युं ही...

मित्रांनो, आज मी माझ्या आवडत्या ह्या गाण्याबद्दल लिहीणार आहे. 'तनु वेड्स मनू' या चित्रपटातील "युं ही' हे एक सुरेख आणी तरल गाणं.

लंडनहुन लग्नासाठी मुलगी बघायला आलेला मनू तनुला बघता क्षणी पसंत करतो पण तनुने नकार दिल्यामुळे व्यथित झालेला मनू तिला विसरु शकत नाहिये. आईवडीलांबरोबर तो अजुन काही मुली बघायला जातो खरा पण काही ना काही कारणांनी पुन्हा पुन्हा तनु त्याला भेटत राहते आणी मनूला पुन्हा पुन्हा तिच्या होकाराची आस लागुन राहते. अशा या पार्श्वभुमीवर मोहित चौहान हे गाण घेउन आपल्यासमोर येतो.

कितने दफे दिल ने कहा, दिल की सुनी कितने दफे
वैसे तो तेरी ना में भी मैने ढूंढली अपनी खुशी, तु जो गर हां कहे तो बात होगी और ही
दिल ही रखने को कभी उपर उपर से सही कह दे ना हां, कह् दे ना हां युंही

खर तर तनुने नकार दिलाय ही वस्तुस्थिती आहे, पण माझं मन मात्र हे मान्य करायला तयार नाहीये. तसं मी मझ्या मनाला समजावलं आहे की बास, संपला तुझा विषय; तु माझी होणे नाही. पण वेडं मन माझं, त्याला अजुनही आशा वाटतीये की काही चमत्कार होईल आणी तुझा होकार येईल. आणी खरं सांगु का, माझ्या मनासारखच मलाही वाटतय की तुझा होकार यावा आणी हे आयुष्यच बदलुन जावं. पण असं होणं शक्य नाही हेसुद्धा तितकच खरं. म्हणुनच, कमीतकमी माझं मन राखण्यासाठी खोटं खोटं का होईना एकदा तरी हो म्हण?

कितने दफे हैरां हुआ मै ये सोचकर,
उठती है ईबादत की खुशबूएं क्युं मेरे ईश्क से?
जैसे ही मेरे होंट ये छु लेते है तेरे नाम को
लगे के सजदा किया कह के तुझे शबद के बोल दुं
ये खुदाई छोड के फिर आजा जमीं पे
और जा ना कहीं, तु साथ रह जा मेरे

प्रेमाबद्दल अनेक कवींनी, लेखकांनी बरच काही लिहुन ठेवलय. आपला प्रेमिक किंवा प्रेमिका देवाच्या रुपात दिसणंही त्यातलचं एक. मग ते तुझं में रब दिसणं असो किंवा तेरा सजदा असो. सोहनी महिवाल मधे नाही का सनी एका गाण्यात म्हणतो, रब से जियादा तेरा नाम लेता हूं, रब मुझे माफ करे, मेरा ईन्साफ करे. तिच्यावर माझं प्रेम इतकं जास्त आहे की मी आजकाल देवापेक्षा जास्त तिचचं नाव घेतो. मग मी तिलाचं माझा देव का बरं मानु नये? आता आपला मन्या तरी याला अपवाद कसा असेल बरं? तो म्हणतो, तुला पाहिल्यापासुन मला राहुन राहुन एका गोष्टीच आश्चर्य वाटतय की प्रत्येक वेळी तुझं नाव घेताना मला ईतकं पवित्र का वाटतं? तुझं नाव घेतल्याबरोबर मला एखादी प्रार्थना म्हटल्याचं सुख का बर मिळतं? तर आता तु हा देवपणा सोड आणी माझा देव्हारा सोडुन माझ्या मनात रहा.

कितने दफे मुझको लगा तेरे साथ उड़ते हुए? आसमानी दुकानो से ढूँढ के पिघला दूँ मैं चाँद ये,
तुम्हारे इन कानों मे पहना भी दूँ बूंदे बना, फिर यह मैं सोच लूँ समझेगी तू जो मैं ना कहे सका
पर डरता हूँ अभी ना यह तू पूछे कही, क्यूँ लाए हो ये, क्यूँ लाए हो ये... यूँ ही
कितने दफे दिल ने कहा, दिल की सुनी कितने दफे?

आशिकांनी आणी प्रेमिकांनी प्रेयसीला चांद आणुन देणं किंवा सितारोंसे मांग सजवणं वगैरे आपण ऐकलं आहेच. पण इथे मात्र कवी चंद्राला वितळवुन त्याचे कानातले करुन प्रेयसीला घालायचे म्हणतोय!! भई इसको कहेते है आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. एवढं केल्यावर तरी तिला कळेल की मला तिच्याविषयी नक्की काय वाटतं ते? पण जाउ दे, एवढ करुन जर तु विचारलस की कशासाठी आणले आहेत ते कानातले तर मी काय डोंबल उत्तर देउ? जे सांगण्यासाठी एवढा आटापिटा करायचा ते तिला समजायला तरी हवं ना?

मला राजशेखर जे या गाण्याचे लेखक आहेत, त्यांचं स्पेशल कौतुक करावसं वाटतं. गाण्याच्या दोन्ही कडव्यांमधे त्यांनी अप्रतिम उपमा वापरल्या आहेत. पहिल्याच चित्रपटात त्यांनी या गाण्यासहीत पिया ना रहे (रुपकुमार राठोड) सारखं अजुन एक सुंदर गाणं दिलं आहे आणी मोहित चौहानने हे गाणं सुंदर पेश केलं आहे.

मंडळी, अशा प्रकारचं हे माझं पहिलचं लिखाण. पहिलं म्हणजे अक्षरशः शाळेत निबंध लिहिल्यानंतर डायरेक्ट हेच. (स्माईल) हे गाण्याचं रसग्रहण नाही किंवा संगीतसमीक्षा ही नाही (ते तात्यांसारखे संगीतातले जाणकारच करु जाणो). मला संगीतातलं ओ की ठो कळत नाही, पण जे कानाला गोड वाटतं ते ऐकतो आणी मला आवडलेलं काही सर्वांना आवडेलच अस नाही याचीही मला जाणीव आहे. आज पिया ना रहे आणी युं ही ह्या दोन्ही गाण्यांवर लिहिण्याची ईच्छा झाली (पहिलीच वेळ असल्याने दोघातल सोप्प गाण निवडलयं) म्हणुन लिहीलं, इतकचं.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

मोहित चौहानचा आवाज मला आवडतो; हे गाणं पहिल्यांदाच ऐकलं, आवडलं. सुचवणीबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.