सखे ये लवकरि परतून

सखे ये लवकरि परतून |
अशी कशी गेलीस,
मनाला चटका लावुन|
सखे ये लवकरि परतून ||

हा दुरावा नको मज आता |
घालमेल होते तु दुर जाता |
वाट पाहूनी डोळे जाती थकून|
सखे ये लवकरि परतून ||

जिवनाचे कोडे ना मज कळले|
प्रेमाचे तर त्याहून निराळे |
आठवन येता हळ्वे होई मन|
सखे ये लवकरि परतून ||

नकळत एकमेकी गूंतलो |
जन्मजन्माचे सोबती जाहलो|
ताटातूट ही नाही होत सहन |
सखे ये लवकरि परतून ||

सुखदुखाच्या या वाटेवरती |
प्रवास करू धरुनी हात हाती |
साथ न सोडण्याची घेऊया आण |
सखे ये लवकरि परतून ||

field_vote: 
1.5
Your rating: None Average: 1.5 (2 votes)