सूक्ष्मकथा - १ ते ४

सूक्ष्मकथा - १

कालच मला बायकोने विचारले की "तुला स्वत:ची आई आणि आजी सोडून
कोणत्या प्रकारच्या बायका आवडतात?"

मी उत्तरलो, "मला स्वत:च्या प्रगतीबरोबर स्वत:च्या
कुटुंबाची प्रगती साधणार्‍या बायका मला आवडतात."

वेताळ परत झाडवर जाऊन लोंबकळू लागला...

सूक्ष्मकथा - २

माझी कन्या पहिलीत किंवा दूसरीत असताना तिने मला एक शंका विचारली.

"बाबा, सगळे आईबाबा बेबीज् व्हायच्या अगोदर लग्न का करतात?"

मी दचकलो आणि विचारले, "का ग?"

कन्येने खुलासा केला, "बेबीज् व्हायच्या अगोदर लग्न केलं की
मग बेबीजना आईबाबांच्या लग्नाची गंमत एन्जॉय करता येत नाही म्हणून..."

...मग वेताळ परत झाडाला लोंबकळू लागला!

सूक्ष्मकथा - ३

आज झोपेत एक स्वप्न पडलं...

झाडाखाली बसून
ओक्साबोक्शी रडताना कृष्ण दिसला.
मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला
आणि विचारलं,
"अरे काय झालं?"

तो म्हणाला, "मी हरलो.
आण ती गीता. जाळून टाकतो.
सहस्रसूर्यांच्या तेजाशी बरोबरी करणारा मी
एक युद्ध थांबवू शकलो नाही."

पुढे म्हणाला, "त्याने तर असंख्य लढाया थांबवल्या.
आता सांग कोण जिंकलं?"

मला उत्तर देणं भागच होतं.
मग काय?

... मग वेताळ परत झाडावर जाऊन लोंबकळू लागला.

सूक्ष्मकथा - ४

परीक्षेच्या आदल्या रात्री
मेस मधल्या टेबल भोवती
चहाचे घुटके घेत
मित्रांची मैफल रंगली.

विषय निघाला,
कोण कुठे राहतो?

एकजण म्हणाला
"मी दूसर्‍या मजल्यावर"
दूसरा म्हणाला
" मी चवथ्या मजल्यावर"
कुणी म्हणाला
" मी पंधराव्या मजल्यावर"

पंधरापैकी चौदाजण होते,
समुद्रसपाटीपासून
कुठल्या ना कुठल्या मजल्यावर.

चौकशीची सुई
माझ्याकडे वळली
तेव्हा मी शरमलो.
मनातल्या मनात हिरमुसलो

कारण पंधराजणात
मी एकटा होतो
राहात तळमजल्यावर.

तत्क्षणी मानगुटीचा
वेताळ म्हणाला
"अरे तुझा तळमजला कुठे आहे
ठाऊक आहे ना?"

मी म्हटलं,
"अरेच्चा समुद्रसपाटीपासून
५६० मीटर उंचीवर"

वेताळ म्हणाला
"मग कशाला शरमतोस?
हा मी चाललो"

... मग वेताळ परत झाडावर जाऊन लोंबकळू लागला.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

भावनांच्या/प्रश्नांच्या सुक्ष्म छटा चांगला उतरल्या आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नविन प्रयोग खुपच आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रयोग रोचक आहे!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'आय स्टोरिज' ('हुशार फोन' वर झर्र्कन वाचता येण्याजोग्या कथा ) या नावाने सध्या हा कथा प्रकार बर्‍यापैकी लोकप्रिय होत आहे.

कथा क्र.३ आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कन्येने खुलासा केला, "बेबीज् व्हायच्या अगोदर लग्न केलं की
मग बेबीजना आईबाबांच्या लग्नाची गंमत एन्जॉय करता येत नाही म्हणून..."

आणि कन्येला हे माहित नव्हते की बेबीज झाल्यावर आईबाबांना लग्नाची गंमत एन्जॉय करता येत नाही म्हणून!

-आणि वेताळ 'झाड' वर लटकून दांत विचकू लागला.

सूक्ष्मकथा-५:
आमच्या घरी एकदा गणपती हा विघ्नकर्ता आहे असा शोध लागला.
वेताळाला याचा पत्ता लागला.
"आता या घरी तो तरी राहील नाहीतर मी", वेताळ म्हणाला.
त्याक्षणी आम्ही गणपतीला घरातून हद्दपार केला.

तरी वेताळ झाडावर जाऊन लोंबकळू लागला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुक्ष्म कथा.५ पण एकदम झकास!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे तर छोटे विनोद आहेत Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0