आपल्या या भारत देशात

आपल्या या भारत देशात
आपल्या या भारत देशात
धर्म संस्कृतीचे गोडवे गातात................

म्हणायला आपली पवित्र संस्कृती
अनुकरण मात्र करतात पाश्चाती
धर्माने वागणाऱ्यास गावंढळ समजतात
आपल्या या भारत देशात..............

भ्रष्टाचाराचा उधळतो आहे वारू
दुधापेक्षा महाग आहे दारू
सर्व काही नेत्यांच्या हातात
आपल्या या भारत देशात.......................

शिक्षण नाही गरिबांच्या आवाक्यात
प्रवेशासाठी लाखो मोजले जातात
अपेक्षांच्या ओझ्यांनी विद्यार्थी दडपतात
आपल्या या भारत देशात................

राजकारणात फक्त गुंडानाच प्रवेश मिळतो
सज्जनांना बाहेरचा मार्ग दाखवला जातो
पैसा दारू ओतून निवडून येतात
आपल्या या भारत देशात....................

साध्या नोकरीसाठीहि मागतात लाखो
कोणाचीही निवड होते गुणवंतांना मिळतो खो
पदवीधरही रखवालदार होतात
आपल्या या भारत देशात.................

ऊठ तरुणा आता तरी जागा हो
असा कोमेजून तू जाऊ नको
लढा देणे आहे तुझ्याच हातात
आपल्या या भारत देशात.....................

field_vote: 
1.666665
Your rating: None Average: 1.7 (3 votes)

प्रतिक्रिया

दुधापेक्षा महाग आहे दारू

तुम्हाला 'दुधापेक्षा स्वस्त आहे दारू' असं म्हणायचं आहे का? पण तेही खरं नाही. देशी दारूसुद्धा चार पाच पट किमतीला मिळते हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलासुद्धा ही ओळ कडव्याच्या संदर्भात समजली नाही. आणि आता कवीने "हाच अर्थ अपेक्षित आहे" याबाबत खात्री दिल्यानंतर टंकनदोष मानून उलट अर्थही घेता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेशजी धन्यवाद,
मला दुधापेक्षा दारू महाग हेच म्हणायचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी अात्ताच Waitrose या इंग्लंडमधल्या वाणसामान विकणाऱ्या दुकानाच्या web-site वर जाऊन पाहिलं. ते दूध लिटरला १ पाउंड किमतीला विकतात, अाणि स्वस्तातली स्वस्त वाईनदेखील लिटरला ४-५ पाउंड पडते. तेव्हा इंग्लंडात दुधापेक्षा दारू महाग अाहे असं दिसतं. जर भारतातही असंच असेल, तर कवितेच्या पाचव्या अोळीत म्हटल्याप्रमाणे हे पाश्चाती अनुकरण असावं. शेवटच्या कडव्यात म्हटल्याप्रमाणे तरुणांनी जागं होऊन याबाबत लढा द्यायला हवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

शेवटच्या कडव्यात म्हटल्याप्रमाणे तरुणांनी जागं होऊन याबाबत लढा द्यायला हवा.

अगदी खरे आहे.

या निमित्ताने बिरबलाची एक गोष्ट आठवते. त्यात एका रेषेची लांबी न बदलता तिला अधिक लांब की कमी लांब काहीतरी करण्याचा नुस्ख़ा होता.

याच धर्तीवर उपरोल्लेखित समस्येवर एक तोडगा सुचवावासा वाटतो. तो म्हणजे, दारूची किंमत कमी करून दुधाच्या किमतीपेक्षा खाली आणता आली तर उत्तमच, पण काही कारणास्तव जर का ते शक्य नसल्यास, किमानपक्षी दारूची किंमत आहे तेथेच स्थिर ठेवून दुधाची किंमत अवाच्या सवा वाढवून दारूच्या किमतीहून अधिक करावी.

संबंधित अधिकारी या सूचनेकडे केवळ लक्षच नव्हे, तर तिजवर कार्यवाही करून आपल्या प्रखर राष्ट्रभक्तीची साक्ष देतील काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद, जयदिपजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आशावादी कविता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

'न'वी बाजु नि धनंजय धन्यवाद,
धनंजयजी दुधापेक्षा महाग दारु असे म्हनायचे कारण असे की मि स्वता शेतकरी आहे.नि दुध ऊत्पादीत करण्यासाठी किती कष्ट असतात हे मला चांगलेच माहीत आहे. शिवाय दुध अतिशय पौष्टीक असुन ते स्वस्त आहे नि दारू ही घातक असुनही ती महाग आहे.घातक पदार्थाचे ऊत्पादन करणारे लाखो कमवतात नि पौष्टीक ऊत्पादन करणारे आज कर्ज बाजारी आहेत.
शिवाय मी कमी शिक्षण असलेला एक शेतकरी आहे. त्यामूळे काही चुका असल्यास मार्गदर्शन अपेक्षीत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखादी वस्तू स्वस्त की महाग, अाणि ती बनवणारा माणूस कमी पैसे मिळवतो की जास्त या दोहोंतला संबंध सरळ नसतो. त्या वस्तूचा उत्पादनखर्च किती, वाहतुकीचा खर्च किती, मध्ये दलाल किती अाहेत, वस्तूचा खप किती होतो अाणि किंमत कमीजास्त झाली तर खपात किती फरक पडेल, तीच वस्तू बनवणारे अाणखी किती लोक अाहेत, त्या वस्तूवर लावला जाणारा कर किती अाहे, या अाणि अशा अनेक गोष्टींवर ते अवलंबून असतं.

उदाहरणार्थ, स्कॉटलंडमध्ये सरोवरांचं पाणी वापरून लहानलहान डिस्टिलरीस् मध्ये व्हिस्की बनवली जाते. स्कॉचच्या गुणवत्तेचा बोलबाला असल्यामुळे मागणी मोठी असते, अाणि उत्तम प्रतीची स्कॉच तशी महाग असते. पण प्रत्यक्षात तिथे मेहनतीचं काम करणारे लोक फारसे श्रीमंत नसतात, किंवा खरंतर कसेबसे मध्यमवर्गीय असतात. भारतातही अांबे, काजू, डाळिंबं अशा गोष्टी महागच अाहेत, पण या गोष्टी पिकवणारे शेतकरी अतोनात पैसेवाले असतात असं नाही.

समजा भारतात दूध महाग झालं, तर त्याचा शेतकऱ्याला फायदा होईलच अशी मुळीच खात्री नाही. लोक दूध अाणि दुधाचे पदार्थ घेणं कमी करतील, दुधाची बाजारपेठ कोसळेल अाणि दूधउत्पादक शेतकऱ्याचा धंदा बसेल, अशीही शक्यता अाहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

पाषाणभेदजी धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद्,जयदीपजी,तुम्हि म्हणता ते खरे आहे.मी कमी शिकलेला असल्यामुळे माझे विचार तेवढे पक्व नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"दुधाहून मोलाची आहे दारू"
असा शब्दप्रयोग केला, तर तुम्ही म्हणता तो मथितार्थ पोचतो. "मोल" हा शब्द निव्वळ पैशापेक्षा भावनिक महत्त्व दाखवतो. कवीला म्हणायचे आहे की भारतात आज दारूला दुधापेक्षा जास्त महत्त्व आहे, आणि ही परिस्थिती अयोग्य आहे, असे कवी म्हणतो आहे. "किंमत" मध्ये "पैशांचा विनिमय", हा अर्थ अधिक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुचवणि बद्दल धन्यवाद, धनंजयजी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0