एन्डीव्हर स्पेस शटलची शेवटची भरारी.

स्पेसशटलला निवृत्त केल्यानंतर म्युझियममध्ये नेतानाची ही त्याची शेवटची भरारी, बोईंग ७४७ च्या पाठीवर बसून.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (4 votes)

प्रतिक्रिया

आमच्याही गावावरून गेलं हो यान. टेक्सस विद्यापीठाच्या टॉवरशेजारून दिसलेलं यान आणि विमानः

Twitter follower Lara Eakins sent in this photo of Endeavour flying over the UT Tower. -- आमच्या लोकल च्यानल YNN च्या फेसबुकावरून.

सर्व सदस्यांना संपादकांकडून सुचना: काही ब्राऊझर व्हर्जन्सवर फोटो व्यवस्थित दिसण्यासाठी फोटो टाकतेवेळी तयार झालेल्या HTML कोडमधून width="" height="" टॅग काढून टाकावे लागतात किंवा योग्य ती छायाचित्रांची लांबी रूंदी द्यावी लागते याची नोंद सर्व सदस्यांनी घ्यावी. वरील प्रतिसादातील छायाचित्रांचे टॅग सुधारले आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नाईल व आदिती

दोघांनाही सुंदर फोटोंबद्दल धन्यवाद.
एन्डेव्हर स्पेस शटलचे हे दृश्य खूप छान दिसत आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टॉवरशेजारी विमान पाहिलं की भीती वाटते ...
नका हो असलं काही दाखवू...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण भारतात असाल तर चिंता नसावी. भारतातील टॉवर,पूल्,फ्लाय ओव्हर पडण्यास विमानांचीही आवश्यकता नाही. आम्ही आपोआप पडतील अशी बांधकामे करु शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा प्रयोग कधी स्वतः करून पाहिलेला नसल्यामुळे नक्की खात्री नाही (स्वतः करून पाहण्याची इच्छाही नाही), परंतु तरीही, टॉवरवर विमान आदळवण्याचा सर्वसामान्य उद्देश हा (१) टॉवर पाडणे, आणि/किंवा (२) विमानाची मोडतोड करणे, यांपैकी कोणताही असावा, असे प्रथमदर्शनी तरी वाटत नाही.

(अवांतर: एरवी हा 'श्रेणी' प्रकार कधीही गंभीरपणे घेतला नाही, की मिळणार्‍या 'श्रेणी'ची कधी पर्वा केली नाही, परंतु यावेळी मात्र या प्रतिसादास 'विनोदी' अशी श्रेणी - कोणी दिलीच, तर - देणार्‍या(/री)च्या आजोबांची (पक्षी: आईच्या वडिलांची) आगाऊ तंगडी! एक वेळ 'कैच्याकै' परवडेल, पण 'विनोदी' नको! च्यामारी, कभी तो सीरियसली लिया करो यारों!)

(आगाऊ इशारा: हे घरी करून पाहू नका - अगदी प्रौढांच्या देखरेखीखालीसुद्धा!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या लेखातील पहिल्या दोन ओळी.........
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16551710.cms

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

चॅलेंजर शटलला झालेल्या दुर्घटनेनंतर एण्डेव्हर बनवण्यात आलं. या आधी बनवलेल्या अटलांटीस आणि डिस्कव्हरी या यानांसाठी बनवलेले सुटे भाग एण्डेव्हरमधे वापरण्यात आले. (अमेरिकेत ऐशीच्या दशकाच्या उत्तरार्धात काटकसर!) १९९२ मधे STS-49 या मिशनसाठी एण्डेव्हर सर्वप्रथम वापरले. या मिशनमधे त्याने Intelsat VI या उपग्रहाला त्याच्या पृथ्वीजवळ असणार्‍या कक्षेतून geosynchronous (मराठी?) कक्षेत सुरक्षित सोडण्याचं काम केलं.

१८ वर्षांच्या सेवेत एण्डेव्हरने २५ वेळा पृथ्वी सोडली. पहिली आफ्रीकन अमेरिकन महिला अंतराळात नेण्याचा मान एण्डेव्हरला मिळाला. हबल स्पेस टेलिस्कोपची जी अनेक दुरूस्ती मिशन्स गेली, त्यातलं पहिलं एण्डेव्हरनेच नेलं, स्पेसलॅब आणि स्पेसरेडार प्रयोगात भाग घेतला, मिर या रश्यन यानाशी भेट घेऊन अंतराळवीरांनी आपआपली यानं बदलली, आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपर्यंत अनेक फेर्‍या मारल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

किती किती करावं ते वर्गीकरण.
नील आर्मस्ट्राँग, युरी गागारिन हे गेले म्हणजे "पहिला माणूस " गेला ते ठीक आहे. एखाद्या देशासाठी " आमच्या देशाचा पहिला नागरिक" गेला असं म्हणणंही समजू शकतो.पण "पहिली आफ्रीकन अमेरिकन महिला " हे इतकं अचाट वर्गीकरण कोण आणी का करत असावं असं वाटून गेलं.(तेही "आमच्याकडे सर्व मानव समान आहेत" अशी टिमकी एखादा देश सातत्याने वाजवत असेल तर.)
असो.
धाग्याची कल्पना छान. पण त्यानिमित्तानं त्या क्षेत्रातली अजून माहिती मिळाली असती तर बरं झालं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आपल्याकडे साधारण दलित समाजावर जसे अन्याय झाले आहेत तसाच प्रकार अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांवर झालेला आहे; अजूनही रेसिझमच्या तक्रारी अमेरिकेत होतात. कृष्णवर्णीयांना अनेक गौरवर्णीय लोक आजही हीन लेखतात. कृष्णवर्णीयांमधे शिक्षणाचं प्रमाण आजही फार नाही, पण गुन्हेगारीचं आहे. ज्या राज्यांमधे बंदुका बाळगण्याचा परवाना मुक्तपणे मिळतो तिथे आजही कृष्णवर्णीय संशयित दिसला तर त्याच्यावर गोळ्या चालवण्याचे प्रकार अधिक होतात (याच्या जागी गौरवर्णीय असता तर गोळी झाडली नसती, असा दावा टीव्हीवर ऐकला आहे); अगदी पोलिसांकडूनही असे प्रकार होतात. याच जागी हिस्पॅनिक असं वर्गीकरण फार होत नाही कारण त्यांच्यावर कृष्णवर्णीयांसारखा अन्याय झालेला नाही.
स्त्रियांवर हजारो वर्ष अन्याय होण्याचा इतिहास आहेच. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचं वर्गीकरण मला खुपत नाही. एक प्रकारे या वर्गीकरणामुळे, अन्याय झालेल्या समाजातून पुढे आलेल्या लोकांचं आम्हाला कौतुक आहे असं सुचवता येतं. समानता असली किंवा अपेक्षित असली तरीही वाईट परिस्थितीतून पुढे येणार्‍यांचं किंचित अधिक कौतुक झाल्यास ते का टोचावं?

अन्यत्र "उत्तर अमेरिकेतली नागरी वसाहतीतली वटवाघळांची सर्वात मोठी वसाहत" किंवा "टेक्ससमधलं, लाल दगडातलं सर्वात मोठं नदीचं खोरं" अशा प्रकारची वर्णनं मला विनोदी वाटतात. किंवा अनेक गाड्यांच्या मागे दिसणार्‍या पाट्यांमधलं "Army Mom" किंवा "A proud parent of blah-blah primary school" हे मला ट्यँव ट्यँवपेक्षा अधिक महत्त्वाचं वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"पण "पहिली आफ्रीकन अमेरिकन महिला " हे इतकं अचाट वर्गीकरण कोण आणी का करत असावं असं वाटून गेलं."

हे वर्गीकरण काही 'ऐतिहासिक' घटनांसाठी आवश्यक मानले जाते, मनोबा.
असे स्पष्ट आणि उघडवाघड नामकरण करण्यामागे कोणत्याही प्रकारचे डिसक्रिमिनेशन नसून ती एक जरूरी अशी नोंद आहे. अमेरिकन नागरिकांच्या नावावरून आडनावावरून पेशावरून त्यांची नेमकी ओळख सिद्ध होत नाहीत इतकी की कॉमन असतात. आपल्याकडे आडनावावरून जात ओळखता येते, व्यवसायधंदाही ओळखता येतो. पण अमेरिकन गोर्‍यांच्या आडनावातही "वॉशिंग्टन' असेल आणि काळ्यांच्याही.

अमेरिकन नीग्रोना 'नीग्रो' ही शिवी [Slang] वाटते. मग त्याना 'कलर पीपल' म्हटले जाऊ लागले. आता 'आफ्रिकन अमेरिकन' म्हटले जाते. 'स्पेस' प्रवास करणार्‍यामध्ये महिलांचे प्रमाण अत्यल्प असते हे तर मान्य व्हावे. मग ज्यावेळी सॅली राईड या गोर्‍या अमेरिकन महिलेला हा मान मिळाला त्यावेळी 'पहिली स्त्री' अशा उल्लेखाने तिच्या शटल प्रवासाचे जगभर वर्णन झाले, ही गोष्ट सन १९८३ ची. मग पुढे मे जेमसन या 'नीग्रो' महिलेला सन १९९२ मध्ये एन्डिव्हर स्पेस शटलमधून अशा सफरीचा मान मिळाला...त्याचीही बातमी जगभर झाली कारण ती 'प्रथम आफ्रिकन अमेरिकन' स्त्री होती म्हणून. या न्यायाने अदितीने मे जेमसनचा 'पहिली आफ्रिकन अमेरिकन महिला' हा उल्लेख केलेला आहे असे मी मानतो, ज्यात काही गैर आहे असे मानू नये.

प्रेसिडेन्ट ओबामा यांचाही उल्लेख 'पहिले आफ्रिकन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष' असाच होत असतो, जे कुणालाच खटकत नाही. विकीवर 'ओबामा' यांच्याविषयी माहिती शोधायला गेल्यास अगदी सुरुवातीलाच त्यांच्याबाबत "He is the first African American to hold the office." हे वाक्य समोर येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काळाचा वेग किती वाढत चाललाय असा विचार मनात आला.
एकेकाळी काही गोष्टी - तंत्रज्ञान पडद्याआड जायला बराच काळ जायचा. त्यामानाने हल्ली तांत्रिक प्रगतीचा वेग बघता आजचे नवे तंत्रज्ञान, थोड्याच काळात सवयीचे गरजेचेच नाही तर जुने देखील वाटु लागते.

स्पेस शटल ही कल्प्ना कित्ती कित्ती आधुनिक पण त्यातील काही मंडळी रिटायर्ड पण व्हायला लागली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ह्या स्पेस शटलला स्वतःचं इंजिन नसतं का? (पृथ्वीवरच्या वातावरणात उडण्यासाठी लागणारं जेट इंजिन नसावं असा अंदाज आहे). दुसर्‍या विमानाने पाठुंगळीला घेऊन का जावं लागतं ?? जर स्वतःचं इंजिन जर नसेल तर जेव्हा स्पेस शटल परत येतं तेव्हा त्याला कसं कंट्रोल करतात? नुसतं ग्लायडींग करून त्याला जमिनीवर उतरवतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-------------------------------------------

म्हशीच्या पाठीवर बसून सहलीला चाललेला कावळा बघितला नाही का कधी? कंटाळा येत असेल त्यालाही उडण्याचा कधीकधी.

(समाधानामागील संकल्पना पु.लं.कडून साभार. त्यामुळे शंका मूर्ख असो वा काहीही असो, समाधान मूर्ख किंवा कसे, ते तुम्हीच ठरवा. कसें?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्पेस शटलला स्वतःचं इंजीन असतं. ते अर्थातच विमानांच्या इंजिनपेक्षा वेगळं असतं. विमानाचं इंजिन हे एअर-ब्रिदींग प्रकारच असतं (म्हणजे हवेतल्या ऑक्सिजनवर अवलंबून) तर स्पेस शटलचं रॉकेट इंजिन ज्यात ऑक्सीजन बाहेरून मिळत नाही (स्पेस मध्ये ऑक्सीजन नसतो, अर्थातच).

स्पेस शटलला पृथ्वीबाहेर सोडण्याकरता प्रचंड उर्जा लागते. पण स्पेस मध्ये गेल्यावर फार उर्जा लागत नाही (न्यूटन!). म्हणून स्पेसशटला मोठे इंजिन बसवणे गरजेचे नाही, उलट अनेकदा स्पेस शटलमध्ये अनेक शास्त्रीय प्रयोग केले जातात त्यामुळे शटलमधल्या जागेचा नीट उपयोग करणं गरजेचं असतं. म्हणून स्पेस शटल लाँच रॉकेट बूस्टर्सने करतात (आणी मग ती वेगळी होऊन पडताना अनेकांनी बघितली असतीलच).

पृथ्वीवर परत येताना स्पेशटलचे इंजिन बंद असते. शटलचा वेग इतका असतो की ग्लायडींग करतानाही प्रचंड वेग निर्माण होतो. त्यामुळे प्रचंड उष्णता शटलभोवती निर्माण होते. म्हणूनच शटला विशेष सिरॅमिक टाईल्स लावलेल्या असतात (ह्याच टाईल्समध्ये दोष निर्माण झाल्याने कोलंबिया यानाचा विस्फोट झाला). सहसा शटलला वातावरणातून खाली येताना डाव्या उजव्या बाजूला आळीपाळीने कलवले जाते, ज्याने दोन्ही बाजूचे घर्षण होऊन तापमान कमी व्हायला वेळ मिळतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

छान आहेत फोटो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

छान फोटो.
मुलाच्या पाठुंगळी बसून वारीला निघालेल्या म्हातारीसारखं दिसतंय. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0