कोलंबस डे

आजचा दिवस अमेरिकेत कोलंबस डे म्हणून साजरा होतो आहे. अमेरिकेच्या काही राज्यांमध्ये आणि अमेरिकेच्या केंद्रसरकारला आज सुटी आहे.
कोलंबसाचा इतिहास , "कोलंबसाचे गर्वगीत" या सार्‍या गोष्टी आपण लहानपणी ऐकतो आणि शिकतोच. या न्यायाने हा विषय आपल्या परिचयाचा आहे.

गेल्या पन्नास वर्षांमधे हॉवर्ड झिन्न आणि त्यांच्या सारख्या इतिहासकारांनी कोलंबस (आणि त्याच्या अनुषंगाने येणार्‍या इतिहासाचे ) पुनर्मूल्यांकन केले आहे. हा सर्व इतिहास शोषणाचा, साम्राज्यवादाचा, वंशवादाने बरबटलेला कसा आहे , मानवी मूल्यांना काळिमा फासणारा कसा आहे याचं चित्रण झिन्न यांच्या A People's History of the United States या ग्रंथामधे मिळतं.

आज माझ्या एका फेसबुकीय मित्राच्या भिंतीवर प्रस्तुत कविता मिळाली. ती त्याचीच की आणखी कुणाची ते ठाऊक नाही.

On Columbus Day

In school I was taught the names
Columbus, Cortez, and Pizzaro and
A dozen other filthy murderers.
A bloodline all the way to General Miles,
Daniel Boone and general Eisenhower.

No one mentioned the names
Of even a few of the victims.
But don't you remember Chaske, whose spine
Was crushed so quickly by Mr. Pizzaro's boot?
What words did he cry into the dust?

What was the familiar name
Of that young girl who danced so gracefully
That everyone in the village sang with her--
Before Cortez' sword hacked off her arms
As she protested the burning of her sweetheart?

That young man's name was Many Deeds,
And he had been a leader of a band of fighters
Called the Redstick Hummingbirds, who slowed
The march of Cortez' army with only a few
Spears and stones which now lay still
In the mountains and remember.

Greenrock Woman was the name
Of that old lady who walked right up
And spat in Columbus' face.
We must remember that, and remember
Laughing Otter the Taino who tried to stop
Columbus and who was taken away as a slave.
We never saw him again.

In school I learned of heroic discoveries
Made by liars and crooks. The courage
Of millions of sweet and true people
Was not commemorated.

Let us then declare a holiday
For ourselves, and make a parade that begins
With Columbus' victims and continues
Even to our grandchildren who will be named
In their honor.

Because isn't it true that even the summer
Grass here in this land whispers those names,
And every creek has accepted the responsibility
Of singing those names? And nothing can stop
The wind from howling those names around
The corners of the school.

Why else would the birds sing
So much sweeter here than in other lands?
---------------------------------------------------------------------------

शाळेत असताना मला
कोलंबस, कोर्टेझ आणि पिझारो यांच्यासारख्या
डझनभर घृणास्पद खुन्यांबद्दल शिकवलं गेलं होतं.
जनरल माईल्स, डॅनियल बून आणि जनरल आयसेनहॉवर
थेट यांच्यापर्यंत पोचलेली रक्ताची नदी.

कुठेही नाव घेतलं नाही
बळी गेलेल्या एकाचंही.
पण तुम्हाला चास्की नाही आठवत,
ज्याचा कण्याचा पिझारोच्या बूटाने चुरा केला ?
जेव्हा धुळीत मिळाला तो तेव्हा
तोंडात काय शब्द आले असतील त्याच्या ?

अगदी ओळखीचं वाटावं अशा त्या मुलीचं नाव काय होतं
इतक्या नजाकतीने नाचत होती जी
आणि जणू सारं गावच तिच्या गाण्यात सामील झालं होतं -
कोर्टेझच्या तलवारीने हात कलम व्हायच्या आधी,
जेव्हा तिच्या प्रियकराला जाळताना गयावया करत होती ती ?

त्या तरुणाचं नाव होतं "मेनी डीड्स"
आणि लढवय्यांच्या एका टोळीचा प्रमुख होता तो
'लालकाठी हमिंगबर्डस्" नावाच्या
ज्यांनी कोर्टेझच्या सेनेला इंगा दाखवला
निव्वळ काही भाले आणि काही दगडांनी
- कडेकपारीत जे आता निश्चल पडून आहेत.

"ग्रीनरॉकची बाई" म्हणून ओळखली जाणारी ती म्हातारी
जी कोलंबसजवळ चालत गेली
आणि थुकली त्याच्या तोंडावर.
आपण हे लक्षांत ठेवलंच पाहिजे आणि
लक्षांत ठेवायला हवेत
"हसणारा ओटर" आणि "टेनो"
ज्यांनी कोलंबसला थांबवायचा प्रयत्न केला आणि
ज्यांना गुलाम बनवलं गेलं.
आपल्याला नंतर कधीच दिसले नाहीत जे.

शाळेत असताना मला शिकवलं
लफंग्या आणि खोटारड्यांनी लावलेल्या शोधांबद्दल.
कोट्यावधी मृदू स्वभावाच्या आणि सच्च्या लोकांच्या
असामान्य धैर्याची कुणालाही कसली खबर नाही.

चला तर मग आपल्या करता एक सुट्टीची घोषणा करूया
आणि कोलंबसाने घेतलेल्या बळींकरता
काढू एक मिरवणूक
जी चालू राहील आपल्या नातवंडा-पणतवंडांपर्यंत
ज्यांची नावं आपण ठेवू त्या हुतात्म्यांवरून.

कारण खरं नाहीये का हे , की या भूमीत
अगदी साध्या उन्हाळात उगवणारी गवताची पातीसुद्धा
त्यांची नावं कुजबुजतात
आणि इथला अगदी एखादा छोटा झर्‍यानेरासुद्धा
त्यांच्या नावे गीतं गायचा वसा घेतला आहे ?

नाहीतर इथल्या आकाशातले पक्षी
इतर ठिकाणापेक्षा अधिक गोड गाणी का गायले असते ?

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

अनुवाद आवडला.

हल्ली अमेरिकेत काही राज्यांत/कौंटीत/शहरांत, कोलंबस दिनाऐवजी स्थानिक लोक दिन म्हणून साजरा होऊ लागला आहे, ही चांगली गोष्ट वाटते.

विकीवर खालील माहिती मिळाली -

In 2007, Dane County, Wisconsin, Supervisor Ashok Kumar replaced Columbus Day with Indigenous People's Day.[25] The city of Berkeley, California has replaced Columbus Day with Indigenous People's Day since 1992,[26] a move which has been replicated by several other localities.[22] Two other California cities, Sebastopol and Santa Cruz, now celebrate Indigenous People's Day.[22] South Dakota renamed the holiday "Native American Day".[27] Various tribal governments in Oklahoma designate the day "Native American Day", or name the day after their own tribe.[28] The Navajo Nation replaced Columbus Day with Navajo Nation Sovereignty Day, which is observed on April 4.[citation needed

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.........सर्व इतिहास शोषणाचा, साम्राज्यवादाचा, वंशवादाने बरबटलेला कसा आहे , मानवी मूल्यांना काळिमा फासणारा आहे........

खरे आहे सर्वच लोक इतिहासाचा अभ्यास करतात असे नाही त्याकरता अश्या कविता असणे हे योग्यच!

अवांतर - कोलंबस म्हणल्यावर आम्हाला जीन्स चित्रपटातले रेहमान - सोनु निगमचे गाणे आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरे आहे. जाणीवा प्रगल्भ करणारी कविता. मुसुंचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

मुळ कविता अधिक आवडली

गयावया करत होती ती ?
दिसले नाहित जे

अशी सर्वनामे शेवटी आणण्याचे काही खास प्रयोजन? यामुळे (मलातरी) अनुवाद काहिसा कृत्रिम वाटला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आणि उत्तम अनुवाद.

No one mentioned the names
Of even a few of the victims

ओनियनचे हे विडंबन आठवले.

याच संदर्भातली अलीकडची अजून एक बातमी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान रे सुक्तमुनित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली. अनुवादही समर्पक वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवी जिमी डर्हम आहे - असा जालीय संदर्भ सापडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0