मावशी-आजीचे घड्याळ

प्रास्ताविक :
माझ्या मनातले माध्यम आहे "स्क्रोलिंग टेक्स्ट". दूरचित्र वृत्तवहिन्यांच्या पायथ्याशी अविरत सरकत असतात, त्या लेखन-फिती. अशा अनेक ध्वनिफिती आपण समांतर वाचू शकतो, असा आपला अनुभव आहे. पण वृत्तवाहिन्यांतली ही पाठ्ये असंबद्ध असतात : एका फितीवर बाजारभाव आणि दुसर्‍या फितीवर हवामान, वगैरे. वाहिन्यांवरती दोन समांतर माहिती-धाग्यांचा एकत्र परिणाम झाला क्वचित योगायोग.

समांतर कथावस्तू, ध्वनी, अक्षर-आकार अधूनमधून गुंफणार्‍या समांतर दोन फिती वाचाव्या असे कधीपासून माझ्या मनात होते. परंतु हे संगणकावर कसे साध्य करावे, ते शोधण्यात मी आजवर सफल झालो नव्हते. याकरिता एचटीएमएल प्रणाली मला आज सापडली, तर मी हा लेखनप्रकार येथे देत आहे. म्हणून दोन पाठ्यफिती गुंफणारी कृती मी ऐसी अक्षरे स्थळाच्या वाचकांपुढे ठेवत आहे.

साधारण हीच दोन पाठ्ये वेगळ्या माध्यमात अन्य संकेतस्थळांवर मी पूर्वी सादर केली. आदली माध्यमे दोन होती : (१) दुहेरी ध्वन्यंकन केलेली ध्वनिफीत आणि (२) दोन-रंगी टंक वापरून पानावर दोन समांतर पाठ्ये लिहिणे. दोन्ही माध्यमांनी मला समाधान मिळाले नाही. समांतर ध्वनींकरिता संगीतशास्त्रातली प्राचीन आणि सिद्ध तंत्रे - ताल/लय/स्वरमेळ - ही माझ्या पाठ्यांकरिता असयुक्तिक होती. एकावर-एक लादलेली दोन अभिवाचने एकमेकांत गुंफण्याऐवजी काहीच नीट ऐकू येत नव्हते. आणि पानभर विखुरलेली दोन पाठ्ये समांतर अनुभवणे डोळ्यांना जमत नव्हते. एक तर एका रंगातला मजकूर वाचला जाई, किंवा दुसर्‍या रंगातला मजकूर वाचला जाई.

समांतर लेखन-फितींमध्ये ही कृती आता माझ्या मूळ कल्पनेच्या जवळ पोचली आहे. तर आता प्रास्ताविक पुरे आणि लेखनफिती समोर ठेवतो. फिती सुरुवातीपासून चालू करण्यासाठी पान ताजे (रिफ्रेश) करावे. या लेखनफिती पूर्ण सरकायला ~६.५ मिनिटे लागतात. टंकाचे आकार मान (फाँट साइझ) थोडासे वाढवले तर वाचन सोयीचे होईल आणि अनुभव सुधारू शकेल.

------------------------------------------------------------
मावशी आजीचे घड्याळ
------------------------------------------------------------
* - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * -
* - * - * - * - * - * - * - * - मावशी आजीचा सदाशिव पेठेत पूर्वी एक फ्लॅट होता. अंधारी चिंचोळी जुनी होती ती इमारत. आजीच्या घरी पूर्वी इतकी येजा नसे. आतमध्ये गेल्यावर पाण्याचे विचारल्यानंतर आजी गप्पांत रमून जाई. "खरे खरे सांगते …" किती पूर्वीच्या कितीतरी गोष्टी. "बाबारे बाबा, पुन्हा विसरला आपला तो हा चावी द्यायला." आजी कधी कावून जाई... "दर वर्षी कोकणातून येत असत आमसुले. मामी-आजीच्या हुंड्यासाठी हांडे आले, कुठे गेले? कारभार तुझ्या तात्या-आबांचा अघळ-पघळ. हेच घड्याळ नवे कोरे देणार होते मेहुण्यांना! फार प्रेमळ होते हे, पण व्यवहाराचे कच्चे फार! त्यांचे वर्ष-श्राद्ध तरी आठवणीने कोण करते? – आपला तो 'हा' आज-काल फिरकत नाही. तात्या-आबांनी किती केले त्याच्यासाठी!" - - - - मावशी आजीच्या सदाशिव पेठेतल्या घरात येजा कमी-कमी होत चालली. दूरचा मी त्या दिवशी अवचित आलो. घरी परतून किती दिवस ठणका टिकेल. ठणका टिकेल?- * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * -
* - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * -
* - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - मावशी आजीच्या सदाशिव पेठेतल्या फ्लॅट-मध्ये अंधारात सदान्-कदा घड्याळाची टिक्-टिक् टिक्-टिक् - नेमकी कुठून येत असे अंधारात कळत नसे. मध्येच मग कोनाड्यातून खर्र खर्र आवाज येई... ठण्... ठण्... ठोके बहुधा मागे-पुढे असत. पुन्हा सुरू होई टिक्-टिक् टिक्-टिक्... हे घड्याळ तात्या-आबांना पणजोबांनी दिले होते लग्नासाठी. तात्या-आबांच्या हयातीत कारभार सगळा चोख असे. आठवड्याच्या आठवड्याला किल्ली देणे. महिन्याच्या महिन्याला पत्रे लिहिणे. वर्षाची वर्षाला सण-श्राद्धे चोख करणे. आठवड्याची आठवड्याला किल्ली नाही होत आता घड्याळाला. तरी सुद्धा आपले आपले कुरकुर करत शिथिल स्प्रिंगी चालते आहे. मीच उठलो. घड्याळाशी जाऊन चाचपून शोधली किल्ली. मावशी आजीच्या सदाशिव पेठेतल्या घड्याळाला त्या दिवशी मिळाली चावी, काटे मात्र मागचे मागे राहिले. टिक्-टिक् टिक्-टिक् ठण्... ठण्... ठण्... * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - *
* - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * - * -
------------------------------------------------------------

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

मस्त प्रयोग!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

आयडियाची कल्पना भारी आअहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

समांतर कथन आवडलं. ध्वनिफीत स्वरूपात ऐकलं होतं, पण ते परिणामकारक नव्हतं झालं. आशय सापडायला कष्ट पडले होते. इथे मागे पडलेल्या घड्याळाची गोष्ट आणि मावशी आजीची गोष्ट यांमधलं सामंतर्य छान आलेलं दिसतं. दोन्हींची सुरूवात आणि शेवट समान ध्वनीच्या शब्दांनी होतो त्यामुळे एका रस्त्याचे दोन फाटे फुटून ते एकत्र आलेले जाणवतात. अधून मधूनही काही सम-ध्वनी शब्द किंवा समांतर कल्पनांमुळे ते रस्ते थोडे जवळ येऊन एकमेकांना चिकटतात.

हे दोन्ही परिच्छेद कथेला आवश्यक आहेत, पण ते एकमेकांमागे वाचता येत नाहीत. त्यामुळे समांतर वाचन ही कल्पना निव्वळ वैविध्य म्हणून नाही, तर कथावस्तू सांगण्याची गरज म्हणून येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विचार करायला भाग पाडणारा प्रयोग अाहे. अभिजात पाश्चात्य संगीतातल्या counterpoint या संकल्पनेची अाठवण झाली. वाचून झाल्यावर मी त्याच धर्तीवर दोनतीन कृती मनातल्या मनात रचून पाहिल्या.

एक तितकीशी न रुचलेली गोष्ट नमूद करतो. या दोन्ही मजकुरांचा जो scrolling rate अाहे, त्यापेक्षा माझ्या वाचनाचा वेग खूपच जास्त अाहे. त्यामुळे एखाद्या हळूहळू चालणाऱ्या सुंदर मुलीबरोबर फिरायला गेलं तर जशी दमछाक होते, तसं काहीसं झालं. यावर काही उपाय अाहे का याबद्दल मला शंका अाहे, कारण वाचण्याच्या वेगावर नियंत्रण राखून असणं हा या कृतीच्या अंतर्रचनेचाच भाग अाहे. (नेहमीच्या लिखाणामध्ये अर्थात लिहिणाऱ्याने हे नियंत्रण सोडून दिलेलं असतं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

योग्य सूचना आहे, सरकायचा वेग आता कमी केला आहे. नवा वेग "१" आहे, तर आदला वेग "२" होता. आता ४ मिनिटांऐवजी ६.५ मिनिटे लागतात. मधला वेग निवडता येत नाही Sad

बरोबर आहे, पॉलिफोनी/काउंटरपॉइंट हे बीज आहे. वरील कृती फ्यूग-सदृश आहे. पण प्रणालीशी अजून झटापट चालू आहे. मधले "स्ट्रेट्टो" हवे तसे नेमके आलेले नाहीत. फाँट साइझ बदलला, तर दोन फिती एकमेकांच्या सापेक्ष थोड्या मागेपुढे होतात... या ठिकाणी प्रपोर्शनल फाँट ऐवजी फिक्स्ड-विड्थ फाँट असता तर रचना अधिक घट्ट विणीची होऊ शकली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0