्टार रेटिंग द्यायला सदैव तयार आहे.

पुणे-मुंबईच्या एकाही मराठी प्रकाशकाने वा ऑनलाईन सेवा देणार्‍या संस्थेने अशी सेवा देवू केलेली नाही, हेही मुद्दाम नमूद करीत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशोक काका,

फ्लिपकार्टचा अनुभव अत्युत्कृष्ट सेवा असाच माझाही आहे. ज्या मराठी पुस्तकांवर सवलत कमी मिळते (ज्यांचे प्रमाण हल्ली फ्लिपकार्टवर वाढले आहे) अशा वेळी मी उल्लेखिलेल्या अनेक पर्यायांपैकी त्या त्या वेळी योग्य पर्याय वापरुन मी खरेदी पूर्ण करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या संदर्भात हे राज यांचे पोस्ट बहारदार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मुंबईचं सुप्रसिद्ध 'स्ट्रँड बुक स्टॉल' आपली पुस्तकं ऑनलाईन ऑर्डरद्वारे उपलब्ध करून देतं. त्यांच्या अधिकृत माहितीत तसा उल्लेख नाही, पण रु. २०००/- पेक्षा अधिक किमतीची पुस्तकं खरेदी केली तर ती टपालाद्वारे मोफत पाठवतात. अनेकदा त्यांच्याकडच्या पुस्तकांच्या किमती इतरांहून स्वस्त असतात. त्यामुळे हा सौदा अधिकच फायद्याचा होऊ शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सागर, माहिती नक्कीच उपयोगी आहे. कधी ऑनलाईन खरेदीकडे माझा कल होईल तेव्हा या धाग्याचा उपयोग करेन मी. पण मी आजवर एकच पुस्तक (Yes Minister) ऑनलाईन खरेदी केले आहे - तेही ऑनलाईन खरेदी कशी करतात हे कळावे म्हणून! अन्यथा पुस्तकं हातात घेउन पाहावीत, त्यावेळचे बजेट पाहून मग दोन पुस्तके बाजूला ठेवत उरलेली काही निवडावीत - आणि पुढच्या वेळी त्या दोन पुस्तकांची मागणी आधी करावी - असेच चालू असते. ते मला शक्य आहे आणि आवडतेही! कदाचित ऑनलाईन खरेदीची एकदा आवड निर्माण झाली की त्यातला आनंद (आणि सोय) मला कळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"...कदाचित ऑनलाईन खरेदीची एकदा आवड निर्माण झाली की त्यातला आनंद (आणि सोय) मला कळेल....."

~ हा अनुभव मी घेतला आहे आणि घेतही असतो अधुनमधून, सविताताई. पूर्वी एक ठीक होते की ज्यावेळी आपल्याकडे प्रत्यक्ष दुकानात गेल्याशिवाय अन्य विकल्प नव्हताच. पण आताच्या युगात जर अशी सोय उपलब्ध होत आहे आणि संध्याकाळच्या वेळी 'रमतगमत' पुस्तकाच्या दुकानाकडे जाण्याचा आनंद हल्लीच्या कमालीचा संताप आणणार्‍या रहदारी तसेच वाढत्या प्रदुषणामुळे लुप्त होत चालला असेल [चालला आहेच] तर मग घरबसल्या अशा सोयींचा वापर करून घेणे केवळ फायद्याचेच ठरते असे नव्हे तर त्यातही सेवेबाबत घेतल्या जाणार्‍या कष्टाचे कौतुक करण्याचीही मनी भावना उत्पन्न होते. मी 'फ्लिपकार्ट' ला असेच सेवेच्या दर्जाबद्दल एक छापपैकी पानभर ई-मेल पाठविल्यानंतर त्यांच्या मॅनेजमेन्टला खूप आनंद झाल्याचे दिसले, कारण त्यानीही 'अशा पत्रांमुळे सेवेचा दर्जा अधिक उंचावण्याबाबत आम्हाला नेहमीच प्रयत्नशील राहाण्यास मदत होते....' असे उलट आभाराचे पत्र तर आलेच, शिवाय मी त्यांच्या 'विशलिस्ट' वरील कायमचा सदस्यही बनलो आहे.

त्या उलट आमचे मराठी प्रकाशक बंधू. स्थानिक पातळीवरील एका दुकानातून किरण नगरकर यांचे 'सात सक्कं त्रेचाळीस' घेतले. ही दुसरी आवृत्ती अरुण पारगावकरांच्या 'प्रतिमा प्रकाशन' द्वारा प्रकाशित झाली आहे. यापूर्वीची 'मौजे' ची आवृत्ती मी वाचली होतीच, पण संग्रही नसल्याने प्रतिमाची घेतली. पुनर्वाचनाचा आनंद घेताना लक्षात आले की पान क्रमांक ११२ नंतर बांधणीमध्ये अशी काही गडबड झालेली आहे की ११२ नंतर परत १०३ पानावरील मजकूर तर येतोच शिवाय ९९ नंतर ९७ अशी उलटापालट. सारा सारा वाचन आनंद अशा धेडगुजरी आणि बेपर्वाई वृत्तीच्या सादरीकरणामुळे घालवून टाकला. अतिशय संयत भाषेत या संदर्भात एक पत्र लिहून प्रतिमा प्रकाशनला कळविले आणि प्रत बदलून देण्याची विनंती केली. याला उत्तर अर्थातच आले नाही. साधी पोच देण्याचे सौजन्यही जर पारगावकर नामक सदगृहस्थ दाखवित नसेल तर उद्या प्रतिमाने फुकट पुस्तके वाटप ठेवले तरी त्याच्याकडे कुणी जात असेल तर त्याला तसे करण्यापासून मी वंचीत करीन.

फार मग्रुर जमात आहे एकजात मराठी प्रकाशक नामक जमात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://www.bookadda.com/
फक्त पुस्तकांसाठीच केलेली साईट आहे.
फ्लिपकार्ट/इन्फिबिमपेक्षा जास्त सवलत दिसते आहे,आणि इंटरेस्टिंग म्हणजे वापरलेली पुस्तके पण उपलब्ध दिसत आहे,खरेदीचा अनुभव नाही पण कॅश ऑन डिलीव्हरी शक्य आहे असे दिसतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0