बॉम्बे टॉकी

ऑफिसमधल्या बर्‍याच धामधुमीनंतर दोनेक दिवसांपासून थोडा रिकामा वेळ मिळाला. रिकामपणाचे उद्योगही खोळंबले आहेत, पण लॅपटॉपला अत्यंत प्रेमाने वागवल्यामुळे त्याने मुकेपण धारण केलं होतं. त्यामुळे नवीन लॅपटॉप घेतल्यानंतर बर्‍याच दिवसांचे पाहायचे पाहायचे म्हणून कित्येक दिवसांपासून ठेवलेले सिनेमे आधी पाहायचे ठरवलेयत. सकाळीच काही नवीन शोधावं म्हणून पाहात होते. खरंतर काल रात्री नाना पाटेकरचा कुठल्याशा मराठी मंडळातली जुनीपुरानी मुलाखत पाहून हा माणूस इतका शहाणा आहे, तर त्या फालतू हिंदी सिनेमांतून अतिफालतू भूमिका का करतो हा प्रश्न पडला होता. म्हणून पुन्हा एकदा नव्याने त्याचा 'माफीचा साक्षीदार' शोधत होते. तो मिळाला नाहीच, पण त्यानिमित्ताने दुसरेच सिनेमे डाऊनलोड झाले. 'बॉम्बे टॉकीज' बद्दल काही माहिती नव्हतं, पण 'गुलाबी टॉकीज'च्या नावाशी साधर्म्य आणि नावावरून काहीतरी चांगलं असेल असं वाटून तोही डाऊनलोड केला.

पाहायला सुरूवात केली. सर्वात आधी नट-नट्यांची नावं आली. शशी-कपूर जेनीफर म्हणजे चांगलाच असेल पण कदाचित समांतर देखील असू शकेल असं वाटलं. जस-जशा पुढच्या पाट्या येत गेल्या तेव्हा मात्र ज्या कुणी ही संकल्पना मांडली असेल त्याला दाद द्यावीशी वाटली. सिनेमा तब्येतीत पाहायचाय हे तेव्हाच नक्की झालं. त्यामुळे तो निवांतपणे पाहीन. सध्या फक्त तुम्ही या टायटल्सचा आस्वाद घ्या.

Bombay Talkies

Poster1

Poster1

हे वरच्या फोटोवरचे लाटांचे तुषार अगदी खतरनाक!

मला ही जागा काही ओळखता आली नाही. कदाचित इतकी रिकामी दिसत असल्याने असावी.

गेल्या आठवड्यालत्या लोकसत्तामध्ये टीव्ही कलाकारांना त्यांच्या मालिकेतल्या नावांनीच ओळखले जात असल्याने आणि एक संपली की लगेच दुसरी मालिका चालू करण्याच्या नादात वाहिन्या या अभिनेत्यांची नामावली गाळत असल्याचा लेख होता. मला वाटलं. की यांना निदान कोणत्या ना कोणत्या नावाने ओळखलं तरी जातं. पण पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ यांसारखे लोक सर्वसामान्यपणे लोकांना माहितही होत नाहीत. अशा परिस्थितीत बॉम्बे टॉकीजची नामावली खरीच अभूतपूर्व (काही कॅरीकेचर्स पाहिलीयेत, पण बहुधा ती त्या-त्या त्ंत्र प्रकारातल्या लोकांची वाटतील अशी होती, त्यावरून हाच तो माणूस असं ओळखणं अवघड असावं.) म्हणायला हवी.

टीपः लेखातील सर्व छायाचित्रे व्हीएलसी प्लेअर मधील स्नॅपशॉट हा पर्याय वापरून काढलेली आहेत, आंतरजालावरून उतरवून घेतलेली नाहीत.)

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

आधीक शोध घेता ही ओपनींग क्रेडीटची "थिम ची कल्पना" सत्यजीत रे यांची होती असे दिसले.
ह्या दुव्यावर ती सुरवातीची टायटल्स बघता येतील.
नुकत्याच आलेल्या ओम शांती ओम मधे, व बहुदा मै हू ना मधे अशीच इनोव्हेटीव्ह क्रेडीट्स होती.

अजुन एक रोचक दुवा

पूर्वी काही हिंदी व मराठी सिनेमांना अ‍ॅनिमेशन असलेली टाटटल्स असायची ती बघायला मजा वाटायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रपटातील नामावली महत्वाची असते. (ती देण्यामागे काही नियम किंवा कायदा आहे काय?)

अवांतरः पुर्वी सिनेमातल्या पाट्या हाताने रंगवत. आताच्या फ्लेक्स च्या तंत्रज्ञानाच्या मानाने त्या रंगवणार्‍यांच्या कलाकारांचे कौशल्य वादातीत आहे. बर्‍याच जुन्या चित्रपटातील अ‍ॅनीमेटेड पाट्यादेखील पाहण्यासारख्या असायच्या. रावडी राठोडपासून तेच तंत्र सफाईदार (जरी ते पोस्टर्स हाताने केलेले नसले तरी) पद्धतीने सुरू झाले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

वा! पडद्यामागच्यांना पडद्यावर आणण्याची क्लृप्ती आवडली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खरंतर या पडद्यालाच छोटा पडदा म्हटलं पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.