जसपाल भट्टीला श्रद्धांजली.

'फ्लॉप शो', 'उल्टा-पुल्टा' आणि इतर टीव्ही मालिकांमधून विडंबनाला टीव्हीवर लोकमान्यता मिळवून देणार्‍या जसपाल भट्टीला श्रद्धांजली.

विनोदाकडे आपल्याकडे फार आदराने बघितलं जात नाही. पण दूरदर्शनच्या मोनॉपोलीच्या आणि उत्तम कार्यक्रम दाखवण्याच्या अखेरच्या काही वर्षांमधे फ्लॉप शो सुरू होता. जसपाल भट्टीने जवळजवळ एकहाती या कार्यक्रमाची जबाबदारी सांभाळली होती. राजकीय, सामाजिक विषयांवर अतिशय मार्मिक विनोद करून टिप्पणी करणारा जसपाल मला खूपच आवडत असे. जमून आलेल्या विनोदाशी ही माझी पहिली ओळख. 'फ्लॉप शो'च्या अगदी शीर्षकापासूनच तो स्वतःची थट्टा करत होता. एका भागात त्याने एक गाणं टाकलं होतं:
ओ सिरीयल बनानेवाले क्या तेरे मन मे समायी
काहे को सिरीयल बनायी, तूने काहे को सिरीयल बनायी॥
स्वतःपासून सगळ्यांवर विनोद करणार्‍या जसपालचा 'उल्टा पुल्टा' फार भावला नाही. अजूनही 'फ्लॉप शो' मात्र आठवतो.

जलंधरमधे एका अपघातात जसपालचं दुर्दैवी निधन झालं. द हिंदूमधली बातमी.

यू ट्यूबवर फ्लॉप शो आहे. अजूनही ते पाहून गंमत वाटली. विशेषतः येताजाता भावना भडकवून घेणारे लोकं आजूबाजूला दिसतात तेव्हा जसपालची निश्चितच आठवण होते.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

जसपाल भट्टी यांच्या दु:खद निधनानिमित्त त्यांचं स्मरण करणं हे होणारच. परंतु, त्यांना अर्थपूर्ण श्रद्धांजली आपण वाहू शकतो अशा सर्व कलाकृती आणि कलाकारांना आठवून , ज्यांनी राजकीय व्यंग - पोलिटीकल सटायर - या प्रकारामधे उत्तम कामगिरी बजावली.

"राग दरबारी"ची आठवण येणं अपरिहार्य आहे. दूरदर्शनवर येणारी , ओम पुरी अभिनित "कक्काजी कहीं" नावाची बिहारी भाषेतली मालिका मला आजही आठवते. ती अशक्य, अशक्य होती. पंकज कपूर अभिनित "ऑफिस ऑफिस" ही देखील. आणि हो, पोलिटीकल सटायरचा शहेनशहा : "जाने भी दो यारो" !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अवांतरः

त्यांना अर्थपूर्ण श्रद्धांजली आपण वाहू शकतो अशा सर्व कलाकृती आणि कलाकारांना आठवून , ज्यांनी राजकीय व्यंग - पोलिटीकल सटायर - या प्रकारामधे उत्तम कामगिरी बजावली.

हे वाक्य 'ज्यांनी राजकीय व्यंग-पोलिटीकल सटायर- या प्रकारामध्ये उत्तम कामगिरी बजावली, अशा सर्व कलाकृती आणि कलाकारांना आठवून आपण त्यांना अर्थपूर्ण श्रद्धांजली वाहू शकतो.' असे हवे का? का मी अपेक्षित अर्थापेक्षा वेगळा अर्थ काढतो आहे? मूळ वाक्य बरेच बोजड वाटते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही वाक्यरचना बरोबर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अलिकडच्या काळात सायरस ब्रोचा नामक एक म्याड मनुष्य अशा प्रकारचा The Week That Wasn't नामक "न्यूज शो" करत असे. आजकाल असतो का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जॉर्ज ऑरवेलच्या नावावरून "ऑरवेलियन वर्ल्ड" अशी संज्ञा इंग्रजीत अस्तित्त्वात आली. (दुसरे आठवणारे उदाहरण म्हणजे "काफ्काएस्क") राजकीय व्यंगाचा विषय निघाल्यावर "अ‍ॅनिमल फार्म" आठवणे अपरिहार्य.

चार्ली चॅप्लीनने "ग्रेट डिक्टेटर" "मॉडर्न टाईम्स" मधे केलेली राजकीय व्यंगे चिरस्मरणीय ठरली.

अलिकडच्या काळात पाहिलेलं उत्तम दर्जाचं राजकीय व्यंग म्हणजे "थँक यू फॉर स्मोकींग". फारच उच्च.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आजकल साशा कोहेन जे चित्रपट करतोय, एदा. 'बोराट', 'अली जी इन दा हाउस' आणि सध्याचा 'द डिक्टेटर' यातल्या एक प्रकारच्या रॅडिकल शैलीबाबत आपल्याला काय वाटते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

जसपाल भट्टींना श्रद्धांजली. फ्लॉप शो हा एक भारी प्रकार होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फ्लॉप शो ला सुपरहिट बनवून एक जागतिक विक्रम करणार्‍या या मार्मिक विनोदवीराला भावपूर्णी श्रद्धांजली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जसपाल भट्टी म्हटलं की त्याच्या टिव्ही शोज बरोबरच रस्त्यावर उतरून त्यांनी केलेली अनोखी आंदोलनं (जसे कांदे, भाज्या लॉकरमध्ये ठेवायला जाणे, त्यांचे दागिने करून रस्त्यावर फिरणे वगैरे वगैरे) याचीही आठवण आल्याशिवाय रहात नाही.

बातमी या धाग्यावरच कळली.. वाईट वाटलेच... त्यांच्या जाण्याबरोबर भारतातील एक दर्जेदार पॉलिटिकल सटायर आर्टिस्टच्या युगाचा अंत झाला आहे.
त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फालतु माकडचाळे आणि धिंगाणा न करता संयत चेहरयाने विनोद करायचा हे मुळीच खाऊचे काम नाहीये. पीएचडी करताना शिक्षकाची केलेली हुजरेगिरी, नवीन सिरीयल काढताना केलेले उपद्व्याप, टेलिफोन एजंट्शी घेतलेले पंगे, कार्यालयात बॉसला उल्लु बनवुन पिकनिक करायचे
फसलेले प्लान या अशा सामान्य माणसाच्या आयुष्यातल्या हजारो तर्‍हा जसपाल भटटींनी सादर केल्या. आर के लक्ष्मणचा कॉमन मॅन व्यंगचित्रातुन पडद्यावर आला. पण आजच्या कॉमेडी मालिका बघाव्याशा वाटत नाहीत कारण उगाच खोटेखोटे बालिश विनोद करण्यातच धन्यता मानली जाते.(ऑफिस ऑफिस सारखे काही अपवाद सोडल्यास)
फ्लॉप शो ला एक वेगळेच स्टँडर्ड होते आणि आज तिथपर्यंत कुणी पोहोचु शकलं नाहीये याचं दु:ख जास्त आहे. RIP जसपाल भट्टी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

जसपाल भट्टी यांना विनम्र श्रद्धांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0