एकवार पंखावरुनी फिरो तुझा "हात"

महाराष्ट्राच्या राजकारणातले एक जाणते काका उत्तरेकडे तोंड करुन हे गीत गात आहेत असे समजा.
या एका गृहीतकामु़ळे मूळ गाणेच विडंबनाची मजा देते.

एकवार पंखावरुनी फिरो तुझा "हात"
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात

धरेवरी अवघ्या फिरलो
निळ्या अंतराळी शिरलो
कधी उन्हामध्ये न्हालो, कधी चांदण्यात

वने, माळराने, राई,
ठायी, ठायी केले स्‍नेही
तुझ्याविना नव्हते कोणी, आत अंतरात

फुलारून पंखे कोणी
तुझ्यापुढे नाचे रानी
तुझ्या "मनगटी" बसले कुणी भाग्यवंत

"मुका" "बावरा", मी "भोळा"
पडेन का तुझिया डोळा ?
मलिनपणे कैसा येऊ, तुझ्या मंदिरात

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)