देव नाही देवळात
देव आहे, का देव नाहीच !
एक शंका घुटमळणारी,
सदैव मनाला पोखरत आहे -
देवळाबाहेर लंगडा माणूस
एका आंधळ्याच्या ताटलीत
आदबीने जवळचे नाणे टाकत आहे -
हे असे का, ते तसे का
अपंग नसतांना माझे मन
पंगु बनायला सरावत आहे -
देव जवळून गेला तरीही
रांगेतल्या लोकांसोबत
आस्तिक-नास्तिक चर्चा रंगत आहे !
.
प्रतिक्रिया
म्हणून म्हंतो अॅग्नॉस्टिक
म्हणून म्हंतो अॅग्नॉस्टिक बना
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आस्तिक-नास्तिक चर्चा रंगत आहे
आस्तिक-नास्तिक चर्चा रंगत आहे !
चर्चा रंगण्यापेक्षा अंतर्मुख होऊन विचार करयला हवा
सुंदर. आमच्या लेखीही देव
सुंदर. आमच्या लेखीही देव देवळात नाही.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही