मनाला समाधान देणारी घटना (आपले मत अपेक्षित आहे )

हि कथा वाचल्यानंतर आपल्याला काय वाटते हे नक्की सांगावे
***************************************************************
तो काळच असा होता कि त्यावेळी माझे मन पूर्णपणे अध्यात्ममय झाले होते. दर वर्षी श्रावणात ग्रंथ वाचण्यासाठी गावात मला बऱ्याच ठिकाणी मागणी असायची. (ऐकाणारांच्या मते ) मी वाचून अर्थ सांगितला कि सगळे समजते. त्यामुळे रात्री दोन ठिकाणी आणि सकाळी एका ठिकाणी ग्रंथ वाचण्यासाठी मी जात असे. याच्यापेक्षा जास्त वेळ मी देऊ शकत नसे. तर त्यावेळी मी पूर्ण अध्यात्म मय झालो होतो. शिवाय पहिल्यापासून माझ्या मनात भक्तीची खूप आवड निर्माण झाली होती. लहान पणापासून ग्रंथ वाचण्याचा परिणाम असेल कदाचित.
वर्ष दीड वर्ष मी रोज नित्यनेमाने शिवपूजेसाठी मंदिरात जात होतो. पूजा साधीच करायचो पण मन लाऊन करायचो. पूजा झाल्यानंतर अक्षता म्हणून जे तांदूळ असायचे त्यातील थोडे तांदूळ मी बाहेर चिमण्यांसाठी ठेवायचो. (नि त्यामागे दुसरेही एक कारण असे होते कि चिमण्या मंदिरात येऊन मी पिंडीवर ठेवलेले तांदूळ खाऊ नये ) पण त्या चिमण्याच, बाहेरचे तांदूळ संपल्यानंतर त्या आत यायच्या नि पिंडीवरील तांदूळ खाऊन टाकायच्या. मी पिंडीवर अतिशय सुरेख मांडलेले तांदूळ विस्कटायचे राग यायचा पण तो गिळावा लागायचा. कारण मनात यायचे कि जर यांच्या रुपात परमेश्वर तांदूळ खायला येत असेल तर (श्रीकृष्णाने नाही का विदुराच्या कण्या खाल्ल्या होत्या ) मगमग जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हि ओवी आठवत घरी जायचो.
असे खूप दिवस चालू होते. नंतर नंतर चिमण्यांची नि माझी जणू चांगली मैत्रीच झाली कारण माझी पूजा चालू असताना त्या अगदी माझ्या जवळ यायच्या नि परत उडून त्यांच्या घरात जायच्या त्यांचे घर तिथे मंदिरातच होते. पुरातन असलेले ते दगडी मंदिर होते. त्यामुळे चिमण्यांना राहण्यासाठी खूप (फटी) घरे होती. ग्रंथ वाचण्यामुळे मी बऱ्यापैकी अहिंसावादी झालो होतो. देवाचे सतत नामस्मरण करायचो. भजन म्हणायचो नेमाने आळंदी पंढरीची वारी करायचो. आणि हि शंकराची नित्य पूजा.

तर रात्री भजनाला जागल्यामुळे मी एकदा उशिरा उठलो. त्यामुळे गडबडीतच आंघोळ उरकली कारण पूजेला शक्यतो मी उशीर करत नसायचो. कपडे घालण्यासाठी मी बाहेर आलो तो तेवढ्यात चिमण्यांचा चिव चिवट कानावर आला. आणि दोन तीन चिमण्या माझ्या अगदी डोक्याजवळ येऊन ओरडू लागल्या. मी जरा चक्रावलोच कारण आमच्या घरात चिमण्या कधी येत नसायच्या आज या कश्या घरात घुसल्या.

मी कपडे घाले पर्यंत त्यांचा चिवचिवाट चालूच होता. कपडे घालता घालता माझ्या डोक्यात एक विचार सर्रकन आला. या मंदिरातील चिमण्या तर नव्हेत. आणि त्या च इकडे आल्या नसेल पण मग त्या एवढ्या दूर कशाला आल्या असतील. त्यांच्यावर काही संकट तर आले नसेल ना? असा विचार माझ्या डोक्यात आला.

नामस्मरण करत कपडे घालून पूजेचे साहित्य घेऊन मंदिरात जायला निघेपर्यंत त्या चिमण्या घरातच होत्या. नामस्मरण करत चाललो असल्यामुळे मंदिर येईपर्यंत मी चिमण्यांना विसरलो होतो. मंदिरात प्रवेश केला नि मला धक्का बसला. कारण चिमण्यांची अतिशय छोटी छोटी दोन पिल्ले खाली पडली होती. अतिशय नाजूक नि सुंदर असणाऱ्या त्या पिलांना पंख देखील फुटले नव्हते. खाली दगडी फरशीवर त्यांची वळवळ चालू होती.

आता मला वाटू लागले कि घरी आलेल्या चिमण्या मंदिरातीलच असाव्यात मदतीसाठी त्यांनी माझ्याकडे धाव घेतली असावी. पिलांना उचलून त्यांच्या घरट्यात ठेवण्यासाठी मी झटकन पुढे झालो.त्यांना हात लावणार तेवढ्यात मनात विचार आला. यांना स्पर्श करावा कि नको. कारण कुठेतरी ऐकले होते कि वाचले होते. कावळा किंवा चिमणी यांना माणसाचा स्पर्श झाला तर त्यांचे भाऊबंध त्यांना मारून टाकतात.

तसाच थांबलो विचार करू लागलो काय करावे याचा, त्या छोट्या जीवांकडे पाहून जीव तुटत होता. पिलांना घरट्यात जर ठेवले नाही तर त्यांचा म्र्युत्यू निश्चित होता. एक मन म्हणत होते कि चिमण्या मदतीसाठी बोलवायला घरी आल्या म्हणाल्यावर आपण स्पर्श केला तरी त्या पिलांना मारणार नाही. परंतु ह्या सगळ्या जर तर च्या गोष्टी होत्या मुक्या जीवांच्या भावना काय आहेत ते कसे कळणार.

विचार करता करता माझे लक्ष्य कोपऱ्यात गेले तिथे एक पत्रिकेचा कागद होता. लगेच तो घेतला नि त्याचे दोन भाग केले एक भाग पिलाच्या खाली अगदी हलक्या हाताने सारला.दुसरा भाग पिलू पडू नये म्हणून आडवा धरला. आणि उठून अगदी अलगद ते पिलू घरट्यात सोडले. दुसऱ्या पिल्लाच्या बाबतीत तीच कृती केली.आणि दोन्ही पिल्ले त्यांना माझा स्पर्शही न करता घरट्यात ठेवण्यात मी यशस्वी झालो मनाला खूप समाधान वाटले.

हे सगळे करेपर्यंत चिमण्यांचा चिवचिवाट चालूच होता. घरट्यात पिले ठेवल्यानंतर तो कमी झाल्यासारखे वाटले.

नंतर मी जवळ जवळ अर्धा तास मन लाऊन पूजा केली. आरती झाल्यानंतर मी घरट्याकडे पहिले नि इतका आनंद झाला कि काय सांगू कारण त्या पिलांची आई त्यांना काहीतरी खायला घेऊन आली होती. आणि ती पिल्ले आपली इवलीशी चोच वासून बाहेर डोकावत होती. चिमणीने आपल्या चोचीतला घास पिल्लांच्या चोचीत सारला होता.

मनाला आज कधीही न वाटणारे एक अलौकिक समाधान वाटत होते.

हा एक छोटा प्रसंग वाचून तुम्हाला काय वाटले.

माझ्या घरात घुसून चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या मंदिरातीलच असतील का?

मदतीसाठी मंदिरातील चिमण्या माझ्या घरी आल्या असतील का?

किंवा

घरातील चिमण्या नि मंदिरातील चिमण्या वेगवेगळ्या असतील आणि हा निव्वळ योगायोग असू शकेल काय?

आपले मत अपेक्षित आहे

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

प्रतिक्रिया

कथा रोचक आहे.

बाकी, चिमण्या कुठल्या आहेत त्याने काय फरक पडतो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद्,ऋषीकेशजि

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0