(अपग्रेड निबंध : एक निबंध-पोएम)

प्रेरणा

मी वयाच्या आठव्या वर्षापासून निबंध लिहीत आलो आहे असं म्हणालो तर इतर कुणाच्या आधी मीच ते खोडून काढेन. म्हणजे एका कागदाच्या आणि माझ्या मध्ये घडणाऱ्या विचार-शारीरिक काही घटना मी निबंध या मोठ्या कॅटेगरीत टाकल्या, त्या वेळच्या माझ्या विचारांबद्दल असलेल्या माझ्या आत्ताच्या विचारांना शब्दांनी रि-घडवलं तरी त्यानी व्याख्येप्रमाणे निबंध समोर ठेवता तर काही येत नाही. निबंध म्हणून एक काहीतरी एंटिटी पाठ्यपुस्तकांतून दिसायची, आणि मनातले विचार हे एखाद्या पेइंगगेस्टप्रमाणे डोक्यात मुक्त जगायचे - खोली वेळच्यावेळी न आवरता, आणि भाडं तंगवत. आता या निबंधाला मी आकार देण्यासाठी मालकी हक्क रि-झाइन करून त्याच पेइंग गेस्टना वहिवाटीच्या हक्काचे पेपर्स साइन करून त्यांना रि-प्रस्थापित करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी रि-घ्यावी लागते ही या दोन वेळांतली डिफरन्शिएटिंग इव्हेंट आहे. याची रि-जाणीव होताना मेंदूच्या एकेक भेगांचा भुगा होता होता स्वतःच्या भंजाळलेल्या मेंदूच्या घरांतून वेगवेगळे पेइंग-गेस्ट-टर्न्ड-मालक एका खोलीतून दुसरीत पटावरच्या पीसेसप्रमाणे हलवावे लागतात याचं ज्ञान मिळायचं. हे मालक मग एकमेकांना फाट्यावर मारतात, मेंदूच्या रचनेला मारतात आणि कोणत्याही पातळीवर जाऊन कागदावर बाहेर उतरण्यात यशस्वी होतात. विचारांशी नाळ पृथ्वीला वेढा घालेल इतकी लूज ठेवली तरी निबंध या कॉन्स्ट्रक्टलाच धक्का लागलेला पाहिला नाही मी कधी. शिस्तीच्या स्कॅफोल्डिंगला न जुमानता त्यामधून बाहेर डोकावणाऱ्या विचारमांडणीतूनही निबंध-लेखनाचं वर्चस्व आपल्या शाश्वतिसुखलोलुप मनाने मान्य केलेलं असतंच. मी जेव्हा अशा लेखनातून मिळणाऱ्या शाश्वतीचा आणि डोकं भंजाळण्याचा विचार करतो तेव्हा मला शाश्वतानंदाच्या अक्षांशी अक्षरशः भांडण करण्याचं सुखही मिळत नाही.

निबंध हा फॉर्म ऑफ एक्स्प्रेशन म्हणून काय आहे हे सांगण्याची गरज नाही. प्रत्येकाची स्टाइल भिन्न असली आणि काही अमॅच्युरिश अटेंप्ट असले तरी आपल्या मनाला भिडलेल्या विचारांच्या उत्स्फूर्त आणि काहीशा अनिवार्य सादरीकरणाच्या ऊर्मीशी नाळ तुटलेली नसल्याने त्याचं कागदाशी घडणाऱ्या विचार-शारीरिक प्रक्रियेतून तो घडतो. एकाच उपप्रकारातले निबंध किती विविध स्वरूपात आणि वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात याचा रि-सर्च केला तर लक्षात येईल विचारांची सुसंगती ही अज्जिबात सेक्रिड गोष्ट नाही. थिअरेटिकल रिगर हा निबंधाचा अत्यंत वरवरचा भाग आहे. ही रिगर स्वतःची. माझ्या मेंदूतल्या घराच्या भिंतींप्रमाणे. पण हे पेइंगगेस्ट जेव्हा त्या भिंती न जुमानता एका खोलीतून दुसऱ्या खोलीत वायफाय सिग्नलप्रमाणे घुसतात तेव्हा या रिगरचं महत्त्व नष्ट होतं. एका खोलीनंतर दुसरी खोली असा रिजिड फॉर्म रहात नाही. आणि सगळंच कसं ट्रान्स्परंट आणि फ्लुइड होऊन जातं. त्यामुळे विचारहीन निबंध हे निष्काम कर्मयोगाप्रमाणे कार्यकारणभावाची ओझी वाहतं. त्यामुळे मग ती ओझी उचलण्याचे कष्ट आपल्याला घ्यावे लागत नाहीत. निरोझी असणाऱ्या माणसाला ओझी न उचलण्याच्या कामनेचं ओझं वहावं लागतंच. सार्वजनिक लेखनप्रपंचात या विचार-शारीरिक कृतीशी प्रतारणा न करणारांची कारणंही तशीच वेगवेगळी असू शकतात.

निष्ठा असताना केलेल्या निबंधलेखनात तर हा इंटेन्सिटीचा मुद्दा क्रुशल होतो. ज्या विचार-पेइंगगेस्टबद्दल आपल्याला विशेष आकर्षण वाटतं त्याचाशी आपण निष्ठा बाळगतो. या वाक्याला उलट केलं तर ज्या विचाराशी निष्ठा बाळगतो त्याच्याविषयी आपल्याला आकर्षण वाटतं. हे विधान (किंवा त्या आधीचं, कुठचं त्याविषयी खात्री नाही) सामाजिक निष्ठांच्या संस्थात्मक नियंत्रणासाठी पायाभूत ठरतं. व्यक्तिगत पातळीवर नेलं तर 'मी' ज्या विचाराबद्दल निष्ठा बाळगतो त्याबद्दल 'मी' निबंध लिहितो. याउलट मी निबंध लिहितो त्या विचाराबद्दल निष्ठा बाळगतोच असं नाही.

(यानंतरचे बरेच परिच्छेद मी लिहिले पण ते लोकांना समजतीलच असं नाही. आणि तसेही माझ्या विचारांच्या दृष्टीने ते आवश्यक नाहीत. त्यामुळे मी डायरेक्ट पॉइंटवर जंप मारतो)

एकंदरीत निबंधात येणारे विचार आणि निबंधाच्या फॉर्मॅटमधून त्यांच्या मांडणीवर घातलेले कंस्ट्रेंट्स हा कॉंप्लेक्स विषय आहे. त्यामुळे त्या विषयावरची मांडणी ही तितकीच कॉंप्लेक्स हवी. तुम्ही जितकी कॉंप्लेक्सिटी एखाद्या विषयाला द्याल तितकीच तुम्हाला त्यातून मिळेल हे उघड आहे. समाजातील निबंधलेखन नियंत्रण-संस्थेने ते वाचणाऱ्याला समजावेत या उदात्त हेतूने तयार केलेले नियम आता आउटडेट होत चाललेले आहेत. आपल्या डोक्यातल्या पेइंग-गेस्ट्सना जागा द्यायची की नाही हा वाचकाच्या मनात ऑप्शन असतो हे लक्षात घेतलं की निबंधाची रिजिड रूपरेखा टिकवण्यासाठी आटापिटा करावा लागणार नाही. विचारांचा प्रवाह विशिष्ट नळातून, एका थेंबामागून दुसरा थेंब असा येण्याची गरज रहाणार नाही. 'एकाच वेळी शॉवरहेड, टब आणि समुद्राच्या लाटा या स्वरूपात विचारांची देवाणघेवाण होणं गरजेचं आहे' असे उद्गार काढणारा कोणी भेटण्याची मला खूप इच्छा आहे. या पाण्यातून पोहणारांनी लेन्स पाळणं बिलकुल गरजेचं नाही. किंबहुना निबंधाला निर्बंधहीन करायचं असेल तर हा फॉर्म अपग्रेड करून त्याला निबंध-पोएम स्वरूपात विचारमांडणी करणं अत्यावश्यक आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

I do approve of the overall rokh of your lekh, but it seems to use needless sulabhikaran, and hence whatever should be sukshmatisukshma and tarala has become vajavibaher sopa-sopa. When avashyak ti vyamishrata has been restored, the general saransh of your lekh seems to be something like this:

`The nibandh as an idealized kalpana as explained udaharanartha in the Navneet guidebooks does not really exist. That is just a krutreem soy made for the facility of shalakaree pupils who are going to write boardachee pariksha. As one's writing and reading develops, and one comes across the nibandhas of Chiplunkar, Addison, Montaigne ityadi, this kalpana also undergoes eka tarhecha transformation. Some lok say ki baba this transformation is a kind of betrayal of one's shaleya identity. But that is a misconception. It is a chinha of maturity that we should give tilanjali to our earlier samjuti, and upgrade our basic manasik sacha of nibandh.'

Due to the degrading effect of the sulabhikaran mentioned above, I am no longer sure whether this is the lekhak's actual vicharprakriya or not. And the avvachyasavva use of Ingraji words in the lekh is atishay khatakanara.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

साष्टांग दंडवत स्विकारावा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरं तर हे पुनर्लेखन न वाटता स्वतंत्र लेखच वाटतो आहे.
प्रेरणा हे उगी आपलं निमित्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0