संग्राह्य इंग्रजी पुस्तके

पुढिल-आठवड्यापर्यंत आमच्या हाफिसात 'स्ट्रॅन्ड' ने सवलतीत पुस्तक विक्री ठेवली आहे. ४०% ते ८०% इतकी घसघशीत सुट असणार आहे. तिथे केवळ इंग्रजी पुस्तके विक्रीसाठी असणार आहेत. अर्थातच ही संधी न दवडता जमतील (म्हणजे आर्थिक दृष्ट्या परवडतील ;)) तितकी वाचनीय + संग्राह्य पुस्तके घेण्याचा विचार आहे.

इथे मला पुढील क्याटेगरीतील वाचनीय +/ संग्राह्य पुस्तकांची सुचवणी हवी आहे:
-- इतिहास
-- करंट अफेअर्स
-- फिक्शन
-- क्लासिक लिटरेचर
-- रेफरन्स बुक्स
-- बालसाहित्य
(शिवाय म्यानेजमेन्ट, सेल्फ हेल्प वगैरे असणार आहे पण मला त्यात फारशी रुची नाही Wink )

पुस्तकाच्या नावा सोबत थोडक्यात सारांश किंवा एखाद-दोन ओळीत का होईना परिचय करून द्यावा अशीही विनंती करतो.

तुम्ही जमतील तितकी पुस्तके सुचवावीत. त्यातील जी मिळतील + आवडतील (+परवडतील) ती मी घेईनच. मात्र या निमित्ताने इतरांना खरेदी करतेवेळी लक्षात घेण्यासारख्या चांगल्या पुस्तकांचा नावाचे संकलन इथे होईल!

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

माझ्या आवडीची पण अद्याप संग्रहात नसलेली पुस्तकं सुचवावीत असा मोह होतो आहे - म्हणजे ते पुस्तक पाहिजे तेव्हा कुणाकडे मिळेल हे माहिती आहे हा फायदा आहेच. Smile

ही पुस्तकं मिळाली तर नक्की घ्या.

1. Yes Minister/ Yes Prime Minister (Lynn and Jay: BBC)
2. Brief History of Time (Stephen Hawlking)
3. The Story of Philosophy (Will Durant)
4. The Best of O'Henry
5. Maverick / The Seven Days Weekend (Ricardo Semler)
6. James Herriot books
7. I too had a Dream (Verghese Kurien)
8. Silent Spring (Rachel Carson)

दहा पुस्तकं झाली, नाही का! थांबते आता.
परिचय पण करुन द्यायचा राहिलाच! जमेल तसा देईन - हाच प्रतिसाद संपादित करुन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयला!!!!मस्त मज्जाय की !!
हृषिदा,एक सांग तुझे हापीस कुठाय??बाहेरच्यांनी आले तर चालेल का??

पुस्तकांचे english वाचन फार कमी आहे जे आवडलेत ते सांगतो...
solstice at panipat-uday kulkarni
पानिपतच्या तिसरी लढाईवर आहे .लेखकाने घेतलेली मेहनत पुस्तक वाचताना जाणवेलच.
Cannons Versus elephants: The Bhattles Of Panipat by Harjeet Singh

india after gandhi-ramchandra guha

फिक्शन मध्ये robin cook,jefry archer आणि michael crichtonची पुस्तके बेष्ट असतात ....

मी तुमच्या जागी असतो न तर मराठी किंवा इतर अनुवाद बघितले असते आणि मुळ पुस्तक घेतले असते कारण मुळात पुस्तक बाप असल्या शिवाय कोणी अनुवादाला घेणार नाही आणि कोणी तो छापणार पण नाही ..:ड
चांगल्या अनुवादित पुस्तकान बद्दल इथे माहिती मिळेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त रे ऋ. खूप नशीबवान आहेस. नाहीतर ४० - ८० % सवलत हे आजच्या महागाईच्या दिवसांत स्वप्नवतच आहे Smile
असो. माझी रेकमेंडेशन्स

क्लासिक्स

किंग्स सॉलोमन माईन्स - रायडर हॅगार्ड
शि (She) - रायडर हॅगार्ड
अजून क्लासिक पुस्तके या दुव्यावर बघ.

द सेकंड सेक्स - सिमोन द बोव्हुआर (आदितीने वाचले आहे, ती तुला या पुस्तकाबद्दल जास्त चांगले सांगू शकेल)
बाकी मिलेनियम ट्रिलॉजी (द गर्ल हू सिरिज) , मुराकामीची नॉर्वेजियन वूड
इंग्रजी वाचन ज्याचा प्रांत आहे त्या ऑरागार्न या आपल्या सदस्याला जागे कर. तुला नक्की काय घ्यावे असा प्रश्न पडेल Wink

तूर्तास एवढे पुरे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

en.m.wikipedia.org/wiki/List_of_best-selling_books या लिस्ट मधे नाव असलेली सगळी पुस्तकं कमीत कमी एकदा वाचावीत अशी नक्कीच आहेत.
मी वाचलेली आणि संग्राह्य वाटलेली काही पुस्तके/लेखक
१. द पिक्चर ऑफ डोरीयन ग्रे
२. गॉन विथ द विँड
३. शेरलॉक होम्स कंप्लिट कलेक्शन
४. हेरी पॉटर सिरीज
५. मिलेनिअम सिरीज
६. अगाथा ख्रिस्टी
७. वुडहाउस
८. दास्तोयेवस्की
९. टॉलस्टॉय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बर्ट्रांड रसलचं 'Religion and Science' हे पुस्तक 'इतिहास' प्रकारात सुचवेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रसल -
ABC of Relativity
An Outline of Philosophy
A History of Western Philosophy

ही पुस्तके फिलॉसफी, विज्ञान यांतील मेळ समजावून देणारी आहेत. मिळाली तर पहा.
स्ट्रॅण्ड च्या स्टॉलवर अशा प्रकारची पुस्तके मिळणे थोडे कठीण वाटते. डिक्शनर्‍या खूप सवलतीत मिळतात. कॉफी टेबल बुक्स ही भरपूर सवलतीत मिळतात, एखादे घ्यायला हरकत नसावी. बाकी लेटेस्ट नॉन फिक्शन्स भरपूर मिळतील असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बेरिंग गोल्ड यांचा 'द अ‍ॅनॉटेटेड शेरलॉक होम्स' हा एक संदर्भग्रंथ आहे. तो अत्यंत वाईट आहे. तो कुणीही वाचू नये. त्यामुळे तुम्हाला तिथे तो दिसला तर लगेच विकत घ्या आणि मला द्या. चुकूनसुद्धा उघडून बघू नका, नाहीतर पाप लागतं.

राधिका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

वा! अनेक आभार!
यातील उल्लेख केलेली दोन चार आधीच घेतलेली आहेत. बाकी आज किती-कोणती मिळताहेत ते बघतो. सवलत पुढच्या शुक्रवार पर्यंत आहे तेव्हा सुचतील तशी पुस्तके येऊ द्या

@राधिका, पाप लागतं सांगायला अ‍ॅग्नॉस्टिक माणूसच गावला का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"अ‍ॅग्नॉस्टिक" वरून आठवलं...'Gods and godmen of India' हे खुशवंत सिंगांचं पुस्तक संग्राह्य आहे.
हे वाचून आपल्याला पडतात तेच प्रश्न अणखीनही कुणाला पडतात हे वाचून अतिशय आनंद झाला होता..आणि एक प्रकारचा आधार वाटला. "अ‍ॅग्नॉस्टिक" हा शब्द याच पुस्तकातून मी शिकले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'Mr. God, this is Anna' - by Fynn (Sydney Hopkins)
लेखक एकदा फिरत असता त्याला एक आगापिछा नसलेली छोटी मुलगी भेटते. तो तिला घरी घेऊन जातो, साम्भाळ करायला. त्या प्रक्रियेत या मुलीची जगण्याची, इतरांशी वागण्याची स्वयम्भू पद्धत त्याचे आयुष्य बदलून टाकते. पुस्तकातील चित्र रेखाटने माझ्या विशेष आवडीची आहेत.

'Persepolis' - by Marjane Satrapi.
मार्जेन सात्रापी ही इरानमध्ये बालपण घालवलेली आणि नन्तर फ्रांसमध्ये स्थायिक झालेली लेखिका. तिच्या (म्हणजे एका लहान मुलीच्या) दृष्टीकोनातून इरानमध्ये 'शाह'ची पाश्चात्य संस्कृतीकडे झुकणारी राजवट उलथून कट्टर मुस्लिम राजवट आली त्याचे स्थित्यन्तर. नन्तर ती फ्रांस्मध्ये गेल्यावर पुन्हा तिच्या आयुष्यातले बदल, इ. सर्व 'कॉमिक स्ट्रिप' च्या माध्यमातून माण्डले आहे. चित्रे तिनेच काढली आहेत. या पुस्तकावर याच नावाने चित्रपट निघाला आहे. तो देखील पाहण्याजोगा आहे.

'Razor's edge' - by W. Somerset Maugham

कठोपनिषदातील - 'The sharp edge of a razor is difficult to pass over; thus the wise say the path to Salvation is hard' या एका वचनावर आधारित कथा. दुसर्‍या महायुद्धातल्या अनुभवाम्मुळे बधीर, निरर्थक झालेल्या आयुष्यात अर्थ शोधणार्‍या माणसाचा अमेरिका-पॅरिस-जर्मनी-भारत-अमेरिका प्रवास.

'Of human bondage' - by W. Somerset Maugham
घ्या आणि वाचा.

'The World of Origami' - by Isao Honda
होण्डा साहेब वि़ख्यात आहेत. ओरिगामीच्या पद्धती उत्कृष्टरित्या समजावून दिल्या आहेत.

'Norman Rockwell: 332 Magazine Covers'
किंवा नॉर्मन रॉकवेल् ने काढलेल्या चित्राञ्चा कुठलाही सङ्ग्रह मिळाला तरी अवश्य पाहा. याचे एक चित्र म्हणजे एक सम्पूर्ण कहाणी असते. आपल्याकडे शि. द. फडणीसाञ्चे जसे काम आहे, त्या पठडीतले. 'Saturday Evening Post' साठी केलेल्या मुखपृष्ठाञ्चा सङ्ग्रह सङ्ग्राह्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'स्ट्रॅन्ड' सेलचा माझा अनुभव असा आहे की आपल्याला अमुक पुस्तकं हवी आहेत म्हणून तिथे जाण्यात अर्थ नसतो. त्यांच्याकडे त्या वेळी जे स्वस्तात असतं ते तिथे असतं. त्यांच्याकडे स्वस्तात येणारी पुस्तकं ही परदेशातून आलेली रिमेंडर्स असतात - म्हणजे छापलेल्या आवृत्तीतली खप न झालेली आणि साठवणही महाग पडते म्हणून स्वस्तात एकगठ्ठा विकलेली अशी. अनेक माहीत नसलेली पण चांगली पुस्तकं त्यात मिळून जातात. पुठ्ठेबांधणीच्या एरवी महाग असलेल्या पुस्तकांच्या किमतीही स्वस्त असतात. उदाहरणार्थ, आत्ता त्यांच्या संकेतस्थळावर गेलो असता 'द प्रायव्हेट लाइफ ऑफ अ मास्टरपीस' ह्या बीबीसी मालिकेवर आधारित पुस्तकाची पुठ्ठेबांधणीतली आवृत्ती ४०० रुपयांना उपलब्ध आहे असं दिसलं. ती मिळाली तर माझ्यासाठी कृपया एक प्रत घेऊन ठेव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आता तिथुनच जाऊन येतोय.. तुम्ही सांगितलेले पुस्तक सोमवरी शोधतो.

बाकी, त्यांच्याकडे कॅटलॉगच नाहिये Sad
कालच आली पुस्तके म्हणाला.. कॅटलॉग बनेपर्यंत सेल संपेल

वर्गीकरणही ढोबळच केलंय.. कोणत्याही विभागात काहिहि मिळतंय
वर दिलेल्यापैकी आज जो वेळ मिळाला त्यात फक्त 'Mr. God, this is Anna' - by Fynn हे एकच दिसलं.. आणि तेही नॉन-सेल विभागात.

असो. मी आज घेतलेली पुस्तकं
-- The fortune of peace [विविध देशांतील शांतीक्षेत्रात काम करणार्‍यांच्या कार्याचा परिचय जसे आंग स्यु, दलाई लामा ही परिचित नावे याव्यतिरिक्त कंबोडिया, मेक्सिको, आफीकन देश वगैरेंतून कामे करणार्‍या 'आधुनिक गांधीं'ची माहिती

-- The three Sirens(Irving wallace) (फिक्शन)
-- Discovery of child (Maria Montessori) (मॉटेसरीबाईंनी स्वतः लिहिलेलं पुस्तक तेही २०० रुपयात मिळत होतं.. लगेच घेतलं Smile )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Roald Dahl यांचा लघु कथांचा संग्रह मिळतो (साधारण एक/दीड इंच जाड पुस्तक, समग्र नाही पण बर्याचशा कथा यात आहेत). त्यांचंच "बॉय" आणि "गोइंग सोलो" हे आत्मचरित्रात्मक लेखन खूप छान आहे. तसच बालसाहित्य सुद्धा छान आहे: 'चार्ली अ‍ॅन्ड द चॉकलेट फॅक्टरी', ' द विचेस' आणि बरच काही.

आणखीनः
ए पी जे अब्दुल कलाम यांच "विंग्ज ऑफ फायर";
रस्किन बाँड यांची बरीचशी पुस्तकं;
रणजित लाल यांचा 'व्हेन बन्शी किस्ड बिंबो' हा लघु कथा संग्रह (बालसाहित्य): यात पक्ष्यांच्या गोष्टी आहेत;
"कॅल्विन अँड हॉब्ज" समग्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0