फरक कुठे पडला आहे

लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो|
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो|
आधराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे|
बापलेकाच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे|

लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचो|
नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचो|
परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली|
मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली|
पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे|
मायलेकाच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे|

तेव्हा भाउबीजेला बाबंकडून ओवळणीचे पैसे घ्यायचो|
ओवळणी द्यायच्या आधी ताईला खूप चिडवायचो|
कमावता झाल्यापासून तिला काय पाहिजे विचारतो|
मात्र ब्लेकबेरीची मागणी नोकियावर भागवतो|
ओवळणी बदलली तरी फरक कुठे पडला आहे|
राखीच्या धग्यांमधला प्रेमळ बंध तोच आहे|

लहानपणी धाकटयावर दाद्ागिरी करायचो|
पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचो|
काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेला निघाला|
पायाशी झुकून दादा आशीर्वाद दे म्हणाला|
थोरला असो की धाकटा फरक कुठे पडला आहे|
भावाकरता वाटणारी कळकळ तीच आहे|

कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा|
बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा|
आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येतो|
सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो|
शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे|
मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे|

जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडतो|
मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो|
-
परिमल विश्वास गजेंद्रगडकर

१२/३/२०११

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

प्रतिक्रिया

ऐसीअक्षरे वर स्वागत!
ही कविता ठिक वाटली. अधिक उत्तमोत्तम कविता वाचायला आवडतील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्वागत. आमचे येथे, नवीन माणसाला, विडंबन करुन धक्का द्यायची पद्धत आहे. तरी हलकेच घ्यावे.

पूर्वी मी तुझा हात धरून गुत्त्यात जायचो|
तुझ्या पैशाने मनसोक्त ऐश करायचो|
आताही मी तुझ्याबरोबर बारमधे जातो|
दोन पेग जास्त झाल्यावर तुला हात देतो|
आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे|
मित्रांच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे|

तरुणपणी चौपाटीवर तिच्याकडे भलते हट्ट धरायचो|
नाही म्हणाली तरी माझे सगळे हट्ट पुरवायचो|
परवा चौपाटीवर तिनेच ओळख दाखवली |
नवर्‍याला हाय केले तेव्हा ती गोड हसली|
बाजुला बसणारा बदलला, तरी फरक कुठे पडला आहे|
जुन्या नात्यातला कायेचा ओलावा तोच आहे|

तेव्हा तुझ्यावर पाचशेचा दौलतजादा करायचो|
तुझ्या ठेवणीतल्या लावण्यांना रंगून दाद द्यायचो |
बायको झाल्यापासून तुला काय पाहिजे विचारतो|
मात्र मघईची मागणी साध्या 'कलकत्ता' वर भागवतो|
ऐपत बदलली तरी फरक कुठे पडला आहे|
इष्काच्या धाग्यामधला शरीरबंध तोच आहे|

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरेच्चा पुणे स्टेशन आल वाटत!तरी हलकेच घ्यावे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुप सुंदर आहे आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहे कविता... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."